श्री बालाजी मंजुळे (आय ए एस) सत्कार समारंभ

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

भारतीय लोकसेवा आयोगा च्या २००९ च्या परिक्षेत भारतात ५६ वा व महाराष्ट्रात तिसरा आलेला बालाजी मंजुळे ह्याचा सत्कार मी माझ्या गावी, वस्तीवर, श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे अध्यक्ष मा. आमदार श्री जयंतराव ससाणे, व अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अच्युतराव हंगे साहेब ह्यांचे हस्ते आयोजीत केला होता. गावातील सामान्य जनतेला अन मुलांना आपल्यासारख्याच कुटुंबातुन ही एखादा मुलगा अश्या मोठ्या पदावर पोहचु शकतो हे सांगणे हा त्या कार्यक्रमाचा उद्देश होता.
बालाजी हा वडार समाजातील पहिला आय ए एस आहे....तो एक डोळयाने अधु आहे....
चिंतामनराव देशमुख ह्यांचे नंतर आय ए एस हा एकमेव सेवा निवडी चा पर्याय देणारा बालाजी हा पहिलाच मुलगा.....
यु ट्युब वर व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याची लिंक.....
क्रम...
श्री. बालाजी मंजुळे आय ए एस

श्री .संतोष मंजुळे (बालाजी चे जेष्ठ बंधु)

मा. आमदार श्री. जयंतराव ससाणे साहेब(अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था, शिर्डी.)

श्री अच्युतराव हंगे साहेब (आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका) ह्यांच्या भाषणा चा व्हिडिओ ची लांबी मोठी असल्याने सध्या अपलोड करता येत नाहीये. तज्ञांना विचारुन नंतर अपलोड करील. हे एक अत्यंत सुंदर प्रबोधनपर भाषण आहे. श्री. हंगे साहेब सहा वर्षे भिवंडी निजामपुर सारख्या संवेदनशील महापालिकेचे उप-आयुक्त होते.***

***आमचे मार्गदर्शक, श्री अच्युतराव हंगे साहेब, (सध्याचे भिवंडी-निजामपुर महापालिकेचे आयुक्त आणि अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त) यांच्या भाषणाचा व्हिडीओ नुकताच अपलोड केलाय! व्हिडीओ थोड़ा खराब आहे पण एकदा जरुर ऐकावे असा खणखणीत आवाज! http://bit.ly/Kardakwadi_IAS_Felicitation

(व्हिडिओ शुट करणार्‍या मुलाला फक्त महत्वाच्या वक्त्यांचेच शुटींग कर असे सांगितल्याने, त्याने अत्यंत महत्वाचे म्हंजे माझे च भाषण शुट केले नाही.... अन एक महान वक्त्याला ऐकणे तुम्हाला शक्य झाले नाही. :))

विषय: 
प्रकार: 

मानपत्रः
श्री

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका फडकणार्‍या पंढरपुर नगरीमध्ये आपल्या सारख्या कर्तुत्ववान व्यक्तीमत्वाने महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ज्ञानगंगेचा सहवास लाभुन गोदावरीच्या पात्रातले अनेक 'दगड' पवित्र झाले. दगडफोड्या समाजामधील अश्याच एका 'हिर्‍या' ने आपल्या कर्तुत्वाने तमाम महाराष्ट्रीय जनतेची मान उंचावली!

त्या एकलव्यास...

श्री. बालाजी दिगंबर मंजुळे (आय. ए. एस.)

... अहमदनगर जिल्ह्यातील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नेवासा नगरीतील जनतेच्या वतीने हे 'सन्मानचिन्ह' प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे!

आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा!

चंपक,
ही बातमी यु ट्युब व्हिडिओ-सहीत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभारी आहे!
माझ्याकडूनसुद्धा बालाजीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!

श्री. बालाजी यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

>>चिंतामनराव देशमुख ह्यांचे नंतर आय ए एस हा एकमेव सेवा निवडी चा पर्याय देणारा बालाजी हा पहिलाच मुलगा.....<< म्हणजे काय? जरा विस्तृत माहिती द्याल का?

चंपक चांगली बातमी दिली, तेव्हढाच हुरुप वाटतो कामामधे. बालाजींच्या पुढील वाटचालीक्ष शुभेच्छा कळवा.

सुरेख भाषण आहे बालाजी मंजुळेंच, चंपक. खूपच आशावाद, स्फूर्ति देणार भाषण केलं आहे. माणूस हुशारच आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आणि तुझा हेतू फारच चांगला होता.

चंपक व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद .
आर्चला अनुमोदन , छोटसं पण खुपच छान आणि स्फुर्तिदायक भाषण केलय बालाजीने. All The Best बालाजी !

जवळपास एक वर्षाने मी त्याचे सन्मानपत्र कुठे लिहुण ठेवावे म्हणुन शब्दांकित केले. त्याला महाराष्ट्रभर झालेल्या सत्कारांमध्ये मिळालेल्या सर्व सन्मानचिन्हांपैकी आपण दिलेले सन्मानचिन्ह अप्रतीम आहे हे तो अभिमानाने सांगतो! ('पैस' खांबाच्या दीड फुट उंचीच्या प्रतिकृतीवर हे शब्द लिहिले होते. फोटो देतो नंतर)

आर्च.. धन्यवाद! अगोदर नगर ला मोठ्या सभागृहात समारंभ घ्यावा असा विचार होता, पण मग आपल्याच मातीत, आपल्याच बांधावर तो घेउ असा धाडसी विचार मनात आला...... अन तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणला! त्याबद्दल समारंभात अनेकांनी कौतुक केले!

रंगाशेठः
युपीएससी २८ प्रकारच्या सेवांसाठी उमेदवार निवडते. उमेदवारांना त्या सेवांचा पसंतीक्रम द्यावा लागतो. मिळालेले गुण अन त्यांचा पसंतीक्रम लक्षात घेऊन निवड केली जाते.

श्री. चिंतामणराव देशमुख अन श्री. बालाजी मंजुळे ही दोनच व्यक्तीमत्वे असे आहेत कि ज्यांनी त्यातील फक्त एकच सेवा पर्याय निवडला. जर त्यांना कमी गुण मिळाले असते, तर एकही सेवा न मिळता, ते बाद झाले असते.
पण यांचा आत्मविश्वासच इतका प्रचंड आहे, कि 'निकाल लागला, मग दुसरा कोण आला?' सारखे प्रश्न हेच विचारु शकतात! Happy

चंपक,खूपच छान बातमी दिलीस.. बालाजी याचे हार्दिक अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा..

श्री. चिंतामणराव देशमुख अन श्री. बालाजी मंजुळे ही दोनच व्यक्तीमत्वे असे आहेत कि ज्यांनी त्यातील फक्त एकच सेवा पर्याय निवडला. जर त्यांना कमी गुण मिळाले असते, तर एकही सेवा न मिळता, ते बाद झाले असते.
पण यांचा आत्मविश्वासच इतका प्रचंड आहे, कि 'निकाल लागला, मग दुसरा कोण आला?' सारखे प्रश्न हेच विचारु शकतात!>>>>> महान !!!!! हॅटस ऑफ टू बालाजी !!!

मी यू ट्युब वर सर्व भाषणे ऐकली.
श्री. मन्जुळे यांना अभिनंदन व शुभेच्छा.
खरोखर स्पृहणीय व कौतुकास्पद आहे त्यांचे यश,
त्यांच्या आई वडीलाना व बन्धूंना शतशः दन्डवत

आमचे मार्गदर्शक, श्री अच्युतराव हंगे साहेब, (सध्याचे भिवंडी-निजामपुर महापालिकेचे आयुक्त आणि अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त) यांच्या भाषणाचा व्हिडीओ नुकताच अपलोड केलाय! व्हिडीओ थोड़ा खराब आहे पण एकदा जरुर ऐकावे असा खणखणीत आवाज! http://bit.ly/Kardakwadi_IAS_Felicitation