कोवळी कळी

Submitted by Aditiii on 11 May, 2010 - 05:14

कोवळी कळी

कॉलेजचा पहिला दिवस ! मनु काय सुरेख ड्रेस घालून आलीये. अर्थात तिला काय कमी? आणि आमच्या सारख्या गर्ल्स स्कूलवाल्यांनाच कॉलेजच आकर्षण. काय छान वाटतंय आज, मोकळं, स्वतंत्र! बस. चला, लेक्चर अटेंड करायला हवं.
कॉलेज सुरु होऊन एक आठवडा झाला, पण अजूनही शाळेत असल्यासारखंच वाटतंय. फक्त विषय आणि शिक्षक वेगळे. आणि आज काल मनुची हि कंपनी नसते फार. त्या मोहित बरोबर फिरत असते. एका आठवड्यात किती प्रगती?. तिची आई विचारते बऱ्याचदा, मनु बसते ना गं तासाला? काय बोलणार? मलाही आज काल जाणवू लागलंय, काही मुलं बघतात माझ्याकडे, त्यांची नजर तर विचारूच नका. पण तो... शहारे येतात त्यांनी पाहिल्यावर अंगावर. किती हुरहूर वाटते. असं वाटत त्याच्याकडे बघतच राहावं, बोलतो आम्ही पण कामापुरत, असं वाटत त्याला सांगाव मनात काय आहे ते पण तो नाही म्हणाला तर? फार फार भीती वाटते त्याच्या नाही म्हणण्याची.
मनुला सांगितलं हे सगळ परवा तर म्हणे बोल कि त्याच्याशी जाऊन त्यात काय? ओळख आहे ना? नाही तर मीच सांगेन! मी म्हणाले, कॉलेजला येशील तर सांगशील ना! तर म्हणे आता रेग्युलर येणार आहे. मोहित जॉब करणार आहे, त्याला आता वेळ नाही. त्याला तर पास व्हायला अजून दोन वर्ष आहेत ना मग? मी विचारलं तर म्हणे गुपित आहे सांगेन कधीतरी. आठवडाभर आली सरळ मग परत गायब बाईसाहेब. यायचा पत्ताच नाही. तो बघतो अजूनही माझ्याकडे पण धीरच होत नाही.
शेवटी महिन्याने गाठलं मनुला घरीच मग विचारलं बाई आहेस कुठे? तर लाजली चक्क आणि म्हणे अगं उद्या येते कॉलेजला मग बोलू. आल्या शेवटी! जबरदस्ती करून कॅन्टीन ला नेलं आणि म्हणे कोणाला सांगू नकोस हा पण आम्ही लग्न करायचं ठरवतोय. मी ओरडलेच इतक्या लवकर? अगं हळू बोल, लगेच नाही काही पण तो आता जॉब करतो आणि पुढच्या वर्षी पास होईल तेव्हा आम्हाला लग्न करायचंय" मी सुन्न बधीर झाले होते. का मनु? एवढ्या लवकर का? अगं तो आपल्या जातीतला नाहीये त्यांच्याकडे लवकर करतात म्हणे. पण तू होतीस कुठे महिनाभर? अगं त्यांनी फ्ल्याट घेतलाय मी तिथेच असते. अगं करतेस काय दिवसभर? तू ना वेडीच आहेस असं म्हणून म्हणाली जाते तो येईलच आता.
आज मि मनुच्याच विचारात गढले होते कि तो माझ्यकडे बघतोय का हे बघायचाच विसरून गेले. प्राजक्ता, हाक ऐकून बघितला तर समोर तो. बोलायचीही शुद्ध नव्हती बघतच राहिले येड्यासारखी. अगं मला तुझी म्याथ्सची वही देतेस का? उद्या परत देईन. मी मूकपणे वही काढली हात थरथरत असल्याने खाली पडली. तो घेऊन निघून गेला. माझ्या वेंधळेपणावर मलाच हसू यायला लागल. दुसऱ्या दिवशी गेले तर हा क्लास च्या दारात उभा! जणू माझीच वाट पाहत असावा. मला म्हणे आज वही विसरलो तुला लगेच हवी आहे का? मी कशीबशी हो म्हणाले तर म्हणे मग ५ वाजता येणार का तळ्यातल्या गणपतीला तिथे आणून देईन म्हणजे दोघानाही जवळ आहे म्हणून म्हटलं. खल्लास! मी काय उत्तर द्यावं असा विचार करत असतानाच तो म्हणाल नाहीतर राहूदे उद्याच घे. मी घाईने होकार भरला आणि धडधडत्या काळजाने लेक्चर ला बसले.
कुठल लक्ष लागायला? मनुला फोन करून सांगितला आणि विचारलं काय करू? तर म्हणे तुझं तू ठरव तुटक तुटक बोलली आणि फार काही नाहीच बोलली. नंतर करते फोन म्हणाली. विचित्रच आहे.

मी जायला निघाले आणि गडबडीत लक्षातच नाही आल आणि धडक बसली, जाग आली ती हॉस्पिटलमधेच तंगड्या गळ्यात आणि महिनाभराची सक्तीची विश्रांती. चुटपूट लागली होती त्याला काय वाटल असेल. मनुजवळ निरोप द्यावं म्हणून फोन केला तर उचललाच नाही. मग पंरत केला तर उचलला आणि गडबडीत म्हणे नंतर करते कुजबुजत म्हणाली. पाय बरा होऊदे मग बघू तिच्याकडे मी ठरवलं. काय करत असेल पण?
मनूचा फोन आलाच नाही नंतर आईलाही विचारलं आली होती का तर नाही म्हणली पटकन. कशी तरी झालंय अस वाटतंय पण काय? तो काय करत असेल आता? सारखी आठवण येतीये.

आज घरी आले. काय छान वाटतंय. लंगडत लंगडत का होईना घरात फिरता येतंय. आज आई काहीतरी बोलत होती, शेजारच्या काकूंशी हळू आवाजात मी सहज ऐकल तर मनुच नाव ऐकलं त्यांच्या बोलण्यात. मग मात्र राहवेना काकू गेल्यावर आईला गाठलच आणि विचारलं आई काय झालंय सांग? मनु फोन घेत नाही, स्वत:येत नाही, तुम्ही पण काही सांगत नाही प्लीज सांग काय झालंय ते. आई म्हणाली तू लहानेस अजून पण ठीक आहे तुलाही कळायलाच हवं! म्हणत पेपर दिला मागच्या आठवड्याचा हातात.

फ्रंटपेजवर न्यूज होती. लग्नाच्या आमिषाने बलात्कार आणि जबरदस्ती वेश्याव्यवसाय लादल्याबद्दल मोहित कुमार यास अटक! तरुणीची आत्महत्या!

समाप्त!

गुलमोहर: 

आत्महत्या?? Sad

शुद्धलेखनाकडे आणि विरामचिन्हांकडे लक्ष द्यायला हवयं खरचं.. e.g. हे वाक्य पहा>>>>
मी जायला निघाले आणि गडबडीत लक्षातच नाही आला आणि धडक बसली जाग आली ती हॉस्पिटलमधेच तंगड्या गळ्य >>

मागे एकदा child helpline साठी काम करणाऱ्या ओळखीच्या एका मुलाने अशीच एक गोष्ट सांगितली होती. हुबेहूब !! मुलगी पुण्यातल्या अतिश्रीमंत घरातली होती पण तिला सोडवताना सुद्धा भयंकर त्रास झाला होता त्या लोकांना. मग अगदी २५००० रु खर्ची घालून पोलिसात वगैरे प्रकरण दिले पण त्या मुलीने जीव दिला शेवटी . वय वर्षे १७ कि १८ काहीसे हि घटना २ वर्षांपूर्वीची !!!

मी सुध्हा अश्या बातम्या वाचल्या/ऐकल्या आहेत ....
पण मला कळत नाही .. की कोणता ही मुलगा एखाद्या मुलिवर जबरदस्ती वेश्याव्यवसाय लादु कसा शकतो ?
मी असतो तर तिथेच उभा कापला असता अश्या मुलाला.

आणि लग्नाचे आमिष हा तर प्रकारच मला कळत नाही. या बाबतीत काही प्रमाणात तरी बळी पडलेल्या मुलिन्चा मुर्खपणा नक्किच आहे.

<<मागे एकदा child helpline साठी काम करणाऱ्या ओळखीच्या एका मुलाने अशीच एक गोष्ट सांगितली होती. हुबेहूब !! मुलगी पुण्यातल्या अतिश्रीमंत घरातली होती पण तिला सोडवताना सुद्धा भयंकर त्रास झाला होता त्या लोकांना. मग अगदी २५००० रु खर्ची घालून पोलिसात वगैरे प्रकरण दिले पण त्या मुलीने जीव दिला शेवटी . वय वर्षे १७ कि १८ काहीसे हि घटना २ वर्षांपूर्वीची !!! >>
भयानक आहे हे.

जाग आली ती हॉस्पिटलमधेच तंगड्या गळ्यात

'त्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यात अडकवेन' असा धमकीवजा वाक्प्रचार असला तरी प्रत्यक्षात तंगड्या गळ्यात घालणं अशक्य असतं. Happy

शुद्धलेखन आणि विरामचिन्हांचा वापर ह्याकडे भरपूर मेहनत घ्यायला हवी आहे.