Submitted by सतीश वाघमारे on 1 May, 2010 - 14:08
जीवनाला ध्यास आहे
टाळणे मरणास आहे
(जीवनाला ध्यास आहे
गाठणे मरणास आहे)
एकदा अपवाद व्हावे
वाटते नियमास आहे
एकदा माणूस झालो-
भोगला वनवास आहे
सैलशी भरगच्च वेणी-
काय सुंदर फास आहे !
पाखरे विसरून गेली
खंत ही घरट्यास आहे..
गुलमोहर:
शेअर करा
पाखरे विसरून गेली खंत ही
पाखरे विसरून गेली
खंत ही घरट्यास आहे. अप्रतिम.
छान गझल.
छान .
छान .
पाखरे विसरून गेली खंत ही
पाखरे विसरून गेली
खंत ही घरट्यास आहे..............
पक्शिणीच्य सोबतीला
कोवळा तो श्वास आहे.....!
खास आहे!!!!!!!!!!!!!!!
खास आहे!!!!!!!!!!!!!!!
सैलशी भरगच्च वेणी- काय सुंदर
सैलशी भरगच्च वेणी-
काय सुंदर फास आहे !
वा.. कुर्बान...
डॉ.कैलास
पुर्ण गज़लच आवडली.... सैलशी
पुर्ण गज़लच आवडली....
सैलशी भरगच्च वेणी-
काय सुंदर फास आहे !----- हे एकदम कातील... !!!
धन्यवाद, आभारी आहे !
धन्यवाद, आभारी आहे !
छान!
छान!