पालवी

Submitted by ललिता-प्रीति on 3 April, 2010 - 01:21

आमच्या घराच्या खिडकीतून हे असं दृष्य दिसतं.

DSC01318.JPG

वसंत ऋतू काय आला आणि बघता बघता हे चित्र पालटलं.

DSC01358.JPG

पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांच्या टोकावर एक निराळीच लगबग सुरू झाली.

DSC01348.JPGDSC01352.JPGDSC01356.JPGDSC01357.JPG

आणि एक दिवस सकाळी सकाळी या कोवळ्या आश्चर्याच्या निरनिराळ्या आविष्कारांनी स्वतःच्या उपस्थितीची मला दखल घ्यायला लावली.

DSC01316.JPGDSC01350.JPG

... आणि मग मला दर तासा-दोन तासांनी ती दृष्य न्याहाळण्याचा नादच लागला.

DSC01324.JPGDSC01347.JPG

निसर्ग हळू हळू कात टाकू लागला.

DSC01343.JPG

ताजी, लुसलुशीत, कोवळी, मऊशार पानं! जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं! त्यांच्या लीला बघाव्या तितक्या थोड्या!

DSC01345.JPGDSC01342.JPG

मानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्साहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय.

DSC01355.JPGDSC01346.JPG

या सुरूवातीच्या टप्प्यात वसंतातल्या उन्हाच्या रूपातलं मऊमऊ भाताचं मंमं या बाळांना पुरेसं आहे. पण जसजशी ती मोठी होतील, त्यांचं विश्व विस्तारेल तसतशी त्यांची भूक वाढेल. ते पावसाची वाट बघायला लागतील.
ते जेवण त्यांना हवं तितकं, हवं तेवढं... पुनःपुन्हा, वर्षानुवर्षं... आपण पुरवू शकू??
जरा विचार करा.

गुलमोहर: 

मस्तच लले. Happy
चर्चगेट ते नरिमन पॉईंट चालताना रोज असे कितीतरी पिंपळ दिसतात. माझा अगदी आवडता उद्योग आहे हा. केवढ्या निरनिराळ्या शेड्स असतात. पानगळ सुरू झाली कि उघडं बोडकं दिसणारं झाड ,एक दिवस अचानकच चमकायला लागतं. मस्त दिसतं ना? मी अगदी रोज बघते. Happy

मंजे Lol यंदा नवर्‍याकडून वाढदिवसाचं काही उकळलेलं दिसत नाहीय. Wink

पानगळ सुरू झाली कि उघडं बोडकं दिसणारं झाड ,एक दिवस अचानकच चमकायला लागतं. >>> Happy माझंही अगदी हेच, असंच निरिक्षण होतं.

Pages