बघ तूला आठवण येते का?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?

खिडकी बन्द करून घे. दिवे पंखे मालव.
सर्व नळ बंद करून टाक.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?

थडथडणार काळीज जागेवर आणायचा प्रयत्न कर.
डोळे मीटून घे. देवाचा धावा कर. राम रक्षा म्हण.
नाहीच आठवल तर भीमरूपी महारुद्रा म्हण.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?

मग हळूच मागच्या दाराने बाहेर पड.
चालत रहा भिती कमी होईपर्यंत.
ती कमी होणार नाहीच. मग घरी ये.
साडी बदलू नकोस. चपलाही काढू नकोस.
पून्हा त्याच खिडकीत ये. हळूच खात्री करून घे.
कर्जवसूलीचे गूंड गेलेले असतील.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?

आता परत बेल वाजेल. धाडकरून दरवाजा उघड.
तूझा नवराच असेल. त्याच्या हातातली पिशवी-
खसकरून ओढून घे. चप्पल बहुदा तो स्वतःच काढेल.
तो विचारेल तूला तूझ्या रागवण्याच कारण.
मग म्हण नशीबच फूटलय.
चहा कर. त्याच्यासमोर आदळ.
तो टी व्ही वर आज तक लावेल. ते तू बदल.
कहानी घर घर की लाव.
बघ आता तरी त्याला बूडवलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?

विषय: 
प्रकार: 

केदार, जमलंय बरं का!! फक्त तेवढ्या शुद्धलेखनाच्या चुका avoid कर रे...

केदार, मजेशीर लिहिले आहेस रे!!

चांगलं जमलं आहे केदार विडंबन..

[पण तुमचे लेख तुम्ही दोन्हीकडे का टाकता- गुलमोहर आणि रंगीबेरंगी? :)]

नमस्कार पूनम,

माझ हक्काच पान आहे ' रंगीबेरंगी' ते विसरायलाच होत. आता ह्यापूढे फक्त रंगीबेरंगी वरच टाकेन.

धन्यवाद स्वाती, शैला आणि पूनम.

अरे
केदार पुन्हा एखादी कविता लिह अशीच आणि बग माझी आठ्वन येते का!!

आरे
केदार पुन्हा एखादि कविता लिह अशिच आणि बग माझी आठ्वन येते का!!

छानै!!!!!!!!!!!!!!!!!!
Happy

******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू