आर न पार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आयुष्य
समुद्रासारखं.
आपण मात्र नेहमीच
उभे असतो किनार्‍यावर
अगदी घट्ट पाय रोवून
धृवालाही खुन्नस देत.

आणि मग
भरती-ओहोटीच्या वेळा येतात
ध्यानीमनी नसताना लाटा रोख बदलतात
पायाखालची वाळू ..... वाळूच ती शेवटी ...
सरकू लागते,
तेव्हा
आधार वाटतो
फक्त ... आकाशाचा.

धरावा का असा भरवसा?
आकाशाचा?
ज्याला न आर न पार स्वतःचाच?
ज्याची निळाई रंगते आपल्याच गहिर्‍या वेळच्या नजरेने
आणि ज्याची अथांगता मूळ धरते
आपल्याच पायाखालच्या सरकणार्‍या वाळूतून ...

धरावा का मग भरवसा?
अशा आकाशाचा?
जे न आर न पार?

प्रकार: 

हे सर्व खरं आहे रे पीके पण आकाश पण भरुन येऊन कोसळायला लागलं तर.. मग कुणावर ठेवायचा भरवसा!!!!!!!!!!

छान लिहिलीस कविता...

ज्याची निळाई रंगते आपल्याच गहिर्‍या वेळच्या नजरेने
आणि ज्याची अथांगता मूळ धरते
आपल्याच पायाखालच्या सरकणार्‍या वाळूतून ..>> मस्त

झकास!
तुझई शब्दस्फटिक पण आवडली...
पण तु काहीतरी श्राव्य अंकात टाकणार असे वाट्ले होते.. उत्सुकताही होती असो...
----------------------------------------------------------------------------------
उमटले क्षणावर काही माझे श्वास, धुळित पाउले, का पावलांचे ओझर भास!

काय पीक्या... तुम्ही दोघांनी रूजण्यार्‍या, रूतणार्‍या पायांवर लिहायचं ठरवलंत की काय? आणी तेही असं? एक जीवघेणं तर एक थरकाप उडवणारं...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

क्या बात है! पिक्या शब्दांशी कसं लिलया खेळावं हे तुझ्या कडून शिकावं
sorry किती उशीरा मी प्रतिसाद देत आहे !पण मधल्या काळात किती काही miss केलय. हे पदोपदी जाणवत आहे.

अरे, मी पण आजच पाहिली ही कविता (शमा ला धन्यवाद !)

चांगली लिहीली आहेस !