पुण्यातील म. सा. स. ग्रंथप्रदर्शन - २०१०

Submitted by हर्ट on 29 March, 2010 - 00:14

नंदनने सुचवल्याप्रमाणे मी इथे हा बीबी उघडत आहे जेणेकरुन त्या बीबीवर भेट न देत असलेली मंडळी चटकन इथे येऊन लिहितील.

मराठी साहित्य संमेलन, ग्रंथप्रदर्शन -२ ०१०, पुणे इथे अजून पुस्तकांची विक्री सुरु आहे का? कुणीकुणी भेट दिली? कुठली पुस्तके विकत घेतलीत? नवीन पुस्तके कुठली घेतली? नवीन काय काय होते.. हे सर्व लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणीतरी मेघना पेठेंची (आपण नाही साला तुझी बायको होणार...) ही कविता कुठल्या पुस्तकात आहे ते सांगेल का? माहीत असेल तर.. Happy

मीनू, मेघना पेठेंची ही कविता यंदाच्या शब्दच्या दिवाळी अंकात आहे. येत्या वीकान्तामध्ये मी टंकीन ती इथे, कुणी तोवर नाही टंकली तर.

मी सतत ग्रंथप्रदर्शनात फिरत असतो. त्यामुले कुथले पुस्तक मला नवे वाटत नाही. मित्राचा स्टॉल होता त्याने अनेकदा फोन करून बोलावले. त्याला विचारले 'बाराला दहा कमी' हे पुस्तक असेल कुठे तरच ते खरेदीला येतो. त्यालाही सापडले नाही. हे पुस्तक आउट ऑफ प्रिन्ट आहे का? अणुस्पर्धेवर आहे.

'बाराला दहा कमी' राजहंस प्रकाशनाचं आहे. टोणग्या, तुला खरोखर हवं असेल, तर मी देऊ शकेन. कार्यालयात काही प्रती आहेत. एक-दोन दिवसांत सांगतो.

म्हणजे बघा एवढे ज्ञात आणि अज्ञात लोक पुस्तक मागत आहेत पण आवृत्ती काढण्याची वृत्ती नाही. लेखकाना 'झोपवण्याचा' पुणेरी फंडा...

रैना, "समग्र एलकुंचवार" मध्ये त्यांची कोणती नाटके आहेत? माझ्या कडे "गार्बो आणि रुद्रवर्षा " सोडल्यास सगळी आहेत,

नंदा खरेंची पुस्तके मला कशी मिळू शकतील?

मेघना: टाक नं please ती कविता, वेळ झाला की.

माधव आचवलांच्या पुस्तकाची यादी मला कुठे मिळू शकेल? माझ्याकडे फ़क्त किमया आहे आणि "भिंत" कधीतरी वाचलेलं आहे. त्यांच "जास्वन्द" नावाचं पण एक पुस्तक आहे नं?

तसेच देवीदास बागूल ह्यांची पुस्तके कुणी वाचली आहेत का? कशी आहेत? माझ्याकडे त्यांचं "माझी छायाचित्रकला" आहे आणि ते वाचलं तेव्हा तरी interesting वाटलं होतं.

माधव आचवलांच्या पुस्तकांची यादी

किमया - स्थापत्य या विषयावरील ललित
पत्र - माहितीपर पुस्तक ( बहुतेक )
जास्वंद - काहीशी समीक्षा तर काहीसे व्यक्तीचित्रण
डार्करूम - नाट्य
युगांत - नाट्य

नंदा खरेंच्या पुस्तकांची यादी

नांगरल्याविण भुई -- ललित
संप्रती -- कांदबरी
अंताजीची बखर -- कांदबरी
दगडावर दगड विटेवर विट -- कथा संग्रह
जीवोत्पती आणि नंतर -- माहितीपर

आपण नाही साला तुझी बायको होणार -- ही कविता आहे माझ्याकडे. स्वत: मेघना पेठेंनी पाठवली आहे. नंतर वेळ होताचं लिहितो इथे. बरीच लांबलचक आहे.

अरे ती कविता इथे टाकल्याने काही कॉपिराइटचे प्रश्न निर्माण होऊ शकतील असं कळलं आहे. तेव्हा इथे न टाकलेली बरी.

मंडळी, ही मेघना पेठेंची कविता. कॉपीराइट्सचा काही घोळ होत असल्यास उडवा:

मी नाही साला तुझी बायको होणार..

झाले तुझी बायको तर काय म्हणशील?
काढ कपडे, ढाळ चवर्‍या, हो माझी चिअर लीडर?
हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट
चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर
मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर
तेव्हा तू कुठे स्टेड्यमातपण नसणार..
मी नाही साला तुझी बायको होणार.

काय म्हणतोस, मी तुझी शिडी?
जमनीत पाय रोवून उभी राहणार?
आणि नुस्ता काय तू वरवर चढणार?
तू इंद्रधनुष्य रापणार आकाशातलं
नि मी आढ्यावरची वटवाघळं मोजणार?
हे नाही गड्या जमणार..
मी नाही साला तुझी बायको होणार!

काय म्हणालास, मी ’वाटबघी’?
भास्कर्रावची वसुंधरा?
सोड यार डोळे उघड,
आकाशगंगेत सूर्य रग्गड
आईस्शत, या छोट्याश्या आयुष्यात
ओसाडावरच्या आभाळात तं तश्श्यात
पण माझी मीच च्यांदनी होऊन चमचमणार
तुझी बायको?
साला मी नाही होणार..

काय बोललास,
तू जेवणार, आणि मी ’वाराघालू’?
तू झोपणार, आणि मी ’गोट्यातोलू’?
काय म्हणालास,
तू नांगरणार, नि मी ’भाकरभाजू’?
तू लढणार नि मी ’भांडीघासू’?
तू टपाटप्‌ घोड्यावरून येणार,
माझी तासंतासांची रांगोळी
खुशाल खुराखाली घेणार..
तुझ्या सोयीचा हा मामला
पण मी हळूहळू नाही बोंबलणार!
छे:
साला.. मी.. नाही.. तुझी.. बायको.. होणार!!

मी पाहिलेत ना तुझे आज्जी-आजोबा आणि माझे,
आत्या-आत्तोबा, मावश्या-मावसोबा,
काका-काकवा, मामा-माम्या,

बहिणी-मेव्हणे नि भाऊ-वहिन्या,
कुटुंबसंस्थेची थोर मदार ज्यांच्या खांद्याला
आई अन्‌ बाबा.. तुझे आणि माझे
जाऊं दे साला, ज्याचं त्याला आणि गाढव ओझ्याला..
गंडवागंडवी, फसवाफसवी, लपवाछपवी, चकवाचकवी..
त्याच्यापेक्षा आपुन बरे की ’आपला काम’ काम बरा असणार
मी? बायको? तुझी? नाही होणार..

काय म्हणतोस,
"तिज्यायला, चर्चा करून का कुठं पोरं होतात?
एक दिवस आई व्हायचंच की गं तुला.."
हो तर! आई व्हायचंच की मला..
पण त्यासाठी बा झवला, तुझीच पोरं रे कशाला?
तुझ्यासारखीच व्हायला?
एक सांग मला,
कुंभाराची का नकोत, चांभाराची का नकोत?
म्हारा-बामणाची, परभ्या-पाटलाची
पारशा-किरिस्तावाची, जैना-मुसलमानाची
का नकोत?
हो तर..
कोण बरा बाप भेटला माझ्या पोरासाठी,
तर आई व्हायचंयच की मला..
पण कोण बरा नि कोण बुरा ते मी ठरवणार
आणि आईच्यान्‌ सांगते,
सगळ्या जगाची भले झाले आई..
तरी तुझी बायको? नाही होणार!

खूप खूप वर्षांपूर्वी..
जेव्हा कापूसही नव्हता नि कापडही
फक्त आंगभर केस होते
पुढल्या पायांचे हात होताना
कणा अजून ताठ व्हायचा होता
सूर होता पण गाणी नव्हती
धातू असेल पण नाणी नव्हती
अजून जेव्हा जमवाजमव सुरू झाली नव्हती..

तेव्हा कुठे रे होते
हे उच्च रवातले कज्जे तंटे?
ह्या स्पर्धा, ही ईर्ष्या, हे राजकारण
हा कमी जास्तीचा विचार, वर-खालीचा
हे नवरा-बायको प्रकरण..
फुकटचा झोल विनाकारण

तेव्हा होते फक्त आग, आकाश, वारा, आभाळ
वाहतं पाणी आणि बदलते ऋतू रानोमाळ
तेव्हा होतं फक्त जंदणं आणि मरणं
तेव्हा होतं फक्त जगणं आणि मरणं
नव्हता शिकारीचा गर्व, नव्हता वेणांचा अभिमान
फक्त असण्याला सलाम, फक्त असण्याला रामराम

जन्म देताना वा जीव जाताना मी गुहेत.. एकटी
जीव घेताना वा जीव जाताना तू रानात.. एकटा
असं असणार हे मान्य होतं.
नो ऑब्जेक्शन, नो अटिट्यूड्स
फुकट फाटक्या ’दुकट्या’ झुली पांघरत नव्हतो..
..जशा आज पांघरतो
नि आणखीच उघडे पडतो..

चल ना जाऊ पुन्हा त्या रानातल्या गुहेत
आपण तिथेच की रे बरे होतो..

मेघना पेठे
शब्द
दीपोत्सव २००९

रैना, नुसतं मेघना म्हणालीस तरी चालेल. आणि धन्यवाद कसले!
मला ही कविता खूप नाही आवडली पण. आक्रस्ताळी वाटली. तिनं संपादित केलेला मागचा 'शब्द'चा अंक इतका तालेवार होता, की त्या तुलनेत कविता खूपच लाउड वाटली. कदाचित पुढेमागे काही संदर्भ असते, तर नसतीही वाटली... पण.. असो!

लाऊड आणि Rabid तर त्यांच अलिकडंच सगळंच लिखाण वाटत- आंधळ्यांच्या गायी सोडलं तर.
अगं पेठ्यांशी confuse होईल म्हणुन पूर्ण नाव लिहीलं तुझं. Happy

मेघना पेठेंचं लिखाण लाऊड असतंच आणि त्यांचा मूळ स्वभावही बंडखोर आणि आक्रस्ताळा असावाच. (त्यांच्या आईकडे मी बारावीत असताना जर्मन शिकायला जायचे. तेव्हा त्या आई वडिलांच्या गप्पांतून थोडाफार स्वभाव कळला होता)

मंजू
हे पटलं नाही गं. कुठल्याही लेखकाचा/लेखिकेचा स्वभाव मूळ 'चांगला' वगैरे असावा असे वाटत नाही. याचं कारण म्हणजे अनेक मनोव्यापार मांडायला मुळात ते जाणवायला संवेदनशीलतेचे फ्रीक्वेंसी सेटींग वगैरेच वेगळं लागत असावं.काही प्रमाणात आत्ममग्न असणे तर आवश्यकच ना?.

आणि चांगला हे पण तसं सापेक्षच ना.
आपल्याला आक्रस्ताळं वाटणारं जर लिहिण्यार्‍यासाठी प्रामाणिक असेल तर आपण त्याला आक्रस्ताळं म्हणत निगेटिव्ह च्या डब्यात ढकलणं कितपत योग्य आहे?

हा मला खरंच पडलेला प्रश्न आहे. बरेच दिवस विचार करतेय यावर.

छान कविता आहे. मला "लाऊड" वाटली नाही. उलट काही काही शब्दरचना या प्रामाणिक आणि गरजेच्या वाटल्या.

एखाद्याचा "मूळ स्वभाव" आणि साहित्यातून त्याचा दिसणारा "स्वभाव" यामधे काय समानता अथवा फरक असतो हा मला पडलेला प्रश्न आहे.

अगं रैना, मी मेघना पेठेंना प्रत्यक्ष भेटले-बोललेले नाहीये. तिच्या लिखाणातून ती जशी व्यक्त होते तसाच तिचा स्वभाव 'असावा' एवढंच मला म्हणायचं होतं. बाकी स्वभाव 'चांगला' 'वाईट' असणं हे व्यक्ती सापेक्ष असतं. मला एखाद्याचा स्वभाव आक्रस्ताळा वाटला तरी दुसरा कोणी त्याला मनस्वीपणाचं लेबल लावू शकेल. बाकी नंदिनीचाच प्रश्न मलाही पडतो नेहमी.

मला आवडली. आक्रस्ताळी वाटली नाही. Happy धन्यवाद मेघना. खरं म्हणजे हेच सगळे मुद्दे आपण सभ्य भाषेत मांडत असतोच. इथे फक्त जास्त प्रखर रॉ शब्दात मांडलंय पण मुद्दे तेच आहेत की ...

मीनू, कविता मला निव्वळ भाषेमुळे नाही आक्रस्ताळी वाटली. पण पुरुषाची बायको होण्यामागे बाईचे, किंवा पुरुषाचेही, काय इतकेच हेतू असतात? निदान सुरुवात करताना तरी सिन्सियरली, चांगल्या हेतूनं करत असतात की लोक. पुढे काय होतं ते व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष. पण इथे, निव्वळ एक नकारात्मक बाजू तेवढी रंगवलीय असं वाटलं. आणि कुठल्याही गोष्टीची एकच एक बाजू रंगवली, की गोष्ट आपोआप आक्रस्ताळी / एकांगी वाटते, तसं झालं.
'हंस अकेला' किंवा 'आंधळ्याच्या गायी' किंवा फॉर दॅट मॅटर काही प्रमाणात 'नातिचरामि'तही सगळ्या पात्रांना काळ्या-पांढर्‍याच्या मधल्या ग्रे छटा आहेत. तसं या कवितेत नाही जाणवलं. कदाचित हा फॉर्मचाही दोष असेल. पण मग असा लटका फॉर्म निवडतानाच कविता मुळात गंडलीय, असंही वाटलं.

Pages