गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......
(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)
जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की...
टीशर्टचा रंग आपल्या सर्वांनाच आवडणारा 'गडद निळा'... आहे की नाही छान?
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
-- Extra Small (XS)
-- Small (S)
-- Medium (M)
-- Large (L)
-- Extra Large
-- Extra Extra Large
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
लेडीज आणि युनिसेक्स दोन्ही प्रकारच्या टीशर्टसाठी ही मापे आहेत.
टीशर्टच्या उजव्या बाहीवर आपल्या मायबोलीचा लोगो आणि टीशर्टच्या पाठीवर URL Address : www.maayboli.com असेल.
यंदा मायबोलीच्या टीशर्टची संकल्पना आणि सुलेखन केले आहे सिद्धहस्त चित्रकार मायबोलीकर पल्ली हीने.... तिच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका
टीशर्टची किंमत आहे : रूपये १६०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २१०/-फक्त
मायबोली टीशर्ट उपक्रमातून उभी होणारी देणगीची रक्कम आपण ह्यावर्षी 'एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास' ह्या संस्थेला देणार आहोत. ही संस्था २००२ सालापासून पुण्यात कार्यरत आहे. वेश्यांच्या, मद्याधीन, एड्सग्रस्त पालक आणि एकटे पालकत्वाची शिकार असलेल्या समाजातील दुर्लक्षित अश्या मुलांसाठी ही संस्था काम करते. ह्यातील बहुतेक मुले ही दारीद्र्य रेषेखालील गटात मोडतात. ह्या मुलांचे 'उत्तम भविष्य घडवणे' ह्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यासाला मदत करण्यासाठी जास्तीत जास्त टिशर्ट्स घ्या असे टिशर्ट समिती आपणां सर्वांना आवाहन करीत आहे. ह्या संस्थेची अधिक माहिती आपल्याला इथे मिळेल http://www.ekalavyapune.org येथे मिळेल.
मग चला तर, आपली ऑर्डर tshirt@maayboli.com ह्या पत्त्यावर खालील स्वरूपात धाडा पाहू
१. नाव (अनिवार्य)
२. मायबोली id (अनिवार्य)
३. पत्ता आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक (अनिवार्य)
४. टी- शर्ट चा प्रकार - लेडिज्/जेण्ट्स/किड्स (अनिवार्य)
५. टी- शर्ट चा साईझ (अनिवार्य)
६. टी- शर्टची संख्या (अनिवार्य)
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई
मेलच्या subject मध्ये Maayboli T-shirt order असे लिहावे.
आपण पाठवलेल्या मेलची पोचपावती देण्यात येईल.
आपली ऑर्डर दिनांक २६ जून २०१० पर्यंत नोंदवावी. त्या नंतर कुठलीही ऑर्डर स्विकारली जाणार नाही.
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी आपण पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहोत.
पुणेकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
दिनांक २७ जून २०१० पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
ह्यादिवशी आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून पैसे भरणे शक्य नसल्यास किंवा टिशर्टसंदर्भात इतर काही शंका असल्यास आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.
विनय भिडे (मुंबई) - ९८२०२८४९६६
आनंदसुजू (मुंबई) - ९८२०००९८२२
परेश लिमये (पुणे) - ९८९०४३०१२३
टीशर्ट वाटप होईल दिनांक ११ जुलै २०१० रोजी पुढील ठिकाणी, ह्या दिवशी आपण वर्षविहार २०१० ची वर्गणी गोळा करण्यासाठी भेटणार आहोतच.
पुणे:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबई:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
टीशर्ट वाटपाच्या दिवशी जे मायबोलीकर हजर राहू शकणार नाहीत ते वर्षाविहाराच्या दिवशी टीशर्ट घेऊ शकतील. जे मायबोलीकर टीशर्ट वाटपाच्या दिवशी अथवा वर्षाविहाराच्या दिवशीही आपले टीशर्ट घेऊ शकणार नाहीत त्यांनी संयोजकांशी संपर्क साधून टीशर्ट घेण्याची व्यवस्था करावी.
मुंबई - पुण्याबाहेर तसेच भारताबाहेर राहणारे मायबोलीकर मुंबई - पुण्यातील मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्टचे पैसे भरू शकतात तसेच टीशर्ट घेऊही शकतात. मात्र ऑर्डर नोंदवताना त्यांनी कोणामार्फत पैसे भरणार व टीशर्ट घेणार तसेच त्या मायबोलीकराचे/ नातेवाईकाचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देणे अनिवार्य आहे.
तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोली टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.... आपली ऑर्डर त्वरीत नोंदवा.
टीशर्टांची ऑर्डर नोंदणी दिनांक २८ जून २०१० रोजी बंद करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
लहान साईझ उपलब्ध झाला तर मीही
लहान साईझ उपलब्ध झाला तर मीही घेईन टीशर्ट माझ्या मुलासाठी.
हो हो लहान साईझ असेल तर मलाही
हो हो लहान साईझ असेल तर मलाही हवाय लेकासाठी
टीशर्टच्या मापांबद्दल ज्यांना
टीशर्टच्या मापांबद्दल ज्यांना शंका होती त्यांच्यासाठी:
ही मापे आता वरील माहितीत लिहीली आहेत. कृपया आपली ऑर्डर लवकरात लवकर नोंदवावी.
लहान मुलांसाठी टी-शर्ट चा
लहान मुलांसाठी टी-शर्ट चा धागा कुठे आहे?
भ्रमर, लहान मुलांच्या
भ्रमर, लहान मुलांच्या टीशर्टची माहिती आता वर लिहीली आहे.
वा हे मस्त झालं जस्ट टू
वा हे मस्त झालं
जस्ट टू कन्फर्म- लहान मुलांच्या टीशर्टांचे साईझ हे 'उंची' दर्शवतात ना? २० इंच ते ३४ इंच ही टीशर्टची लांबी आहे, बरोबर? (मोठ्यांचे टीशर्ट साईझ हे रुंदी दर्शवतात)
आणि हा नवीन प्रकार आल्यामुळे एक सजेशन-
ऑर्डरीच्या अनिवार्य माहितीत 'टीशर्टचा प्रकार- लेडिज/ जेन्ट्स/ किड्ज' असा केलात, तर ऑर्डर नोंदवून घ्यायला सोपे पडेल तुम्हाला.
झकास, आमची जनता जाम खूश...
झकास, आमची जनता जाम खूश...
पौर्णिमा, आपल्या सूचनेप्रमाणे
पौर्णिमा,
आपल्या सूचनेप्रमाणे बदल केला आहे.
लहान मुलांच्या टीशर्टची नक्की साईज ठरवण्यासाठी एक कोष्टक आहे. तुमच्या मुलाचे वय + २० अशी साईज ठरते. म्हणजे समजा तुमच्या मुलाचे वय ५ वर्षे आहे तर ५ + २० = २५, तर २४ किंवा २६ साईजचा टीशर्ट तुमच्या मुलाला सहज बसेल.
त्या वयाच्या सर्वसाधारण मुलांपेक्षा तुमचा मुलगा सशक्त असेल तर २६ किंवा २८ साईज आणि जर तो तब्येतीने साधारण असेल तर २२ साईज घ्यावी लागेल.
वा. धन्यवाद. उपयुक्त माहिती.
वा. धन्यवाद. उपयुक्त माहिती.
टीशर्ट समिती जोरात आहे
टीशर्ट समिती जोरात आहे ह्यावेळी!
आला आला पावसाळा छत्री, रेनकोट
आला आला पावसाळा
छत्री, रेनकोट काढा बाहेर लवकर
वविची, टिशर्टची नोंदणी करा भराभर....
आतुरतेने ज्याची वाट पहावी असा दिवस.
लहान मुलासांठी हे एकदम सहीये
लहान मुलासांठी हे एकदम सहीये
आता नेक्स्ट टाईम रूमाल, मोजे ही हवेत
छत्र्या आणि रेनकोट रे पुढच्या
छत्र्या आणि रेनकोट रे पुढच्या वर्षी... एकदम आतली बातमी आहे ही
मंजू द डी तुझा आतला गोट
मंजू द डी तुझा आतला गोट कित्ती आतला आहे?
प्लीज, ऑर्डर मिळाल्याची
प्लीज, ऑर्डर मिळाल्याची पोचपावती द्याल का? धन्यवाद.
मी पण ऑर्डरले टिशर्ट,
मी पण ऑर्डरले टिशर्ट, पोचपावती द्याल का प्लिज, कारण मी कं आयडीवरून मेल पाठवला आहे, मिळाला नाही तर परत ऑर्डर द्यायला बरं. नाहीतर मला टिशर्ट
मिळायचा नाही यावर्षी..
मी पण ऑर्डर केली आहे.. पण
मी पण ऑर्डर केली आहे.. पण अजून पोच पावती मिळालेली नाही... ऑर्डर करुन एक आठवडा झाला...
डक्षे, तू गडावर जाउन
डक्षे, तू गडावर जाउन महाराजांना भेट की..
असुदे या टिशर्टच्या ऑर्डरीचे
असुदे या टिशर्टच्या ऑर्डरीचे म्हाराज काय करणारेत? ते शिवायला बसलेत का?
ऑर्डरची पोचपावती दिल्याबद्दल
ऑर्डरची पोचपावती दिल्याबद्दल धन्यवाद, पण पैसे कुठे भरायचे हे तुम्ही कळवलेले नाही. ते कधी कळवणार? मी ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहे. हे मेलमध्येही लिहिले आहे. पैसे कोणत्या अकाऊंटला व कधी भरायचे हे कधी कळेल? २७ जून शेवटची तारीख ना?
दक्षे, "शिवाजी" महाराजांवर
दक्षे, "शिवाजी" महाराजांवर असा विनोद ? हर हर...
ऑर्डर नोंदवली आहे कृपया पोच
ऑर्डर नोंदवली आहे कृपया पोच द्यावी.
कालपर्यंत नोंदवलेल्या सर्व
कालपर्यंत नोंदवलेल्या सर्व ऑर्डरींची पोचपावती संबंधितांना देण्यात आली आहे. आज नोंदवण्यात आलेल्या ऑर्डरींना लवकरच पोचपावती देण्यात येईल.
पोचपावती मिळाली नसल्यास वा इतर काही शंका असल्यास माहितीत दिलेल्या क्रमांकांवर आमच्या संयोजकांशी जरूर संपर्क साधावा.
सॅम्पल टीशर्ट तयार असेल, तर
सॅम्पल टीशर्ट तयार असेल, तर तयार टीशर्टचा फोटो पहायला मिळेल का १-२ दिवसांत?
टीशर्ट समिती, ऑनलाईन
टीशर्ट समिती, ऑनलाईन पेमेंटसंबंधी मेल टाकल्याबद्दल धन्यवाद. ह्यासंदर्भात विचारणा केल्याबरोबर लगेच मंजूनेही मेल टाकले आहे, त्याबद्दल तिला धन्यवाद.
पण ह्या बाफवरही हे डीटेल्स टाकले आहेत असे तुम्ही मेल मध्ये म्हटले आहे ((हिच सर्व माहिती ' टी-शर्ट आले ' बाफवर समितिने प्रतिसादात दिली आहे. आपण केव्हाही पाहु शकता.), ते अजूनतरी टाकलेले नाहीत असे वाटते. मी हे लिहीपर्यंत तरी आलेले नव्हते. ते जर शक्य असल्यास टाकले तर ऑनलाईन पैसे भरणार्या सगळ्यांनाच सोयीचे पडेल असे वाटते.
पुन्हा एकदा धन्यवाद.
शैलजा, काही विशिष्ट
शैलजा,
काही विशिष्ट कारणांमुळे ऑनलाईन पैसे भरण्याची माहिती ह्या बातमीफलकावर आम्ही जाहिर केली नाही आहे. ज्या मायबोलीकरांना टीशर्टचे पैसे ऑनलाईन भरायचे आहेत त्यांना त्याविषयीची सर्व माहिती आम्ही मेलद्वारे कळवत आहोत. टीशर्टच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने हे आवश्यक आहे.
आपल्याला झालेल्या मनःस्तापाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
टी शर्ट समितीने त्यांचा फोटो
टी शर्ट समितीने त्यांचा फोटो पोस्ट खाली वेगळी लिंक दिली तर बरे होईल असे वाटते. फोटोतल्या लिंकवर टिचकी मारता येत नाही
ऑर्डर नोंदवली आहे. कृपया
ऑर्डर नोंदवली आहे. कृपया पोचपावती द्या.
धन्यवाद.
चला लोकहो २७ तारखेला
चला लोकहो २७ तारखेला भेटूया...
काल ऑर्डरची ईमेल केली आहे,
काल ऑर्डरची ईमेल केली आहे, पोच द्याल काय? ऑनलाईन पेमेन्टसाठी डिटेल्स मागितले आहेत. तेही दिलेत तर बरं होईल.
इथे लिहिल्याशिवाय पोच देत नाही काय समिती?
Pages