स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

>>> तुम्ही प्रतिकांनाच मुल्य (principles) समजण्याची चुक करत आहात.

वा! एक फूल, कसं नेमकं बोललात! Happy

या वाक्यावर हा बीबी बंद करायला हरकत नाही.

मयेकरांना अनुमोदन..

बाकी चघळ चालूच आहे का.. स्वातीने म्हटल्याप्रमाणे आता बंद झाला नाही तर आवर्ती सुरु होईल.. तिकडे काही लोक गणपतीअथर्वशीर्षाच्या आवर्तनला बसल्यासारखे सुपार्‍या मांडून बसले असतील..

तुम्ही प्रतिकांनाच मुल्य (principles) समजण्याची चुक करत आहात.>> अख्ख्या बीबीचे सार आले यामधे!!!

आता इथे लिहायची गरज नाही. हेच एक वाक्य पेस्ट करत राहिले तरी चालेल!!

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

तुम्ही प्रतिकांनाच मुल्य (principles) समजण्याची चुक करत आहात.>> अनुमोदन.

लिम्बुटिम्बु
तुम्ही या बीबी वर मांड्लेल्या मतावरुन असे वाट्ते की तुम्हला काही गोष्टींतील ठ्ळक फरक च कळत नाहीयेत, त्यांमुळे तुम्ही उगाच काहीही मुद्दे काढ्ताय्..जसे
दिखाऊ (अन सक्तीचे म्हणून) बाकी सर्वच जाचक वाटत असेल, तर तसे तात्विकदृष्ट्या पहाता वस्त्रान्ची देखिल सक्तीच नाही का? मग वीतभर चिन्धोटी लावा वा हातभर कपडा गुन्डाळा, ती सक्तीच! अन ती सक्ति जर चालते असे गृहित धरले (का चालते असे विचारत नाही) तर अन्य "सक्त्या" का चालायला नकोत? >>>>> इथे आपण सर्व माणसांसाठी असणार्या नियमांची चर्चा करत नसून कुणाही "व्यक्ती" ला मनाविरुद्ध केवळ "स्त्री" असल्यामुळे सामोर्या जाव्या लागणार्या रुढींची चर्चा करतोय..मागेही तुम्ही traffic rules सक्ती नाही का वगैरे फाल्तु प्रश्न विचारले होते. पण जर traffic rules ही केवळ विशिष्ट जात्-धर्म्-वर्ण्-देश्-लिन्ग यांना च पाळावे लागले तर ती सक्ती अर्थातच त्यांना जाचणार..

हिन्दुस्थानात हिन्दू महिलेने लग्न झाले याचे निदर्शक जोडवी/मन्गळसुत्र/कुन्कू न लावणे हे एका अर्थी, (ड्युप्लिकेत आयड्ञान्प्रमाणे) लग्न झाल्याची ओळख जाणून बुजुन झाकुन ठेवण्यासारखे नाही का? का झाकुन ठेवावेसे वाटते?
>>> अतिशय अपमानास्पद निष़्कर्ष... ज्यांना ही प्रतिकं वापराय्ची गरज वाट्त नाही, ती मुद्दम लग्न झाल्याची ओळख झाकण्यासाठी असे करतात या तुम्च्या मताला मी तरी तालिबानी मनोव्रुती च समजते. ह्याचे उत्तर मी वर दिले आहेच की तुम्ही प्रतिकांनाच मुल्य समज्ण्याची चुक करताय..
बाकी आज्काल शाळेत जाणार्या मुलांना जसे वाट्ते की friendship band बांधणाराच आपला मित्र, तसेच बहुधा तुम्हालाही वाट्त असावे की मंसु, कुंकु लावणारीच पतिव्रता भारतीय स्त्री!!!
लहान मुलांना कमीत कमी शिकवता तरी येते, तुमचे म्हण़जे "मेरि मुर्गी की एक ही टांग"!! तेव्हा पुन्हा एकदा विनंती की असले फालतु निष्कर्ष काढण्याआधी सारासार विचार करावा..तुम्हीच तात्विक चर्चा अपेक्षिली होती, म्हणून हा लेखनप्रपंच..(शिवाय हा बीबी बंद व्हायच्या आधी तुमच्या अज्ञानमुलक प्रश्नांना उत्तरे दिली नसती तर तुम्हाला कदाचित असेही वाटले असते की आपण मांड्लेले मुद्दे कुणाला खोड्ता आले नाही, तेव्हा ते बरोबरच होते)

''हिन्दुस्थानात हिन्दू महिलेने लग्न झाले याचे निदर्शक जोडवी/मन्गळसुत्र/कुन्कू न लावणे हे एका अर्थी, (ड्युप्लिकेत आयड्ञान्प्रमाणे) लग्न झाल्याची ओळख जाणून बुजुन झाकुन ठेवण्यासारखे नाही का?''
मुळात कोणत्याही स्त्रीच्या , समजा बँकेतल्या काउंटरवरच्या किंवा तुमच्या घरच्या मोलकरणीच्या किंवा अगदी तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधीच्या, एखाद्या अभिनेत्री /गायिकेच्या अशा आयडेंटी तुम्हाला कळण्याची 'तुम्हाला' काय गरज आहे ते सांगा. ती कळल्याने तिच्या कामाच्या गुणवत्तेत फरक पडणार आहे का? उत्तर द्याच.

भारतीय घटनेनुसार या देशाचे नाव भारत/ इंडिया आहे. हिंदुस्थान हा देश कुठे आला? हा प्रश्न मी हिंदू असून विचारतोय.

भरत
मार्मिक प्रश्न..
लिम्बुटिम्बु
कुठ्ल्याही स्त्रीची वैवाहीक स्थिती माहीत करुन घेण्याची गरज तुम्हाला का पडते, याचे उत्तर द्याच!!

एकफुल .. Happy

कुठ्ल्याही स्त्रीची वैवाहीक स्थिती माहीत करुन घेण्याची गरज तुम्हाला का पडते, >>माझे चार-पाच मित्र विवाहीत मुलींच्या प्रेमात (एकतर्फी) पडले. त्यांना डेटिंगवर चलतेस का म्हणून विचारायला गेले तेंव्हा कळले की ती मुलगी लग्न झालेली आहे. मग घोर निराशा झाली त्यांची. त्यात त्या मुली साखरपुड्याची अंगठी देखील घालत नव्हत्या.. मंगळसुत्र जोडवी कुंकू वगैरे पण नाही. याच्या उलट विवाहीत पुरुषाच्या प्रेमात अविवाहीत मुलगी पडली असे कुठे कधी वाचले वा ऐकले नाही. असो.

याच्या उलट विवाहीत पुरुषाच्या प्रेमात अविवाहीत मुलगी पडली असे कुठे कधी वाचले वा ऐकले नाही >>> मजाक मत कर यार ! शेकडो किस्से असतात अश्या फसवणुकींचे.

विवाहित मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला...आणि अविवाहित मुलीच्या एकतर्फि प्रेमात पडला. यात फरक काय..शेवटी एकतर्फीच प्रेम ना...पडायच्या आधी ज्याच्यासाठी पडतोय त्या व्यक्तिविषयी जाणुन घेवुन मग पडायचे!
उठसुट कुठेही पडापड करणे बरे नाही. Happy

माय गॉड !!! हा बीबी आता विनोदी होत चाललाय :ड

बी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडलेली मुलगी नाही पाहिलीस???? उलट तू जे म्हणतोयेस त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आहे. असो बीबीचा तो विषय नाही.

स्त्रियांनी मंसु घातलेत तर असे होणार नाही असे म्हणायचेय का?

पक्स Lol

एक फूल - मस्त पोस्ट.
लोक्स जमलं तर बास करा आता.

प्रकाश, सुरवातीला एकतर्फीच प्रेम असते. मग पुढचे पाऊल ती व्यक्ती घेते. मग नंतर दुतर्फी प्रेम होते. एकाच वेळी दोघांचे एकमेकांवर प्रेम जडणे इतके सहजशक्य (योगायोग) मला तरी नाही वाटतं. सुरवातीला प्रेम हे एकतर्फीच असते!!!!! आणि एखाद्या मुलीला जाऊन असे आपण विचारू शकत नाही की तू लग्न झालेली आहेस की नाही. कधीकधी इतरांनाही हा प्रश्न विचारणे योग्य वाटतं नाही. कधीकधी एखादी मुलगी जर बसथांब्यावर भेट्त असेल तर मग तिच्याविषयी माहिती काढणे अजूनच अवघड आहे.

बी,
अहो तुम्ही जे म्हणताय ते "नुसते बघुन आवडणे" अर्थात infatuation!! प्रेम बघुन होत नाही, जेव्हा एखाद्याला जाणून घेता तेव्हा होते..ज्याअर्थी तुमच्या मित्रांना त्या स्त्रियांविषयी अजिबात माहेती नाही, अन तरीही ते तिला प्रपोज कराय्ला जातात, त्यांना काय म्हणावे? आणि अशा महाभागांच्या सोयीसाठी मंगळसुत्र घालावे म्हणता की काय? अतिशयच विनोदी Lol

हे राम- हे मी का वाचते आहे?
माझ्या आयुष्यात काय कमी आहे की मी हा बाफ वाचते ? (वाक्य "अनुदोन" यांचेकडून चोरले आहे)

>> तुम्ही प्रतिकांनाच मुल्य (principles) समजण्याची चुक करत आहात.
एक फूल, चांगली पोस्ट. संदर्भासह स्पष्टिकरण न देता एका वाक्यात उत्तर!
आता फक्त एक फूल आणि भरतमयेकर यांच्या प्रश्णाला लिंबुटिंबुचे उत्तर (?) आले की ही चर्चा संपवा.
[आणि ते एकतर्फी प्रेम वै फाटे फोडु नका उगाच]

आणि अशा महाभागांच्या सोयीसाठी मंगळसुत्र घालावे म्हणता की काय? >> नाही मी तसे म्हणत नाहीये. मी फक्त माझ्या मित्रांची गमतीदार उदा. दिलीत. त्यावरुन मी अमूक काही सुचवितो आहे असे कृपया समजू नका अशी विनंती.

जरा गंभीरपणे विचार केला तर जाणवतं की या रुढी ज्या आपल्याला जाचक वाटतात त्या संपवण्यासाठी काय करतो आपण? आत्तापर्यंत फक्त आपण आपल्याबाबतीत काय करतो हे सांगितलं आपण. पण इतर स्त्रिया ज्या या रुढींमध्ये मनाविरुद्ध (हा शब्द महत्त्वाचा :)) अडकल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करतो, काय करु शकतो यावर चर्चा वाचायला आवडेल मला.

माझे बाबा जाऊन दोन वर्षं झाली. पण मी आईला कुंकू लावणे, दागिने घालणे, चांगल्या साड्या नेसणे यापासून रोखले नाही. उलट माझ्या, मुलीच्या वाढदिवसाला तिच्याकडून औक्षणही करून घेतले,पुढेही घेईन. गेले दोन वर्षं मी संक्रांतीचं हळदीकुंकू केलं नाही, पण यापुढच्या संक्रांतीला तिला वाणही द्यायचे ठरवले आहे मी. फक्त माझी आईच नाही, तर इतरही ओळखीच्या विधवा बायकांना वाण देईन, जर त्यांची हरकत नसेल तर.
चैत्रगौरीचे हळदीकुंकू चालले असतील आत्ता, त्यात तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या विधवेला बोलावून नवीन पायंडा पाडू शकता.लग्नसमारंभात वगैरे त्यांना त्यांचा मान मिळावा म्हणून पावलं उचलू शकता.

हे एक उदा. दिलं मी. तुम्हीही असं काही करत असाल. तर त्याबद्दल लिहा.

या रुढी जाचक आहेत हे दुसर्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न किती दिवस करणार आपण? आता त्या मोडून काढण्यासाठी पावलं उचलायची वेळ आली आहे. नाही का?

Pages