वृषाली!

Submitted by Aditiii on 3 May, 2010 - 06:04

वृषाली!

गंगेच्या काठावरून येणाऱ्या लाटा झेलत आणि हातातील वस्तूशी चाळा करत बसलेली सौधावरील आकृती दासींच्या आता परिचयाची झाली होती. अंतःपुरातील कोणतीही गडबड त्या कानांपर्यंत पोहोचताच नसे. गेले चार दिवस रणभूमीकडे डोळे लावून बसलेली ती आकृती होती कर्णपत्नी वृषालीची! तिच्या हातातील ती वस्तू होती एक मडक्याचा खापराचा तुकडा.

दासी दीपप्रज्वलन करून गेल्या तरी ती तशीच अढळ बसली असताना तिच्या पाठीवरील स्पर्शाने तीला भान आले त्या राधा माता होत्या. वृषाली तू कर्णपत्नी आहेस या वाड्याची स्वामिनी! पती रणांगणावर असताना त्याच्या पश्चात ह्या वास्तूची जबाबदारी तुझीच आहे. त्यांच्या त्या धीर गंभीर स्वराने तिला आज आधार वाटायच्या ऐवजी विस्मय वाटला. काय वाटता असेल ह्या मातृ मनाला एका पुत्राने अशाच युद्धात प्राण गमावले असूनही दुसऱ्या पुत्राला रणांगणावर पाठवताना ह्यांचे मन धजावले कसे? ह्यांचा हात पुत्राला आशीर्वाद देताना थरथरला नसेल?

जणू तिचे मनोगत जाणूनच मत म्हणाल्या "वृषाली ज्या कौरवांच्या छायेत आपण सुखाचे सोहळे अनुभवले आज त्यांच्याशीच असलेल्या कर्तव्याला मुकून कसे चालेल? तुझं पती आधी कर्तव्याने बांधला गेला आहे, त्याच्या निष्ठा अढळ आहेत आणि त्याच त्याला तारणार आहेत." मात्र तुही तुझ्या कर्तव्याला मुकू नकोस आणि तुझा पत्नीधर्म निभाव.सुप्रिया आणि मुले भोजनासाठी खोळंबली आहेत चाल हसतमुखाने त्यांना सामोरी जा आणि भोजन ग्रहण कर.

आसवांच्या पावसासोबत वाहात असलेला आठवणींचा धबधबा रोखणे तिला अशक्य झाले ते मात्र शयनकक्षात आल्यावर. इथेच तर अनेक मधु मधुर आठवणींचे घट भरले होते. आठवणी तिच्या आणि तिच्या स्वामींच्या! स्वामी, नाथ, पती किती नावे, किती उपमा! एक मात्र तिने स्वतःपुरतीच ठेवली होती. सकाळी जाग आल्यावर ती प्रथम दर्शन घेत असे ते स्वामींच्या मुखाकमलाचे, गंगेच्या घाटावरून परत येणारे स्वामी आणि आकाशात नुकताच उगवलेला आदित्य यांची तुलना करणेच शक्य होत नसे इतके ते एकसारखे दिसत स्वामींची कुंडले अन कवच त्याच आदित्याची कोवळी किरणे वाटत. ह्याच गवाक्षातून त्यांचे दर्शन घेऊन तर आपण देवदर्शनास जायचो.

बाकी कोणी नाही पण भावोजींच्या मात्र हि गोष्ट लक्षात आली होती.त्यांनी मात्र तेव्हा थट्टा करून बेजार केले होते. शोण भावोजी ह्यांच्या हृदयाचा तुकडा, ह्यांचा सुहृद, सर्वकाही. अनेकदा माझ्याशी बोलताना ते शोणाची स्तुती करायचे त्याच्या निस्वार्थ अभंग प्रेमाची. भाऊजींनी मलाहि अगदी थोड्या काळातच मातेचेच स्थान दिले होते. माझ्या वसू सारखेच! वसू आमचा प्रथम पुत्र माझ्या आणि अंगराजांच्या प्रेमाची निशाणी. आमच्या संसारवेलीवर फुललेले फुल! जे अर्जुनाने निष्ठुरपणे खुडून टाकले अगदी त्याच प्रकारे त्याने शोण भावोजीनाही यमसदनास धाडले. आमचे दोन प्राणप्रिय जिवलग त्याने निष्ठुरपणे आमच्या संसारातून खोडून टाकले. त्याच अर्जुनासमोर स्वामी आज उभे राहणार आहेत. त्यांना हि येत असेल का आठवण आता शोणाची, वसूची? माझी? सुप्रियेची?

सुप्रिया! काय म्हणू? माझी सवत? छे, माझी प्रिय सखी! आली तेव्हा बराच घोर लागला होता माझ्या जीवाला पण सुप्रियेने क्षणात सर्वांना आपलेसे करून टाकले मलाही. तिचा हेवा वाटला मला कधी तेव्हा? आत्ता? नाही कधीच नाही मत्सराची लागण होण्याआधीच सुप्रियेने प्रेमाचे खत घातले आणि मत्सराची ती कीड कधी लागलीच नाही माझ्या मनाला. काय वाटत असेल त्या वेडीला आता? तिची हि फार प्रीती आहे अंगाराजांवर, रडत असेल? नक्कीच पण आपण गेलो तर नक्कीच म्हणेल छे कुठे काय मला नाही येत त्यांची सय तुमच्या एव्हडी, तो मान पहिला तुमचा माझा सगळीकडेच द्वितीय क्रमांक आणि खळखळून हसेल! पण वेडे, मी देखील ओळखते ना तुला मला जाणवतो त्या हस्यामागचा दुखाचा भार! पण ज्याचे ओझे त्यानेच वागवायचे आणि असे नसते तर स्वामींचा दुखाचा भार मी नसता उचलला?

आजही आठवते ती उषा जिच्या साक्षीने आम्ही भेटलो, गंगा जमुना यांचा संगम ज्याच्या काठावर होते माझे गाव. मी पाण्याला निघाले होते माझ्या सख्यांबरोबर अन परतताना मानेशी काही तरी थंडगार हुळहुळले मी एक किंकाळी फोडून लांब झाले तो पहिले दोन राजबिंडे स्वर तिथे उभे होते, स्वार छे मज तर प्रथम दर्शनी ते राजकुमाराच वाटले. "क्षमा असावी आमच्या अश्वामुळे आपला घडा फुटला" असा एक राजकुमार मला म्हणाला तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले मी घडा फोडल्याचे. क्षमा मला करावी राजन मी आपल्या अश्वाच्या मार्गात आले, मी उत्तरले, त्यावर हसत हसत ते म्हणाले मी कोणी राजकुमार नाही देवी मी एक सारथी पुत्र आहे, आम्ही हस्तीनापुराकडे प्रयाण करत असून येथे अश्वांना पाणी देण्यास थांबलो आहोत, आम्हास कोणी पाणी देईल काय हे ऐकताच माझ्या सखीने माझ्या हातात घडा देऊन मज पुढे धाडले अन नवागतांना माहिती पुरविली कि मी हि एक सारथी कन्या आहे. मी केवळ एक वर त्या कुमारकडे नजर टाकताच माझे हृदय क्षणभर बंद पडते काय मला वाटले, अन ते दोघे कुमार निघून गेल्या वरही मी रोज नदीवर येताना त्या वातेक्वर क्षणभर थबकायचे, मला एक अजब हुरहूर वाटत असे, त्या कुमाराचा राजबिंडा चेहरा कायम चक्षु समोर राहत असे. हे सर्व थांबले ते आमच्या विवाहा नंतरच नाथांची प्राप्ती झाल्या नंतर!

पण ते पर्यंत नाथ अंगराज झाले होते आता ते केवा; एक सारथी पुत्र नसून युवराज युधिष्ठीर ह्यांचे सखा होते, सल्लगार होते. पण नाथ नाथ अजूनही मला त्या संगमाकाठी भेटलेले राजबिंडे, मितभाषी, सुस्वभावी, अन अमर्याद प्रेम करणारे नाथच होते. माझ्या जीवनात प्रेमाचा वर्षाव करणारे, माझ्या मनीचे गुज जाणणारे, एकांतात थट्टा करून मला लाजवणारे अन प्रेमानी जवळ घेणारे नाथ! नाथांची किती रूपे? आदर्श पती, आदर्श पुत्र, प्रेमळ पिता, न्यायी अन दानशू़र राजा

क्रमशः

गुलमोहर: 

युवराज युधिष्ठीर>>>>>>???

दुर्योधन हवंय ना इथे?

शिवाजी सांवंतांच्या "मृंत्युंजय" कादंबरीतून प्रसंग ढापून कथा बनवलीये. मजा नाही आली. nothing original......... Sad

वेगळे काही वाचायला मिळेल असे वाटले पण निराशा झाली.<<शिवाजी सांवंतांच्या "मृंत्युंजय" कादंबरीतून प्रसंग ढापून कथा बनवलीये. मजा नाही आली. nothing original......... >> सहमत.

वेगळे काही वाचायला मिळेल असे वाटले पण निराशा झाली.<<शिवाजी सांवंतांच्या "मृंत्युंजय" कादंबरीतून प्रसंग ढापून कथा बनवलीये. मजा नाही आली. nothing original......... >> सहमत नाही, कारण हे प्रसंग महाभारत, मृंत्युंजय सगळिकडेच सारखे आहेत.