जुन्या दूरदर्शन मालिका - हिंदी

Submitted by शुभंकरोती on 5 February, 2010 - 18:53

भारतात खर्‍या अर्थाने दूरदर्शन प्रसार पावला एशियाड (१९८२) नंतर. प्रथम एशियाड खेळांचे थेट प्रक्षेपण आणि पुढे सुरवात झाली मालिकांची. हा प्रयत्न आहे तुम्हाला आठवत असलेल्या जुन्या दूरदर्शन मालिकांची नावे आणि त्यासंबंधित आठवणी गोळा करण्याचा.

हम लोग
बुनियाद
तमस
नुक्कड
रजनी (प्रिया तेंडुलकर)
उडान
दादी मां जागी
करमचंद
इधर-उधर (सुप्रिया पाठक, रत्ना पाठक)
खानदान
मिर्जा गालिब
विक्रम वेताल
अडोस-पडोस (सई परांजपे फेम)
रामायण
महाभारत
कथा-सागर
वागले की दुनिया
गुल्-गुलशन-गुलफाम
कहां गये वो लोग
फास्टर फेणे
एक कहानी
फौजी
सर्कस
दूसरा केवल
भारत एक खोज
स्वोर्ड ओफ टीपू सुलतान
चाणक्य
मि. योगी
ये जो है जिंदगी (शफी इनामदार, टिक्कू तलसानिया)
मालगुडी डेज
तृष्णा
शो थीम
व्योमकेश बख्शी
चमत्कार
रिपोर्टर (शेखर सुमन)
लाइफ लाइन
नीम का पेड (मुंह की बात, सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन ...)
स्पेससिटि सिग्मा
सुरभि
...
...
क्षितिज ये नहीं
सुबह
कच्ची धूप
मुंगेरीलाल के हसीन सपने
आसमां कैसे कैसे
मिट्टी के रंग
नींव
दादा दादी की कहानियाँ
सिंहासन बत्तीसी
फूल खिले हैं गुलशन गुलशन
फिर वही तलाश
कक्का या काका जी कहिन
आ बैल मुझे मार (अमोल पालेकर और भारती आचरेकर)
फटीचर ( पंकज कपूर - यार फटीचर तू इतना इमोशनल क्यों है ??)
देख भाई देख
खरी खरी
राग दरबारी
श्रीकांत
छोटी सी आशा
छोटी बडी बातें
चुनौती
दिल दरिया
सांझा चूल्हा
अपना अपना आसमान
कर्मभूमि
रथ चक्र
लेखू
छपते छपते
दर्पण
दाने अनार के
युगांतर
कशिश
गुनीराम (राकेश बेदी)
एक दो तीन चार
पोटली बाबा की
फ्लॉप शो
किले का रहस्य
हम पंछी एक डाल के
होनी अनहोनी
मृगनयनी
तहकीकात
गायब-आया
अकबर द ग्रेट
शांति
स्वाभिमान
मुजरिम हाजिर
मुल्ला नसरुद्दीन
एसा भी होता है (सिद्धार्थ काक)
परम वीर चक्र
बीबी नातियों वाली
कबीर
समंदर
तेरह पन्ने
पचपन खंबे लाल दीवारें
सुकन्या
बैरिस्टर विनोद
टर्रम टू
इंद्रधनुष
आनंदी गोपाल
वाह जनाब
गण देवता
अप्पू और पप्पू
तरंग
देखो मगर प्यार से
अपराधी कौन
अंक अजूबे
छुट्टी छुट्टी
उपन्यास
उल्टा-पुल्टा
चरित्रहीन

तुमच्या काही जुन्या आठवणी वाचायला मिळाल्या तर अजून उत्तम
गुगल शरण गेल्या वर ही साईट मिळाली बघा ...
http://oldidiotbox.blogspot.com/2009/03/watch-old-doordarshan-serials-cl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाने अनारके - नीना गुप्ता आणि रघुवीर यादव. 'किस्सा है कहानी है पहेली है, जिंदगी ये मुहलगी सहेली है' असे टाइटल साँग होते.

फूल पलाश के- मुख्य हिरोइन आठवत नाही, पण निलीमा आजीम तिची मैत्रीण असते.'जब जब मेरे घर आना, फूल पलाशके ले आना' असे टाइटल साँग होते.

मागे एका सिरियलबद्दल लिहिले होते जी pride & prejudice वर आधारित होती, तिचे नाव 'तृष्णा'. वर उल्लेख झाला आहे.

शेखर कपूरची उडान ही मस्त होती. त्यानंतर त्याचीच एक सिरियल आर्किऑलॉजिस्ट वर होती त्याचे नाव काय होते?

आर्किऑलॉजिस्ट वरची सिरियल? उपन्यास नावाची एक होती. त्यात शेखर कपूरने आर्किऑलॉजिस्टचं काम केलं होतं. Big Flix वर त्या सिरियलचे काही एपिसोड होते पुर्वी.

'संसार' असं टाईटल असलेल्या २-३ सिरीयल येउन गेल्या>>> बहुतेक धीरजकुमार व श्रीपदा हिंदित होते..
फूल पलाश के- मुख्य हिरोइन आठवत नाही, पण निलीमा आजीम तिची मैत्रीण असते.'जब जब मेरे घर आना, फूल पलाशके ले आना' असे टाइटल साँग होते.>> हो ती बहुतेक पुनम रेहाना .. कसली मथ्थाड होती .. पण निलीमा आजीम साठी बघाय्चे..

रविवारच्या :
एक दोन तिन चार
मोहन गोखलेची एक आठवते का ? (character name = serial title ) ... बहुतेक 'लेखु'.. तसचं काहिस title song.. 'लेखु.. लेखु.. लेखु'
कोवळी मने
फेमस फाईव
कँडिड कॅमेरा
ऐसा भी होता है
वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स (बहुतेकच यातच शेवटी परदेशातले मजेशीर खेळ दाखवत.. जसे पाण्यावर तरंगणार्‍या ओंड्क्यावरुन चालणे.. रिंग गोळा करणे...लठ्ठ माणसे असत सगळी... नुसती हहपुवा बघताना.. अगदी कॉमेडी शो..)

शनिवार :
डी डीज कॉमेडी शो.. दु. ३.३० ला असायचा.. अक्षरशः धावत याय्चो शाळेतन
शो थीम

इतर:
पचपन खंबे लाल (? कि चार) दिवारे : मिता वशिष्ट व अमन वर्मा असावा ... इतका मथ्थाड दिसाय्चा.. पण तरी बघाय्चो
कशिश : मस्त होती.. गाणं पन छान .. सुदेश बेरी न माल्विका तिवारी.. त्यातले ते घर पण मस्त होते...

अजुन खुप आहेत... नंतर कधी...

" नीव"....त्याच टयतल सॉग पण मस्त होतं>> माझी पण आवड्ती.. बोर्डीग स्कूल प्रथमच बघितले/अनुभवले या सिरियल मधुन ..
बहुतेक अस काहिस (चु भु दे घे) ..

धरतीपर सूरज कि किरने
रखे नीव उजाले कि
विद्या के प्रकाश से रोशन (२)
नीव रहे विद्यालय कि....

पुर्ण नाही आठ्वत आता.. अजुन एक ओळ कडव्यात्ली...
-
कोई गांधी कोई नेहरु कोई वीर सुभाष बने
-----

जुन्या सिरियल्स आठवड्यातून एकदाच यायच्या. त्यामुळे लेखकांना नव्या कल्पना सुचत असत.
अमेरिकेत आमच्याकडे झी आहे. त्यातली एकही सिरियल वर लिहिलेल्या दूरदर्शनच्या सिरियल्च्या जवळपासही जात नाही. नुसते सिंदूर, मायका, बहु, डोली, जनाजा ...

रविवारी रात्री ९ वाजता 'एअर हॉस्टेस' ही सिरीयल असायची.त्यात किटू गिडवानीची प्रमुख भूमिका होती.
सोमवारी रात्री ९ वाजता 'कश्मकश' ही सिरीयल असायची. ह्या सिरीयलचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त लेखिकांच्याच कथा सादर होत. ह्या सिरीयलची निर्माती मंजु असरानी होती.

एअर होस्टेस पण मस्त होती. त्यावेळी विमान, त्यातले सिन्स बघुन आपणही एअर होस्टेस व्हावे वाटायचे. Happy

"सी हॉक्स"
मस्त होती.
तो आर महादेवन नावाचा सध्याचा हिरो त्यातुनच आला. न चुकता बघायचोच.

"कशिश" ची मालविका मला जामच आवडायची.

शाहरुखची "फौजी"
"सर्कस"

ksmita |हो असच काहीतरी होतं ते "नीव" च टायटल सॉग

"किल्ले का रहस्य" पण भारी होती.

शेखर सुमनची एक मालिका लागायची. तो एका तवायफ च्या नादी लागतो , तो तिला "प्यारी " अशी हाक मारायचा त्यात. ते कोप्णती??

अरे वा! हा बीबी पाहिलाच नव्हता आत्तापर्यंत. मला आठवलेली काही नावं - प्रथम प्रतिश्रुती, बंगाली कादंबरीवर होती, रविवारी सकाळी लागायची. नंतर आश्चर्य दिपक म्हणून सुध्दा रविवारी सकाळी लागायची ह्यात अल्लादिनच्या दिव्यासारखा एक राक्षस होता.

घुटन मध्ये किरणकुमार आणि स्मिता जयकर होते एव्हढं आठवतंय - त्याचं टायटल सॉन्ग मस्त होतं. कभी सफर है, कभी रास्ता है मंझीलका, ये रात दिन की घुटन क्यू अजाब है दिलका असं काहीतरी.

नंतर यात्रा म्हणून रेल्वेच्या प्रवासावर होता, त्यात नीना गुप्ता होती. तसंच छोटे बाबू म्हणून लागायची त्यात शेखर सुमन आणि कांचन अधिकारी होते.

>>p.s. एक प्रिया तेंडूलकरची सिरियल सुरु झाली होती आणि काही भागांनीच बंद झाली. तिच्याच कथेवर आधारीत होती बहुतेक. नवर्‍यापासून वेगळी होऊन स्वतःच नवं आयुष्य सुरु करताना दाखवली होती प्रिया सुरुवातीच्या काही भागामधे. प्रदीप वेलणकरही होते बहुतेक. नाव आठवतय का कुणाला?

मला वाटतं स्वयंसिध्दा. ह्याचंही टायटल सॉन्ग मस्त होतं - एक दफा तो अपना जीवन मुझ्को खुदही जीने दो, लिख लेने दो किस्मत अपनी होना है जो होने दो. दुखके दाने, सुखके मोती, सब है मेरी आखोमे, अबकी बार तो मुझको अपना आचल भरके रोने दो. लता मंगेशकरांनी म्हटलं होतं.

क्या बात है दोस्तों ... लगे रहो ...

उजाले उनकी यादों के हमारे साथ रहने दो,
न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाये ...

शुभंकरोती, मस्त लिस्ट बनवली आहे तुम्ही. बाबाजीका बाईस्कोप (सत्येन कप्पू बहुतेक) आणि जुनून (टॉम ऑल्टर, अर्चना पूरणसिंग, मंगल धिल्लो) हे पण अ‍ॅड करा. झालंच तर तेनालीरामा आणि एक शून्य शून्य. आ़णखी आठवलं तर पोस्टेन इथे.

Pages