मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लार्सन अ‍ॅव्हरेज करा. चांगला स्टॉक आहे. SBI 2175 येईल असे वाटत आहे, पण सोमवारी आला नाही तर घ्या. रिलायन्स ९८० क्रॉस करेल असे वाटत नाही, तो पर्यंत कधिही घेता येईल. १२०० पर्यंत जाईल.

ग्लोबल क्रॅश भारतासाठी भरुन येईल. काळजी नको. एक महिनाभर वाईट जाईल. ह्यावर लिहीतो.

Aban Offshore's gas rig sinks in Caribbean, stock down 17%

http://www.moneycontrol.com/news/world-news/aban-offshore39s-gas-rig-sin...

अबन ऑफशोअर घ्यावा काय आत्ता ? मला या स्टॉकने दोनवेळा चांगला फायदा करून दिलाय, सध्या भाव खाली आलेत तर घ्यावेत काय?

तसेच गोल्ड ETF मध्ये आहे थोडी गुंतवणुक, पण आत्ता आणखीन वाढवावी का, सोने थोडे कमी आल्यावर घ्यावे?

>>> मारुती एकदम डिस्काउंटला आला आहे. काल मी मारुती अपलोड केले. येत्या वर्षभरात १६ ते १८ टक्के रिटर्न मिळतील.

केदार साहेब,

३ आठवड्यांपूर्वी १२८० च्या आसपास असलेला मारूतीचा शेअर आज १२०० च्या खाली उतरला. यामागे काय कारण असेल? अजूनही मारूतीचा शेअर घ्यावा का?

केदार

सेल चे भवितव्य काय आहे. मी २३५ ला घेतलाय आता २०५ चालू आहे Sad

तसेच वर म्हटल्या प्रमाणे मारुती सुझुकी च्या इतक्या घसरणीचे कारण काय ?

मारुती सुझुकी किंवा इतर भारतीय शेअर्स इंडेक्स घसरणीमुळे ( पॅनीक सेल) मुळे पडत आहेत. ग्रिस मध्ये जे चालू आहे त्यावरुन युरोप, अमेरिका, एशीया हे सर्व मार्केट्स गेले कित्येक दिवस पडत आहेत. पडत्या मार्केट मध्ये जर पेशन्सची सवय नसेल तर अजिबात फ्युचर्स / ऑप्शन्स घेउ नका.
पण दिर्धकाळ शेअर्स घेण्यासाठी ही संधी चांगली आहे.

मी गेल्या दोन-तीन दिवसात फ्युचर्स मध्ये खालील खरेदी केली.

फ्युचर्स - निफ्टी ५१०० - ३ लॉट - काल लॉस बुक ४७०००
फ्युचर्स - निफ्टी ४९०० - ३ लॉट - अनरियलाईज्ड लॉस - ८०००
फ्युचर्स - निफ्टी ४८३४ - २ लॉट - प्रॉफिट नॉट बुक्ड - विल वेट
फ्युचर्स - लार्सन - प्रॉफिट - १८५००
फ्युचर्स - स्टेटबँक - सेल -कव्हर - प्रॉफिट १९०००
फ्युचर्स - ओरियन्टल बँक - प्रॉफिट ७२००

शेअर्स
लार्सन - १४९८ - विकत घेतला
मारुती - काल विकत घेतला
टाटा मोटर्स - काल विकत घेतला. आज सकाळी ४.६ टक्यांनी फायद्यात आहे.
ओरियन्टल - परवा विकत घेतला. ३१७-३२० ला जबरी सपोर्ट आहे. ४०० + जाणार.
HDIL - विकला - रियालिटी पॅक
NTPC - विकला.

वर ही उदा. का दिली तर गोंधळले नाही तर ह्यासर्वातून देखील फायदा होउ शकतो. तोटातर होतोच, माझ्या ६ निफ्टी पोझिशन्स तोट्यात आहे, पण ओव्हरलॉल ओके आहे. गोंधळू नका. नेमके इथेच सामान्य गुंतवणूक दार मार्केट कडे पाठ फिरवतात व संस्था नफा कमवतात. पॅनिक मोड मध्ये येउन विक्री करु नका. हे सावट एक दोन महिन्यात भारतासाठी निघून जाईन. भारताची स्वतःची प्रगती ८ टक्याने होणार आहे. ते अजुन बदललेले नाही.

सर्व मेटल स्टॉक्स गेल्या १० दिवसात २० टक्यांपर्यत पडले आहेत. त्यातले मला स्टर्लाईट आवडते. सेल पण मेटल्स पॅक मध्ये असल्यामुळे पडला आहे. होल्ड कर. खरेतर अजून घे.

युफलेक्स वर माझा अभ्यास नाही, मी बघून सांगतो.

केदार,
"Trading Strategy "..........just great !
सर्व मार्केटस( nifty ,Dow ,China n Europe) २०० Days Simple Moving Average च्या खाली बंद.
What you Say ?

मला PSL Ltd. / Man industries. / Ratnamani Metals पैकी १ घ्यायचा आहे. Man आणि Ratnamani मधे प्रमोर्टस ची खरेदी दिसतय. आणि Ratnamani तर equity master नी मागे ९० वर असतान्ना रेकमेंड केलेला (टार्गेट २२०).

केदार, बर्‍याच दिवसांनी विचारतेय. फ्युचर्सबद्दल काही कळतही नाही त्यामुळे त्यात लक्षही घालत नाही. शेअर्सबद्दल लिही म्हणजे साधारण कोणते घ्यावेत किंवा कोणते काढावेत.

सध्या मार्केट मध्ये जो दंगा चालला आहे त्यामुळे केदार त्याच्यात बिझी असेल हो.. हा दंगा संपू दे मगच बहुतेक तो सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देईल.. Happy

केदार, इथे याहू किंवा वॉल स्ट्रीट च्या वेबसाइट वर जसा सेक्टर, इंडस्ट्री वाइज अ‍ॅनॅलिसीस करता येतो तसा बी एस इ, निफ्टी वरती नोंदवलेल्या स्टॉक्सचं अ‍ॅनॅलिसीस, कंपनी क्वॉर्टर्ली, यिअर्ली रिपोर्ट्स वगैरे बघण्याकरता कुठल्या साइट्स चांगल्या आहेत? मी गुगल करुन बघितले पण हे सगळं असलेली साईट काही सापडली नाही. बर्‍याच ठिकाणी फक्त करंट मार्केट डेटा आहे. बी एस इ च्या साइट वर पण कंपन्याबद्दल सविस्तर माहिती आहे पण ती सेक्टर, इंडस्ट्री नी स्लाइस करता येत नाही.

वैद्यबुवा, खाली काही साइट्स दिल्या आहेत. तिथे स्टॉक्सचं अ‍ॅनॅलिसीस, कंपनी क्वॉर्टर्ली, यिअर्ली रिपोर्ट्स अशी माहिती मिळेल.

www.moneycontrol.com

http://money.rediff.com/money/jsp/markets_home.jsp

http://www.capitalmarket.com/

तसेच ब्रोकरिंग हाउसेस च्या वेबसाइटवर पण हमखास माहिती मिळेल.
ICICI Direct, Motilal Oswal, ShareKhan etc.

वरील काही शेअर वर व निफ्टी वर मी काही लिहू शकतो का? >>> परांजपे नेकी और ?? जरुर लिहा.

मी १० दिवस कुटूंबासहित फिरतीवर होतो त्यामुळे काही लिहायला जमले नाही. आत्ता बघत आहे, प्रश्नांची उत्तरे देईनच.

बुवा मनीकंट्रोल ची एक उपशाखा indiaearngins.com आहे. तिथे तुम्हाला प्रत्येक कंपनीच्या उत्पनाबद्दल माहिती मिळेल.

निफ्टी सध्या ४९०० ते ५१२५ रेंज बाऊंड आहे. निफ्टी फ्युचर्स डिस्काउंट वर आहेत, कारण मार्केट परत पडण्याची भिती. निफ्टीसाठी ४९6X च्या खाली आला की लगेच विकत घ्या व ५०५० क्रॉस केला की विकत जा. तसेच शॉर्टसाठी पण ही रेंज वापरता येईल. नविन रेंज सुरु झाली की अपडेट टाकत जाईन.

रंगाशेट - अ‍बॅन ऑफशोरचे काही खरे दिसत नाही. ३ र्‍या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी उत्पन, रिग्सचे युटीलायझेशन ह्या बद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिल्या तिमाहीत वर्षाच्या शेवटी जेवढे उत्पन्न (भविष्यातील) दाखवले ते आता येणे शक्य नाही.
माझ्यामते तो आता सपोर्ट लेव्हलला आला आहे. २००८ डिसे अन २००९ जुलै मध्ये तो सध्याच्या लेवलला ट्रेड होत होता व ही लेवल सपोर्ट म्हणून पकडायला हरकत नाही. इथून जर घसरला तर मात्र सब ५०० लेवलला जाईल.

देवदत्त - तुम्हाला काही स्पेसीफिक हवा असेल तर तो शेअर कळवा. मी लिहेन त्यावर.

भाउ PSL अर्निग्स साठी बरा आहे. क्लासिक हेड न शोल्डर्स मध्ये अडकला आहे. १०० ते १०५ रेंज मध्ये एन्ट्री घ्या.

रत्नमनी - ऑर्डरबुक ४०० करोडचे. सर्व रेशोस ( मार्च २०१०) चांगले आहे. गेले तीन वर्षे कन्सीस्टंट ग्रोथ, ह्या वर्षी नेट प्रॉफिट मार्जिन थोडे कमी झाले आहे, पण तेवढी चिंता नाही. जिंदाल सॉ, मान सोबत मुख्य कॉम्पीटिशन. ९८ ते १०२ मध्ये सपोर्ट, १२५-१३० ला मेजर रेसिस्टन्स. लुक्स गुड टू मी. Happy

बुवा ET वर पण माहिती मिळते. पण ती स्लाईस न डाईस नाही करता येत. अजूनही भारतीय साईटस ह्या सर्व माहितीसाठी एवढ्या चांगल्या नाही. खरेतर अशी एखादी नविन साईट काढने जास्त फायद्याचे ठरेल असे मला वाटत आहे. Happy ज्यात

१. प्रत्येक सन्ड्री कंपनीची माहिती रॅलिगेअर किंवा डायरेक्ट बिसई वरुन
२. सेक्टर / सब स्केटरवाईज अलोकेशन. स्लाईस न डाईस
३. एन्ड ऑफ डे फ्रि चार्टिंग विथ १००+ टुल्स ( सध्या मेटा स्टॉक ला २५००० रु व ९००० दरवर्षी डेटाचे लागतात)
४. असे अनेक मुद्दे जे इतर साईटस जसे आयसीआयसीआय, शेअरखान, रिलायन्स मनी, मनीकंट्रोल कडे नाहीत ते. ( मॉडेल म्हणून याहू फायनान्स मस्त आहे. )

केदार,
३ i infotech ६६ला मिळतो आहे? कसा आहे? मझ्याकडे ९८ ला घेतलेला आहे. अव्हरेज करायचा आहे

केदार,
ICICI प्रत्येक शेअर मागे ६० रु. व L & T ८० रु. फायदा देतायत. प्रॉफिट बुक़ करू की अजून फळाची आशा धरु?
नजीकच्या काळात ICICI ९५० पर्यन्त जाईल काय?
सेन्सेक्स जून मध्ये १८,००० ला जाईल कि range bound राहील?
धन्यवाद.

निकिता अ‍ॅव्हरेज करा. पण ९८ + क्रॉस होण्यासाठी वाट पाहावी लागेल.
ICICI मध्ये एन्ट्री कधी घेतली? मला वाटतं इन्डेक्स वर गेला तर ICICI ला फायदा होईल. घाई नसेल तर होल्ड करा. ९०० क्रॉस होईल.

लार्सन - आज १६६० आहे. फायदा बुक करुन परत १५९० लेवल वर येऊ शकता. पण अगदी १५-२० शेअर असतील तर ब्रोकरेज मध्ये खूप पैसे जाउन तेवढा फायदा (% मध्ये) दिसणार नाही. पण मार्केट मध्ये सुरुवात केली असेल तर फायदा बुक करा. फायदा झाला की बरं वाटत. Happy

मार्केट रेंजबाउंड आहे. १८००० जुन शेवटा पर्यंत येणार नाही असे मला तरी वाटत आहे, पण जर सलग दोन तीन दिवस युरोप, अमेरिका वर गेले तर काहीच अशक्य नाही.

काल परवाच निफ्टीवर लिहीले होते, त्याप्रमाणे रेंज मध्येच शेअर्स घ्या.

Pages