२६ मे : वर्षाविहाराच्या दवंडीची दवंडी आली आणि मायबोलीवर नव्याने आनंदाची लकेर उठली.
८ जून : प्रत्यक्ष दवंडी झाली, वर्षाविहाराचं ठिकाण जाहीर झालं आणि यू.के.’ज् रिसॉर्ट हे नाव मायबोलीवर सर्वतोमुखी झालं.
... आणि आज हा वर्षाविहार-२०१०च्या सविस्तर माहितीचा धागा आलाय तुमची उत्सुकता शमवायला.
एखाद्या गोष्टीची खुमारी वाढवत न्यायची असेल तर ती अशी!
गेली सात वर्षं चालू असलेला हा वर्षाविहाराचा उपक्रम आहेच तसा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा!
तर मंडळी, मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१०...
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ;)) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे १८ जुलै २०१० या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज् रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.
नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.
१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंबई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?
नावनोंदणीची अंतिम तारीख आहे ११ जुलै २०१०.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा.
नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०१० साठी वर्गणी आहे :
प्रौढ : रु. ६५० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४००, बस : रु. २००, इतर खर्च : रु. ५०)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ४०० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्या खर्चाचा अंतर्भाव आहे.)
पुणे आणि मुंबई इथे ११ जुलै २०१० या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०१० संयोजन समिती :
पुणे -
प्रणव कवळे (प्रणव कवळे) फोन : ९७३००१८१२८
सचिन (सचिन_dixit) फोन : ९८९०८२०७००
राजेश जाधव (राज्या) फोन : ९८८१४९८१८९
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
मुंबई -
विनय भिडे (विनय भिडे) फोन : ९८२०२८४९६६
निलेश वेदक (नील वेद) फोन : ९७०२७२१२१२
कविता नवरे (कविता नवरे)
अमित देसाई (असुदे) फोन : ९३२१९१७२१५
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति)
आनंद केळकर (आनंद्_सुजू): ९८२०००९८२२
http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज् रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी मावळसृष्टी इथे पार पडलेल्या ववि-२००९ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
तेव्हा, भेटू या, २०१०च्या वविला!
मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे
१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद केळकर ह्यांच्याशी संपर्क साधावा)
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am
मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया १० जुलै पर्यंत इमेल करा किंवा ११ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत श्री विनय भिडे ह्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करुन संपर्क साधावा.
पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
बस नंबर - MH12 FC 3344
बसचा रंग - पांढरा / केशरी - (अंबिका ट्रॅव्हस)
१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)
२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)
३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)
४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am
प्रत्तेकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवडहुन येणार्यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.
नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.
सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.
कोलमडत चाललेले बजेट आठ-दहा
कोलमडत चाललेले बजेट आठ-दहा जुलै पर्यन्त किती सावरल जातय यावर सारे काही अवलम्बुन असेल!>>>>> लिंब्या, बजेट नाही कोलमडलं तर यायला काही प्रॉब्लेम नसणारच आहे. आणि समजा कोलमडलं.... तर घरी राहून शिव्या( आणि इतर जे काही खात असशील एरवी अशा प्रसंगी ते) खाण्यापेक्षा ववि ला आलेलंच बरं, नाही का?
आपण लोकांना पाण्यात लोटू
आपण लोकांना पाण्यात लोटू किंवा उचलून फेकू शकतो.>>>>> विन्या, तू हे वाक्य फार धाडसाने उच्चारतो आहेस असं नाही का वाटत तुला :फिदी:.... आपल्या माबोकरांना (विशेषतः माबोकरणींना) तू म्हणजे अगदीच 'हे' समजतोस का? इतक्या सहजासहजी लोटू किंवा उचलून फेकण्याइतकी ताकद कमावायला दिवस फार थोडे उरलेत
नक्कीच मालक , आम्ही आप्ल्या
नक्कीच मालक , आम्ही आप्ल्या आदन्याचा (आपलेपनाचा) मान नक्कीच ठेऊ.. काळजी नसावी
अग बै ग, येवढ सोप नाहीये ते,
अग बै ग, येवढ सोप नाहीये ते, घरात बसुन शिव्या खाण परवडेल एकवेळ! कसं ते सान्गतो
मी निघालो की दूचाकीवर अजुन कोणतरी पाहीजे, तर समजा धाकटीला घेतले, तर थोरली म्हणणार मी का नको? मग तिघान्करता जीप काढली तर लिम्बी म्हणणार मी काय घोडं मारलय? अन रहाता राहिला थोरला, समजा त्याला ठेवला घर साम्भाळायला आज्जीच्या सोबतीला, तरी तो कुरकुरणारच, तर त्यालाही धरला, तर एकुण डोकी होतात पाच! त्यात म्हातारीपण मागे लागली यायच बरोबर घाट बघायला म्हणून तर सहा! अन आमच्यातले दोन पेईन्गगेस्ट जर माबोकर बनुन निघाले तर टोटल आठ!
कस जमवायच हे गणित????????
त्यापेक्षा आता येवढ्या सुविधा निघाल्या, शास्त्र/विज्ञान येवढ पुढे गेलय, बरेच माबोकर आयटी की फायटीमधले आहेत, तर वविचे ऑनलाईन प्रसारणच का करत नाही? मी घरबसल्या सगळ्यान्ना कॉम्प्युटर समोर बसवुन ववि दाखवेन हव तर लाईव्ह इफेक्ट करता प्रोक्षण करेन!
सन्योजक मण्डल, विचार करा बर यावरही!
सही लिम्ब्या
सही लिम्ब्या
लिंबू मग तुम्ही
लिंबू मग तुम्ही महाभारतात्ल्या संजयचा नवा अवतार गाठा, म्हणजे तो बघेल ववि नी सांगेल तुम्हाला
मजा करा लोक्स ! शुभेच्छा !
मजा करा लोक्स !
शुभेच्छा !
पहिला तर मी घारु ला पाण्यात
पहिला तर मी घारु ला पाण्यात फेकीन म्हणतो, पण टोलक जमवायला हव त्याकरता....
आनंद केळकर ला तर शक्यच नाही फेकन पाण्यात... महापूर यायचा...:फिदी:
मी निघालो की दूचाकीवर अजुन
मी निघालो की दूचाकीवर अजुन कोणतरी पाहीजे>>>>> मुळात तूच इथून सुरुवात का करतोयस पण??? सुट की आग्र्याहून पहाटेच गुपचुप येकलाच
महापूर यायचा>>>> असलेलं पाणी
महापूर यायचा>>>> असलेलं पाणी पण गडप व्हायचं नाहीतर
विनय, लिंबू, मंजे
विनय, लिंबू, मंजे
अकुरडी / निगडी तुन कोणि जाणार
अकुरडी / निगडी तुन कोणि जाणार आहे का ?>>> मी आहे..
लिंबु भाव, राम
लिंबु भाव, राम राम.
तुमच्याशिवाय ववि व्हायचा कसा? तुम्हाला यायलाच हवं.
तुमच्याशिवाय ववि व्हायचा कसा?
तुमच्याशिवाय ववि व्हायचा कसा? तुम्हाला यायलाच हवं. >>>
हो गेल्या वेळेस टांगारु झाला होता हा...
आनंद केळकर ला तर शक्यच नाही
आनंद केळकर ला तर शक्यच नाही फेकन पाण्यात... महापूर यायचा>> आनंदमैत्री येणार आहे का??? त्याला फेकता येइल.
आणि यावेळेला बसमधे दर्दभरी गाणी कोण म्हणणार आहे?? त्याची लिस्ट आधीच काढून ठेवा!!! आनंदमैत्री यंदा गाणार नाही.. त्यामुळे योदगडू एकटा पडेल बहुतेक.
घारूअण्णाचा कार्यक्रम नक्की काय आहे ते विचारून घ्या... ते एक वाजताअ रायगड उतरून वगैरे वविला येतात!!!
>>टांगारु झाला होता
>>टांगारु झाला होता हा...<<
अरे कोणत्या ववी ला घेऊन गेला होतात त्या लिम्ब्या ला
निलुभाव, या वेळेस मी मोस्टली
निलुभाव, या वेळेस मी मोस्टली येणारच आहे! थोडा गनिमी कावा खेळावा लागेल! पण येणारच
नंदिनी आनंदमैत्री येणार आहे
नंदिनी
आनंदमैत्री येणार आहे का??? त्याला फेकता येइल. >>> नको ग त्याला सोडूया , बिचार्याच नुकतच लग्न झालय
घारूअण्णांचे पुढच्या सहा
घारूअण्णांचे पुढच्या सहा महिन्यांचे कार्यक्रम ठरले असतील. नंदे, त्यांना ते आठवण्याचे कष्ट का देते?
आण्णा यावेळेला जाड रस्सी
आण्णा यावेळेला जाड रस्सी लागणार नाही ना ? ते विचारा...
पायलटला आण्णांनी दिक्लेअर केल होत्...ववी झाला ...:फिदी:
च्यामारी, उचलून फेकणारात ?
च्यामारी, उचलून फेकणारात ? फेकाच मला आणि हो मी नरडं फाडणारे यावेळी , ऐकणार्यांच काय खरं नाहीये...
पणी दीसत नाही आहे >>>
पणी दीसत नाही आहे >>> ह्म्म्म्म ५-१० लि. च्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जायच्या हाकानाका
च्यामारी मी जरा बीझी झालो
च्यामारी मी जरा बीझी झालो इकडे तिकडे तर सारे माझ्या नावानी शंख करतायत सगळे
घारूअण्णाचा कार्यक्रम नक्की काय आहे ते विचारून घ्या...>>>. पहिला तर मी घारु ला पाण्यात फेकीन म्हणतो, >>>> मालक हरकत नाही पण जरा आधी कल्पना द्या म्ह्ण्जे पाकिट्-पेटी वरच काधुन ठेवीन ंहणतो उगाच भीजुन ओली झाली तर पंचाइत नको जवळपास टपरीही नाही एखादी
पायलटला आण्णांनी दिक्लेअर केल
पायलटला आण्णांनी दिक्लेअर केल होत्...ववी झाला . >>> म्हणजे आण्णा आता म्हणणार - 'आता उरलो केवळ उपकारापुरता...'
नमस्कार. मलाही वविला यायची
नमस्कार. मलाही वविला यायची ईच्छा आहे. पण मी माबोवर नविन असल्यामुळे मी कोणालाच ओळखत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस येईन. या वेळच्या वविस माझ्या शुभेच्छा.
मिनू, आपण जरुर या. इथे
मिनू, आपण जरुर या. इथे आल्यावर ओळखी आपोआप होतील
मिनू, उलट सगळ्यांच्या ओळखी
मिनू, उलट सगळ्यांच्या ओळखी होण्यासाठी वविला येण्याइतका चांगला दुसरा कुठलाच पर्याय असू शकत नाही.
नवी मुम्बई मधुन कोनि आहे का
नवी मुम्बई मधुन कोनि आहे का
वा खूपच छान मस्त मी तर
वा खूपच छान मस्त मी तर आत्तापसुनच तयारीला लागलेही
मी माबोवर नविन आह॓. नवी
मी माबोवर नविन आह॓.
नवी मुम्बई मधुन कोनि आहे का??
Pages