निमंत्रण

Submitted by क्रांति on 25 March, 2010 - 23:43

हिरकणीला स्वर्णकोंदण
चैत्रबहराचे निमंत्रण

या मनी डोकावला तो
एक क्षणभर थांबला तो
आणि हसुनी बोलला तो
"घे तुला आभाळ आंदण!"

उमलल्या चैतन्यवेली
अमृताने बाग न्हाली
बहरली वेडी अबोली
अंगणी प्राजक्तशिंपण

लाभल्या दाही दिशाही
घ्यायचे उरले न काही
तो तरीही देत राही
स्फूर्तिचे सौभाग्यगोंदण

भाव मनिचे व्यक्त झाले
मी ऋणातुन मुक्त झाले
धन्य झाले, तृप्त झाले
लेवुनी हे सृजनकंकण

गुलमोहर: 

चैतन्यवेली, प्राजक्तशिंपण, सौभाग्यकोंदण, सृजनकंकण छान शब्द. अगदी सहज आल्यासारखे वाटताहेत्...मुद्दाम घडवल्यासारखे नाही.
दुवा बहार कि मांगी तो इतने फूल खिले
कहीं जगह न रही मेरे आशियाने को

या मनी डोकावला तो
एक क्षणभर थांबला तो
आणि हसुनी बोलला तो
"घे तुला आभाळ आंदण!"

क्या बात है क्रांति ! जियो !

आई गं.......!! कसली गोड कविता आहे !!
भरत तुला खूप सारे मोदक.......फार गोड शब्द आहेत सगळे.