"वाचलो रे भावा!"

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कालच्या रविवारी घरी भावाला फोन केला होता.

तो म्हणे, "वाचलो रे भावा!"

मी विचारले,"काय झाले..?"

तो.."दुपारच्या सुटीत रानातील वस्तीवरच्या घरी झोपलो होतो. एक नागराज उशाला येउन बसले.:) बाहेरुन वहिनी आल्या तो जाम घाबरल्या. वहिनींच्या पायाच्या आवाजाने नागराजाने फना काढला..... नशीब भावाने झोपेत हालचाल केली नाही. जाग आली तेंव्हा मग एक क्षणात दुर उडी मारली.....मग नागराजांना समाधिस्त केले गेले!"

***
शेतकर्‍याच्या आयुष्यात नेहमी घडणार्‍या घटना... प्रत्येक वेळी नशीब बलवत्तर असेलच असे नाही! मागील दोन महिन्यापुर्वी एका दुध उत्पादकाचा तरुण मुलगा सर्प दंशाने गेला. त्याचा वयस्कर बापाचा चेहरा आजही आठवला कि अंगावर काटा येतो! वेळीच उपचार मिळाले असते तर?

***
मागील वर्षी आमच्या शेजारील वस्तीवर एक तरुण, विजेचा पंप चालु करताना विजेचा धक्का लागुन गेला. भारनियमणाचा एक मुक बळी. वेळी अवेळी वीज जाण्याने त्रस्त झालेला जीव, वीज आली कि लवकर पंप चालु करावा या आशेने पंपाजवळ गेला, अन हलक्याश्या पावसाने ओल्या झालेल्या तारेला चिकटुन मरणाच्या दारी गेला...बायका पोरे उघडयावर..

***
शेतकर्‍यांना अन ग्रामीण जनतेला पुरेश्या सुविधा उपलब्ध न झाल्याने गमवाव्या लागलेल्या जीवांचे मोल जमा खर्चाच्या कुठल्या प्रकारच्या तोट्यात मोजायचे?

विषय: 
प्रकार: 

आपल्या आसपास असे कितीतरी जीव वेळे अगोदर हकनाक जातात. Sad
कधी परिस्थिती तर कधी मृत्यू पावणारी व्यक्ती स्वत: कारणीभूत असते. पण अरेरे! म्हणण्याशिवाय आपण काय करू शकतो? गेलेली व्यक्ती परत तर येऊ शकतच नाही ना?

या करपलेल्या चेहरयांची किंम्मत जिवंत असताना ठेवली जात नाही ....तिथे मेल्यावर कोण घेणार ?
शहरात एखादा जरी मेला तर किती हंगामा ,ग्रामीण भागात १० जरी मेले तरी सगळं शांत, नेहमी प्रमाणं ...कारण हे मानवाधिकारवाले,सामाजिक जाण असलेले कार्यकर्ते,उच्चशिक्षीत लोक्,पत्रकार, मीडियावाले यांची घरे या "शहरात" तर आहेत ...
em>शेतकर्‍यांना अन ग्रामीण जनतेला पुरेश्या सुविधा उपलब्ध न झाल्याने गमवाव्या लागलेल्या जीवांचे मोल जमा
मुळात याची जाण सरकारला नाही आणि शेतकर्याला हे अजुन कळत नाही ....