सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 6 April, 2010 - 22:33

आजवर मीना रात्री अकराच्या सुमारास घरी पोचल्याचा प्रकार फ़क्त दोनदाच झाला होता. पण शोभा, मीनाची मैत्रिण, धावत धावत सकाळी सव्वा सहाला मीनाकडे येण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत होता.

तिचा आवेश बघूनच आई हादरली होती. आपल्या मुलीने काहीतरी भयानक करून ठेवले आहे किंवा शोभाकडे तरी काहीतरी भयानक झाले आहे हे ती समजली.

त्यात आणखीन मीना सकाळी साडे पाच वाजताच उठून आवरू लागली होती.

शोभाने हातातील पेपर मीनाच्या आईकडे दिला.

पहिल्याच पानावरील खालील अर्ध्या भागात मीनाचा आमदार, बर्गेबाई, भाऊ, सुंदरमल व काका म्हस्के यांच्याबरोबर फ़ोटो होता अन बातमीचे शीर्षक होते...

अहिंसा क्रान्ती पक्षाच्या जिल्हा उपप्रमुखपदी मीना कातगडे यांची निवड...

पुढच्या दोन तासात श्रीधरनगरचे किमान वीस टक्के लोक मीनाच्या दारात येऊन अभिनंदनांचा वर्षाव करून गेले.

आपल्या मुलीचे काय चालले आहे या संदर्भातील आईचे यच्चयावत अंदाज खोटे ठरले होते.
आणि ते सुखदरीत्या खोटे ठरले होते.

जे झाले ते किती आनंददायी आहे याची कल्पनाच त्या माउलीला येत नव्हती! बिचारी! पतीच्या निधनानंतर कसेतरी मुलीला वाढवलेले. त्यात हे असले हीन प्रसंग वाट्याला आलेले. आणि कशात काहीही नसताना केवळ चार दिवसात मुलगी एका पक्षाची जिल्ह्याची उपप्रमुख?

यातही त्या भाऊचाच हात आहे की काय वाटावे तर लोक म्हणतायत भाऊंपेक्षा किती तरी वरच्या लेव्हलला आहे ती!

आई अवाक होऊन केवळ होईल ते पाहात होती.

कुणी आले, अभिनंदन करून गेले. कुणी आले, गोड देऊन गेले. कुणी आले, नुसतेच ’छानच झाले हां’ म्हणून गेले.

शोभा तर घरातून हालतच नव्हती.

आणि मीना...

सर्वांच्या अभिनंदनांचा सस्मित मुद्रेने स्वीकार करत, आईला व शोभाला मधून मधून किरकोळ तपशील सांगत आवरत होती. तिने स्वत:च कार्यकर्त्यांची मीटिंग दहाला बोलवली होती.

पार्टीच्या गाडीतून मीना जायच्या आधी आईने तिला ओवाळले. शोभाने तिला मिठी मारली. या प्रेमाने मात्र मीनाचा धीर सुटला. कोणत्या दिव्यातून गेल्यावर हे पद मिळाले आहे याची आठवण प्रकर्षाने येऊ लागली. जणू बाबा नसल्याचेच दु:ख होत आहे असे दाखवत मीना खूप खूप रडली. आईच्या डोळ्यांना तर धारच लागली होती. आणि शोभा मात्र हसून हसून दोघींना हसवायचा प्रयत्न करत होती.

पार्टीच्या कार्यालयातील मीनाची पहिली मीटिंग परिचय, जबाबदारी वाटप मधे वगैरे आटोपली. मात्र, त्या कार्यकर्त्यांमधील एक चेहरा तिने फ़ार फ़ार नीट ओळखला. मात्र, ओळखल्याचे अजिबात दाखवले नाही. तो चेहराही जरा दचकलाच होता. कालच्या पार्टीला तो चेहरा नव्हताच. त्याचे नाव होते माधव कुलकर्णी! डॊक्टर..... डॊक्टर माधव कुलकर्णी!

रुग्णालयात राठींच्या केबीनमधे मीनाचा इंटरव्हिव्ह घेणारा डॊ. माधव कुलकर्णी पक्षाच्या पश्चिम विभागाचा प्रमुख होता.

मीटिंग झाल्यावर सगळे निघून गेले. भाऊ आलेच नव्हते. मीना कार्यालयात बसून फ़ाईल्स वगैरे बघत होती. पक्षाचे काही लोक ती नवीन असल्याने कार्यालयाच्या बाहेर थांबलेले होते. कार्यालयात एक संजय नावाचा हरकाम्या होता. तो मोठा हुषार होता. त्याला कार्यालयाची सगळी माहिती होती. पक्षाच्या लोकांबाबतही बरीचशी माहिती होती.

आणि अचानकच भाऊ आले. भाऊंना आजवर ज्या खुर्चीवर बसायची सवय लागली होती तिथे अर्थातच मीना होती. हा भयानक अपमान भाऊंनी गिळला. त्यांच्या येण्याचा हेतू काय असावा ते मीनाला समजत नव्हते. पण अर्थातच, आजवर त्या कार्यालयाचे ते प्रमूख असल्याने मीना त्यांच्या आगमनाबाबत काहीच म्हणू शकत नव्हती.

भाऊ आले ते सरळ तिच्या समोर बसले. मीनाने संजयला बाहेर जायला सांगीतले. तसेच, कुणीही डिस्टर्ब करू नये असेही सांगीतले. संजयने आजवरच्या सवयीप्रमाणे भाऊंना ’गुडमॊर्निग’ विश केले व तो बाहेर गेला.

रात्रभर पीत जागलेल्या भाऊंच्या तोंडावर अत्यंत भेसूर भाव होते. जळजळीत डोळ्यांनी ते मीनाकडे बघत होते.

त्यांच्याकडे योग्य तितके लक्ष देत व योग्य तितके दुर्लक्ष करत मीना टेबलवरील फ़ाईल्स बघत होती. एक मिनिट असेच गेले.

भाऊंनी तोंड उघडले.

भाऊ - अभिनंदन!...
मीना - धन्यवाद!
भाऊ - लवकर उडी मारलीस...
मीना - जिल्हा उपप्रमुख! काय? जि ल्हा उ प प्र मु ख... मी! नीट बोलायचे..

भाऊ खदखदून हसले.

भाऊ - हं! ... जिल्हा उपप्रमुख! नाही का? जिच्यावर परवाच नगरसेवकाने...
मीना - जपून बोलायचे...
भाऊ - तू जिथे बसलीयस ना आत्ता .. तिथे कालप..
मीना - अ रे तु रे क रा य चे ना ही
भाऊ - काय करशील?
मीना - हाकलून देईन इथून

या वाक्यावर मात्र भाऊ हादरले. काल निवड झालेली चिमुरडी आपल्यालाच सांगते हाकलून देईन म्हणून? अन खरच तसं करायला गेली तर कार्यकर्ते कुणाची साथ देतील? या प्रश्नाचे उत्तर भाऊंना स्वत:लाच ’आपली देतील’ असे खात्रीलायकरीत्या वाटत नव्हते.

भाऊ - बरीच... जीभ चालते की...
मीना - कामाच बोल...
भाऊ - बोल? तू मला अरे तुरे करतेस? (भाऊ भयानक खवळून ओरडले)
मीना - पुन्हा अरे तुरे केलस तर कार्यकर्त्यांना सांगेन हात टाकलास म्हणून.. अन मी तुला असेच बोलणार... जेव्हा जेव्हा तू एकटा समोर येशील तेव्हा तेव्हा...

हा प्रकार मात्र भाऊंच्या वर्मावर बोट ठेवणारा होता. हे कुणाला सांगताही आले नसते अन त्यात पुन्हा ही बाई! काही भलतं सलतं सांगीतलं तर लोक हिचंच ऐकणार!

भाऊ - भाऊसाहेब बनसोडे म्हणतात मला...
मीना - लोक म्हणत असतील.. मी तुला कुत्रा म्हणते.
भाऊ - ए.... जीभ सांभाळायची. पक्षाचा गेली कित्येक वर्ष काम केलेला माणूस आहे मी.
मीना - ते मी बघेन. मी पक्षाची वरिष्ठ अधिकारी आहे तुझ्यापेक्षा!

तिचे ते ’अरे तुरे’ मात्र भाऊंना सहन होत नव्हते. दोन मिनिटे तसेच बसून त्यांनी स्वत:ला शांत केले.

भाऊ - आमदारांनी सांगीतलंय... माझ्याकडून मार्गदर्शन घ्यायला. रिपोर्ट मी पाठवणार आहे.
मीना - निघ.
भाऊ - क्काय? (भाऊ आणखीनच खवळले.)
मीना - नी...घ! मला तुझी गरज नाही.
भाऊ - आरोग्यमंत्र्यांचा फ़ोन येईल तेव्हा ततपप होईल तुझं!
मीना - यानंतर एकदाही मला ’तू’ म्हणालास तर वाईट होईल.

भाऊ चांगलेच चपापले. मीना तोंडावर अत्यंत शांत भाव धारण करून फ़ाईल्स बघण्यात गुंतल्यासारखे दाखवत होती.

भाऊ - सी.डी. आठवतीय ना? (भाऊंनी शेवटचे अस्त्र काढले.)
मीना - सी.डी. तुझ्याकडे कशी आली हे विचारले तर काय सांगशील? (ती अजूनही फ़ाईल्सच बघत होती.)

भाऊ पुन्हा खदखदून हासले.

भाऊ - माझ्याकडे नाही. सोलापुरातील केबलवर दिसेल... घरोघरी...

आता मीनाने भाऊंवर नजर रोखली. तिच्या त्या नजरेने ते पुन्हा चपापले. पण तसे त्यांनी दाखवले नाही.

मीना - दिसली तर दिसली. मीही पेपरात देईन.. नंदन आणि तू माझ्यावर रेप केलात. तू ही आत, नंदनही आत, केबलवालाही आत!

आता हादरायची वेळ भाऊंची होती. ही मुर्ख पोरगी स्वत:च्या तोंडाने सागेल? खरच सांगू शकेल? आणि सांगीतले तर? आपले राजकीय भवितव्य वगैरे सोडाच, जगणे मुश्कील होईल. अन आजवर फ़सवलेल्या बायका एकत्र झाल्या अन हिला मिळाल्या तर वाघमारेचा आजा अन आरोग्यमंत्र्यांचा काकाही वाचवू शकणार नाही आपल्याला.

भाऊंचा चेहरा पाहून मीना मंद हासली.

मीना - तीन दिवस! चवथ्या दिवशी मी राहायला येणार आहे बंगल्यावर. तीन दिवसात हालायचं तिथून...
भाऊ - आवाज बंद (भाऊ तिच्यासमोर बोट नाचवत खर्जातल्या आवाजात ठासून बोलले)
मीना - आवाज तू बंद कर! सकाळीच प्यायलायस! पक्षातून हकालपट्टी होईल तुझी...

भाऊंच्या तोंडाला अजूनही वास येत होता. कारण पहाटेपर्यंत ते पीतच बसले होते.

मात्र आता त्यांचा तोल गेला. भयानक नजरेने तिच्याकडे पाहात ते म्हणाले:

भाऊ - निजायला गेलेली दिसतीयस.... आमदाराच्या... खाली

मीना भयानक भडकली होती. पण भाऊ खरे बोलत होते. याचा मनातल्या मनात तिला फ़ार अपमान वाटत होता. मात्र हे बोलण्याचा भाऊंसारख्या माणसाला काहीही नैतिक अधिकार नव्हता. हेही तिला जाणवले.

अजिबात आवाज न चढवता व तितक्याच शांतपणे मीना म्हणाली:

मीना - जाणार होते.. पण गेले नाही...
भाऊ - का? भाव कमी देत होता?
मीना - अंहं! तुझी आई आधीच तिथे होती असे कळले.

ही सरळ सरळ शिवी होती. एका घरंदाज स्त्रीने एका माणूस ठरण्यास नालायक असलेल्या माणसाला दिलेली!

परिणाम सरळ होता. भाऊ ताडकन उठले. त्यांची खुर्ची मागच्या बाजूला पडली. उजवा हात ताठ करत तिच्याकडे रोखत घुसमटत्या आवाजात भाऊ उद्गारले..

भाऊ - ए... ए पोरी.. लय बोललीस.. नरकासारखं करीन तुझं जगणं.. आज रात्री बंगल्यावर यायचं...गपचूप... नाहीतर उद्या सी.डी...

मीना - आमदारांना फ़ोन लावतीय मी.. त्यांच्यावर वेश्यांना बोलवतात अशी चिखलफ़ेक केलीस म्हणून अन मला बंगल्यावर बोलवलंस म्हणून...

भाऊंचा ताठ हात लुळावत खाली आला. आपलं अख्खं करीअर या मुलीच्या हातात असल्याची त्यांना जाणीव झाली. हिने फ़क्त फ़ोन करायचा अवकाश! स्त्री आहे म्हंटल्यावर आधीच सहानुभुती! त्यात कालच स्वत: आमदारांनी हिची निवड केलेली. त्यात बरेचसे कार्यकर्ते आपल्यावर आधीच विविध कारणांनी खवळून! निघायला हवे. आणखीन राग यायच्या आत निघायला हवे.

भाऊ पाठ करून निघायला लागले.

मीना - ए... बनसोडे...

भाऊंच्या अंगातून आग निघत होती. पण ती अपमानास्पद हाक ऐकूनही तिच्याकडे पाठच ठेवून ते उभे राहिले.

मीना - तेरवा सकाळी शिफ़्ट होतीय मी... काय? उद्या अन परवामधे सामान हलव.

पंचावन्न वर्षांचे भाऊ बनसोडे त्यांच्या आयुष्यात कधीच झाला नसेल असा अपमान होऊन मीनाच्या कार्यालयातून बाहेर पडले.

सतीश मेहेंदळेची बायको दोन दिवस माहेरी गेल्यामुळे घरी तो एकटाच होता. त्याला काहीही व्यसन नव्हते. बिचारा सरळ मार्गी गृहस्थ होता. त्याचे कामही घरातूनच असायचे. त्याला आठवण झाली. जर्मनीमधील एका कंपनीने त्याला ट्रान्सलेशनचे काम पाठवले होते. त्याने ती इमेल पुन्हा वाचली. इमेल लिहिणारी बाई होती अन तिचे नाव होते कमल गिट्टा! गिट्टा हे तर जर्मन नाव होते. मग कमल काय?
सहज गंमत म्हणून त्याने गूगलवर कमल गिट्टा असा सर्च दिला.

आलेल्या हजारो एन्ट्रींपैकी कमल नावाच्या अनेक होत्या. कमल गिट्टा नावाच्या फ़क्त तीन! त्यातील एक पाहून त्याला समजले की ती बाई भारतीय वंशाची आहे. वेगवेगळ्या देशांमधे जाऊन आपले नागरीक नाव कमावतात याचा त्याला आनंद झाला. ती स्क्रीन तो घालवणार तेवढ्यात त्याला इतर एंट्रीज दिसल्या. त्यातील एकावर त्याने सहज क्लिक केले. कमल आंटी! रिअल लाईफ़ फ़ोटोज....

घेरी यायची बाकी राहिली होती. मेघनाचे फ़ोटॊ होते ते! निश्चीतच! किमान अर्धा तास तो त्या एंट्रीवरून वेगवेगळ्या पोर्नोग्राफ़िक साईट्सवर जाऊन ते फ़ोटो तपासत होता. मेघना? खरच मेघना असेल का ही? छे? असे कसे होईल?

एकही कपडा अंगावर नसलेल्या अवस्थेत तिचे एका माणसाबरोबर फ़ोटो होते. फ़ोटोग्राफ़ीचा दर्जा अत्यंत सुमार होता. आपल्या बायकोला, संगीताला हे सांगायला पाहिजे की नको हेच त्याला ठरवता येत नव्हते. सख्ख्या बहिणीचे असे फ़ोटो पाहणे तिला कसे वाटेल?

कमल आंटीची सी.डी. उपलब्ध असल्याचे लिहिले होते. मात्र सतीशला क्रेडिट कार्ड नंबर वगैरे देणे धोकादायक असते याची जाणीव होती. या विषयात काय करावे याचा तो तब्बल अर्धा तास विचार करत होता.

या सी.डी.मधील बाई मेघना नसण्याच्या किती शक्यता आहेत हे पडताळून पाहण्यासाठी त्याला मेहुणीचेच फ़ोटो अनेकवेळा बघावे लागले. तिचे त्याच्यावर व त्याचेही तिच्यावर अतिशय प्रेम होते. या प्रेमाला फ़क्त निखळ प्रामाणिक प्रेम इतकेच म्हंणता आले असते. त्यात काहीच शंका येण्यासारखे नव्हते. सतीशच्या लग्नानंतर मेघनाचे लग्न एकच वर्षांनी झाले होते. तिचा नवरा अभिजीत व ती आता अमेरिकेत होते. संगीताचे अन तिचे रोज फ़ोन व्हायचे.

हे काय हे? काय आहे काय हे?

दोन दिवसांनी संगीता आली तेव्हा सतीशने फ़ोटो कट बिट करून फ़क्त मेघनाबरोबर जो पुरुष होता त्याचे फ़ोटो तिला दाखवले व विचारले की याला कुठे पाहिले आहेस काय?

संगीता हतबुद्ध झाली. जे सतीशला कधीच कळू नये यासाठी तिच्या लग्नाआधीपासून तिच्या घरचे सगळे प्रयत्नशील होते ते आज त्याला कळले होते. कसे कळले? हा माणूस असा कसा? कपडे नाहीत अंगावर? असा कसा फ़ोटो मिळाला या माणसाचा?

संगीताच्या डोळ्यात पाणी आले. सतीश व संगीता दोघेही अतिशय समजुतदार जोडपे होते. सतीशने तिची खूप समजूत घातली. संगीताने शेवटी सारे सांगीतले.

मेघना कॊलेजला असताना एका वक्तृत्व स्पर्धेत तिला पारितोषिक मिळाले होते. ते पारितोषिक द्यायला एक स्थानिक पुढारी आला होता. चांगलाच तरुण व आकर्षक व्यक्तीमत्वाचा हा पुढारी पुढे मेघनाला आणखीन दोन तीनदा भेटला. अजून मेघनाने घरी काही सांगीतले नव्हते. मात्र हळूहळू तिलाही त्याला भेटावेसे वाटायला लागले. भेटींच्या इच्छेची तीव्रता वाढू लागल्याचे दोन्ही बाजूला समजल्यावर मग नंदन व मीनाप्रमाणेच प्रकार घडला. फ़क्त यावेळेस नियुक्तीच्या पत्राची गरज नव्हती. मेघनाच्या वडिलांची इस्टेट भरपूर होती. केवळ लग्नाच्या आमिषावर हा प्रकार झाला. झाला तोही एका बंगल्यावरती! तो प्रकार झाल्यानंतरही ते काही वेळा भेटलेले होते. मात्र अचानक एक दिवस त्या तरुणाने त्याला स्वत:लाच कर्करोग झालेला असून आता तो फ़ार तर दोन महिने जगेल अशा आशयाचे मेडिकल रिपोर्ट्स दाखवले. मेघना रडून रडून हताश झाली. त्या तरुणाने राजेश खन्नाच्या आविर्भावात ’तू मला सोडून दे’ वगैरे भावनिक डायलॊग्ज टाकले. आता मात्र मेघनाने घरी सांगीतले. त्यातही, बंगल्यावर झालेला प्रकार सांगीतलाच नाही. घरच्यांना वाटले की या माणसाची ट्रीटमेंट होते का ते बघावे. तपासायला आलेले दोन्ही डॊक्टर असेच म्हणाले की याचा रोग बरा होणारा नाही. तेही पैसे खाऊन आले होते हे संगीताला आजवर समजले नव्हते. आज फ़ोटो पाहून तिला शंका यायला लागली होती. शेवटच्या भेटीत मेघनाला त्याच्या मिठीतून दूर होताना आपले जीवन संपवून टाकावे असे वाटू लागले. पण संगीता व आई, बाबांच्या सततच्या प्रेमळ सल्ल्यांमुळे कालांतराने ती सावरू लागली. तो माणूस तीन ते चार महिन्यांनी मुंबईला मेला अशी बातमी आलेली होती तेव्हा पुन्हा मेघना भयंकर रडली होती. पण दोन वर्षांनी तिचे लग्न झाले अन त्या प्रकरणावर पडदा पडला. त्याआधी सतीश व संगीताचेही लग्न झालेलेच होते. त्यांच्या संसारातील आनंद पाहून मेघनानेही लग्नाला होकार दिला होता व ती व अभिजीत लग्न झाल्यावर अमेरिकेला निघून गेले होते.
मात्र, हा प्रकार त्यांच्या घरच्यांनी दोन्ही जावयांपासून लपवून ठेवला होता. पण आज ज्येष्ठ जावयांना हा जावईशोध लागला होता अन संगीताचे रडून रडून वाईट हाल झाले होते.

सतीश मनाने खूप चांगला होता. त्याने संगीताला खूपच धीर दिला. त्याला ते माहीत असल्याचे तो कधीही मेघना, अभिजीत किंवा संगीताच्या आई, बाबांना सांगणार नाही याचे त्याने वचन दिले.

मात्र, या फ़ोटोंमधे मेघनाचेही फ़ोटो आहेत हे त्याने संगीताला सांगीतल्यावर मात्र तिला चक्कर आली.
जवळपास तासाभराने संगीता पुर्ववत झाली तेव्हा त्यांनी दोघांनी मिळून एक निर्णय घेतला...

त्या फ़ोटोतीला माणसाचा नाश करायचा...

त्या फ़ोटोतील माणसाचे नाव होते... डॊ. माधव कुलकर्णी... स्कॆंडलचा एक्स कर्मचारी जो आता पुर्णवेळ पुढारी झाला होता

आणि संगीता आणि मेघना यांचे माहेरचे आडनाव होते... भेंडे

मेघना भेंडे हा भेंडे कुटुंबियांपैकी शर्मिलाचा दुसरा बळी होता.

मीना दुपारी घरी जाऊन जेवून पुन्हा कार्यालयात आली. नवनवे लोक अभिनंदन करायला येत होते. कुणी हार, कुणी गुच्छ, कुणी पेढे, कुणी गणपतीचा फ़ोटो तर कुणी फ़्लॊवरपॊट वगैरे घेऊन! मीना शेवटी एक लहान मुलगी होती. आपण जे केले आहे ते आपल्याला खरच झेपणार आहे की नाही हे आता तिला समजेनासे झाले होते. साडे चार ते सहा वाजेपर्यंत ती अभिनंदनांचा स्वीकार करत होती. नंतर आलेल्या लोकांना तिने ’मला खरच कार्यालयीन काम आहे, आपण कृपया उद्या यावेत’ अशी विनंती केली. आता कार्यालयात कुणीच नव्हते. तिने भाऊंच्या घरी फ़ोन केला. त्यांच्याकडचे फ़ोन सदू उचलत असेल असा तिचा अंदाज होता. तो खराही निघाला.

मीना - सदूभाऊ.. मीना कातगडे बोलतीय...
सदू - ताई... आपलं .. मॆडम (सदूच्या आवाजातील आनंदयुक्त उत्साह स्पष्ट कळत होता.).. ताई.. तुमची निवड झाली ते ब्येस्ट झालं

मीना - सदूभाऊ.. महत्वाचं काम आहे.
सदू - ताई... तुम्ही फ़क्त सांगा..
मीना - ऒफ़ीसला या
सदू - निघालो
मीना - लगेच या
सदू - फ़ोन ठेवला की निघालो.

पाच मिनिटात सदू आला. भाऊ सकाळी कार्यालयात जाऊन आलेले त्याला माहीत होते. आल्यावर ते भडकले होते हेही त्याने पाहिले होते. कार्यालय केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर होते. सदूने ’भाजी घेऊन येतो’ असे सांगून तो पटकन कार्यालयात आला.

मीना सदूशी वीस मिनिटे अत्यंत खासगी बोलत होती. सदूच्या तोंडावरील भाव क्षणाक्षणाला पालटत होते. आश्चर्य, धक्का, संताप, कीव, जणू स्लाईड शोच चालला असावा. सदू उठला तेव्हा मीनाला त्याचा चेहरा पाहून खात्री पटली होती. सदूला काम पुर्ण समजलेले आहे आणि ते तो करणार म्हणजे करणार!

सदू निघून गेल्यावर एक नवीन संकट ऒफ़ीसमधे उपटले. मीनाला अंदाज होताच, पण इतक्या लवकर हे होईल असे वाटले नव्हते. पण तिच्या दृष्टीने आता हे संकट फ़ारच किरकोळ होते.

काल सायंकाळी नियुक्तीची ऒर्डर घेऊन लातूरला गेलेला नंदन आज सायंकाळी नियुक्ती रद्द झाल्याची ऒर्डर घेऊन सोलापुरला परत आला तो तडक कार्यालयातच आला. मधेअधे कुणालाही न भेटल्यामुळे व सोलापुरातील पेपर वाचलेले नसल्यामुळे भाऊंच्या जागी मीनाला पाहून तीनताड उडाला.

काय बोलायचे हेच त्याला समजेना.

मीना - बोला ... समाजसेवक...
नंदन - तू?
मीना - मला ’ए’ म्हणालास तर कोठडी मिळेल आठवड्याची...
नंदन - म्हणजे?
मीना - म्हणजे काय ते बापाला जाऊन विचार तुझ्या... त्या बनसोडेला...
नंदन - ए ...
मीना - संजय? ए संजय... हा कोण छपरी आलाय बघ रे...

संजयला हाका ऐकूच आल्या नव्हत्या. पण नंदनला समजायचे ते समजले.

नंदन एक क्षणही तिथे न थांबता सरळ ताडताड भाऊंकडे निघून गेला.

नंदनला असले धक्के कधीच बसले नव्हते. हे काय चाललेले आहे हेच त्याला कळले नाही. काल आपल्याला सांगतात लातूरचा प्रमूख तू! तिकडे जाऊन चार्ज घ्यावा तर दुपारी फ़ोन येतो याला परत पाठवा. काल जाताना आपल्याला प्रमूख केले म्हणून भाऊ कानसुलात मारतात. आज भाउंना सांगायला कार्यालयात पोचावे तर तिथे मीना????

सोलापूर आहे का भुताटकी?

मीना मनमुराद हसत होती. आपण असे ’तुझी आई, तुझा बाप’ वगैरे कसे बोलू शकतो याचे तिलाच आश्चर्य वाटत होते. आमदारांचा फ़ोन आला.

बंडा - हं! काय मीनाताई...
मीना - सर.. मला ताई काय म्हणता?
बंडा - (हसू लागला) कार्यकर्ते आहेत आसपास... तू कधी येतीयस? उस्मानाबादला?
मीना - अंहं! तुम्हीच या... सोलापुरला
बंडा - आमच्या चकरा वाढायला लागल्या तर आम्हाला बाबा काढून टाकतील.

दोघेही हासले.

बंडा - आजच सकाळी बाबांना फ़ोन करून सांगीतलं!
मीना - काय?
बंडा - नवीन नियुक्तीबद्दल
मीना - माझ्या?
बंडा - मग कुणाच्या?
मीना - सर काय म्हणाले?
बंडा - ते म्हणाले जुन्या लोकांना दुखवू नको... अननुभवी नेतृत्व नसावे पक्षात...
मीना - मग?
बंडा - आम्ही सांगीतलं की सोलापुरातील महिला मतदार वळतील. युवकही वळतील आपल्याकडे
मीना - मग?
बंडा - मग भाऊंचा विषय निघाला... आज आले होते का ते? ऒफ़ीसला ?
मीना - आले होते. पण मला वाटतं ते चुकून ड्रिंक्स घेऊन आले होते की काय कुणास ठाऊक?
बंडा - का?
मीना - जरा वास येत होता. माझा पहिलाच दिवस.. अन ऒफ़ीसमधे हे असलं चालतं म्हंटल्यावर कसेतरीच वाटले.
बंडा - छे छे! ऒफ़ीसमधे कुठे चालतं हे? त्यांना सांगून टाक...
मीना - सांगून पाहिलं मी.. पण....
बंडा - काय ... पण?
मीना - ते म्हणाले आरोग्यमंत्र्यांचा तुला फ़ोन आला तर ततपप करशील...
बंडा - काय???? भाऊ म्हणाले?
मीना - हं! असूदेत.. जरा रागावले असतील. सोडून द्या. वयही झालंय आता
बंडा - नाही नाही... वय कसलं झालंय? प्यायच्या वेळेला समजत नाही का वय स्वत:चं? मीच बघतो..
मीना - सर.. माझ्यासाठी तरी सोडून द्या...
बंडा - का?
मीना - आज कुठे पहिला दिवस आहे... इतक्यातच वैर होणं...
बंडा - तू म्हणतेस म्हणून गप्प बसतो. परंतू ऒफ़ीसमधील वागणूक कशी असावी याचे पत्रक काढ अन आम्हाला एक कॊपी पाठव.
मीना - हो सर..
बंडा - अन ते पत्रक सगळ्यांना वाटायचं अन ऒफ़ीसमधेही लावायचं!
मीना - हो सर...
बंडा - आणि सोलापुरातल्या गेस्ट हाऊसवर कसं वागायचं त्याच पत्रक फ़क्त आमच्यासाठी काढायचं
मीना - सर... काय हे? आजूबाजूला कार्यकर्ते आहेत..

मीनाने लाजल्यासारखे करत फ़ोन ठेवायची परवानगी मागीतली. आमदाराने हसत हसत दिली.

फ़ोन ठेवल्यावर जळजळीत नजरेने मीना फ़ोनकडे बघत होती.

साडे सात वाजता ती घरी जायला गाडीत बसली.

नेमका तेव्हाच शहराच्या सेवाभाव मनोरुग्णालयातील महिला विभागात एक प्रकार घडत होता.
नेहमी कामावर असलेली नर्स विद्या आज रजेवर होती. अन दुसरी नर्स वनिता ड्युटी संपवून निघून गेली होती.

पुढच्या शिफ़्टच्या नर्सेस यायला अजून एक तास होता.

शांताराम हा मेल नर्स एकटाच थांबलेला होता. त्याची ड्युटी महिला विभागावर असायची ती काही अचानक अडचण आली तर धावाधाव करायला. ऎब्युलन्स बोलवणे, औषधे आणणे, कुणालातरी गाडीवर बसवून घेऊन येणे वगैरे! बाकी फ़िमेल नर्सेस रुग्णांकडे बघायच्या.

कुणीच नाही म्हंटल्यावर शांतारामची नजर हळूहळू भिरभिरू लागली. योगिता नावाची एक रुग्ण मुलगी असेल बावीस एक वर्षांची! तिला पतीने सोडले होते. तिच्या डोक्यावर कसला तरी परिणाम झाला होता. परिणाम झाला म्हणून सोडले की सोडले म्हणून परिणाम झाला हे शांतारामला माहीत नव्हते. योगिता शुन्यात बघत बसायची. मधेच घळाघळा रडायची. मधेच हातातील वस्तू फ़ेकायची. पण तिला झटके येण्याची वारंवारता तशी फ़ार नव्हती. महिन्यातून एक दोनदा ती वाईल्ड व्हायची. पण एरवी ती नुसती शुन्यात बघत बसायची.

शांताराम हळूहळू वॊर्डमधून फ़िरायला लागला. योगितावर त्याची नजर फ़ार आधीपासूनच होती, तिला येऊन पाच, सहा महिने झाले होते.

शांताराम तिच्यापाशी गेला.

शांताराम - चला ताई... मशीनवर बोलवलंय

योगिताला तपासणीसाठी मधून मधून घेऊन जायचे. आजवर दोन वेळा तिचे ए़क्स रे ही काढलेले होते. का कुणास ठाऊक, एक्स रे काढून घ्यायला ती फ़ार घाबरायची. हा फ़ोटो का काढतायत असे विचारून रडून, ओरडून ती हॊस्पिटल डोक्यावर घ्यायची. आत्ताही शांताराम तसे म्हणाल्यावर ती किंचाळायला लागली. ते किंचाळणे बघून दुसरी एक मुलगी खदाखदा हसायला लागली तर आणखीन एक पोक्त स्त्री मुसमुसून रडायला लागली. शांतारामला पक्षी हातात सापडल्याचा आनंद झाला. तो तिला म्हणाला:

शांताराम - ताई... तुम्हाला फ़ोटो काढायचा नसला तर मी तुम्हाला लपवून ठेवू का?
योगिता - हो... हो.. लपव मला लपव... (योगिता ओरडून शांतारामकडे आशेने बघत होती.)
शांताराम - चला माझ्याबरोबर.

शांतारामकडे पाहात ती पलंगावरुन उठली. त्याने तिचा डावा हात धरला. तिला तो किंचितच ओढू लागला. जसे ते वॊर्डमधून बाहेर आले तसे प्रवेशद्वाराकडे न जाता डावीकडे एक स्टोअररूम होती तिकडे शांताराम तिला घेऊन जाऊ लागला. ती बिचारी भीतीने प्रवेशद्वाराकडे बघत होती की आपल्याला न्यायला कोणी येते की काय? शांताराम तिला ’इकडे लपा ताई, इकडे लपा, मी पण आहे तुमच्यासोबत, कोणी येणार नाही आता’ असे म्हणून धीर देत होता.

स्टोअररूममधे गेल्यावर शांतारामने दार आतून लावले. त्याने योगिताच्या कंबरेवर दोन्ही हात ठेवून तिला ओढले. योगिता अजूनही स्टोअररूमच्या लावलेल्या दाराकडेच बघत होती भीतीने.

शांताराम - जवळ या ताई... अशा जवळ या.. मी असल्यावर कुणी येणार नाही.

योगिता शांतारामच्या पूर्ण निकट गेली.

शांतारामचा हात आता तिच्या खांद्यांवरून खाली सरकला. दुसरा हात तिच्या अंगावरील हॊस्पीटलचा गाऊन वर ओढू लागला. योगिता बिचारी अजूनही घाबरून दाराकडेच बघत होती.

मधेच ती शांतारामकडे बघून हसत होती. ’कसे आपण त्या लोकांना फ़सवले अन लपून बसलो इथे’ असा काहीसा बालीश भाव तिच्या तोंडावर होता. शांतारामही ती हसली की हसून तिला आनंदीत करत होता.

गाऊन कंबरेपर्यंत येईपर्यंत तिला काहीच वावगे वाटले नव्हते. आता शांतारामने तिला खाली बसवले.

त्याची जवळीक अजूनही तिला शंकास्पद वाटत नव्हती. शांताराम आता दोन तीन सेकंद थांबला. त्याने कुजबुजून तिला सांगीतले की ते लोक दारापाशी आले आहेत. तू आडवी हो व मी तुझ्या अंगावर झोपतो व तुला झाकतो.

योगिता त्या लोकांच्या येणाच्या कल्पनेने भयंकर घाबरली. तो म्हणतो तसे तिने केले.

अन केवळ चार पाच क्षणातच तिच्यातील स्त्री खाडकन जागी झाली. हे जे चाललेले आहे ते भयानक आहे आणि आपण याच्यातून पुर्वी गेल्यामुळेच आपली अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे हे तिला जसे आठवले... तिने किंकाळ्यांवर किंकाळ्या फ़ोडायला सुरुवात केली.

शांताराम हबकला होता. मात्र त्याही परिस्थितीत तिचे तोंड दाबायचा प्रयत्न करत तो आपली विकृत वासना पुर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. पण योगिता ही मनोरुग्ण असली तरी दुर्बळ नव्हती. तिने केलेला प्रखर विरोध त्याला जास्त वेळ चिरडून काढता आला नाही. त्यातच तिच्या ओरडण्यामुळे बहुधा काही पावलांचे आवाज त्याला आल्यासारखे वाटले होते. त्याने त्याच क्षणी तिच्यावरचा आपला ताबा सोडला. आता घाबरण्याची वेळ त्याची होती.

बाहेर धावाधाव झाल्यासारखी वाटली तेव्हा शांतारामने दार उघडले. दोन तीन रुग्ण महिला प्रवेशद्वारातून बाहेर गेल्या होत्या. त्यांना असे वाटले होते की योगिताला फ़ोटो काढायला बळजबरीने नेले. संधी साधून शांताराम निसटला व आपल्या जागेवर जाऊन बसला. योगिता अत्यंत भीतीने एक एक पाऊल सरकवत कशीबशी स्टोअरमधून बाहेर पडली व मग धावत आपल्या वॊर्डमधे गेली.

आणखीन एक दुर्दैवी प्रसंग येणे तिच्या दैवातून टळले होते.

आठ महिन्यांपुर्वी असाच प्रसंग आला होता. तिचे लग्न नुकतेच झालेले होते. पण आज त्याने तिला ब्लॆकमेल करत पुन्हा घरी बोलावले होते. पतीला काहीही न सांगता योगिता त्याच्या घरी गेली होती. तिथे त्यांचे खूप मोठे भांडण झाले होते. यापुढे मी तुला बोलवणार नाही असे वचन देऊन ’एकदाच शेवटचे’ असे म्हणून त्याने तिला त्यावेळी पुन्हा भोगले होते. मात्र त्यानंतरही त्याने पिच्छा सोडला नाही. योगिता मोठी सुरेख मुलगी होती. एकदा कधीतरी मात्र पतीला सुगावा लागला. त्याने पाठलाग करून पाहिले तेव्हा त्याला भयानक धक्का बसला.

पतीने तिला त्यादिवशी मारहाण करून घराबाहेर काढले. तिच्या माहेरचे सोडवायला आले होते. पण त्यांचे ऐकले नाही. योगिताला हाकलून दिले. या धक्क्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता.

तो माणूस तिला ब्लॆकमेल करू शकायचा कारण त्याने तिच्यावर प्रेम असल्याचे नाटक केले होते. एके दुपारी ती त्याच्याशी संबंध आल्यानंतर तशीच पडून राहिलेली असताना त्याने तिच्या नकळत तिचे फ़ोटो घेतले होते. नंतर लग्नाचे वचन पाळले नाही. तिचे लग्न झाल्यावर मात्र तिला ब्लॆकमेल केले होते.
घटनांचा परिणाम वाईट झाला होता. योगिता कायमसाठी मनोरुग्ण झालेली होती. तिच्या पतीने दुसरे लग्नही केले होते. त्या माणसाचे पुढे काहीच कळले नाही.

फ़क्त एकच तिला आठवत होते...

त्या माणसाचे नाव होते.. नंदन वार्के!

भाउंना न सांगता नंदनने तिचे फ़ोटो काढले होते. ते फ़ोटो त्याच्याकडे आजही होते. फ़सवलेल्या मुलीला तिची सी.डी. केल्याचे सांगायचे नाही हा नियम होता. पण नंदनने तो मोडला होता. नंतर मीनाच्या बाबतीत भाऊंनीही मोडल्यानंतर नंदनला सुटका झाल्यासारखे वाटत होते.

नंदन भाऊंकडॆ आला तेव्हा ते नेहमीच्या रूममधे बसलेले होते.

नंदन - हा काय भलताच प्रकार भाऊ?

भाऊंना नंदन परत आला आहे याचे कारणच माहीत नव्हते.

भाऊ - या.. या लातूर शाखा प्रमुख.... आज इकडे कुठे?
नंदन - भाऊ, मला पेग हवाय...
भाऊ - अरे? तुम्ही सांगायचा अन आम्ही भरायचा... वरिष्ठ आपण...
नंदन - भाऊ.. मी परत आलोय...
भाऊ - डोळे काम देतात माझे अजून.. तुझे भूत नसून तू आला आहेस हे मला समजते...
नंदन - कायमचा....

दोघांचे तीन तीन पेग होईपर्यंत दोघांनाही आपापल्या कहाण्या समजल्या होत्या.

आता भाऊ खदखदून हसायला लागले. म्हातारा भ्रमिष्ट झाला असावा असे वाटून नंदनही हसायला लागला. तो हसला तसे भाऊ खवळले.

भाऊ - ***** ! हसतोस? माझ्यासमोर हसतोस?
नंदन - काय झालं? तुम्ही पण हसताय की?
भाऊ - *****! तुझा नखरा उतरला याचं हसू येतंय मला... तू काय हसतोयस?
नंदन - आता.. म्हणजे...
भाऊ - काय? काय आता म्हणजे?
नंदन - माझंही थोडस तेच कारण आहे हसण्याचं!
भाऊ - काय कारण आहे?
नंदन - आता तुमचाही नखरा उतरला असे म्हंटलो तर मला माराल....

भाऊंना हे समजेना की तो तसे म्हणतोय की ’मीही असे म्हणू शकेन’ असे म्हणतोय. त्यामुळे ते प्रचंड भडकूनही चूप होते.

भाऊ - नंद्या.. पोरगी खलास व्हायला हवी..
नंदन - त्या आधी इथे आणायला हवी तिला
भाऊ - कर फ़ोन तिला...
नंदन - ऒफ़ीसमधे नसेल आता
भाऊ - घरी जा तिच्या..
नंदन - आपलाच पोपट होईल..
भाऊ - का?
नंदन - आता पार्टीचे कुणी ना कुणी तिथे असणारच ना..
भाऊ - या आमदाराने काय डिसीजन घेतला काही समजत नाही
नंदन - तुम्ही त्यांना शिव्या दिल्यात तेच बरं केलत भाऊ
भाऊ - आमदाराचा अन या पोरीचा संबंध काय ते शोधायला हवे.
नंदन - आता त्याच कामाला लागतो. पण.. आता.. ऒफ़ीसला जायच का नाही जायचं मी?
भाऊ - मीच जाणं बंद करणार आहे. तू कशाला जातोयस?
नंदन - तिची पाठवली का? सी.डी.?
भाऊ - हं!
नंदन - पेमेंट?
भाऊ - तीन दिवसात येईल.
नंदन - शर्मिला कुठंय?
भाऊ - दिल्ली..
नंदन - दिल्ली???? का???
भाऊ - का गेलीय ते मलाही समजत नाहीये...

नंदनला तिचं जाण्याचं कारण अंधूकसं माहीत होतं. पण तिला इतक्या लवकर त्या कॊन्टॆक्टचा तपशील कसा समजला असेल हे त्याला समजत नव्हतं!

नंदन - शर्मिलाला माहितीय का?
भाऊ - काय?
नंदन - ही पोरगी प्रमुख झाली ते?
भाऊ - शर्मिला आजच गेली असणार सकाळी.
नंदन - माधव भेटला का तिला?
भाऊ - कुणाला?
नंदन - त्या मीनाला?
भाऊ - च्यायला.. खरच की? हा एक वेगळाच तिढाय.. माधव या पोरीला भेटला असणार नाही का?
नंदन - मग? भेटलाच असणार... वर त्याने तिचा इंटरव्हिव्ह घेतलाय...
भाऊ - त्याला फ़ोन लाव रे *****

नंदनने फ़ोन जोडून भाउंकडे दिला.

भाऊ - बनसोडे
माधव - हं!
भाऊ - भेटली का? जिल्हा उपप्रमुख?
माधव - भेटली.
भाऊ - मग?
माधव - ओळखलंच नाही मला
भाऊ - असं कसं? चार दिवसांपुर्वी तर मुलाखत घेतलीस ना तू?
माधव - मलाही समजत नाहीये.. मी जरा लांब लांबच होतो.
भाऊ - तुला काही विचारलं?
माधव - नाही. काका म्हस्केच सगळ्यांची ओळख करून देत होते.
भाऊ - मग तुझे नाव सांगीतल्यावर तिने काय केलं?
माधव - काही नाही. नुसते हात जोडून मान तुकवली. इतकी गर्दी होती तिथे. कुणाचा कोण आलाय तेच कळत नव्हतं!
भाऊ - आता काय ठरवलयस?
माधव - आता काय ठरवायचय? वर्षभर मुंबईला जाणार मी... आजाराचं निमित्त काढून...
भाऊ - मग आज तरी कशाला गेलास ऒफ़ीसमधे...
माधव - मला वाटलं होत की तुम्ही मला फ़ोन करून सांगाल की काल या पोरीला उपप्रमुख केल ते..
भाऊ - खरय! डोकंच ठिकाणावर नाहीये माझं!
माधव - नंद्या कधी आला तुमच्याकडे?
भाऊ - आत्ताच
माधव - अन शर्मिला?
भाऊ - ती गावाला गेलीय.
माधव - बर! ठेवू का?
भाऊ - माधव.. पुन्हा विचारतो... रॆकेटला आत्ता गरज आहे, येतोयस का पुन्हा?
माधव - भाऊ! मला काय पैसा नकोय का? पण पक्षाचे काम करून जास्त मिळतो, पुन्हा सत्ता, पुन्हा त्या कटकटी नाहीत
भाऊ - हे मला सांगतोस?
माधव - तसं नाही! पण इतकी रिस्क घेणं आता नको वाटतं!
भाऊ - तुला स्वत:ला मुलगी झाल्यापासून तुझं...
माधव - तसं नाहीये भाऊ...
भाऊ - मला काय सांगतोस? उगाच पांढरे नाही झाले माझे...
माधव - एका परीने तेही आहेच भाऊ...
भाऊ - म्हणजे सुधरलास म्हणायचा..
माधव - हा हा हा हा! तसं नाही. पण एखादा धमाल माल असला तर मला जरूर बोलवत जा...

त्या रात्री आमदार उस्मानाबादला, भाऊ आपल्या बंगल्यावर, नंदन त्याच्या घरी, मीना तिच्या घरी आणि शर्मिला दिल्लीतील एका हॊटेलमधे झोपलेले होते.

एक मीना सोडली, तर बाकी कुणाचीच झोप धड नव्हती.

दुसरा दिवस उजाडला तो अनेक आश्चर्ये घेऊनच!

भाऊंच्या घरातील पहिला फ़ोन खणखणला तोच मुळी दहा वाजता आरोग्यमंत्र्यांच्या सचिवाचा!

सचिव - भाऊसाहेब.. काय म्हणताय?
भाऊ - नमस्कार साहेब, साहेब कसे आहेत?
सचिव - ठीक आहेत...
भाऊ - बोला साहेब.. सकाळी सकाळी कशी आठवण आली?
सचिव - अं! दोन गोष्टी होत्या..
भाऊ - हां साहेब...
सचिव - एक म्हणजे आपल्या कार्यालयात एक नोटीस लावून टाका
भाऊ - काय साहेब?
सचिव - की कुणीही मद्यपान करून तेथे यायचं नाही.
भाऊंच्या पायाखालची वाळू सरकली.
भाऊ - लगेच लावतो साहेब
सचिव - आणि...
भाऊ - ......
सचिव - माझा मित्र आहे सोलापुरला..
भाऊ - कोण साहेब?
सचिव - पुरंदरे म्हणून
भाऊ - बर साहेब
सचिव - ट्रान्सपोर्टमधेच आहे
भाऊ - हां साहेब..
सचिव - तो सगळी मदत करेलच तुम्हाला.. त्याला फ़ोन करा
भाऊ - कसली साहेब?
सचिव - तुम्हाला शिफ़्टिंग करायचंय असं मंत्रीसाहेब म्हणत होते.

येणारा प्रत्येक दिवस भाऊंना खड्ड्यातच ढकलत होता. मीनाच्या लाडीक आवाजात केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार झाला असेल हे त्यांना माहीत नव्हते. यातून त्यांना फ़क्त एक म्हणजे एकच गोष्ट समजली. ती म्हणजे.. आरोग्यमंत्र्यांनी मीनाच्या निवडीला परवानगी दिलेली होती.

सदूच्या नावाने कानठळ्या बसतील अशी हाक मारत भाऊ भेसूर चेहरा करून पाहात होते.

आणि संजयकडून त्याचवेळी मीना कार्यालयात बसून डॊक्टर माधव कुलकर्णी या व्यक्तीमत्वाची सर्व माहिती विचारून घेत होती.

पुढच्या दोन तासात भाऊंचे पुरंदरेंशी बोलणे झाले. आज आवरा आवर होईल व उद्या गाड्या येतील असे ठरले. भाऊ सदूला सगळ्या सूचना पुन्हा पुन्हा देऊ लागले. मधेच कार्यालयात जाऊन त्यांनी एका कार्यकर्त्याला नोटीस लावायची मंत्र्यांची सूचना आहे व ताबडतोब नोटीस लाव असे सांगीतले. ते आत जाऊन मीनाला भेटलेच नाहीत. ते कार्यालयात गेलेले असताना इकडे सदूने मीनाचे काम करून टाकले.
दुपारी दिड वाजता नंदन भाऊंकडे आला तेव्हा भाऊ नवीन जागेतील सोयींची चौकशी फ़ोनवर करत होते.
इकडे मीना ’महिला तक्रार केंद्रांमधे’ विनयभंग, छेडाछेडी, मंगळसूत्र उडवणे यासारख्या तक्रारींचेही कायद्याच्या मार्गातून निवारण केले जाईल अशा स्वरुपाच्या बातम्या पेपरवाल्यांना द्यायला कार्यकर्त्यांना सांगत होती.

आणि.....

हरजिंदरसिंग बग्गाच्या दाढीच्या स्पर्शाने पोटाला गुदगुल्या होत असल्याने शर्मिला चंदीगढमधील त्याच्या आलिशान बंगल्याच्या बेडरूममधील अवाढव्य बेडवर चेकाळत हासत होती.

शर्मिला - बस... बस... और कितना प्यार करोगे
बग्गा - जितना सह सकेगी तू..
शर्मिला - ना...

शर्मिलाने साडे अकरा वाजता बजाजच्या शोरूममधे ’मालकांना भेटायचंय’ याचा आग्रह धरल्याने बग्गा तिला भेटायला तयार झाला होता. आणि पुढच्या अर्ध्याच तासात ’ही शर्मिलाच असून सोलापूरमधील सप्लाय ही नुसता हॆंडल करत नाही तर रेकॊर्ड्स ब्रेक करते’ हे त्याच्या दृष्टीने सिद्धही झाले होते.

हरजिंदरसिग बग्गा! दाखवायला ऒटोमोबाईल डीलर! प्रत्यक्षात एक शरीरांचा डीलर! भारतभरात एजंट नेमून तो ही कामे करून घेत होता. बहुतेक सप्लाय मुंबई, दिल्ली व चेन्नईतून व्हायचा. त्यातला ६० टक्क्याच्या आसपास तो स्वत:च रिजेक्ट करायचा. उरलेल्यांपैकी जेमतेम दहा टक्के फ़्रान्सच्या एजन्सीला ऎक्सेप्टेबल असायचा. त्यामुळे प्रत्यक्ष नेटवर अगदीच कमी मुलींची चित्रे झळकायची. वर्षाला जेमतेम दहा ते बारा! अन शर्मिलाचे रेकॊर्ड हे होते की दोन वर्षात पाच मुलींच्या सी.डी. पाठवल्या अन त्यातल्या दोन सिलेक्ट झाल्या अन तिसरी मीनाची सी.डी, म्हणजे एकुणात सहावी, बग्गाच्या घरात होती अन ती सिलेक्ट होणार यात बग्गाला कोणतीही शंका नव्हती. उरलेल्या दोन सी.डी पैकी एक होती मेघना भेंडेची!
मात्र ती एजन्सी रिजेक्ट केलेल्या सॆम्पल्सचेही ४० % पैसे द्यायची कारण या धंद्यातील रिस्क! आणि खरे तर त्या ४० % टक्क्यांवरच बग्गाची चेन आपला उदरनिर्वाह आरामात करू शकायची. रिजेक्ट केलेली सॆम्पल्स पुढे कधीतरी कुठेतरी वापरली जाण्याची शक्यता असायची.

शर्मिलाला शर्मिला मानायलाच तो तयार नव्हता. अत्यंत भंडावणारी चौकशी केल्यावरच त्याने ते मान्य केले.

मान्य केल्यावर मात्र तिला घेऊन तो एका महागड्या रेस्टॊरंटमधे घेऊन गेला.

तेथील चर्चेत तिने दिलेला प्रस्ताव आकर्षक वाटत असतानाच बग्गाला शर्मिलाही आकर्षक वाटू लागली होती. ४५ वर्षांच्या बग्गाने आपल्या जवानीत शेकडो स्त्रियांचे अनुभव जमेस घेतले होते. अन शर्मिलाला त्याची अनुभवी नजर केव्हाच कळली होती.

प्रस्तावावरील चर्चेने शर्मिलाला हवे तसे अन सहवासावरील सूचक चर्चेने बग्गाला हवे तसे वळण घेतल्यानंतर बग्गाच्या बंगल्यावर त्यांच्या क्रीडेला ऊत आला होता. भाऊ बनसोडे अन आमदार असले घाईघाईत सगळे कसेतरी उरकणारे साथीदार वारंवार अनुभवल्यानंतर बग्गाच्या प्रचंड बंगल्यातील निवांत एकांतात बग्गासारख्या पुरुषाची प्राप्ती झाल्यामुळे शर्मिला स्वर्गसुख अनुभवत होती. आणि बग्गाला असा साथीदार यापुर्वी क्वचितच मिळालेला होता.

बग्गा - तू चंडीगढही मे क्यो नही रहती?
शर्मिला - और?
बग्गा - नॊर्थकी लडकिया तुम्हारे इलाकेसे ज्यादा खूबसूरत होती है
शर्मिला - तो मै खूबसूरत नही हूं...
बग्गा - अरे तू तो फ़ूल है फ़ूल... इसिलिये तो तुझे यहॊं रहनेके लिये कह रहा हूं
शर्मिला - तो काम बंद करके यही करते रहेंगे आप?
बग्गा - ये भी, वो भी!
शर्मिला - मै भला किसी बुढे के साथ क्यू रहूं?
बग्गाने तिच्या या थट्टेच पुन्हा उट्टे काढले.
शर्मिला - बस बस.. माफ़ करो.. मैने मजाक किया था
बग्गा - ऐसा मजाक भी मजा देता है
शर्मिला - और कोई नही होता घर मे?
बग्गा - हम आजाद रहनाही पसंद करते है
शर्मिला - ताकि हररोज किसी नयेको यहॊं बुलाया जा सके?
बग्गा - अरे नही... ये तो तेरी खूबसूरती खीच लायी..
शर्मिला - अब हटो... मुझे निकलना पडेगा
बग्गा - अब आठ दिन यही रहना है तुने
शर्मिला - हं! आठ दिन! और सोलापुरमे भाऊ पागल हो जायेगा..
बग्गा - ये बनसोडेको भाऊ कहते है क्या?
शर्मिला - हटो पहले...
बग्गा - उसका फ़ोन आया था!
शर्मिला - क्युं???
बग्गा - वो नयी सी.डी. ना भेजने के लिये
शर्मिला - क्युं?
बग्गा - उस लडकीकी वहीपे ऎडव्हर्टाईज करना चाहता था
शर्मिला - मीना?
बग्गा - हं!
शर्मिला - भाऊ पागल होगया है!
बग्गा - सही कह रही हो..

बग्गा पलंगावरून उठला.

दोन तासांनी बग्गाने तिला खास ओळखीच्या एजन्सीकडून टॆक्सी करून दिली. शर्मिलाने त्याला महिन्यातून एकदा चंदीगडला अन तेही चांगले चार चार दिवसांसाठी यायचे वचन दिले. रात्री साडे नऊची फ़्लाईट घेण्यासाठी शर्मिला चंदीगडहून निघाली.

तिच्या या धाडसामुळे अनेक गोष्टी झाल्या होत्या.

भाऊंचे सोलापुर सेक्स स्कॆंडलमधील महत्व शुन्य झाले होते.

बग्गाला रेकॊर्ड ब्रेक करणारी व्यक्ती थेट मिळाली होती.

शर्मिलाला व तिच्यामुळे नंदनला.. आजवर मिळाले नाहीत इतके पैसे मिळायला लागणार होते..
पण ...

याचवेळेस सोलापुरात एक भयानक गोची झालेली असल्याचे या चौघांपैकी किंवा माधव कुलकर्णीलाही अजिबात माहीत नव्हते.

वाघमारेच्या चौकीवर सेवाभाव मनोरुग्णालयात विनयभंग झाल्याची तक्रार दाखल झाली होती. शांताराम केव्हाच फ़रार झाला होता. वाघमारेला केसचे इतर काहीच महत्व माहीत नसल्यामुळे त्याने सरळ केस दाखल केली होती.

ही बातमी मिळाल्यानंतर पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना घेऊन मीना सेवाभाव मनोरुग्णालयात गेली होती. तिथे तिची चर्चा सर्वात वरच्या अधिकारी व्यक्तीशी चाललेली होती. योगिताची केस हिस्टरी समजत होती. योगिता ’फ़ोटो काढणे’ या प्रकाराला घाबरत होती याचे कारण मागे कुणीतरी तिला ब्लॆकमेल केले होते हे योगिताच्या माहेरच्यांनी कॊन्फ़िडेन्शियल म्हणून हॊस्पीटलमधील त्या अधिकारी व्यक्तीला सांगीतले होते. मीना योगिताला भेटली. योगिताचे आई वडील व एक भाऊ हेही तिथेच होते. मीनाने विश्वासात घेऊन योगिताच्या आईला सर्व हकीकत विचारली. योगिताला तिच्या पतीने हाकलून देण्याचे कारण नंदन वार्के नावाच्या मुलाने छायाचित्रांच्या मार्गे तिला केलेले ब्लॆकमेल हे होते, ही गोष्ट प्रकाशात आली.

मीनाला तिच्याचप्रमाणे आणखीन एक शोषित मुलगी आहे हे पाहून तीव्र संताप आला. तिरीमिरीत तिने नंदनला कार्यालयात बोलवणे पाठवले होते व वाघमारेलाही तिथे बोलवून त्याला नंदनला ताब्यात घ्यायला सांगीतले होते. बर्गेबाईंना आदेश दिला होता की नंदनच्या विरुद्ध ही केस त्या लढवतील. अहिंसा क्रान्ती पक्षातर्फ़े नंदन वार्के या पक्षातीलच तरुणावर त्या दिवशी पोलिसकेस झाली.

ही गोष्ट भाऊंना समजली तेव्हा त्यांची आवराआवर संपत आली होती. आमदारांना ही बातमी समजल्यावर त्यांनी मीनाचे अभिनंदन केले. पार्टीतील नंदनचे जे विरोधक होते त्यांना फ़ारच आनंद झाला होता. भाऊंचे जे समर्थक होते त्यांनी भाऊंना गप्प राहण्याचा संदेश दिला होता. सध्याच्या पार्श्वभूमीवर नंदनला सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा मूर्ख ठरेल हे भाऊंना पटले होते.

आणि वाघमारे.. जेव्हा त्याला या प्रकरणाच्या मुळाशी नंदन वार्के आहे हे समजले.. त्याची स्वत:चीच पाचावर धारण बसली होती. नंदनला कोठडीत जाब विचारणे दूर.. तो आधी स्वत: कुठे अडकणार नाही ना याचीच काळजी घेत होता. मीनाच्या घरावर चिठ्ठी लेहून ठेवणारा दादूही फ़रार झाला होता.

आणि आज पहिल्यांदाच.. थेट आरोग्यमंत्र्यांचा मीनाला पहिलावहिला फ़ोन आला होता. त्यांनी ’बेटी’ म्हणून तिच्या धडाडीचे कौतूक केले होते.

आमदार जर सत्शील असता तर मीनाला अशा घराण्याची सून होण्यात भूषण वाटले असते. पण आमदार सत्शील नव्हता.

सोलापूर सेक्स स्कॆंडलला मीनाचा पहिलावहिला खराखुरा जबरी तडाखा..... .. आज बसला होता...

गुलमोहर: 

बेफिकिर चांगले लिखाण आहे.
अतिशय गंभीर विषायावर लिहीलय.जळगावची बातमी आठवली.
प्रत्येक भाग वाचला की पुढच्या भागाची उत्सुकता वाढते.
पु.ले.शु.

अगं सायो, मलाही ते 'इंटरव्हिव्ह' खटकतंय. पण कदाचित तिथल्या बोली भाषेतला रूढ शब्द असेल तो.

इंटरव्हिव्ह लिहिण्यात काही चुकत असेल तर कृपया माफ करावेत.

प्रतिसाद व प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनापासून आभार

-'बेफिकीर'!

गीताशी सहमत आहे, एखाद्या पक्षात इतक्या पटकन प्रवेश मिळवणं अतिशय अवघड असतं. पण तुमचा लिखाण इतकं ईंटरेस्टींग आहे की तो मुद्दा मी सहज नजरेआड केला..
कृपया आता पटकन पुढचा भाग टाका.. Happy

पक्षातील प्रवेशाचा मुद्दा न पटल्याबद्दल क्षमस्व!

प्रत्यक्ष कादंबरीचे प्रकाशन करेन तेव्हा त्यावर विचार करेन असे वाटते. आत्ता प्रवाहात लिहीत आहे.

मायबोलीवर प्रकाशित झाल्यावर पुन्हा पुस्तक स्वरुपात ही कादंबरी छापायला काही कायदेशीर बाबी तर नसतात ना याची माहिती कृपया हवी आहे.

पुढचा भाग आत्ताच लोड करत आहे.

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

मी सुद्धा गीता शी सहमत आहे..आमदाराने जरी हा decision घेतला असला, तरी त्याच्या बाबाने आणि पक्षामधल्या इतर लोकांनी कशी सहमती दिली..तेही एका गरीब घरच्या, जेमतेम शिक्षण झालेल्या, काहीही राजकीय बॅकग्राऊंड नसलेल्या मुलीला एवढे मोठे पद द्यायला ? कथेची ही बाजू अजून जास्त strong हवी..बघा पटतयं का..

आपल्या सर्वांच्या मताचा आदर आहे. तो भाग 'वीक' वाटत आहे याबद्दल क्षमस्व!

(अवांतर - मला इंदिरा गांधींच्या दुर्दैवी निधनानंतर राजीव गांधी यांची निवडही जरा अचानकच झाल्यासारखी वाटली होती. मात्र ती तुलना अयोग्य आहे. फक्त आठवले म्हणून लिहिले.)

सर्वांचे मनापासून आभार!

"वीक" वगैरे काही नाही हो... वाचणार्याच्या सज्जनपणामुळे त्यांना हे खटकतेय / पटत नाही. तसा मीपण सज्जनच आहे Happy पण अश्या काही गोष्टी घडलेल्या माहीत आहेत.....

हे लिहलय त्यात मला तरी काही अतिशयोक्ती वाटत नाही. कधी कधी त्यातले काही प्रसंग कोणितरी तुम्हाला घडलेले सांगितलेत असे वाटते (सुडाचे नाहीत तर शोषणाचे).

चांगला भाग आहे हा. मी वाचत होतो मात्र आजच लॉगइन झालो. म्हणून सगळेच प्रतिसाद एकदम देतो आहे. सूड नेमका काय आहे हे कळायचे बाकी असल्याने थरार वाढतो आहे.

जबरदस्त लिखाण आहे, बेफिकीर!

पक्षातील प्रवेशाचा भाग अजिबात वीक नसून, राजकारणाशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संबंध आलेल्या वाचकांना त्याच्या स्पष्टीकरणाची अथवा बदलाची गरज न वाटावी.