अमेरिकन स्वप्न! (भाग १)

Submitted by Aditiii on 4 May, 2010 - 02:57

अमेरिकन स्वप्न!

डिस्कोमधील गाण्यांच्या तालावर बेधुंद होवून नाचताना माधुरीला वेळेचे भानच राहिले नव्हते. जेव्हा तिचे घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा तिला रात्रीचे २ वाजल्याचे लक्षात आले. 'ओह शिट! आज परत शिव्या खाव्या लागणार' तिच्या मनात विचार आले. तिच्या 'गोऱ्या' मित्र मैत्रीणीना बाय करून गाडी चालू करे पर्यंत अडीच झाले होते. आता घरी पोहोचायला ३ तरी वाजणार. आई बाबा झोपलेले असुदेतरे तिनी जिझस ची प्रार्थना केली. कितीही प्रयत्न करूनही तिच्या ओठावर देवा पेक्षा जिझस चेच नाव येत असे. भांडणाच अजून एक कारण! तिने एक सुस्कारा सोडला. घरी पोहोचल्यावर आवाज ना करता खोलीत जी पर्यंत तिच्या मनावर फारच ताण पडला अंथरुणावर स्वतःला झोकून देऊन आजच मरण उद्यावर गेला असा विचार करत सुटकेचा एक निःश्वास सोडला.

माधुरी अत्रे, वय वर्षे १९, राहणार न्यू जर्सी, लहानपणापासून आई बाबांच्या लाडाकोडात अमेरिकेतच वाढलेली एकुलती एक मुलगी. पहिली दहा वर्षे अतिशय शांततेत सुखात लाडात गेली. वादाला तोंड फुटले ते तिच्या १६ व्या वाढदिवशी! आई बाबांबरोबर हा दिवस साजरा करायची पद्धत मोडून जेव्हा तीने पब मध्ये पार्टी देण्याचे सुचवले किंवा हट्टच धरला तेव्हा. जरी तो हट्ट फेटाळला गेला असला तरीही वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या आणि जास्तीत जास्त अमेरिकन पद्धतीने जाणाऱ्या तिच्या मागण्या आई बाबांना अधिकच काळजीत टाकू लागल्या आणि माधुरीला बुचकळ्यात. ज्या आई बाबांचे बोट धरून ती इथे आली त्यांनी अचानक एवढे का बदलावे आणि आपली पोटाची पोर एवढी अमेरिकन का व्हावी हे एकमेकांना कळतच नव्हते.

सकाळी ब्रेकफास्ट साठी टेबलवर आल्यावर आईची सरबत्ती सुरु झाली. काल किती वाजता आलीस? किती वेळ वाट बघितली? हि काय वेळ आहे तरुण मुलीनी घरी यायची? रात्र रात्र त्या अमेरिकन मित्रांबरोबर फिरत असतेस जरा तरी लाज बाळग? आमचा नाक कापू नकोस म्हणजे मिळवली." आई प्लीज सकाळी सकाळी नको बस आता! माधुरीचा आवाज फारच चढला होता मग मात्र ती खाणं सोडून तशीच रूम मध्ये निघून गेली.

' काय तर म्हणे आमेरीकॅन मित्र मैत्रिणी' ती स्वतःशीच धुसफुसत म्हणाली. "किती वर्ष झाली भारत सोडून पण ह्यांच्या मनातून भारतीयत्व काही जात नाही, मला तर आठवत हि नाही तो देश तिथला काहीच, तुम्हाला नसेल वाटत पण मला वाटत ना मी इथलीच आहे म्हणून. माझे मित्र मैत्रिणी हे इथलेच, शाळा, हायस्कूल सगळा सगळा इथेच. मग का नाही मला वाटणार इथलं सगळ चांगलं? लहानपणी माझ्या बरोबरीनं ख्रिसमस, होलोवीन, साजरा करणारे आई बाबा आता नाव जरी निघाला तरी कपाळावर आठ्या पाडतात. काय तर म्हणे इथल्या भारतीयांच्यात मिसळ, त्यांच्याशी मैत्री कर, पण म्हणून माझे मित्र मैत्रिणी का उपरे? ते अमेरिकन आहेत म्हणून? मला नाही पटत हे, मी जाते ना संस्कृती मंडळाच्या कार्यक्रमाला पण मला माझा ग्रुप हि आवडतो आणि जास्त जवळचा वाटतो, आता काय करू?"

मोबाईलच्या रिंग ने माधुरी भानावर आली. पाहते तो जॉन चा फोन! "हे म्याडी व्हेन टू पिक यु? वी आर गोइंग फॉर स्यामी ज पार्टी." "ओह शिट आय फोर्गोट, पिक मी अराउंड १२ .०० " फोन ठेऊन मागे वळते तो आई दारात उभी. "कोणाशी बोलत होतीस? आणि कुठे जाणारेस संध्याकाळी आज घरी कार्यक्रम आहे घरीच थांब" प्लीज ममी अगं जरा तरी प्रायव्हसी? सरळ काय आत येतेस आणि ऐकतेस?" माधुरी ने तिला सुनावले. 'किती वाजता कार्यक्रम आहे मी येईन तो पर्यंत परत' ती म्हणाली. चालणार नाही जरा मला मदत हवी आहे स्वयंपाकात आज कुठेही जायचा बेत नको. तिला उत्तर द्यायलाही वेळ न देता आई निघून गेली आणि माधुरीच्या हातात चरफडण्याशिवाय काही राहिले नाही. अजून भांडण करायची ताकत कालच्या अपुऱ्या झोपेमुळे आली नसल्याने तीने आईचे ऐकायचे ठरवले नाहीतर काळाचा उत्त आई लगेच काढेल अशी भीतीही तिला होतीच. आपण येणार नसल्याचे मित्रांना कालवून स्यामी ला सॉरी म्हणून आणि त्यांचे टिपिकल इंडिअन वाले टोमणे ऐकून ती खाली आली.

आई पूजा करत होती. अलीकडे सारखीच असते देवघरात बघावा तेव्हा उपास पूजा. का करत असेल असं? माझी काळजी? पण कशाला करते ती आईची पूजा होईपर्यंत ती हाच विचार करत होती. आई ने अंघोळ करून मगच आत ये असे फर्मान सोडले मग ती अंघोळीला पळाली. बाहेर येऊन बघते तो आईने पुरणपोळी चा घाट घातला होता. आई कोण येणार आहे एव्हड खास? तुझ्या बाबांचे खूप जुने मित्र आहेत आत्ताच आलेत न्यू जर्सी मध्ये म्हणून त्यांना बोलावलंय, आणि हो त्यांचा मुलगा आहे एक आमोद तो हि येणार आहे म्हणून तर तुला थांब म्हणाले मी" इति आई! एकंदरीत काय प्रकार चालू आहे ते माधुरीला लगेच लक्षात आलं आणि आईशी भांडण न केल्याचा तिला आता पश्चात्ताप झाला. पण बारा वाजून गेले होते.

आमोद शी काय पण नाव आहे. तीच्या मनात विचार आला,आणि ह्या विचारासरशी तिला आठवला तिला आवडणार नाव आणि त्या नावाचा मालक "रुसन!

क्रमशः

गुलमोहर: 

आदिती रागवायचे नाही हं पुलेशु. माझी मुलगी पण काही तरी विचारते एड्वर्ड चांगला कि जेकब ( ट्वायलाइट फेम) तेव्हा मी तिला नेहमी म्हण्ते तू शेवटी एकारान्त कोब्रा गोड मुलाबरोबर लग्न करणार. आत्ता काय ते कल्पना करून घे.

न्यू जर्सीत सुमा फूड्स च्या पुरणपोळ्या मिळतात ना? घरी कुठे घाट घालते ही माधुरीची आई?

आदिती, तुझे शैली खूप छान आहे पण अमेरिकेत घडणारी कथा मुळीच वाटत नाही. खर सांगू कालबाह्यच वाटते. कदाचित कथेच्या वेगामुळे तू व्यक्तिरेखा नीट ठोस रंगवू शकली नाही आहेस. एकसारखी देवघरात बसणारी मराठी आई (१९ वर्षाच्या मुलिची) ही अमेरिकेतच काय भारतात पण दुर्मिळ झालीय. आम्ही एकतर ऑफिसला जाण्यासाठी, लोकल मधे तरी लटकलेल्या नाहीतर दात्-ओठ खाऊन टर्न पाइक वर ट्रॅफिक मधे अडकलेल्या.
आयव्ही लीग च्या रेस मधे अडकलेली आमची पोर कधी रात्रभर डिस्कोत जाणार? दर शनिवारी लाँड्रीचे लोड घरी घेउन येतात आणि आयुष्यभर मराठी जेवणाला नाव ठेवणारी ही पोर रविवारी परत डॉर्मवर जाताना भाज्यांचे डब्बे आणि पोळ्याचे चवड घेउन जातात. खूप बर वाटत! परिक्षा आणी प्रॉजेक्ट्स असली तर ही विकेएन्ड्ची फेरी पण स्किप करतात. आउट ऑफ स्टेट असलेल्या आई-वडलांच्या भाग्यात ही विकेण्ड व्हिजीट पण नसते. समर मधे इन्टर्नशिप नाहीतर जॉब आहेच.
अग, आयुष्याची जास्ती वर्ष अमेरिकेत काढ्लेल्या आम्ही आया आता मनाची समजूत घालतो.. चांगला जावई आणि सून हे सगळ्या रंगात येतात. तुमच भाग्य लागत मात्र ते मिळायला. फक्त मुलाने सून आणि पोरीने जावई घरात आणावा हीच माफक अपेक्षा ठेवतो.

जरा रिसर्च पक्का कर ग! पुलेशु!

न्यू जर्सीत सुमा फूड्स च्या पुरणपोळ्या मिळतात ना? घरी कुठे घाट घालते ही माधुरीची आई? >>> सुमाच्या पोळ्या बेक्कार असतात म्हणून घरी करत असेल. तुमचे इतर मुद्दे ठीक आहेत पण हा उगीचच वाटला.

<<सुमाच्या पोळ्या बेक्कार असतात म्हणून घरी करत असेल. तुमचे इतर मुद्दे ठीक आहेत पण हा उगीचच वाटला. >>
मुळीच नाही! तुम्हाला कळला नसेल तर माफ करा. मराठी जेवण न्यू जर्सी मधे सहज मिळत हे मला सांगायच होत. सुमा हे एक माहित असलेल उदाहरण दिल. Sometimes you have to use known examples to get your point actross.

मराठी जेवण न्यू जर्सी मधे सहज मिळत म्हणून न्यु जर्सीतल्या प्रत्येक मराठी घरी पाहुणे येणार असले की सर्व पदार्थ विकत आणणं इतकं obvious नाही (हा माझा मुद्दा आहे). हौशीने पुरणाच्या पोळ्या, श्रीखंड घरी करुन चार लोकांना खाऊ घालणारे लोक दुर्मिळ नाहीत अजिबात.

पुरणपोळ्यांचं एक ठीक आहे हो.....करतील घरी! पण १९ वर्षाची मुलगी आई बाबांच्या घरात रहातेय हेच कौतुकाचं आहे नाही का?

१९ वर्षाच्या मुलीच्या लग्नाचा घाट घालणारे उच्चविद्याविभूषित मराठी आईवडील हल्ली इथे म्हणजे देशातही नाही बघायला मिळत. काहीही उगाच काय?
कल्पू काय म्हणतायत ते बघा जरा. थोडा रिसर्च/ अभ्यास इत्यादी केला तर काय बिघडते काय?
कशाला नावं ठेवायची सिरीयल्सच्या दळणाला?

कदंब,
समर मधे घरी आली असेल अस धरुया. आणि वर कुणितरी म्ह्ट्ल्याप्रमाणे आई सुद्धा हौशीने पुपो करणारी असेल. पण मला एकंदरीत प्लॉट नाही झेपला. एखादा प्रसंग वा व्यक्तिरेखा वेगळा (exception rather than norm) असला तर समजू शकतो पण मला सगळच outlandish वाटतय. करण जोहरच्या पिक्चर सारख. रिसर्च नक्कीच तोकडा पडलाय. माझी मुल लहान आहेत आणि अजून कॉलेज मधे जात नाहीत पण मैत्रिणिंच्या अनुभवांवरून, आजूबाजूच्या घरातली कॉलेजात जाणारी पोर बघून वरचा अभिप्राय दिला. आदितीने लिहलेली माधुरी मला नाही दिसली गेल्या २५ वर्षात. आणि निधप म्हणतात त्याप्रमाणे १९ हे काही लग्नाचा घाट घालायच वय नाही. इथे किंवा तिथे. हा पण एक टोटली न पटणारा प्लॉट. असो.

पुरणपोळ्यांचं एक ठीक आहे हो.....करतील घरी! >>> हे माझ्या पोस्टला उद्देशुन असेल तर कल्पु ह्यांचे इतर मुद्दे पटल्याचं मी माझ्या पहिल्याच पोस्टमधे लिहिलं होतं. असो.