ड्राईव्ह टु भिमाशंकर...

Submitted by MallinathK on 14 June, 2010 - 06:59

पावसाने नुकतीच हजेरी लावलेली. झुळझुळनारी थंड हवा, सळसळनारी हिरवी पानं.... आणि रिमझिमनारा पाऊस.... नकळतच गाण ओठी येतं...

सोनेरी उन्हात हिरव्या रानात,
कोसळे असा हा पाऊस खुशाल.
हवेत हलतो झुलतो डुलतो,
सरी सरींचा हा रुपेरी महाल.

कुठे कधी ऐकलं ते निटसं आठवत नाही, पण पाऊस आल्या बरोबर हे गाणं ओठावर येतंच. मग अश्या पाऊसात वाफाळलेला चहा नि गरमा गरम भजीची मजाच न्यारी ! त्यातुन या झुलनार्‍या रुपेरी महाला सोबत गर्लफ्रेंड ला घेउन (म्हणजे माझी बाईक हो, उगाच नसत्या शंका नकोत Proud ) ड्राईव करणे म्हंजे वेगळंच थ्रिल.

गेल्याच शनिवारी गाडीवर कर्ले-भाजे-लोणावळा-महड-पाली फिरुन झालेले. पण मन काही भरलं नव्हतं. म्हंटलं या आठवड्यात परत लॉग ड्राईव पाहीजे. ऑफिसमधले काही मित्रमैत्रीण तयार झाले, पण स्पॉट काही फायनल होईना. कोणाला लोणावळा नको, कोणाला महाबळेश्वर, आणि मला जवळचा स्पॉट नको होता. असं करत करत शेवटी शुक्रवारी महाबळेश्वर फायनल झाले. ऑफिसमधले जयप्रकाश उर्फ जेपी (एकाचेच नाव आहे, दोन नव्हेत), विष्णु, कविता आणि मी असे चौघे. शनिवारचा एक दिवस कसा बसा काढायचा होता. अशीही अमावस्या होती म्हणुन गाडी धुवुन पुसुन स्वच्छ केली. पण राहुन राहुन वाटायला लागलं की महाबळेश्वरच्या ऐवजी दुसरी कडे जावं. मग लगेच सगळ्यांना समस करुन कळवलं की सकाळी आपण भिमाशंकरला जातोय. कोणाचा काही आक्षेप नाही आला.

रात्री सहज प्रणव (कवळे) ला फोन लावलेला, तेव्हा त्याला विचारले की येतोस का ? तसा तो मुंबई मध्ये होत, पण झटक्यात तयार झाला Happy आम्ही पुण्यातुन आणि प्रणव मुंबईहुन सकाळी ६.३० ला निघायचे ठरले. कोण आगोदर पोचणार तो घोडेगावला (भिमाशंकरच्या आधी एक ४०-४५ किमी. वर गाव आहे) थांबुन वाट पाहील.

पण घडलं वेगळंच !!! रविवारी सकाळी ५.३० लाच माझा फोन खणखणला... विष्णुचा होता. बाहेर पाऊस चालुय आपण ट्रिपला जायचं की नाही विचारत होता. म्हंटलं उशीर झाला तरी चालेल, पण जाऊच (कारण, प्रणव मुंबईहुन निघनार होता, जर आम्ही कॅन्सल केलं अस्तं तर फाडुन कच्चा खाल्ला असता त्याने Sad ). इकडे कविता फोन उचलत नव्हती, म्हंटलं हिला सोडुनच जावं लागनार. Proud असंही पाउस चालुय, आणि जर पाउस थांबे पर्यंत जर ही तयार झाली तर घेउन जायचं. पण पाउसाने कविताला साथ दिली. कविता उठलीच ६.३० ला, तिचं तयार होई पर्यंत काही पाउस थांबला नाही. Sad (हा पाऊस सुध्दा कधी कधी पार्सलीटी करतो Angry ) आम्ही सगळे ७.३० ला शिवाजी नगर ला जमुन ७.४५ ला प्रस्थानलो (एकदाचे). दोन गाड्या, चार माणसं. पाऊस तसा चालुच होता, शेजारुन जाणार्‍या गाड्या कपड्यांवर नक्षीकाम करत होते. भोसरी ओलांडायच्या आतच आमचा अवतार असा झाला की पाहणार्‍याला वाटले अस्ते की आम्ही भिमाशंकर वरुन परततोय कि कॉय... Uhoh

कसे बसे भोसरी ओलांडुन महामार्गाला लागलो. पण म्हणावं तसं वेग पकडता येत नव्हता. रात्री पावसाने हजेरी लावल्याने रस्ता ओला होता. Sad पण वारा मात्र मस्त वाहत होता. तो कोणाच्या अध्यत न मध्यात, आपलं काम निट बजावत होता. रात्री अंधारात कुठं कुठं कोरडं राहीलंय तिथं ढग व्यवस्थीत पोचवणे. बाकी उरलेलं काम वरुण राज करणारच होते. एकंदरीत वातावरण मस्तंच होतं. गाडीला वेग देता येत नसले तरी वातावरणामुळे चिडचिड मात्र होत नव्हती. Happy अश्या वातावरणात भजीची आठवण न व्हावी म्हणजे विषेश. पण बाकिच्यांनी 'इतक्यात काही नको' असं म्हंटल्याने गप बसावं लागलं. Sad पुढे पेठच्या आलीकडंच एका ढाब्यावर गाड्या थांबवल्या (९ वाजलेले, त्यामुळे कोणी हुं की चुं केलं नाही). मस्त झणझणीत मिसळ ऑर्डर दिली. सगळे चविनं मिसळ चघळत होते, गप्पा चालु होत्या. तेवढ्यात.... तेवढ्यात अघटीत (जे पुण्यात नेहमीच घडतं माझ्या बाबतीत) घडलं. पण पुण्याच्या बाहेर असं घडेल वाटलेलं सुध्दा नव्हतं. Sad तेही असं देवाला जाताना तर नाहीच नाही.. Sad पण शेवटी अघटीतच ते... घडनारच Angry तर अघटीत हे होतं मी माझ्या मिसळीत एका शेव वर डास चिटकवल्या प्रमाणे झोपला होता (कदाचीत मेला होता Uhoh ) मला आवर्जुन पुलंचं वाक्य आठवलं. कविताने तर नाक मुरडुन मिसळ खाणंच बंद केलं, जसं काही तो डास तिच्याच सँपल मध्ये न्हाउन बाहेर आलेला. Proud मी आपला शेवचा तुकडा बाहेर काढुन ठेवला नी खाणार इतक्यात, जेपी म्हणाला की खाउ नका. Sad आता मात्र मग इछा नसताना हताश नजरेने मिसळ कडे पाहत मी त्याच्यावर पाणी सोडलं. पण पाव मात्र दुसर्‍याच्या मिसळ मध्ये बुडवुन खाल्ले.. Proud

जे समोर होते तेवढ्यावरच आपापले टँकर भरुन पुन्हा मार्गाला लागलो. पुढे पेठ वरुन भिमाशंकरला फाटा फुटतो, माझ्या माहीतीप्रमाणे NH ५० वर पेठ नि मंचर अश्या दोन ठिकाणी फाट आहे (राजगुरु नगरला सुध्दा आहे हे येताना कळलं). कोणता रोड बाईक्स साठी चांगला आहे याची चौकशी केली. गावकर्‍यांनी पेठवरुनच जायचं सुचवलं. तस राष्ट्रिय महामार्ग सोडला तसं गावकडची दृष्य दिसायला लागली. मस्त थांबुन फोटोज घ्यावं वाटत होतं, पण पुढं रोड कसा असेल माहीत नसल्याने थांबणं शक्य झालं नाही. तरीही जाता जाता घेतलेले काही फोटो.

शेत

ढवळ्या पवळ्या.. Uhoh

अख्खी फॅमिली... Uhoh

हे कदाचीत शेंडेफळ होतं.. Proud

पुढं जाईल तसं हवेत गारवा जाणवायला लागल. Happy एके ठिकाणी दोन बंधारे होते, रस्ता बंधार्‍या शेजारुन वळसा घेत घेत गावाकडे जातो. तिथल्या उतरणीच्या रोडवर थांबुन आम्ही जरा फोटो सेशन केले. रस्त्याच्या कडेच्या झाडांमुळे फोटो काही निट घेता येत नव्हते. Sad घोडेगाव तिथुन एक ४-५ किमी असेल. प्रणव ला फोन केला, तो नुकताच घोडेगावला पोहोचलेला.

पावसाळ्यात काय सह्ही दिसत असेल हा नजारा.. Happy

घोडेगावला प्रणव जॉईन झाला. दोनाचे तिन (चार नव्हे, नाही तर सवयी प्रमाणे 'दोनाचे चार' वाचाल.) गाड्या झाल्या. पुढे मग २-३ ठिकाणी फोटो सेशन झाले.

जसं जसं भिमाशंकर जवळ येईल तसं तसं वातावरण प्रफुल्लीत (फ्रेश म्हणायचंय Proud ) वाटत होतं. आजुबाजुला गर्द झाडी, आणि या झाडीतुन वेडीवाकडी वळसा घेत धावणारा रस्ता. त्या रस्त्यांवर वारा लपंडावच खेळत होताअ जणु. हळुच एखादी थंड हवेची झुळुक अंगावरुन जायची. नकळतच रोमांच उभे रहाय्चे. अंगावरचा शहारा दर वेळेस वेगळाच अनुभव देउन जात असे.

आमच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखीन २ गाड्या समाविष्ट झालेल्या. आणि हि गाड्यांची रांग साप सळसळावी तशी भिमाशंकरच्या घाटात अगदी थाटात सळसळत होती... एका मागुन एक गाडी, एक गाडी वळाली की लगेच दुसरी, जणु काही रेसच चालु आहे. (घाटातही) वेग इतका होता की फोटो काढणेही कठीण जात होते.. Sad तरी केलेला एक प्रयत्न...

हा ४-५ किमी. चा पल्ला पार करुन आम्ही भिमाशंकरला पोहोचलो. मग सगळे फ्रेश वगैरे होउन शिव दर्शन घेतले. सभा मंडपातुन पिंडीचे छायाचित्र घ्यायचे काही प्रयत्न केले.

मंदिराचा कळस

देव दर्शन वगैरे झाल्यावर थोडं अभयारण्य फिरुन घेतले. कोणते वन्य प्राणी दिसतात का ते पाहीले, पण वान्नरा शिवाय कोणीच दर्शन दिले नाही. Wink मग परतीचा मार्ग धरला. येताना भिमाशंकर माथ्यावर, एका गावाजवळ 'राजगुरु नगर' चा फाटा असलेला बोर्ड दिसलेला. वेगळ्या मार्गाने जायची हुक्की आल्याने त्या मार्गाने जायचे ठरले. म्हंटलं हाही रोड 'टेस्ट' करुत, त्यात काय Wink पण जेव्हा तो रोड उतरायला लागलो, तेव्हा २-४ ठिकाणी सगळ्यांची चांगलीच तंतरली होती.. Proud सिंगल रोड, त्यात बारीक खडी टाकलेली आणी वर रोड खुप म्हंजे खुपच स्टीप होता.. Uhoh गाडी अक्षरशः लो गिअर वर सेकंड थर्ड करत उतरवावी लागली. मनोमन म्हंटले जाताना हा रोड लागला नाही ते बरंच झालं. (भिमाशंकरला जाताना या रोडने जाउ नये, येताना येउ शकता.) पण त्या रोडने आलो ते सार्थकी लागलं जेव्हा पुढे नदी लागली. Happy नदीच्या काठावर मस्त फोटो सेशन करण्यासाठी उतरलो.

थोड्याच अंतरावर एक छोटीसी नाव दिसली. मग काय... Wink मी नी प्रणव एकमेकांकडे पाहुन पळतच त्या नावे कडे पोचलो. दोघांच्याही मनात एकाच विचार आलेला होता. Proud नावीकाला पटवुन मस्त नौकाविहार केला. Happy वर्षा विहाराच्या गप्पा रंगवत, नौका विहारावरुन माबोकरांना कसं चिडवायचं हे ठरवत मस्त गप्पा रंगल्या. वेगवेगळ्या पोज मध्ये फोटोज काढुन झाले. माझे वल्हवणे शिकुन झाले. म्हंटलं पार्ट टाईम व्यवस्था तर होईल Wink

हिच ति नौका, जिच्यात आम्ही नौका विहार केलं.

संध्याकाळचे पाच वाजत आलेले. ग्रुप मधल्या काही जणांना जेवणाची आठवण व्ह्यायला लागलेली. सकाळ पासुन जेवायचं भानच कुणाला नव्हतं. घेतलेल्या ब्रेक ला ब्रेक देत, पुढं प्रस्थान केलं. निघताना तिथं एक किडा दिसला, वेलवेट सारखं त्याचं अंग होतं. त्याचे काही फोटोज नि विडीयो घेतला. ति इथं पहायला मिळतीलच. पुढं राजगुरू नगर १ किमी. असताना एक ढाबा लागला. तिथं मस्तपैकी जेवण केलं. जेवल्यावर तर थंड वार्‍याचा अनुभव वेगळाच असतो. वाटत होतं तिथं एखाद्या शेतात मस्त ताणुन द्यावी. Proud पण पुणे गाठायचं होतं. Sad घरी परतल्यावर जे पाठ टेकवली जमीनीला, ते आज सकाळीच जाग आली...

गुलमोहर: 

गेल्याच शनिवारी गाडीवर कर्ले-भाजे-लोणावळा-महड-पाली फिरुन झालेले.>>> अरे सदगृहस्था त्या आधी एक मेल किंवा विपू टाकली असतीस तर भेटलो असतो ना आपण? Uhoh

बाकी फोटू तर मस्त आहेतच....आणि हेल्मेटमधला ''ये दोस्ती हम नही छोडेंगे' टाईप फोटू तर १ नंबर! Happy

मल्ल्या फोटो मस्तं, वर्णन मग वाचेन.
रस्त्यावरून येणारा तुमचा ताफा सुरेख, लाल गाडीवाला एकदम स्टायलिश वाट्टोय.. Proud
गढूळ नदीचा फोटो झ्याक.. Happy

आहा हा सुरेख ! व्हॅलीचा रस्त्याचा, नदीचा खासच !
जायलाच हवं आता भिमाशंकरला.
२० वर्षांपूर्वी गेलो होतो, पावसाळ्यात. अन असला तुफान पाऊस होता ही पाच फुटाच्या पुढचे काही ही दिसत नव्हते. भिमाशंकरच्या पावसात भिजलो अन आलो, इतकच Happy

लै लै .. लईच भारी बरं का?? .....

काय काय आनि कीती किति ... कीती किति..
बरं अगदी पहिल्यापासुन सुरवात करतो ..

हंग बघ .. मजी बग मलल्लु ..ढवळ्या - पवळ्या आक्शी मस्त आलेती..
अन अओउ ,मी काय म्हनंतुया भिमाशंकरच मंदिर बरच आकरशक दिस्तय .. आजुन दोन-चार फुटु काढला आसशिला तर .. टाक गी लेका .. Happy
निसर्गचित्रे तर .. एक्दम झ्याक आलीत .. ती नागमोडी वळणं अन ते तलाव.

बाकी काय हेल्मेट्मधुन दिसत नाही .. सो नो कमेंट्स ..

अनि शेवट एक आर्जव .. विनंती .. मेहेरबानी म्हणा हवी तर .. Uhoh
आम्हाला आनंद वाटेल .. नाहीतर शनिवार/रविवार आम्ही झोपाच काढतो ..

मस्त वर्णन, फोटोही छान आहेत. पण या रस्त्यावर अजून बरेच बघण्यासारखे आहे.
आणखी थोड्या दिवसानी, इथे पांढर्‍या नागफणीसारखी फुले फुललेली दिसतील.
शांता शेळके यांचे मंचर गाव. या भागातली रताळी फार चवदार असतात.
देऊळ नव्याने बांधले आहे का ? मी बघितले त्यावेळी असे नव्हते.

मस्तच! Happy

(दिप्या, Lol स्मायल्यांचं स्ट्याटिस्टिक लै भारी !! मोजदादीचं माझं काम वाचवलंस.)

लय भारी Happy
तू न कळवता जातोस ह्याचा वचपा लवकरच काढेन Proud

लले, बर केलस ते स्टॅटिस्टिक बद्दल लिहीलस मला कळलच नाही दिप्याला हे अचानक काय झाल Proud

खुपच छान निसर्गाचे दर्शन
धन्यवाद

अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

तू न कळवता जातोस ह्याचा वचपा लवकरच काढेन
Proud नको ग बाय असं करुस...

(दिप्या, हाहा स्मायल्यांचं स्ट्याटिस्टिक लै भारी !! मोजदादीचं माझं काम वाचवलंस.)
मला ते कळ्ळंच नव्हतं आधी... लले मुळं कळलं की ते स्टॅस्टीस्टीक्स आहे म्हणुन. Proud

धन्यवाद समद्यास्नी Happy

@सेम,

माझाही रुट सेमच होता, फक्त जाताना आम्ही मंचरच्या ऐवजी, पेठ वरुन घोडेगावला गेलेलो. आणि प्रणव जुन्नर वरुन घोडेगावला आलेला. येताना (चेंज म्हणुन) वाड्यावरुन राजगुरु नगरचा (जो तु घेतलेलास) रुट ट्राय केला. Happy

मस्तच फोटो..

दोन वेळा गेलेय मी भिमाशंकरला पण भर पावसाळ्यात सो धुकं सोडुन काहीच आठवत नाही.. आता परत जायलाच हवं! Happy

राजगुरुनगरचा रस्ता मी गेलेलो तेंव्हातरी exciting (म्हणजे जरा खराब आणि निर्जन! Happy ) होता... मंचरचा रस्ता काही खास नाही (म्हणजे गुळ्गुळीत मोठ्ठा रस्ता आणि भरपूर रहदारी Sad ) याच रस्त्यावरुन परत येताना डाविकडे एका डोंगरावर आयुकाची दुर्बिण पण दिसते!!

.

Pages