मायबोली का बंद होती?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोली तांत्रीक कारणामुळे बंद होती हा संदेश/मजकूर तुम्ही गेले २ दिवस पाहिला असाल. नेमकं काय झालं होतं? आणि एवढा वेळ का लागला?

मायबोलीचे सर्व्हर ज्या डेटा सेंटरमध्ये आहेत तिथे भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. तिथे जनरेटर आणि UPS असूनही वेळेत वीजपुरवठा पुन्हा सुरू न झाल्याने बरेच सर्व्हर बंद पडले.

सर्वसाधारणपणे अश्या प्रसंगी पुन्हा वीज आल्यावर सर्व्हर चालू होऊन सर्व सुरळीत चालायला लागतं. ह्यावेळी मात्र बरेच सर्व्हर चालू (boot) झाले नाहीत. त्यात मायबोलीचेही सर्व्हर होते. डेटा सेंटरने सांगीतलं की आधीचा संगणक चालू होत नसल्याने नवा देत आहोत. तो अमेरिकेतील वेळेनुसार रात्री २:०० ला मिळाला. हा सर्व्हर मिळाला असला तरी तो पुर्णपणे नवा असल्याने त्यात मायबोलीला लागणारी प्रणालीची स्थापना (setup) करायची होती. मंगळवारी पहाटेपासून त्यावर काम सुरू केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे मायबोलीकरांनी लिहिलेलं सर्व लेखनसाहित्य, प्रकाशचित्रं, इतर फाईल्स पुन्हा चढवल्या आणी आज मायबोली नेहेमीसारखीच पुन्हा दिसू लागली.

मायबोलीवरचा सर्व Data रोजच्यारोज संग्रहीत (Backup) केला जात असल्याने एकही फाईल अथवा अक्षर हरवलं नाही. सोमवारी बंद होण्यापूर्वी ज्या स्थितीत मायबोली होती त्याच स्थितीत मायबोलीला इतक्या कमी अवधीत आणता आलं.

या गडबडीत एक राहूनच गेलं. सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy

विषय: 
प्रकार: 

मायबोलीवरचा सर्व Data रोजच्यारोज संग्रहीत (Backup) केला जात असल्याने एकही फाईल अथवा अक्षर हरवलं नाही.

नशिब... मला तर भीती वाटत होती सगळे साहित्य हरवतेय की काय..

एवढ्या कमी वेळात सगळे नीट केल्याबद्दल अ‍ॅडमिन टिमचे अभिनंदन...
नविन वर्षाची सुरवात........ Happy

हे नविन वर्ष सगळ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जावो...

सर्व अ‍ॅडमिन टीम आणि मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

धन्यवाद अ‍ॅडमिन माबो परत आणल्याबद्दल. इतर कोणत्याही मराठी (किंवा इतर भाषिक) साईटवर करमत नव्हते दोन दिवस. जरा वेगळा मेसेज दिसला की म्हणजे आता लौकर चालू होईल बहुतेक असा समज करून घेत होतो Happy

ओह, अस झाल होय! तरीच....!
ग्रेट इफोर्ट्स , धन्यवाद
(पण आता माझा पीसी बोम्बललाय, माझ्या पीसीवरुन नेट कनेक्शन गायब झालय Sad असो)
नववर्षाच्या आपणांसही हार्दीक शुभेच्छा! Happy

तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.

<<सर्वात महत्वाचं म्हणजे मायबोलीकरांनी लिहिलेलं सर्व लेखनसाहित्य, प्रकाशचित्रं, इतर फाईल्स पुन्हा चढवल्या आणी आज मायबोली नेहेमीसारखीच पुन्हा दिसू लागली. >> बापरे मी डेटाचा नुसता विचारच करते आहे केवढा असेल तो. आणि किती काम पडले असेल ते.

मायबोलीला परत तसेच सुरु केल्याबद्द्ल धन्यवाद. मला रेसेपीजची काळजी होती Happy

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. दोन दिवस अगदी करमलं नाही !> अगदी! अन मग बरेच मायबोलीकर जीमेल, बझ, याहु, फेसबुक, हॉट्मेल वर भटकत्या आत्म्यांप्रमाणे भटकत राहिले! Happy

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही अन सर्वांनाही !

अ‍ॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकराना नूतन वर्षाच्या शुभेच्छा !!
जरा वेगळा मेसेज दिसला की म्हणजे आता लौकर चालू होईल बहुतेक असा समज करून घेत होतो >>
अगदी अगदी.. Happy

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. फारच कसंतरी होत होतं हो.
आमच्या घरी माबोमुक्तीसमारंभ साजरा करण्यात आला एका व्यक्तिकडून Proud त्याला आत्ताच माबो चालु झाल्याची गुडन्युज पाठवली. Wink

दोन दिवस एखाद्या दारुड्याने पुन्हा पुन्हा बन्द गुत्त्यासमोरून चकरा माराव्यात त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा मायबोलीवर लॉग इन होत होतो. अन घरातले फिदी फिदी हसत होते.

अ‍ॅडमिन यानी घेतलेल्या कष्टांबद्दल आभारी आहोत. धन्यवाद

धन्यवाद अ‍ॅडमिन! नव्या वर्षाच्या प्रारंभीच मायबोलीचं दैनंदिन आयुष्यातलं हवंहवंसं वाटणारं नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं त्या निमित्ताने! Happy तुम्हालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

अगदी अगदी. आजिबात करमलं नाही. तुम्ही हैद्राबादला का नाही येत. आता तर फेसबुक पण इथे सेंटर सुरु करत आहे. गुढीपाड्व्याच्या शुभेच्छा. बाकी मराठी साइट वर आजिबात मन रमत नाही.

मंगळवारच्या मटामध्ये मायबोली, अजय-भावना आणि दिपांजलीबद्दल 'ग्लोबल गुढी' मध्ये वाचून अभिमानाचं भरतं येत होतं. ते व्यक्त करण्यासाठी कित्तीदा इथे लॉग इन करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ..
अर्थात् इतका वेळ मायबोली बंद म्हटल्यावर वर लिहीलेल्या सर्व अडचणींची कल्पना आलीच होती. पण अॅडमिन टिम मायबोली पूर्ववत करण्यासाठी झटत असणार ह्याची खात्रीही होती.
धन्यवाद अॅडमिन टिम Happy

धन्यवाद अ‍ॅडमिन Happy बापरे किती काम पडल असेल तुम्हा सगळ्यांना.

अ‍ॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकराना नूतन वर्षाच्या शुभेच्छा !! Happy

मंगळवारच्या मटामध्ये मायबोली, अजय-भावना आणि दिपांजलीबद्दल 'ग्लोबल गुढी' मध्ये वाचून अभिमानाचं भरतं येत होतं.....>>अगदी अगदी मंजुडे

अ‍ॅडमिन टिमला धन्यवाद! Happy
अ‍ॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकरांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा !!

मंगळवारच्या मटामध्ये मायबोली, अजय-भावना आणि दिपांजलीबद्दल 'ग्लोबल गुढी' मध्ये वाचून अभिमानाचं भरतं येत होतं>>>>>>>>>>> अगदि खरच मंजुडे !

ऑफिसमध्ये आल्या आल्या मायबोली सुरु झाली का हे पाहिले आधी! Happy धन्यवाद अ‍ॅडमिन! Happy
>>माझं तर मायबोली विड्रॉवल सिम्प्टम्सने डोकंच दुखू लागले होते >> अगदी! Happy आणि हापिसात कामातही लक्ष लागलं नाही हे वेगळच! Proud

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम आणि नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा !!
मी पण काल मटा मध्ये अजय-भावना आणि दिपांजलीबद्दल वाचलं तर मला कुणाकुणाला सांगू असं होऊन गेलं होतं. तरी सदिच्छांचे ज्यांचे फोन आले आणि आधीच मी ज्यांना माय्बोली विषयी सांगितलं होतं त्यांना मटा जरुर वाचा असं सांगताना अगदी जाम अभिमान वाटला. Happy अजय-भावना आणि दिपांजली तुमचे त्रिवार अभिनंदन!!

माझं तर मायबोली विड्रॉवल सिम्प्टम्सने डोकंच दुखू लागले होते >> अगदी अगदी !! अजून थोडा वेळ गेला असता तर जग शून्य भासे मज वगैरे वाटायाला लागलं असतं. Proud

मायबोली Admin Team चे प्रयत्न यशस्वी झाल्या बद्दल त्यांचे आभार अन सर्व माबोकरांना नव वर्षाच्या शुभेच्छा !!!

मायबोलीवरील मटामधील लेखाची लिन्क देणार का. सापड्त नाहीये.

वाचले. चांगले लिहीले आहे. अजय - भावना, दीपांजली यांचे खरेच मनापासून अभिनंदन. दोन दिवस अगदी चुकल्या चुकल्यासारखे वाट्त होते.

Pages