मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

---------------------------------------
पिक युवर स्टॉक. मला खालील शेअर्स आवडतात.

इन्फ्रा, मेटल्स
लार्सन
सेसागोवा ( थोडे पडल्यावर)
स्टर्लाईट
भेल

बँक

बँक ऑफ बडोदा
स्टेट बँक ऑफ इंडिया
ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स

फार्मा- लूपीन
ऑईल - रिलायन्स (एवढी फास्ट ट्रॅक ग्रोथ नसेल.)
टेलकॉम - भारती
शिपिंग - एबिजी शिपयार्ड, मर्केटर लाईन्स
------------------------------------------
हे पोस्ट मी १० मार्चला केले होते. ह्यातील शिपींग कंपन्या आणि भेल सोडली तर बाकी सर्वांनी ६ ते ११ टक्के रिटर्नस दिले आहेत. ते पण फक्त गेल्या १५ सेशन्स मध्ये. लिडींग अ‍ॅनॅलिस्ट चालवत असलेल्या PMS वर लोक सध्या फसवल्याच्या पोस्ट्स विविध ब्लॉगवर टाकत आहेत. Happy

इनफॅक्ट तुम्ही फ्युचर्स मध्ये काही दिवस ही स्ट्रॅटेजी ठेवा. >>> केदार फ्युचर्स बद्दल कुठे लिहिले आहेस का? नसेल तर हा प्रकार समजवून सांगशिल का?

सध्या पेट्रोलिअम सगळे मार्केटच्या तुलनेत खाली आहेत बरेच (एचपीसीएल, बीपीसीएल, आरएनआरएल वगैरे).. त्यातले RNRL मायावती आल्यामुळे खालीच राहील.. बाकी क्रुड वाढल्याने पण भारतात पेट्रोल/डिझेलच्या किमती न वाढल्याने खालीच आहेत.. लाँग टर्ममध्ये ह्यात गुंतवलेले फायद्याचे ठरेल काय?

केदार, भेल आताच्या या रेटला घ्यायला ठीक आहेत का?
NTPC बद्दल काही सांगु शकशील का?
RNRL माझ्याकडेहि होते याच महिन्यात काढुन त्यासमोर L & T घेतले. RNRL पेक्षा नफ्यात आहे.

भारतात पेट्रोलच्या किमती बहुतेक आज पासून वाढल्या किंवा वाढणार आहेत. पेट्रोलिअम मध्ये अल्पकाळासाठी तेवढा काही दम राहीलेला नाहीये. नविन रिफायनरीज फक्त रिलायन्स उघडत आहे. त्यामुळे इतर लोक बाजारातून (BPCL / HPCL) क्रुड ऑईल विकत घेउन रिफाईन करत आहेत, त्याचा फारसा काही फायदा नाही, कारण क्रुड ऑईल सध्या महाग झालेले आहे व दिवसेंदिवस जशी मागनी वाढत जाणार तसे महागच होईल. क्रुड ऑईलसाठी जाने / फेब २००८ ची रेंज पुढच्या एक वर्षात येईल असे मला तरी वाटते. त्यामुळे ह्या कंपन्या कायम अंडरपर्फॉर्म करतील.
IOC, BPCL, HPCL ह्यांचा गेल्या फेब पर्यंतचा गॅस आणि फ्युअल विक्रीचा लॉस ४७९६० करोड रु आहे.

पण त्यात एक मेख आहे ती म्हणजे जर भारत सरकार थोडेफार पेट्रोलला ओपन करणार असेल तर मग त्याचा सर्वात जास्त फायदा ह्या कंपन्यांना होईल. तरीही घ्यायच्या असतील तर भारत पेट्रोला त्यातल्या त्यात मी प्रेफ देईल. सध्या खूपच प्रेशर मध्ये आहे, त्यामुळे जर ५१० च्या लेवल कन्सॉलिडेट झाला तर पुढे ५५२ ला फर्स्ट रेसिस्टन्स येईल म्हणजे नक्कीच ४० रु तरी मिळतील.

NTPC असेल तर सध्या होल्ड करा. फार फायदा नाही, पण नुकसानही जास्त नाही, त्यामुळे पैसे पार्क करायला हा शेअर अत्यंत चांगला आहे. पुढच्या एक दोन वर्षात कॅपॅसिटी वाढत आहे, त्यामुळे ९ महिन्याचे माझे टारगेट २४० ते २४५ आहे.

भेल बद्दल लिहीतो.
इन्द्रा मी ऑप्शन, फ्युचरवर मागे लिहीले होते, परत एकदा लिहायला सुरु केले, वेळ मिळाला की टाकत जाईन, पण ह्या बाफवरही फ्युचर्स बद्दल लिहीले आहे.

निफ्टी ५२९० ला आज आहे.

फुचर्स ट्रेडींगसाठी

फुचर्स सेल वन लॉट ५२९० +/- एप्रिल साठी. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ५३१०
बाय १ कॉल ५२५०

रेंजबाउंड असल्यामुळे तो इंडेक्स ५२०० ते ५३२० मध्ये राहील.

केदार,
Infosys आत्ता घ्यावा का? तुमचे काय मत आहे?
आणि Reliance Capital , Reliance बद्दल तुम्हाला काय वाटते?

सई

ह्या बद्दल थोडा अभ्यास करुन लिहीतो. Happy

येत्या काही दिवसांसाठी (शॉर्ट टर्म) मला बँक ऑफ ईंडिया आवडत आहे.

BankofIndia.gif

हा समभाग बरेचदा डबल टॉप, डबल बॉटम रेंज मध्येच ट्रेड होतो. (अगदी नेहमी नाही ! ) उदाहरणात दोन डबल टॉप दाखवले आहेत. जुना इतिहास पाहिला तर आणखी असे उदा. दिसतील. फर्स्ट लेवल ऑफ रेसिस्टन्स ३५३ आहे. तो काल ब्रेक झाला. आणखी एक दोन सेशन्स मध्ये जर वर गेला तर पुढचा रेसिस्टन्स ४०३ च्या आसपास आहे. थोड्या कालावधीसाठी ३९०-४०० पर्यंत घ्यायला हवा. ( फ्युचर्स किंवा शेअर्स दोन्हीतही चालेल, पण फ्युचर्स मध्ये घेतला तर वाट पाहन्याची तयारी ठेवा.)

चार्ट मधील पर्पल डेटा हा हायर टॉप्सचा आहे. नीट लक्ष दिले तर दिसेल की गेल्या चार पाच सेशन मध्ये ऑलरेडी ४० रु वाढला आहे. Happy

केदार, अ‍ॅपलॅब बद्दल काही सांगू शकशील कां? तिथे काहीतरी स्ट्राईक वगैरे चालू आहे त्यामुळे शेअर्स खाली आहेत.

केदार, सोमवारी मार्केट पडणार. गोल्ड्मन साक्स फ्रॉड केस व अमेरिकन मार्केट पड्ल्याचा परिणाम. तर काय खरेदी करावी सोमवारी? म्हण्जे आम्ही फिल्डिन्ग लावून ठेवतो.

मी पण पूर्ण नाही वाचले अजून पण उस्गावातील मार्केट पड्ले की दुसर्‍या दिवशी इथे पड्ते. त्यात सोमवारी बर्‍याच दा कसेही खालीच जाते. सर्व मिळून आपल्याला शॉपिन्ग साठी उत्तम हवा Happy

मामी उशिरा वाचलं. पण फार उशिर झाला नाही. Happy

निफ्टी मे फ्युचर्स घ्या ! ५३०० + परत काही सेशन्स मध्ये येतीलच.
लार्सन मे फ्युचर्स घ्या.

येस बॅन्क - घ्या. चांगले आहेत.

केदार दादा !
मी मार्केट मध्ये पहिल्यांदाच गुंतवणुक करावी म्हणतोय,
१०००० पर्यंत करता येईल का, कुठे करु ? प्लीज सल्ला द्या !

आय्_पियेल अहो मी कुठला दादा? Happy

१०,००० रु पर्यंत करणार असाल तर शेअर्स घेण्यापेक्षा एखाद्या म्युच्वल फंडात टाका.

मामी सोमवारी लिहील्याप्रमाणे फ्युचर्स घेतले का? रोज नही आते ऐसे दिन. Happy

आधी लिहल्याप्रमाने चार सेशन्स मध्ये ५३०० क्रॉस झाला. लार्सन पण १५७६ ते १६१९. Happy

निफ्टी घेतला असेल तर एका लॉटला खर्च वजा जाता ४८०० चा फायदा.
लार्सनला घेतला असेल तर एका लॉटला ९८०० चा फायदा.

निफ्टी रेंजबाऊंड आहे. ५३२५ पर्यंत जाऊन परत खाली जाईल असे वाटते.

फ्युचर्स आपण समजतो तेवढे अवघड नसते. पण तोटाही सोसन्याची तयारी हवी.

केदार साहेब,

तुम्ही फ्युचर / ऑप्शन्स ट्रेडिंग वर कधी ज्ञान देणार? शक्यतो ICICI Direct वापरून कसे ट्रेडिंग करायचे ते लिहा.

केदार, फ्युचर्स नाही घेतले पण हिन्दुस्तान झिंक घेतले रिलायन्स इं चे एक टारगेट होते तेवढे शेअर्स घेतले व
एक दोन चिल्लर.
डेट फंड्स मध्ये गुंतवणूक केली.
Now waiting for next round of funding!. Happy

फ्युचर्स चे होमवर्क करत आहे. सध्या पोरे घरी, पाहुणे त्यामुळे उगीच ऑफलाइन राहून काम करावे लागते आहे चक्क.

केदार
१९.०४.२०१०----निफ्टी मे फ्युचर्स घ्या ! ५३०० + परत काही सेशन्स मध्ये येतीलच.
२३.०४.२०१०---निफ्टी रेंजबाऊंड आहे. ५३२५ पर्यंत जाऊन परत खाली जाईल असे वाटते.
२८.०४.२०१०--29APR2010 @ (Last Price)5223.75

great n Accurate !!!!!
just hats off...... Happy

TaTa Motor DVR your opinion ?

थँक्स सतीश.

TaTa Motor DVR फक्त चॅटर साठी बरा आहे. ब्रोकर्स थोडा वर नेऊन (म्हणजे सध्या डिस्काउंटला मिळतोय म्हणून. गेले सहा महिने ! ) परत पाडणार. पण डिव्हीडंड मध्ये इंट्रेस्टेड असशील तर घे कारण ५ टक्के जास्त मिळेल.

निफ्टी ५१९३ ते ५२०९ ला सपोर्ट आहे. कालही ५२०२ नंतर सपोर्ट मिळायला सुरु झाले. आज एक्स्पायरी आहे, त्यामुळे आज दुपार नंतर किंवा उद्यापासून परत ५३०० कडे वाटचाल सुरु होईल. निफ्टी मे फ्युचर्स पुढच्या ८० पाँईटसाठी आज घे.

मारुती एकदम डिस्काउंटला आला आहे. काल मी मारुती अपलोड केले. Happy येत्या वर्षभरात १६ ते १८ टक्के रिटर्न मिळतील.

केदार,
आज मार्केट बंद होताना Nifty-५१२४(-२४)....
global market still not recovered !!! Sad no signs yet , some saying Spain in queue After Greece....
What you Say ?
मी TaTa Motor DVR विकले in plus, nano's progress is not good too !!!

काळजी नको. उलट मी काल मार्केट ५०५० ला असताना लाँग टर्म खरेदी केली. फ्युचर्स मध्येही निफ्टी लॉट ५०६४ ला उचलले आहेत. ते आज विकेल.
एक महिन्यात हे सर्व निवळेल.

स्टर्लाईट, टिस्को, ओरियंटल बँक, मारुती, रिलायन्स, सेसा गोवा हे मस्त आहेत.

Pages