मराठ्यांचा इतिहास - पुस्तकांची यादी व साधने.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मराठ्यांचा म्हणजे आपला ईतिहास वाचायची खुमखुमी प्रत्येकाला असते पण काय वाचावे हे न कळल्यामुळे आपण प्रकाशित कादंबर्‍यांनाच "ईतिहास" समजतो. यात आपले मत पुर्वग्रहदुषीत होन्याचा फार संभव असतो. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की कादंबर्‍या वाचने चुकीचे आहे. ऐतीहासीक कादंबरी तो कालखंड त्या व्यक्तीच्या व लिहीनार्‍या व्यक्तीच्या दॄष्टीने सांगत असते आणि यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होऊ शकतात. पण ह्या कादंबर्‍या सामान्य वाचकांना ईतिहास सांगू पाहातात हे ही नसे थोडके.

मला ईतिहास समजावून घेताना खालील पुस्तकांची मदत झाली. ती यादी मी देत आहे. ही यादी पुर्ण नाही. (कारण पुर्ण होने शक्य नाही). यात मला आवडलेल्या, महत्वांचा पुस्तकांची नावे आहेत. वाचकांनी देखील काही महत्वाची पुस्तके वाचली असनारच . आपण वाचलेली पुस्तक ही प्रतिक्रियेत लिहीली तर ती या यादीत समाविष्ट करत येईल.

कादंबर्‍या.

छत्रपती शिवाजी
श्रिमान योगी.
छावा
संभाजी
छत्रपती संभाजी
राऊ
मंत्रावेगळा
पानिपत
स्वामी

ऐतीहासीक पुस्तकांची यादी -

मराठी रियासत - गो.स.सरदेसाई ( जुने खंड १ ते ४५ पण ते नविन संपादित कमी केले आहेत)
ईतिहास संग्रह - भाग १ ते ७, संपादक पारसनिस.
मराठ्यांचा ईतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे
शिंदेशाही ईतिहासाची साधने - संपादक आनंदराव फाळके. ( पानिपत साठी उपयोगी)
मराठ्यांचा ईतिहासाची साधने खंड १ ते ६ - संपादक वि का राजवाडे
ऐतीहासीक पत्रव्यवहार. गो.स.सरदेसाई, कृ पा कुलकर्णी
बाळाजी बाजीरावची रोजनिशी - संपादक पारसनिस.
मोगल मराठा संघर्ष - सेतु माधवराव पगडी
श्री छत्रपती शिवाजी - शेजवलकर
श्री छत्रपती महाराजयांचे चिकीत्सक चरित्र्य - वा सि बेंद्रे
श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र्य - वा सि बेंद्रे

ईंग्रजी पुस्तक.

A History of the Mahrattas Volume 1, 2 and 3 James Grant Duff ( अमॅझॉन वर हे अजुनही मिळते)
The Marathas 1600-1818 -The New Cambridge History of India by Stewart Gordon
History of Aurangjeb - Sir Jadunath Sarkar
Military History of India - Sir Jadunath Sarkar
Rise of the Maratha power, and other essays, by M.G. Ranade
Marathas and the Marathas country by A. R Kulkarni
The second Maratha campaign, 1804-1805: Diary of James Young, officer, Bengal Horse Artillery, and twice sheriff of Calcutta by James Young

ही काही पुस्तक. यातील बरिच सहज उपलब्ध नसतात तर काही महत्वाची अजुनही प्रकाशनात आहेत. अप्पा बळवंत मध्ये बहुतेक सर्वच मिळतील पण काही अमेरिकेतही सहज मिळू शकतील. ( जसे ग्रांट डफ). वरिल पुस्तके ही खास करुन मराठ्यांचा ईतिहासाचीच आहेत, ह्यात मी केम्ब्रींज हिस्ट्री ऑफ ईंडिया सारखी प्रकाशने टाळली आहेत कारण ती पुर्ण भारतासाठी आहेत.

ही यादी निश्चीतच अपुर्ण आहे पण ईतिहास वाचकासांठी भरपुर होईल. मला स्वतःला मराठी रियासत व मराठ्यांचा ईतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे हि दोन पुस्तके जास्त आवडतात कारण ह्यात भरपुर माहीती सोप्या व सहज शैलीत दिली आहे.

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद सिंड्रेला. ती कांदबरी राहीलीच लिहायची.
पण सुचवताना कांदबरी शिवाय खर्‍या ईतिहासाची पुस्तके सुचविने अभिप्रेत आहे.

म्हणुनच मी प्रश्नचिन्ह टाकले. कारण ह्या कादंबरीत आलेले सर्वच प्रसंग किंवा माहिती अस्सल आहे की नाही हे मला माहिती नाही.

ठिकय. आपण सर्वच चांगली पुस्तके, कादंबर्‍यांसहीत लिहूयात. (मला आता कादंबर्‍या आठवने सुरु करावे लागेल).

चांगली पुस्तके, कादंबर्‍यांसहीत लिहूयात >> लेखक आणि जमल्यास प्रकाशन पण लिहुयात का ? Happy

धन्यवाद केदार. चांगली माहिती मिळतेय.
हो हो लेखक आणि प्रकाशकहि हवेत. खुपच मदत होईल त्यामुळे.

केदार, हे मस्त केलेस! धन्यवाद Happy

मला बाबासाहेब पुरंदर्‍यांचे 'राजा शिवछत्रपती' हे पुस्तक सर्वात आवडते. मेहेंदळ्यांची पुस्तकेही छान आहेत

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

कुनि मला चंबलेच्या पलिकड हे पुस्तक मिलवुन देवु शकते का ? हे पुस्तक महादजि शिदे वर आहे. खुपच छान पुस्तक आहे.

'शिवाजि महाराज' - सेतुमाधवराव पगडि-अत्यंत अभ्यासपुर्ण व अभिनिवेशरहित इतिहास.
'शिवाजि कोण होता?'- हे एक छोटे booklet but must read.
नरहर कुरुंदकरांचे अनेक लेख- त्याच एक संग्रहित पुस्तक आहे, पण नाव आठवत नाहि
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

नरहर कुरुंदकरांचे अनेक लेख >> त्या पुस्तकाचे नाव शिवरायांचा आठवावा प्रताप आहे बहुतेक. नरहर कुरुंदकरांकडून मला स्वतःला अनेक पुस्तके मिळाली होती, लहानपणी. त्यांचेच पुस्तक मी विसरलो द्यायला. हे पुस्तक खरेच छान आहे.

केदार, पुस्तकांच्या यादीबद्दल अनेक धन्यवाद..!!!

केदार, मी अहिल्याबाई होळकरांवर एक पुस्तक वाचते आहे. 'ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर' हे पुस्तक 'विनया खडपेकर' यांचे आहे. कादंबरी नाही, खूप संशोधन आणि अभ्यास करुन लिहिले आहे. नुकती सुरुवातच केली आहे वाचायला. १८ व्या शतकाच्या मराठ्यांच्या इतिहासात होळकरांनाही स्थान आहे तेव्हा वाचून झाल्यावर यादीत टाकता येईल का सांगते. तुला हवे असेल तर नंतर वाचायला पाठवू शकेन.

होळकरांवरील हे पुस्तक मी वाचले नाही पण अभ्यासू असेल तर प्लिज मला पाठव, कदाचित काही नविन माहीती संदर्भासाठी मिळेन.

धन्यवाद केदार!!
मि कालच श्रीमान योगी वाचून सम्पवले. आधीही वाचले होते. पण खूप प्रश्न पडले. अर्थात कादम्बरीतील वर्णिलेले सर्व प्रत्यक्षात घडले असल्यास. उदा. राजे अतिशय मुत्सद्दी, औरन्गजेबाचा पराभव करुन काशीविश्वेश्वराची स्थापना करण्याचे कार्य सिद्धीला जाण्याआधी, घरात होणार्या विषप्रयोगाबद्दल सावध का राहू नये??

केदारभाउ, खालील लिंक पहा www.indianexpress.com/news/researcher-finds-reference-to-shivaji-maharaj...">
ही बातमी तुम्ही वाचली होतीत काय?
मला तरी हा शोध नुकताच लागला
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

हो. ही बातमी मी वाचलीय गेल्या महिन्यात. गंमत म्हणजे लंडन मध्ये आधी महा सरकारने अनेकांना मराठ्यांचा इतिहासाची साधने तपासायला सरकारी खर्चाने पाठविले होते, कोणीही हे शोधले नाही, ( वा त्या दृष्टीने प्रयत्न केला / झाला नाही) सायली दातारांचे अभिनंदन. त्यांचा रिसर्च प्रसिध्द व्ह्यायची मी वाट पाहनार आहे. Happy

राजेश्री आणि राजा शिवछत्रपति मला दोनीही पुस्तके मला थोडीसी पूर्वग्रह दूषित वाटली राजा शिवछत्रपति तर मी प्रकाशनातच विकत घेतली होती. हो एक मात्र मान्य केले पाहिजे की हे दोन पुस्तके वाचल्यानंतर संभाजी महाराजां बद्दल आणखी वाचावयास हवे ही ओढ़ लागली, कारन त्यांच्या पधतशिर बदनामिचा प्रयत्न होतोय असे राहून राहून वाटले.