स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

माझ्या एका ओळखीच्या घरात कुठलाही ग्रुप फोटो काढायचा असेल तर त्यात घरातल्या स्त्रीयांनी खुर्च्यांवर बसायचं नाही, मागे उभेच राहायचं असा नियम होता..... हा कसला जाचक नियम??? फोटोत घेतोय म्हणजे उपकारच करतोय हे भाव आणि चेहेर्‍यावर.......

बरेच दिवस वाचतोय... त्यातुन एकच (साधी) गोष्ट कळली... रुढी आणि परंपरा या नावाखाली कुणावरही (स्त्री-पुरुष) कुठल्याही गोष्टीची सक्ती करु नये.. ज्याला त्याला पटलं तसं तो करेल. यात अजुन भर पडेल असं वाटत नाही. त्यामुळे पोचपावती द्यावी म्हणुन ही पोस्ट...

>> सूनान्चा छळवाद असा बीबी नाहीये! ... शिवाय तो विषय अनादि-अनंत असा आहे.
अनादि-अनंत आहे??... मग चर्चा करुन काय उपयोग?
>> तिथेही पुरुष मंडळी येउन सुनांचा नव्हे तर जावयाचा"च" छ्ळवाद कसा होतो हे prove ...
असं कोणी म्हणालय? मुद्दाम विषय स्त्री वि. पुरुष असा करायचा हा (अजुन एक) प्रयत्न... पुरुषांना कमी दाखवल्याशिवाय स्त्रीया श्रेष्ठ ठरत नाहीत बहुतेक...

जाउदे...

साधी गोष्ट आहे... आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती होती. ते चुकिचं होतं, त्याने स्त्रीयांवर अन्याय झाला, हे सगळं मान्य. पण 'होती' हे बदलता येइल का? आत्ताची परिस्थिती हा त्याचाच परिणाम आहे. तसे पाहिले तर पुरुषांवरही परंपरा-रुढी यांचा पगडा होता, अर्थात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुषांवरच्या जाचाचे प्रमाण (बायकांच्या जाचाच्या तुलनेत) अल्प होते. त्यात कालाप्रमाणे बदल झाला. पुरषांवरच्या जाचक रुढी सोडणं (पुरुषांना) सोप्प होतं (पुन्हा कारण, पुरुषप्रधान संस्कृती), पण स्त्रीयांवरच्या जाचक रुढी सुटायला वेळ लागला कारण मागच्या पिढितील स्त्रियांचा (आणि काही पुरषांचाही) विरोध.

पण हळुहळु बदल होत आहेत. इथल्या बर्‍याच स्त्रीयांना (नानबा... किती टक्के? विसरलो Happy ) या जाचाची कल्पना आलिये, अर्थातच त्यांच्या पुढच्या पिढित 'यातला' कुठलाच जाच नसणार / नसावा. (पुढच्या पिढितल्या स्त्रियां मायबोलीवर याच विषयावर काय लिहितील?!! Light 1 )

पुढच्या पिढितल्या स्त्रियां मायबोलीवर याच विषयावर काय लिहितील?!! >>>>>>

सॅम, या प्रकारचा नविन बाफ उघडायला हरकत नाही. पुढच्या पिढीतल्या स्त्रिया कदाचित वेगळ्या काही प्रथा जाचक आहे असं सांगतील, पण पुढच्याच काय, त्याच्या पुढच्या अनेक पिढीचे पुरुष मात्र आत्ताचे पुरुष जे बोलतायत तेच बोलताना दिसतील, यात मला काडीमात्र शंका नाहीये Proud

सॅम, मुळात जोवर
१. सक्ती जाचक आहे
२. सक्ती झुगारून दिलेली बाई ही कुणीही कसलेही अपमानास्पद प्रश्न व टोमणे(उदा: एकाच पुरूषाशी लग्न का करता? लग्न केलंतच कशाला? तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याचे बांडगुळ इत्यादी) यांची धनी होते ते योग्य नव्हे.
३. मुळात 'पुरूषधार्जिणी संस्कृती व वृत्ती' आणि 'स्त्रिया' यांच्यातला हा लढा आहे. पुरूष विरूद्ध स्त्रिया असा नाही.
४. स्त्रियांवरच्या जाचक बंधनांबद्दल बोलताना पुरूषांवर पण आहेत बंधने हे स्त्रियांवरच्या जाचक बंधनांचे समर्थन होऊ शकत नाही.

या गोष्टी काही पालथ्या घड्यांच्या डोक्यात शिरत नाहीत तोवर हेच होणार.

>>>> तिथेही पुरुष मंडळी येउन सुनांचा नव्हे तर जावयाचा"च" छ्ळवाद कसा होतो हे prove ...
असं कोणी म्हणालय? मुद्दाम विषय स्त्री वि. पुरुष असा करायचा हा (अजुन एक) प्रयत्न... पुरुषांना कमी दाखवल्याशिवाय स्त्रीया श्रेष्ठ ठरत नाहीत बहुतेक.>><<
याचे ४ हे उत्तर ठरावे. याच क्रमात हे दरवेळेला घडल्याने हे जे कोणीतरी म्हणलंय ते म्हणलंय.

>>या जाचाची कल्पना आलिये, अर्थातच त्यांच्या पुढच्या पिढित 'यातला' कुठलाच जाच नसणार / नसावा.<<
आमच्या मागच्या पिढीला आली होती कल्पना त्यामुळे आम्हाला वैयक्तिकरित्या जाच नाही. पण आमच्या पिढीतल्या अनेकींना ही कल्पना अजून शिवलेली नाही त्यांच्या पुढच्या पिढीचं काय?

women-s-equality-day.gif

सॅम,
>> सूनान्चा छळवाद असा बीबी नाहीये! ... शिवाय तो विषय अनादि-अनंत असा आहे.
अनादि-अनंत आहे??... मग चर्चा करुन काय उपयोग?
-- मी ही तेच म्हणतेय ना..तसा बीबी उघडून चर्चा करायचा सल्ला लिम्बुटिम्बु यांचा होता, माझा नव्हे!! पुर्ण पोस्ट वाचा.

>> तिथेही पुरुष मंडळी येउन सुनांचा नव्हे तर जावयाचा"च" छ्ळवाद कसा होतो हे prove ...
असं कोणी म्हणालय? मुद्दाम विषय स्त्री वि. पुरुष असा करायचा हा (अजुन एक) प्रयत्न... पुरुषांना कमी दाखवल्याशिवाय स्त्रीया श्रेष्ठ ठरत नाहीत बहुतेक...
--- कोणी कशाला म्हणेल? मी च म्हणते ना.. हे वाक्य या बीबी वर बहुसन्ख्य पुरुषांनी लिहिलेल्या प्रतिक्रिया बघता अगदी समर्पक आहे. शिवाय ते एका smily सह टाकले अस्ल्याने argument म्हणून घेऊ नये अशी अपेक्षा होती. उलट "स्त्री वि. पुरुष असा करायचा हा (अजुन एक) प्रयत्न" असे स्वरुप त्याला देऊन तुम्हीच त्या मूळ विषयाची वाट लावलिये. वर विनाकारण "पुरुषांना कमी दाखवल्याशिवाय स्त्रीया श्रेष्ठ ठरत नाहीत बहुतेक..." असला तद्दन फालतू आणि बिनबुडाचा निष्कर्ष ही काढलात..वाह वाह!!
नीधप ने ही कारण दिले आहेच.

आता तुम्ही विषय चालु केला आहेच तर, अजुन थोडे मुद्दे माझ्याकडूनः
आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती होती. ते चुकिचं होतं,>>>
आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती होती नव्हे, आहे.
ते चुक आणि स्त्रीप्रधान संस्कृती बरोबर असे मी मानत नाही. माझ्या आधीच्या काही पोस्ट मध्ये ही मी म्हट्ले आहे, मला equality हा मुद्दा पटतो.
equalism आपल्या समाजात रुळण्यासाठी मला पटत असलेले कही उपायः
१. लग्ना नंतर मुलीने सासरी जाणे याऐवजी मुला-मुली ने दोघान्नीही आपापल्या घरातून बाहेर पडून स्वतःचा (स्वतःच्या हिमतिवर, पैशावर आणि प्रेमावर आधरित) संसार सुरु करावा. त्यावर दोघांच्याही घरच्याना समान मान आणि प्रेम मिळावे. परंतु त्या घरावर दोन्हिकड्च्या पालकांनी हक्क समजू नये. (जसे म्हातारपणी मुलीच्या घरी राहू असा विचार generally आई-वडील करत नाहीत, तसा मुलाच्याही पालकांनी करु नये.) जेव्हा पालकांना/भाऊबहिणीला कुठलीही गरज भासेल तेव्हा मुला-मुलीने दोन्हीकड्च्या पालकांचे/भाऊबहिणींचे प्रेमाने करावे.
यामुळे कोणावर ही सक्ती होणार नाही. शिवाय "मुलगी आज ना उद्या सासरीच जाणार, मुलगा म्हणजे"च" म्हातारपणाची काठी" वगैरे समजुतीतून आपला समाज मुक्त होइल व मुलगा मुलगी असा भेदभाव होणे कमी होइल.
२. मुलीलाही उद्या तिचा संसार चालवायचाय तेव्हा मुलांप्रमाणेच तिला financially independant बनवणे. नंतर नोकरी करायची का नाही वगैरे ती व तिचा नवरा ठरवेल त्यांच्या परिस्थितीनुसार व आवडीनुसार. जर मुलाला घर सांभाळणे आवडत असेल तर त्याने नोकरीवाली मुलगी शोधावी व तिला आधीच सांगावे. तिला हे पटत असेल तर असे लग्न ही यशस्वी होउ शकते. मात्र वर दिलेला मुद्दा क्र.१ जर पाळला गेला तर च हे होणे शक्य आहे.
३. लहानपणा पासून हे काम मुलीचे, ते मुलाचे असे त्यांच्या मनावर बिम्बवू नये. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार करु द्यावे. मात्र काही कामे (स्वयंपाक, bank ची कामे, भाजी-किराणा, electrical appliances वापर्ण्याचे basic knowledge) हे दोघांनाही शिकवावे, जेणेकरुन त्या मुला/मुली ला पुढच्या आयुश्यात काही अड्णार नाही.

माझे विचार आहेत, सगळ्यांना पट्तील असे नाही. पण त्यावरून मी पुरुषविरोधी असल्याचा निष्कर्ष काढु नये.

>>>>> २. सक्ती झुगारून दिलेली बाई ही कुणीही कसलेही अपमानास्पद प्रश्न व टोमणे(उदा: एकाच पुरूषाशी लग्न का करता? लग्न केलंतच कशाला? तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याचे बांडगुळ इत्यादी) यांची धनी होते ते योग्य नव्हे.<<<<<<
पुरुषाचे बाबतीत हे प्रश्न विचारले जात नाहीत असे वाटते? तस वाटत असेल तर अनुभवविश्व वाढवुन घ्या म्हणलं.
बाकी तुम्च चालूद्यात, आमचे घडे पालथे आहेत तेच बरय!

अरुन्धती, नेमके मुद्दे, प्रमाण टक्केवारीत (?) कमी होत चाललय, पण अजुन भरपुर करण्ञासारख आहे याबाबत!

>>पुरुषाचे बाबतीत हे प्रश्न विचारले जात नाहीत असे वाटते? <<
म्हणून बाईच्या बाबतीत ते होणे समर्थनीय कसे काय ठरते?

>>अनुभवविश्व वाढवुन घ्या म्हणलं.<<
same to you!

>>>> >>अनुभवविश्व वाढवुन घ्या म्हणलं.<<
same to you!<<<<<
[थ्री इडीयट मोड ऑन]
तर मग ठिके, तू म्हणतेस तस अजुन दहा वर्षान्नी अनुभवविश्व वाढवुन भेटूच आपण, इथेच, याच जागी
तारीख तू कोरलेली आहेसच, ३० मार्च! लक्षात ठेविन मी! Rofl
[थ्री इडीयट मोड ऑफ]

तर मग ठिके, तू म्हणतेस तस अजुन दहा वर्षान्नी अनुभवविश्व वाढवुन भेटूच आपण, इथेच, याच जागी
तारीख तू कोरलेली आहेसच, ३० मार्च! लक्षात ठेविन मी!<<
सिरीयसली... नॉट इंटरेस्टेड!

ओक्के Happy तुझी मर्जी!
बर ते जाऊदे, पुपुवरली ही पोस्ट इकडे डकवतो, तथ्य वाटल तर भाष्य करा त्यावर

********************
>>>>> आमचं भूतही असलंच आहे. (बाबावर गेलंय :फिदीफिदी: )<<<<
आयला, हा मुद्दा राहूनच गेलाय, जाचातून! सान्गु का तिकडे? :डोमा;
काय पोर्गा पोर्गी काय होईल ते, शिन्चे सगळे बापावर तरी गेलेलेत अस म्हणतात नाय तर मागली पितर हुडकुन हुडकुन काढून गचकलेल्या आज्जी/आजोबा/काका/आत्या यावर गेलेत अस म्हणतात! अन् हे म्हणताता पोराच आजोळ बर आठवत नाही? :फिदीफिदी:
कुणीतरी घ्याच हा मुद्दाही तिकडे!
********************

मंजिरी सोमण : तुम्हाला काही सजेशन्स.. !!
फोटोत बसू देत नसतील तरः
१. बसलेल्या पुरुषांच्या समोर जाऊन उभे रहा.. म्हणजे ते पुरुष फोटोत दिसणारच नाहित.
२. फोटोग्राफर फोटो काढायला लागला की पळत जाऊन्/उड्या मारून बसलेल्या पुरुषांच्या मांडीवर बसा.
३. फोटोग्राफर फोटो काढायला लागला की पुढे बसलेल्या पुरुषांच्या टपलीत मारा म्हणजे ते वळून मागे बघतील आणि त्यांचे फोटो विनोदी येतील.
४. बसलेल्या पुरुषांना मागून शेंड्या लावा.
५. मागे उभी राहून चकणे डोळे, वेडीवाकडी तोंड, जिभ बाहेर काढणे, बसलेल्या पुरुषांचे चेहेरे हाताने झाकणे ह्यापैकी काहितरि करा.. म्हणजे ते पुरुष वैतागुन पुढच्या वेळी बसायला देतील..
.
.
.
.

काहितरी मुद्दे काढून दळत बसायचं.. !!!!! Uhoh

... Happy

धन्यवाद दक्षिणा!
मला वाटले की या मुद्द्यांवर तरी काही constructive चर्चा होईल,पण.... जाऊ दे Sad
पराग,
हाहाहा..पण जरा गंभीर चर्चेत भाग घेतलात तर कसे?
मंजिरी,
फोटो वगैरे मला तरी काही जाचक वाटत नाहीये..उगाच काहीतरी मुद्दे काढून वाद घालण्याने आपले बरेचसे चांगले मुद्दे नजरेआड केल्या जाताहेत!
असो, ही सगळी माझी मते..पटणे आवश्यक नाहीच.

<< काय पोर्गा पोर्गी काय होईल ते, शिन्चे सगळे बापावर तरी गेलेलेत अस म्हणतात >> पोरगं चांगले असेल / निघाले तर बापावर गेलेय म्हण्तात. काही प्रॉब्लेम असेल / बिघडले असेल तर मात्र आईच्या घराण्याचाच उद्धार होतो Wink Light 1
------------------------------------------------

प्रत्येक स्त्री कडे स्वतःचे कायदेशीर हक्काचे घर असले पाहिजे ( ते तिने स्वतः मिळवावे किंवा आईवडीलांच्या मदतिने ) अशी एक नविन प्रथा पडावी असे मला मनापसुन वाटते.

मला खुपदा असे वाटते की चीन प्रमाणेच फक्त १का मुलाची सक्ती केली तर बहुतेक स्त्रियांची परवड थांबेल का ? म्हण्जे आईवडिल त्या १काच मुलीची व्यवस्थित काळजी घेतिलच शिवाय तिला तिचे स्वतःचे असे हक्काचे एक घर मिळेल जिथुन तिला कोणीही हाकलवुन लावु शकणार नाही. तसेच सध्याच्या घरांच्या कीमती बघता त्या १का मुलाला किंवा मुलीला सुरक्षित भविष्य मिळु शकेल. (देशालाही फायदा होइल Happy )
(यावरुन १ मुल हवे की २ हा वाद इथे नको , तो दुसर्‍या बीबी वर सुरु आहे)

यासाठी स्त्री-पुरुष समानता सामाजिकदृष्ट्या गरजेची आहे. ते म्हण्जे स्त्रियांनी देखिल त्यांच्या आईवडिलांची शेवटपर्यंत देख भाल केली पाहिजे. आणि मानसिक , अर्थिक , शारिरीक सर्व मदत आईवडिलांना केली पाहिजे. हे त्यांच्या सासरच्यांना देखिल मान्य व्हावे.

अर्थात स्त्रियांच्या या ( आर्थिक आणि मानसिक ) सबली करणाबरोबर पुरुषांची आणि त्यांच्या आईवडीलांची मानसिकता बदलणे ही खुप गरजेचे आहे. नाहीतर सध्या सगळीकडे वाचायला मिळतेय त्याप्रमाणे अशा मुली लग्नाच्या निर्णयात तड्जोड करत नाहीत , मुलिंच्या डोक्यात हवा गेलिये , यामुळे आमची कुटुम्बसंस्था धोक्यात येतेय असे वाद सुरु होतील.

नाहीतर सध्या सगळीकडे वाचायला मिळतेय त्याप्रमाणे अशा मुली लग्नाच्या निर्णयात तड्जोड करत नाहीत , मुलिंच्या डोक्यात हवा गेलिये , यामुळे आमची कुटुम्बसंस्था धोक्यात येतेय असे वाद सुरु होतील.<<
मेख इथेच गं...
मुलींनी काय करावं न करावं यावर त्यांची कुटुंबसंस्था धोक्यात येते. मुलीचं कुटुंब नसतं कधी. ती केवळ टूल...
लग्न होऊन २० वर्ष जुनी झाली बाई तरी 'आमच्या' घरात असं असतं तसं असतं हे तिला ऐकवलंच जातं सिनियर बाया आणि ज्युनियर वा सिनियर बाप्यांकडून. माहेरी ती पाहुणी असतेच.

तुझं म्हणणं पटलं. एक घर बाईला स्वतःचं हक्काचं हवं जिथे ती पाहुणी नसेल आणि सूनही नसेल.

हे घर माहेरच्या माणसाबरोबर जॉइन्टली नोन्दवले पाहिजे अन्यथा नवरे घर धाक दाअखवून स्वतःच्या नावावर करून घेतील. अर्थात एक घर घेता घेता हाल तर अशी माणसागनिक घरे कशी घ्यावीत? काही काही बाप स्वतःच शेवटपर्यन्त भाड्याच्या घरात राहतात....

अरुधती यांनी मांडलेली चारही मुद्दे मला महत्वाचे वाटतात.

हुंडा प्रथाच चिड आणणारी आहे. कायदे झालेत मग वरदक्षिणा म्हणायला लागले. काही लोकं "आम्ही काहीच मागत नाही, तुमची मुलगी आहे तुम्हीच ठरवा काय द्यायचे ते" असा सावध पावित्रा घेतात. पण एक डोळा हा मुली सोबत किती पैसा/ सोने येते याच्यावर असतो.

काही घरात मुलिंना मिळत असलेली नोकरी करु दिले जात नाही, असलेली नोकरी सोडावी लागते. 'तुला कशाला हवी आहे नोकरी ? नवर्‍याचा चांगला पगार आहे, रहायला छानसं घर आहे, तु आपलं घर संभाळ' असा सुर असतो... नोकरीची जरुरी नसली तरी आर्थिक स्वावलंबनही तितकेच महत्वाचे असते. एक वय निघुन गेले की मग नोकरी मिळविणे जड होते. मुलिंनी आर्थिक स्वावलंबी बनण्याकडे पुर्ण जोर द्यावा... बर्‍याच प्रश्नांची दाहकता कमी होण्यास मदत होईल.

इथेच, याच जागी तारीख तू कोरलेली आहेसच, ३० मार्च! लक्षात ठेविन मी!<<
सिरीयसली... नॉट इंटरेस्टेड!

----लिम्बु राव त्या थ्री इडीयट मधे आव्हान (चॅलेंज) देणार्‍याची शेवटी पळता भुई थोडी Sad अशी अवस्था झाली होती... तुमचे तसे व्हायला नको.

>>>>> इथेच, याच जागी तारीख तू कोरलेली आहेसच, ३० मार्च! लक्षात ठेविन मी!<<
सिरीयसली... नॉट इंटरेस्टेड!

----लिम्बु राव त्या थ्री इडीयट मधे आव्हान (चॅलेंज) देणार्‍याची शेवटी पळता भुई थोडी अशी अवस्था झाली होती... तुमचे तसे व्हायला नको. <<<<<<<
उदयराव, सदिच्छेबद्दल धन्यवाद,
पण माझी पोस्ट पुन्हा वाचा अन पिक्चरही आठवा! कोरल कुणी होत ते! Wink
(आयला, लिम्ब्याच्या पोष्टी इतक्या वर वर वाचूच कसे शकता तुम्ही? इत्क्या साध्या क्षुल्लक वाटणार्‍या पण अतिमहत्वाच्या पॉईण्टकडे माझे दुर्लक्ष झाले असेल असे वाटलेच कसे तुम्हाला? पिक्चरमधे ५ सप्टेम्बर की कायसीसी तारीख भितीवर कोरली, कुणी ते आठवा! Proud अन वर ३०मार्च कुणी कोरली अस कोण म्हणलय? :खोखो:) अवघड आहे बुवा! आताशा मायबोलीवर विनोद देखिल समजावुन सान्गावे लागतात!

पराग,
तुमची सजेशन्स स्वागतार्ह आहेत...... पण ती तुम्ही चुकीच्या व्यक्तीला देताय. माझ्या घरात असं काही होत नाही पण मी पाहिलं आहे आणि त्याची सक्ती होताना ही पाहिली आहे आणि त्या स्त्रिया नाराजीचे सूर काढताना ही पाहिलं आहे. तुमची सजेशन्स मी त्यांना सांगून बघते, बघूया पटतंय का ते!

एक फूल,
हे उगाच काहीतरी आणि वेळ जात नाही म्हणून वाद घालायला काढलेले मुद्दे नाहियेत. त्या घरातल्या स्त्रियांच्या जागी स्वतःला इमॅजिन करा, ज्या पद्धतीने त्या नाराज असतात ते पाहिलंत की तुम्हाला कळेल की ते त्यांच्यासाठी जाचक आहे कारण ते फ्री स्टाईल नाहीये तर तो नियम केलेला आहे.

आताशा मायबोलीवर विनोद देखिल समजावुन सान्गावे लागतात>>>>>>

लिम्बु, बॉईज ना विनोद च नाही तर गंभीर मुद्दे पण समजावताना पालथ्या घड्यावर पाणी, रक्त आटवणे या सगळ्या म्हणी चांगल्याच परिचयाच्या झाल्या आहेत आम्हाला Proud

मंजिरी,
कुठ्ल्याही प्रकारची सक्ती जाचक असणारच.
तुम्ही वेळ जात नाही म्हणून वाद घालताय असे म्हणण्याचा उद्देश नव्हता. परन्तु तुम्ही सांगितलेला प्रसंग हा generalize करण्यासारखा नसल्याने त्यावर इथे चर्चा करण्याऐवजी त्या घरच्यांशी केलीत, तर तो ऩक्कीच सुटेल. मात्र इथे लिहिल्यामुळॅ तो सुटणार तर नाहीच पण टिन्गल होउन तुमच्याच इतर चांगल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते आहे, एवढेच सांगण्याचा हेतु होता.

एक फूल,
तसंही, इथे लिहिलेले कुठले प्रश्न आत्तापर्यंत सुटलेले आहेत? हा बाफ च जाचक ठरणार्‍या प्रथांविषयी आहे. इथे मांडलेले मुद्दे हे प्रत्येक घरात पहायला मिळतात असं नाहीचे ना, तरीही सांगितले जातात च, म्हणजे काय ते प्रश्न कायमचे सुटले असं होतच नाहीये. एखाद्या घरात तिथल्या स्त्रियांना जाचक वाटणार्‍या प्रथांमधे माझ्या मते फोटोचा मुद्दा बसतो म्हणून तो इथे मांडला आहे इतकंच.
राहता राहिला प्रश्न टिंगल होण्याचा तर जिथे काही उत्तर सापडत नाही तिथे टवाळी करून वेळ मारून नेण्याची खोड काही नविन नाहिये.

एक फूल- टिंगल होणारच. मुद्दे एकदा मान्य करायचेच नाहीत म्हणल्यावर टिंगलीशिवाय उरतं काय? Happy

मंजिरीला अनुमोदन.
पराग- ज्या घरात क्षुल्लक फोटोसाठी असा नियम लागु असेल तिथल्या स्त्रियांची इतर बाबतीतली कोंडी आपल्याला जाणवते का? सांस्कृतिक संकेत जरी म्हणलं तरी त्यामागची विचारसरणी काय असते?
उदा- जपानात सर्वात ज्युनियर व्यक्तिने एलिवेटर ऑपरेट करावा वगैरेचे नियम आहेत. तरूण पिढीला त्या जाचक प्रथा वाटल्या तर त्यात चुक काय? एवढी हौस आहे तर लिफ्ट लिफ्ट खेळा किंवा जिने चढुन जा असे आपण म्हणु शकतो का?

Pages