दोन शब्द!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बायको (स्वतःची) सोबत सुपरमार्केट मध्ये होतो. काउंटर च्या पलिकडे एक प्रोफेसर माझेकडे पाहुन हात करत होते. मी हाय केले, पैसे देउन बाहेर आलो. म्हटले कि मी गाडी आणली आहे, तुम्हाला सोडतो घरी (तुमच्या). ते नम्रतेने नको म्हणाले. मी विनम्रतेने त्यांना आग्रह केला. तो त्यांनी मान्य केला.

हे प्रोफेसर म्हंजे आय आय टी गुवाहाटी चे आहेत. ते सहा महिने साठी 'एन्डेव्हर' फेलोशिप वर आलेले आहेत. अत्यंत साधी राहणी, प्रचंड अभ्यास, ज्ञान, व्यासंग. अर्थात त्यामुळे व्यवहारज्ञान कमी (!).
बाहेर निघताना म्हणाले, कि मी गेले अर्धा तास इथे उभा आहे, कारण मी शॉप मध्ये जाताना माझी बॅग/ शबनम मी इथे रॅक वर ठेवली होती, ती गायब झाली आहे. या अर्ध्या तासात त्यांनी सिक्युरीटी अन इन्फोर्मेशन ला काही विचारलेले नव्हतेच! नुसतेच कुणी परत ठेवतो कि काय हे बघत उभे होते! त्या बॅग मध्ये त्यांचे विद्यापीठाचे इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेस कार्ड अन बँन्केचे एटीएम कार्ड अशी मामुली कागदपत्रे होती!!! थोडी चिल्लर पण होती.

हे ऐकल्यावर मी, सिक्युरीटी चा शोध घेतला, पण तो सापडला नाही. मग इन्फोर्मेशन च्या पोरीला विचारले. ती अगोदर माहिती नाही बोलली. प्राध्यापक आतमध्ये गेल्यावर रॅक मध्ये काही वस्तु आणुन ठेवल्याने ती बॅग हलवली का असे विचारले तर, ती उद्या परवा फोन करा म्हणाली. प्राध्यापक ही तयार झाले. अन म्हणाले कि, माझ्यापेक्षा कदाचित 'त्या' माणसाला बॅग ची जास्त गरज असेल म्हणुनच त्याने ती बॅग नेली. असु दे त्याचे कडे, मी दुसरी घेईल.....फक्त ते एटीम अन अ‍ॅक्सेस कार्ड कसे डिअ‍ॅक्टीवेट करु ते मला सांग! मी मनातच त्यांना साष्टांग दंडवत घातला.... मग अजुन थोडा वेळ तिला बॅग चे वर्णन ऐकवल्यावर तिने कोपर्‍यातील एक शबनम उचलुन आणली अन हिच का ती?(बॅग) असे विचातराच, प्राध्यापक खुष झाले! तिला धन्यवाद देउन आम्ही मार्गस्थ झालो.

मी स्वतःवर खुष झालो, कि किमान त्या प्राध्यापकांची बॅग परत मिळवण्याचे काम मी केले. हुषार लोक विक्षिप्त अन विचित्र वागतात हे अनुभवले. अ‍ॅक्सेस कार्ड अन एटीएम शबनम मध्ये ठेउन ती शबनम सुपर मार्केट मध्ये बाहेर च्या रॅक मध्ये ठेवण्या इतका मी हुषार अन ज्ञानी अन व्यासंगी नाही याबद्दल देवाचे आभार मानले.
*****

गाडीतुन त्यांना त्यांच्या घरी सोडताना त्यांनी एक किस्सा सांगितला. महाभारत युद्धामध्ये कुरुक्षेत्रावर सैंन्य एकमेकांसमोर ठाकले..सर्वत्र रणधुमाळी सुरु होणार होती. एका चिमणी ला हे सर्व बघवेना. मग ती चिमणी भगवान श्रीकृष्णाकडे गेली अन म्हणाली, कि माझे अंडे इथे कुरुक्षेत्रावर आहे. युद्धाने त्याला इजा होईल. तुच माझ्या वंशाचे रक्षण कर देवा! मग देवाने अर्जुनाला सांगितले, कि समोरच्या हत्तीच्या गळ्यातील घंटी चा आवाज मला त्रास देतोय, तु ती घंटी तोडुन टाक. अर्जुनाने ती घंटी तोडली अन ती बरोब्बर चिमणी च्या अंड्या वर अलगद पडली. अंडे झाकले गेले! अठरा दिवसांनी युद्ध संपल्यावर भगवान श्रीकृष्णानी जेंव्हा ती घंटी बाजुला केली, त्यातुन चिमनीचे पिल्लु भुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र उडाले!
अर्थात, भगवान सर्व गोष्टींचा काळजीवाहक आहे. मला (प्राध्यापक) संकटात पाहुण त्यांनी तुला (चंपकला) बरोब्बर इथे पाठवले!.... अन ते काही अंशी खरेच होते. शेजारच्या सबर्बन मार्केट मधुन घरी येताना एक सिग्नलला अगोदर वळालो म्हणुन मी चुकुण(!) त्या सुपरमार्केट मध्ये गेलो होतो, अन्यथा मी घराजवळच्या मार्केट मध्ये जाणार होतो! काय हा योगायोग! Happy

******
असे अनेकदा होते. दोन शब्द संवादाचे बोलल्याने अनेकदा मोठी अन किचकट कामे सहज होउन जातात! मनात कुढत बसण्यापेक्षा बोललेले काय वाईट! न बोलुन नुकसान होण्यापेक्षा बोलुन फायदा झाला तर उत्तमच कि!

*****
कॉलेजला असताना एखादा/एखादी मुलगा/मुलगी आवडला/ली अन ति/त्या ला काही 'महत्वाचे' सांगायचे/विचारायचे असेल तर आम्ही 'दोन शब्द' करुन घ्या असे संकेतिक शब्दात म्हणत असु! Happy त्या प्रक्रियेचे नामकरण 'दोन शब्द' असे केलेल्या माझ्या परममित्र सर्वश्री. मोहंमद शेख यांना हे स्फुट अर्पण!:)

*****

विषय: 
प्रकार: 

छान Happy

::)

Pages