इको यणचि, रावणवध, गूगल बुक्स वगैरे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आमच्या गुरुवारच्या संस्कृत वर्गामध्ये अष्टाध्यायीची काही सूत्रे एकत्र शिकण्याचा विचार सुरु होता. त्यादृष्टिने योग्य सामग्रीचा शोध आंतरजालावर करत होतो. पाणिनीकृत अष्टाध्यायी हा कोणत्याही व्याकरणावरचा सर्वोत्कृष्ट खजीना आहे याबद्दल दुमत असु नये. इको यणचि (6.1.77) हा त्याचाच एक सुंदर नमुना आहे. इको म्हणजे इक् म्हणजे इ, उ, ऋ, ऌ (माहेश्वर सूत्र 1 व 2) या नंतर जर अच् (म्हणजे स्वर - माहेश्वर सूत्र 1-4) आल्यास त्यांचा यण् (म्हणजे य, व, र, ट - सूत्र 5-6) होतो. उदा. दधि + अत्र = दध्यत्र, मधु + अत्र = मध्वत्र ई. (अर्थात जवळजवळ सर्व नियमांप्रमाणे या नियमालाही अपवाद आहेतच जे अष्टाध्यायीचीच्या इतर सुत्रांद्वारे दिलेले आढळतात).

तर ही शोधाशोध सुरु असतांना एक वेगळाच खजीना हाती लागला. वर पाहिलेल्या सुत्राप्रमाणे अष्टाध्यायीमध्ये जवळजवळ 4000 सुत्रे आहेत. त्यावर अनेक भाष्ये झाली, त्या भाष्यांवर भाष्ये झाली, तरी त्यातील जादु संपता संपत नाही. साधारण 1600 वर्षांपुर्वि भट्टि नामक कवि होऊन गेले. त्यांच्या व्याकरणाच्या वर्गात म्हणे एकदा एक हत्ती शिरला. कोणत्या तरी नियमामुळे त्यानंतर एक वर्षापर्यंत व्याकरण शिकवता येणार नव्हते (त्यांना? तिथे?). यावर मार्ग् म्हणुन त्यांनी भट्टिकाव्यम् या नावाचे रामायणावर एक काव्य केले. अर्थात ते वाल्मिकी रामायणापेक्षा बरेच छोटे होते. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्या 1650 श्लोकांमधुन पाणिनीचे नियम वापरायचे प्रात्याक्षिक दिले.

हे कळल्यावर भट्टिकाव्यम् कुठे सापडतय का हे मी शोधु लागलो. काही संदर्भ लागले, पण मुळ नग काही सापडायची चिन्हे दिसेनात. इतक्यात एका दुव्यावर असे समजले की क्ले संस्कृत लायब्ररीने त्यावर एक पुस्तक नुकतेच प्रकाशीत केले आहे. गेल्या काही वर्षात यांनी अनेक सुंदर पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. या नव्या पुस्तकाचे नाव आहे रावणवध. ओलिवर फॅलन नामक महाभागाने हे लिहिले आहे आणि या भाषांतराला आधीच्या एका भाषांतरापेक्षा सुदृढ वगैरे पण म्हणण्यात आले आहे.

आणखीन थोडी शोधाशोध केल्यावर कळले की फॅलन साहेब जरा जास्तच फॉलन वाटताहेत. प्राचीन व त्यामुळे दुर्मीळ व महागडी अशी हस्तलिखिते चोरल्यामुळे हे महाशय तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. त्या पुस्तकातील प्रास्तावीकावरून हे मात्र कळले की भट्टिकाव्यम् समजाऊन घ्यायचे असेल तर जयमंगलांचे भाष्य (1914 सालचे) वाचणे आवश्यक आहे.

मग जयमंगलची शोधाशोध सुरु झाली. नेहमीप्रमाणे भलते सलते दुवे पटापट सापडु लागले. अमॅझॉन सारख्या ठिकाणी काही विक्रीकरता असलेली पुस्तके सापडली. शेवटी एकदा हवं ते गूगल बुक्स वर सापडले! आधी फक्त पहिले 5 सर्ग असलेले (पण ईंग्रजी भाषांतरासहीतचे) आणि मग सर्व सर्ग असलेले. कॉपीराईट संपलेली ही पुस्तके याप्रकारे उपलब्ध करुन देत असल्याबद्दल गूगलचे आभार.

वर उल्लेख झालेले दुवे:

अष्टाध्यायी/काशिका
माहेश्वराणि सूत्राणि
भट्टिकाव्यम्
क्ले संस्कृत लायब्ररी
रावणवध
फॉलन फॅलन
भट्टिकाव्यम् - सर्ग 1-5 जयमंगल यांचे भाष्य आणि ईंग्रजी भाषांतर यांच्यासहीत
भट्टिकाव्यम् - सर्व सर्ग जयमंगल यांच्या भाष्यासहीत

जाताजाताः कीवर्ड च्या समानतेवरुन शोधांचे निकाल प्रदर्शीत केल्या जातात. ओलिव्हर फॅलनचे भट्टिवरील पुस्तक शोधत असतांना, त्याच्या सारखेच म्हणुन खालील पुस्तके दर्शविल्या गेलीः
Picture 21.png

विषय: 
प्रकार: 

अरे उत्तम. वाचून काढणार. किती तो रीसर्च. अस्चिग या शब्दाचा पण काही अर्थ आहे काय? माझ्या एका पुतण्याचे नाव अर्चिस आहे. तो ही उसगावी प्रोफेश्वर आहे. अस्चिग म्हण्ले कि मला नेहमी अर्चिसच आठवतो.

cant believe...
कोणीतरी हे सगळे हजार वर्षांपुर्वीचे जुने सांभाळुन ठेवले, आणि मग ते नेटवरही टाकले...

मला यातले काही कळत नाही याचे भयानक वाईट वाटतेय...:(

धन्यवाद.

पण माझे योगदान हे केवळ संकलन करण्याचे आहे. रैना, मला जेंव्हा १० टक्के अष्टाध्यायी कळली असे वाटेल तेंव्हा नमस्कार स्विकारायचा का याचा विचार करेन.

अ.मा. aschig हे जर्मन आहे असे समजुन वाचले तर त्याचा उच्चार आशिष च्या जवळपास जातो.