क्षण

Submitted by arati sinnarkar on 14 April, 2010 - 07:54
गुलमोहर: 

मैत्र
काही भेटतात वाटसरू जीवनाच्या प्रवासात
काळात नकळत ते आपलेसे वाटतात
काहींशी होते मैत्री घट्ट अगदी काही क्षणात
अन आपणही आनंदतो त्या मंतरलेल्या मैत्रात

भूमिका
काही असतात असेही दो चेहऱ्यांचे
समोर गोड बोलणारे अन पाठीवर खंजीर खुपसणारे
दुहेरी भूमिका उत्तम बजावणारे
आणि सहज उत्तम कलाकाराचे बक्षीस पटकावणारे ....उत्तम कलाकाराचे बिरूद मिरवणारे

नाते
का हे घडते असे अचानक
आपले व्हावे परके
स्वार्थापोटी स्वतःच्या
नाते हि होते मोडके

नातं प्रेमाचं
प्रेमाच्या नात्याला हळुवार जपावं
विश्वासाचं खत पाणी द्यावं
अन....
प्रेमाचं नातं बहरत जाव

वा सुरेख

अमोल केळकर
------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

क्षण म्हणजे पहिल्या पावसातल्या
ओल्या मातीचा सुवास,
क्षण म्हणजे आतूर नयनांना,
दुरवरच्या मृगळजाचा भास

साठवता साठवता निसटून जाती,
क्षण हे मनास भावलेले,
अ गं कधी पाहिले आहेस का,
आळवावरचे थेंब ही क्षणात ओघळलेले...

-- सुर्यकिरण

सुंदर प्रयत्न ...