आक्षेप - शेवट सुचवा

Submitted by एस अजित on 25 March, 2010 - 11:10

'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.

तो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.

बी.ए. च्या दुसर्‍या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्‍याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.

पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.

मी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.

तसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.

आईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय ? आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.

त्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे ? आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून ? आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.

दोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.

संपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय? थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो? शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.

माझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्‍या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्‍या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.

आपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या सोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.

मग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का? आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.

मी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात? ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता? मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्‍या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.

माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.

मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'

या कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.

१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.

२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.

३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.

मित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.

गुलमोहर: 

बाबाच मुलीला पत्र
बेटा,
आपल्या आईनी तुला एक पत्र लिहिलच आहे पण तिला अज्जिबात म्हणून अज्जिबात परवानगी देउ नकोस. किती वर्ष झाली मी तिच्या समोर इतका त्यागी पणाचा, समजुतदारपणाच आव आणतोय पण ती त्या तिच्या मुर्खाला विसरायला तयारच नाहिये. कॉलेजात लागल्यापासुन माझा तिच्यावर डोळा होता. हिला कधी कळणार आहे कि मी ते सगळ घडवुन आणल होत. कि एकदा जाउनच येउदे?? नाहितरी तो गद्धा हिच्या साठी काय थांबलाय काय? नंतर तरी ती माझी होइल का?
माझ मन मी तुझ्यापुढे उघड करतोय बेटा...

-आपले बाबा..

हा घ्या अजुन एक...

आई मुलीला म्हणत्येय...

तुझे बाबा आणि मी आता एक नविन अ‍ॅड्व्हेंचर करणार आहोत. माझ्या 'त्या' ला आपल्याच घरी बोलवणार आहोत. नाहीतरी आता तो एकटाच आहे. आम्ही तिघे एकाच घरात राहु. पुर्वीसारखे हसत खेळत.

आणि मलाही चॉईस रहिल... कधी सोज्वळ नारी बनायचे असेल तर बाबां बरोबर साडी, मंगळ्सुत्र, कुंकु लावुन जाईन आणि कधी क्लब ला जायचे तर त्याच्याबरोबर जीन टीशर्ट... व्हरायटी का जमाना है Happy

शिवाय एकाच घरात एकत्र रहाण्याचे कित्ती कित्ती फायदे. म्हंटल तर लग्न झालय - बाबांशी, म्हंटल तर लिव्ह इन रिलेशनशिप 'त्याच्या'शी.... मी झाले की नाही एकविसाव्या शतकातली मॉडर्न मुक्ता Happy

तेव्हा आता तु आपला गाशा गुंडाळ आणि तुम्हारा कुछ सामान जो तुम्हारे रुम मे पडा है... तो आपल्या घरी घेऊन जा... मला त्याच्या करता रुम रिकामी हविये Proud

ता.क. बाबाही खुप खुष आहेत. आता त्यांना घरकामात मदत करायला हक्काचा असिस्टंट मिळणार आहे ना... आम्ही काम वाटुन घेऊ म्हणालेत... कधी तो धुणीभांडी करेल आणि ते स्वयंपाक तर कधी उलट... कित्ती समजुतदार आहेत नै आपले बाबा Happy

आता वाजले की बारा हे गाणे सुरू होते
मोबाईल फोनची रिंग वाजते.

आईचा मोबाईल वाजत असतो.
आई: हेल्लो क...क...कोण बोलतंय
पलिकडूनः हेल्लोऽऽ, मी धरणीमाता बोलतेय. ते काय पोटात घ्यायचं काहीतरी म्हणत होतात तुम्ही.
त्याबद्दल फोन केला.
आई: .......
धमा: हेल्लोऽऽ, आहे कुणी का यमाला भेटायला गेलात
आई: आहे. त..तुम्हाला कसं कळलं.
धमा: आम्हाला सगळं कळतं सगळीकडं आमचं लक्ष असतं.
आई: ..
धमा: हां तर.. धरणीमाते पोटात घे असे म्हणालात ना तुम्ही तेवढ्याचसाठी फोन केला.
आई: म्हणजे ?
धमा: अहो बाई, २१वे शतक आहे, सगळ्या गोष्टी आधी ठरवून करायच्या असतात.
आई: आँ.. काय ठरवायचे?
धमा: काळ, वेळ, झालंच तर पोशाख, साईझ.
आई: पोशाख?
धमा: अहो बाई, ही ईव्हेंट लाईव्ह प्रक्षेपित होईल ना स्वर्गात. मग कपडे चांगले झँगपँग पाहिजेत.
उगाच कळकट्ट नकोत बर्का.
आई: लाईव्ह? अहो माझा जीव जाणार, आणि लाईव्ह प्रक्षेपण.
धमा: अहो बाई, जीव आणि आत्मा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर फिकर नॉट!
लाईव्ह प्रक्षेपण, म्हणले की ३/४ कॅमेरे लावून तुमचा लाँग शॉट, क्लोजप,
सगळं कव्हर व्हायला पाहिजे. त्यासाठी कौंसा कपूरला कॅमेरे सेटप, टेस्टींग
करायला वेळ द्यायला पाहिजे.
आई: लाँग शॉट? कौंसा कपूर ? अहो काय लावलंय काय? [कट करते]

मला जाउ द्या ना ... घरी
आई: ह..हेल्लो.
धमा: हेल्लोऽऽ. कट कशाला केला फोन? वरतून कनेक्शन मिळायला केवढा त्रास होतो.
सारखी रेंज जाते, ते वेगळेच. हां. तर काय म्हणत होते. हां कधी वेळ आहे तुम्हाला?
परवा संध्याकाळी बाजारला जाता तेव्हा वाटेत एक काटेसांवरी लागते, तिथे करूयात !
काटेसावरी मला फार आवडते. तिच्यावर गाणे पण आहे एक "ओ ..सांवरे ... तेरे बिन जिया
जाये ना!". तोच बॅकग्राऊंड स्कोअर. पर्फेक्ट ! तर तयार रहा बर्का.
आई: अहो पण, मला अजून ...
धमा: अहो रेंज जाते आहे, काय? ऐकू येत नाहीय्ये नीट.
आई: [खोल आवाजात] अजून जगायचय हो!
धमा: आँ? आ होहो, तयार रहा. एक सांगायचं राहिलंच की. हे सगळं झाल्यावर, मी तुम्हाला पोटात घेईन
आणि मग चित्र्याकडे देईन. म्हणजे कडेवर नाही काही, चित्र्या म्हणजे चित्रगुप्त ! आमचा हिशेबनीस.
फार प्रश्न विचारतो ब्वॉ. करताना काही वाटलं नाही, पण लिहीताना वाटलं असं कसं? अजून काही
अकाऊंट, जसे की प्रोफेसर, बाबांचा मित्र, चालू आहेत की बंद केली? वगैरे प्रश्नांची उत्तरे
तयार ठेवा बर्का.

अजुन एक शेवटः

माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.

मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का?

<<< या नंतर पुढे :
आईला वाटल् पोरगी "आक्षेप" घेइल पण पोरगी तर आई पळून जायची वाटच पहात होती जणु !
आईचा जाच केव्हा पासून असह्य झाला होता ..पोरीच्या कॉलेज डेज पासून ते पोरगी स्वतः आई होई पर्यन्त हिचे पोरीला जाच करणे चालुच असायचे !
कॉलेज मधे अस्ताना पोरीवर जीन्स वर टिकली लावायला आणि पायात छुमछुम सक्तीचे करून जाच करणारी आई आणि सध्या पोरगी नुकतीच आई झाली असतानाही सक्ती चालुच ठेऊन होती.. तान्ह्या नतवंडालाही हिची सक्ती... तर ती अशी कि बाई साहेबांना पोरीच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला न्हाऊ घातल्यावर आईला ते तान्हुलं, छानसं काजळ, गालाला तिट, हातात पायात तांब्याचे वाळे. गळ्यात जिवती. कानाच्या मागे, एका तळ्पायावर कुणाची दृष्ट लागु नये म्हणुन लावलेलं काळं अशा रुपात पहायला आवडायच आणि पोरीला मात्र नुकतचं न्हाऊ घातलेलं एक तान्हुलं. फक्त एवढच आवडायच, या वरून माय लेकींचे कायम वाद होत !
थोडक्यात माय लेकींचं पटत नव्हतच, आई एक बॉ.फ्रे कडे जातेय म्हंटल्यावर पोरीने मोठ्या मनाने तिला परवानगी दिली, आई त्या च्या कडे गेली पण...... पण त्या बॉ फ्रे ला आई कॉलेज च्या रुपात पहायला आवडायची.. म्हणजे " अगदीच साधा अवतार... कपाळाला कुंकु नाही. हातात बांगड्या नाहीत, केस अव्यवस्थितपणे गुंडाळ्लेले. अस्ताव्यस्त वेशभुषा. " अशी Proud
पण हिच्या सध्याच्या गेट अप ला म्हणजे "माफक प्रमाणात अलंकृत. हातात बांगड्या, पायात पैंजण, केस छान विंचरलेले आणि सुबकशी केशरचना, सोबत फुलांचा गजरा" अशा रुपाला एक्स बॉ. फ्रे ने "आक्षेप" घेतला आणि चक्क तिला हकलून लावले!
पोरगी, नवरा कोणी "आक्षेप" घेतला नाही पण "आक्षेप" घेतला तो खुद्द प्रियकरानीच...!!
". हाय रे धरणी माते.. घे मला उदरात म्हणून ती प्राण त्यागायला निघाली.. धरणी धुभंगली पण धरणी मातेनेही "आक्षेप" घेतला.. "इथेही धरणी म्हणजे स्त्री रुपामधेच जीव द्यायला निघालीस ना, द्यायचाच असेल तय पुरुष रुपी "सूर्या" कडे जा आणि जीव दे म्हणून धरणीनेही आपला "आक्षेप" नोंदवला आणि धरणी पूर्वव्रत झाली.
....................................... समाप्त...........................................................

पण हिच्या सध्याच्या गेट अप ला म्हणजे "माफक प्रमाणात अलंकृत. हातात बांगड्या, पायात पैंजण, केस छान विंचरलेले आणि सुबकशी केशरचना, सोबत फुलांचा गजरा" अशा रुपाला एक्स बॉ. फ्रे ने "आक्षेप" घेतला आणि चक्क तिला हकलून लावले!
>>>>>> Lol

का छळताय कथा लेखकाला. याही पेक्षा तद्दन कितीतरी पोरकट, सुमार दर्जाच्या कथा असलेले सिनेमे पैसे देऊन नाही का पाहिले आपण. म्हणजे मी तरी पाहिलेत.
कविता पण वाचल्यात पण अश्या प्रतिक्रीया बर्‍या नाहीत. नवीन कथालेखक असेल बिचारा माझ्यासारखा. त्याचा अवसानघात करु नका.

Pages