गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......
(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)
जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की...
टीशर्टचा रंग आपल्या सर्वांनाच आवडणारा 'गडद निळा'... आहे की नाही छान?
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
-- Extra Small (XS)
-- Small (S)
-- Medium (M)
-- Large (L)
-- Extra Large
-- Extra Extra Large
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
लेडीज आणि युनिसेक्स दोन्ही प्रकारच्या टीशर्टसाठी ही मापे आहेत.
टीशर्टच्या उजव्या बाहीवर आपल्या मायबोलीचा लोगो आणि टीशर्टच्या पाठीवर URL Address : www.maayboli.com असेल.
यंदा मायबोलीच्या टीशर्टची संकल्पना आणि सुलेखन केले आहे सिद्धहस्त चित्रकार मायबोलीकर पल्ली हीने.... तिच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका
टीशर्टची किंमत आहे : रूपये १६०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २१०/-फक्त
मायबोली टीशर्ट उपक्रमातून उभी होणारी देणगीची रक्कम आपण ह्यावर्षी 'एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास' ह्या संस्थेला देणार आहोत. ही संस्था २००२ सालापासून पुण्यात कार्यरत आहे. वेश्यांच्या, मद्याधीन, एड्सग्रस्त पालक आणि एकटे पालकत्वाची शिकार असलेल्या समाजातील दुर्लक्षित अश्या मुलांसाठी ही संस्था काम करते. ह्यातील बहुतेक मुले ही दारीद्र्य रेषेखालील गटात मोडतात. ह्या मुलांचे 'उत्तम भविष्य घडवणे' ह्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यासाला मदत करण्यासाठी जास्तीत जास्त टिशर्ट्स घ्या असे टिशर्ट समिती आपणां सर्वांना आवाहन करीत आहे. ह्या संस्थेची अधिक माहिती आपल्याला इथे मिळेल http://www.ekalavyapune.org येथे मिळेल.
मग चला तर, आपली ऑर्डर tshirt@maayboli.com ह्या पत्त्यावर खालील स्वरूपात धाडा पाहू
१. नाव (अनिवार्य)
२. मायबोली id (अनिवार्य)
३. पत्ता आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक (अनिवार्य)
४. टी- शर्ट चा प्रकार - लेडिज्/जेण्ट्स/किड्स (अनिवार्य)
५. टी- शर्ट चा साईझ (अनिवार्य)
६. टी- शर्टची संख्या (अनिवार्य)
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई
मेलच्या subject मध्ये Maayboli T-shirt order असे लिहावे.
आपण पाठवलेल्या मेलची पोचपावती देण्यात येईल.
आपली ऑर्डर दिनांक २६ जून २०१० पर्यंत नोंदवावी. त्या नंतर कुठलीही ऑर्डर स्विकारली जाणार नाही.
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी आपण पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहोत.
पुणेकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
दिनांक २७ जून २०१० पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
ह्यादिवशी आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून पैसे भरणे शक्य नसल्यास किंवा टिशर्टसंदर्भात इतर काही शंका असल्यास आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.
विनय भिडे (मुंबई) - ९८२०२८४९६६
आनंदसुजू (मुंबई) - ९८२०००९८२२
परेश लिमये (पुणे) - ९८९०४३०१२३
टीशर्ट वाटप होईल दिनांक ११ जुलै २०१० रोजी पुढील ठिकाणी, ह्या दिवशी आपण वर्षविहार २०१० ची वर्गणी गोळा करण्यासाठी भेटणार आहोतच.
पुणे:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबई:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
टीशर्ट वाटपाच्या दिवशी जे मायबोलीकर हजर राहू शकणार नाहीत ते वर्षाविहाराच्या दिवशी टीशर्ट घेऊ शकतील. जे मायबोलीकर टीशर्ट वाटपाच्या दिवशी अथवा वर्षाविहाराच्या दिवशीही आपले टीशर्ट घेऊ शकणार नाहीत त्यांनी संयोजकांशी संपर्क साधून टीशर्ट घेण्याची व्यवस्था करावी.
मुंबई - पुण्याबाहेर तसेच भारताबाहेर राहणारे मायबोलीकर मुंबई - पुण्यातील मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्टचे पैसे भरू शकतात तसेच टीशर्ट घेऊही शकतात. मात्र ऑर्डर नोंदवताना त्यांनी कोणामार्फत पैसे भरणार व टीशर्ट घेणार तसेच त्या मायबोलीकराचे/ नातेवाईकाचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देणे अनिवार्य आहे.
तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोली टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.... आपली ऑर्डर त्वरीत नोंदवा.
टीशर्टांची ऑर्डर नोंदणी दिनांक २८ जून २०१० रोजी बंद करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
वाचला. पैसे कुणा
वाचला. पैसे कुणा मायबोलीकरामार्फत भरले तरी टीशर्ट आणण्याची सोय पण बघावी लागेल. आता पन्ना आणि अमृताच्या बोकांडी बसावं! (थँक्यु अश्विनी!)
छान आहे टी-शर्ट चे डिझाईन.
छान आहे टी-शर्ट चे डिझाईन. आवडले
मी पण घेणार यावेळी.
मी जूलै मधे काही दिवस भारतात
मी जूलै मधे काही दिवस भारतात असेन, (त्यातला एखादा दिवस पुण्यातही असेन, ) पण मला पण दरियादिल मित्राची गरज आहे. (पैसे रोखीने मिळतील, याची खात्री बाळगा. हवे तर त्याच्याही टी शर्टाचे देईन.)
पल्ली, डीझाईन मस्तच आहे.
टी-शर्ट छानच आहेत. (एक महिना
टी-शर्ट छानच आहेत. (एक महिना आधी का नाही आले?):अरेरे:
शेवटच्या पॅरावरून भारताबाहेरच्या लोकांनी काय करायचं ते कळलंच, पण त्यांची सध्यातरी भारतवारी होणार नसेल तर? भारतातून अमेरिकेत जाणारी लोकं तरी रग्गड असतात, आमच्यासारख्यांनी काय करायचं?
>>आमच्यासारख्यांनी काय
>>आमच्यासारख्यांनी काय करायचं?
घरच्यांना घ्यायला लावून कुरियर करायला सांगायचं. हाकानाका.
टीशर्टच्या सुलेखनाच्या भागाचा
टीशर्टच्या सुलेखनाच्या भागाचा क्लोजप टाकता येईल का? 'मायबोली' अक्षरं सुरेख आली आहेत पण बाकी डिझाईन नीट कळत नाहीये.. त्याला काही सूचक अर्थ आहे का तेही सांगा
आडो, तुला हवा असेल तर मी पैसे
आडो, तुला हवा असेल तर मी पैसे भरुन घेऊन ठेवू शकेन. तुझ्या आईकडे पार्सल पोस्त करेन.
मी दिल्लीला राहतो.
मी दिल्लीला राहतो. (exactly....Gurgaon 40km from Delhi)
आणि पुणे-मुम्बई मध्ये कुणी परिचयाच नाही.
T-shirt घेण्यासाठी काय करावे????
क्रुपया...सुचवा....
कविता तुला अनेक धन्यवाद. खरंच
कविता तुला अनेक धन्यवाद. खरंच घे माझ्यासाठी पण तो घेऊन तुझ्याकडेच ठेव, आईकडे वगैरे पार्सल नको करूस. (पुढच्या भेटीला निमित्त नको का गं)
कविता तुझा भ्रमणध्वनी संपर्कातून पाठवशील कां ग?
'मायबोली' अक्षरं सुरेख आली
'मायबोली' अक्षरं सुरेख आली आहेत पण बाकी डिझाईन नीट कळत नाहीये.. त्याला काही सूचक अर्थ आहे का तेही सांगा >>
चंद्र (पौर्णिमेचा वाटोळा) पकडू पाहणारी व्यक्ती दिसतीये मला तर्.......बरोबर आहे का?
पुण्या-मुंबईबाहेर परंतू
पुण्या-मुंबईबाहेर परंतू भारतातच राहणा-या मायबोलीकरांनी टीशर्टस कुरीयरने पाठवता येऊ शकतील. परंतू कुरीयरचा खर्च हा त्यांना सोसावा लागेल, टीशर्टच्या एकूण किंमतीत तो खर्च समाविष्ट नाही. इच्छूकांनी आपली ऑर्डर नोंदवताना कृपया तसे स्पष्ट लिहावे. टीशर्टची किंमत + कुरीयर खर्च अशी एकूण रक्कम तुम्ही ऑनलाईन ट्रान्स्फर करू शकता. संबंधितांना ह्या संदर्भातील सर्व सूचना इमेलद्वारे कळवण्यात येतील.
मला पण....... मला पण........
मला पण.......
मला पण........
दिनेशदा, मैं हूँ ना! आप अपना
दिनेशदा, मैं हूँ ना! आप अपना साईझ और अन्य डिटेल्स मुझे दो, ऑर्डर नोंद करो और उसका एक कॉपी मला दो.
ऑनलाईन पेमेन्ट करायची सोय आहे
ऑनलाईन पेमेन्ट करायची सोय आहे का? असल्यास, कृपया कळविणे.
टीशर्टाचा क्लोजप टाका की
टीशर्ट तंतोतंत याच रंगात
टीशर्ट तंतोतंत याच रंगात असणार आहे का? रंग नक्की कसा, हे कळायला टीशर्टाचा फोटो (प्रिंट न केलेला) टाकता येईल का?
यंदा एकच रंग असल्यानं निवडीला वाव नाही, त्यामुळे हाच घेईन, पण रंग नक्की कसा, याची उत्सुकता होती, बाकी काही नाही.
पौर्णिमा, ऑनलाईन पैसे
पौर्णिमा,
ऑनलाईन पैसे भरण्याची सोय आहे. आपण आपली ऑर्डर इमेल करताना ऑनलाईन पैसे भरणार असे नमूद करा. मग ह्या संदर्भातील सूचना आपल्याला इमेलद्वारे देण्यात येतील.
चिनूक्स,
आपण मांडलेल्या प्रश्नाचा जरूर विचार करण्यात येईल.
<<चंद्र (पौर्णिमेचा वाटोळा)
<<चंद्र (पौर्णिमेचा वाटोळा) पकडू पाहणारी व्यक्ती दिसतीये मला तर्.......बरोबर आहे का?>> तो चंद्र नाहीय. सगळ्या पृथ्वीला हाताच्या बोटावर गोल गोल फिरवण्याचे चित्र आहे (मॅराडोना फूट्बॉल फिरवतो तसे)
टीशर्टचे डिजाईन मोठ्या आकारात
टीशर्टचे डिजाईन मोठ्या आकारात इथे देण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत.
डिजाईन आवडल्याचे आवर्जून लिहील्याबद्दल सर्वांचे आभार. ते डिजाईन 'मानवाकृतीने हातात उंच धरलेला गोल आणि बाजूला आपली लाडकी 'मायबोली' ही अक्षरे' असे आहे. 'गोल' हा आकार एकतेचे प्रतिक आहे. मायबोली.कॉमच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या लाडक्या मायबोलीला (मराठी भाषा आणि मायबोली.कॉम) उच्चस्थानी नेऊया असे व्यक्त करायचा प्रयत्न ह्या डिजाईनद्वारे केला आहे.
टिशर्ट समीतीचे आभिनंदन ,
टिशर्ट समीतीचे आभिनंदन , उत्तम सुलेखन आणि योग्य नियोजन .......
चला माझी ही ऑर्डर बूक झाली.. समीतीकडुन काही कन्फर्मेशन मिळेल का ?
शरद, खुप आभार. विपूत लिहितो.
शरद, खुप आभार. विपूत लिहितो.
धन्यवाद कन्फर्मेशन मिळाले
धन्यवाद कन्फर्मेशन मिळाले .....
टीशर्ट समिती, डीझाईनमागची
टीशर्ट समिती, डीझाईनमागची कल्पना अत्यंत आवडली! मस्त! पल्लीचं पुन्हा एकदा खास अभिनंदन!
मी तर ऑर्डर नोंदवली पण
मी तर ऑर्डर नोंदवली पण
सही डिझाईन आणि त्या मागची
सही डिझाईन आणि त्या मागची कल्पना.
दोन घेतले.
रंगाचा ओरिजिनल फोटो टाकाल
रंगाचा ओरिजिनल फोटो टाकाल का??
कविता, मी माझी ऑर्डर वर
कविता, मी माझी ऑर्डर वर दिलेल्या इमेल आयडीवर टाकलीये गं.
ऑर्डर दिली.
ऑर्डर दिली.
सही
सही टि-शर्ट!!!!!!!!!!!!!!!
मला पण एक.
भरपूर प्रेम दिलंय मायबोली आणि
भरपूर प्रेम दिलंय मायबोली आणि मायबोलीकारांनी मला..... गच्च भरल्या आभाळागत मन भरून आलंय... सर्वांचे आभार
मायबोलीचा लोगो बदलला का
मायबोलीचा लोगो बदलला का ?
साईटवरचा व टिशर्टवरचा दोन्हि लोगो वेगवेगळे आहेत, असं का बरं ?
Pages