मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार ...
मी आज इकडे बरेच दिवसांनी आलो आहे. खुपच मजा आली हा धागा वाचुन. आता पाहात जाइन नेहमी.
माझ्या कडे थोडे रिलायन्स चे अवेरेज १११०/- लेवल नी आहेत. काय वाट्ते या बद्द्ल, अजुन घेउन अवेरेज करु का?

केदार, तुम्ही चार गोष्टी शिकवा.

१) इकॉनॉमिक टाइम्स मधील शेअरची पाने कशी वाचायची. ते फार बारीक लिहिलेले अस्ते व मला कळत नाही. ते शिकवा.

२) ऑन्लाइन शेअर ट्रेडिन्ग अकाउंट सगळ्यात चांगले कुठले. काही तुलना असेल तर सांगा. ब्रोकरेज वर फार पैसे जातात.

३) बॉन्ड्स, म्युच्युअल फंडस यात तुम्ही पैसे टाकता का? एक व्हॅल्युरीसर्च ऑन्लाइन साईट आहे ती मी बघते पण असेच खूप टेक्निकल आहे मराठीत समजावुन सांगणारे भेट्ले तर बरे

४) कमॉडिटीज, फ्युचर्स, करन्सी यात आपण जावे का? आपले मत काय?

रिलायन्स अ‍ॅव्हरेज केले तरी चालतील. सध्या हा समभाव रेंजबाऊंड आहे, आत्ता पैसे घालायचे नसतील तरी चालेल, पण लाँग टर्मला मस्त. मी पण ह्यावर लाँग आहे, वाटल्यास त्याने फर्म बाय सिग्नल दिल्यावर इथे परत लिहीन. तेंव्हा घ्या. आत्ता घेतला तरी पैसे नक्की वाया जाणार नाहीत.

मामी मी मागे ह्याबद्दल लिहीले होते. पण अजून एकदा लिहायला आवडेल. सध्या इथेच लिहीतो, मग वेळ झाला की वेगवेगळे भाग करेन.

१ इकॉनॉमिक टाइम्स मधील शेअरची पाने कशी वाचायची.

हा आजचा डेटा मी इटी मधून घेतला आहे. प्रिंटेड पेपर मध्ये पण असाच असतो. एकेक शब्द बघूया.

Larsen & Toubro Ltd.
LTP*
Feb 25, 15:59 Bid Offer Open Intra Day 52 Week Prv Close Volume
NSE 1535.60
34.45
(2.29%) Price 0.00 Price 1535.60 1510.00 High 1543.00 1729.40 1501.15 2427026
Q

NSE - म्हणजे निफ्टी इंडेक्स
BSE - सेन्सेक्स

LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईज. ( १५४२.३५) तुम्ही विकत घ्यायच्या आधीची त्या समभागाची किंमत. ही दिवसात दर सेकंदागणीक बदलत असते.

आता आपण मुख्य चार किमती पाहू.

ओपन ( १५३५) - समभाग ज्या किमतीला त्या दिवशीसाठी विक्रिला "ओपन" होतो ती किंमत.
हाय - ( १५४८) दिवसभरातील सर्वात जास्त किंमत
लो - (१५२९) उलट. दिवसभरातील सर्वात कमी किंमत
क्लोज - ( १५४२.३५) दिवसा अखेरील त्या समभागाची किंमत

५२ विक हाय (१७२९.४०) - गेल्या वर्षभरातील सर्वात जास्त किंमत
५२ विक लो -( ५५६ ) गेल्या वर्षभरातील सर्वात कमी किंमत

बिड - बिड म्हणजे विकत घेणारा ह्या किमतीला विकत घेऊ इच्छितो. ( लिमीट प्राईज साठी)
ऑफर - म्हणजे विकणारा ह्या किमतीला विकू इच्छितो.( लिमीट प्राईज साठी)
व्हॉल्यूम - एकून संख्या (समभागांची)

हा झाला ET मध्ये येणारा तक्ता. Happy अगदी सोपा.

२.ऑन्लाइन शेअर ट्रेडिन्ग अकाउंट सगळ्यात चांगले कुठले?

तसे बरेच आहेत. तुलना माझ्याकडे नाही, पण रिलायन्स मनी खूप स्वस्त आहे. अकांउट मध्ये आयसिआयसिआय, HDFC, शेअरखान कोटक देखील चांगले आहेत.
अकाउंट उघडताना मी खालील गोष्टी विचारात घेईन.
१. ऑनलाईन ट्रेडिंग माझ्या बॅंकेला लिंक करता येईल का? जेणेकरुन पैसे टाकने व काढने ह्यात काही सेकंदाचा फरक असेन, काही दिवसाचा नाही.
२. ब्रोकरेज - बरेच जण काही दिवस फ्रि देतात पण नंतर जास्त पैसे लावतात, ते नको. ब्रोकरेज मध्ये खूप पैसे जातात. ट्रेड प्रॉफिट मध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्रोकरेज पण लक्षात घ्यावे. Happy
३. चार्टस - चार्टिंग सर्व्हिस असेल तर उत्तम. Happy आत्ता लगेच नाही पण थोडे म्यॅचुअर झाल्यावर कामी येते.

३) बॉन्ड्स, म्युच्युअल फंडस यात तुम्ही पैसे टाकता का? एक व्हॅल्युरीसर्च ऑन्लाइन साईट आहे ती मी बघते पण असेच खूप टेक्निकल आहे मराठीत समजावुन सांगणारे भेट्ले तर बरे >>>

हो. मी ह्यात देखील पैसे टाकतो. पैसे गुंतवताना आपले स्वतःचे प्रोफाईल समजून घेणे आवश्यक आहे. थोडे पैसे गेल्यावर जर रात्रीची झोप उडणार असेल तर शेअर मध्ये गुंतवणूकीचा फंदात न पडलेले बरे. पण तसेच अगदी अग्रेसिव्ह प्रोफाईल असले तरी ( माझे स्वतःचे) पूर्ण गुंतवणूकीच्या काही टक्के रक्कम MF, bonds मध्ये गुंतवने आवश्यक आहे. निदान १५ ते २५ टक्के.
MF वर परत लिहीतो. Happy

४) कमॉडिटीज, फ्युचर्स, करन्सी यात आपण जावे का? आपले मत काय?

नक्कीच. पण त्या आधी वर लिहील्यासारखे आपले प्रोफाईल सम़जून घेणे आवश्यक आहे. फ्युचर्स मध्ये प्रचंड तोटा होऊ शकतो. (नफाही) अंदाज चुकले तर भले भले ह्यातून सावरू शकत नाहीत. मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी पैसे लागतात, भावना नाही, आणि हे वरिल मार्केट फक्त पैशांवर चालते, त्यामुळे इथे रिस्क जास्त आहे. माझे मुळ प्रोफाईल किंवा व्यक्तीत्व हे रिस्क टेकींग आहे, त्यामुळे आधी आपले प्रोफाईल तपासा. तपासन्यासाठी काही टेस्ट आहेत, पण मुख्य प्रश्न स्वतःला विचारा की, आज माझे २५००० हारवले तर मी काय करेन? पॅनिक होईन, रडेन, आठवडा वाईट जाईल की ठिक आहे, हारवले ना, आय अ‍ॅक्सेप्ट, ह्यातून मी काही तरी शिकेन, असे काही उत्तर येतील.

मुख्य गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मध्ये सर्व लोक मी किती कमावले हे सांगतात, गमावले हे कोणी सांगत नाही, तो कमिपणा वाटतो. हा गेम आहे, सचिनही रोज १०० मारत नाही. Happy प्रत्येक ट्रेड मधून शिकत गेलो तर शेअर मध्ये भरपुर पैसा कमवता येतो. त्यामुळे बिनधास्त फ्युचर्स मध्ये या. पण आधी शिकल्याशिवाय एक ही पैसा फ्युचर्स मध्ये टाकू नका. ते पैसे जातील. तुम्हाला तिकडे यायचे असेल तर मी नक्कीच मदत करेन. Happy फक्त हा प्रो गेम आहे. इथे चुकांचे मुल्य जास्त आहे. शेअर्स मध्ये एखादा शेअर कमी झाला तरी होल्ड वर ठेवून पेपर लॉस मध्ये राहता येतं, पण फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये तो ऑप्शन नाही. Happy

करन्सी मार्केट किंवा कमोडिटी ट्रेडींग हे अजून थोडे वेगळे आहेत. (मुलभूत सगळं तेच, पण डेटा प्रोसेसिंग वेगळं.

केदार, एकदम मस्त पोस्ट. बर्‍यापैकी सोप्या शब्दांत सांगितलं आहेत.. मला एक शंका आहे, फ्युचर्स म्हणजे काय वेगळं आहे शेअर्स शिवाय?

केदार, काही दिवसांपूर्वी LNT घेतला साधारण ब्रोकरेज वगैरे पकडून १४१९ ला. आज त्याची किंमत १५४४ आहे. हा शेअर चांगला आहे, त्यामुळे लगेच विकणार नाहीये. मला शॉर्ट टर्म साठी काही सजेस्ट करू शकाल?

फ्युचर्स म्हणजे काय?
नावाप्रमाने भविष्यात (एका ठराविक दिवशी) मी एखादी वस्तू विकत घेईन किंवा विकेन ह्याचा करार, आजच पण भविष्यातील किमतीला करने.

थोडे साध्या शब्दात सांगतो. समजा आज तुर दाळ ९० रु किलो आहे. तुम्हाला ही तुरदाळ कदाचित १०० रु किलो होईल असे वाटले. तर तुम्ही आज डिसे २०१० मध्ये मी ९० रु किलो ने १००० किलो तुरदाळ घ्यायला तयार आहे असा करा माझ्यासोबत केला. ह्यात खालील गोष्टी आहेत.
१. तुम्ही डिसे २०१० मध्ये तुरदाळ खरेदी करणार.
२. त्याला आज तुम्ही ९० रु द्यायला तयार आहात.
३. जर किंमत ९० रु च्या वर गेली (उदा १००, जी तुम्हाला तिथपर्यंत जाईल असे वाटत आहे) तर तुम्हाला १० रु चा फायदा होणार. ( टेक्नीकल भाषेत तुम्ही तुरदाळीवर लॉंग आहात)
४. जर तुरदाळ ८८ रु किलो एवढी झाली तर तुम्हाला प्रतिकिलो २ रु नुकसान होईल.
५. मी तुम्हाला विकेन असा करार केला. मी विक्रेता आहे, म्हणजे मी तुरदाळी वर बियरीश आहे. किंमत कमी होईन ही माझी आशा, व किंमत कमी झाली की मी लगेच तुरदाळ कव्हर करेन म्हणजे विकत घेईन. (शॉर्ट अ‍ॅन्ड कव्हर)

थोडक्यात ह्या सर्व भविष्यातील घडामोडी आहेत, ज्या तश्या होतील असा दोन्ही पार्टीचा आंतरिक विश्वास आहे, हा विश्वास अभ्यासातून, माहीतीतून येऊ शकतो.

हेच सर्व तुम्ही एखाद्या शेअरवर किंवा इंडेक्स वर करु शकता. म्हणजे LNT १७०० ला जाईल असे वाटने. हे सर्व एका अडरलाईंग सेक्युरिटी वर होते म्हणून ह्याला डेरिव्हेटीव्ह म्हणतात.

फ्युचर्स मध्ये गुंतवण्याच्या अनेक स्ट्र्टेजी असतात. त्या मी नंतर नक्की लिहीन. (उदा स्ट्रँगल, स्ट्रॅडल, नेकेड इ इ)
फ्युचर्स सारखे दुसरे म्हणजे ऑप्शन. इथे भांडवल कमी लागते, नफा अनलिमीटेड. तोटा लिमीटेड. म्हणून इथून सुरुवात करायला हरकत नाही. फक्त कॉल आणि पुट विकायला गेलो तर मात्र तोटा अनलिमिटेड. पण ते कधी व का विकायचे हे मी नक्की लिहेन. Happy

शॉर्ट टर्म साठी म्हणजे १ महिना वगैरे चालेल का? सुचवेन काही.

केदार, अतिशय उपयुक्त माहिती देताय. प्लीज कंटिन्यू करत रहा.

शॉर्ट टर्म १ महिना किंवा त्याही पेक्षा कमी पण चालेल. मध्ये इकॉ.टा. मध्ये ४ स्क्रीप्स ची नावे होती. १) अनंत राज इंड २)ग्लेनमार्क लॅब ३) फेडरल बँक ४) युनिटेक. अनंतराज चा त्यांचा अंदाज १२३-२०७ आहे. मध्ये काही दिवस मी लक्ष ठेऊन होते. साधारण १३२ च्या आसपास किंमत होती. आज १२३.७० आहे. मी १२० ला ऑर्डर टाकून ठेवलीये.

हो मार्केट सुरु होतानाच खरे तर झोपायची वेळ झालेली असते. पण आठवड्यातील दोन तीन दिवस मी रात्री जागतो ह्या सर्वासाठी. Happy मी त्या सिक्युरिटीज कधी फॉलो केल्या नाहीत. पण उद्या टाकेन अंदाज.

बायदवे मला सर्वांनी अरे म्हणले तरी चालेल.

केदार, धन्यवाद. Happy
आज अर्थसंकल्प सादर केला जातोय. जर यावर पण भाष्य केलास तर आणखी माहिती मिळेल आम्हाला.

रंगासेठ, अहो त्यांना आपल्यासाठी जागत बसावं लागतंय. केदार, तुमच्या इथेही खूप बर्फ आहे कां?

अरे हा केदार जपान मध्ये आहे ना? म्हणून विचारलो.
अर्थसंकल्पाबद्दल माहिती आजच पाहिजे अस नाहीये. ते आपल्याला उद्या वर्तमानपत्रातून कळेलच.
पण केदार सोप्या भाषेत उपयुक्त माहिती देतो ना म्हणून हा हट्ट Happy

>>> फ्युचर्स सारखे दुसरे म्हणजे ऑप्शन. इथे भांडवल कमी लागते, नफा अनलिमीटेड. तोटा लिमीटेड. म्हणून इथून सुरुवात करायला हरकत नाही. फक्त कॉल आणि पुट विकायला गेलो तर मात्र तोटा अनलिमिटेड. पण ते कधी व का विकायचे हे मी नक्की लिहेन.

केदार,

मला ऑप्शन्सची व फ्यूचर्सची थोडीफार तांत्रिक माहिती आहे. परंतु तुमचे वरील वाक्य (फक्त कॉल आणि पुट विकायला गेलो तर मात्र तोटा अनलिमिटेड. ) समजले नाही. जरा ऑप्शन्स बद्दल सविस्तर लिहाल का? ऑप्शन्समधून नफा कसा मिळवायचा याबद्दल सविस्तर लिहा.

80-C मध्ये असणारी करसवलत २०,००० ने वाढवलीय. पण त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स मध्येच गुंतवायला पाहिजेत.
मार्केटने तर चांगला प्रतिसाद दिलाय. इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग, उर्जा क्षेत्रातील कंपन्यांकडे लक्ष ठेवावे लागेल.
L&T, BHEL, SBI, Suzlone, Dena Bank यांना पसंती मिळाली आहे जाणकारांकडून.
NIIT & Educomp या कंपन्यापण उत्तम भाव देऊ शकतील, कारण सरकारने ऑनलाइन शिक्षण क्षेत्राला उत्तेजन द्यायचे ठरवलेय.

बँकींग, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर वाढेल अस दिसतय.

कदाचित सोमवारी मार्केट पडेल असा अंदाज आहे. (कारण भाजपाचा मार्केट वरील प्रभाव)

इन्फ्रास्ट्रक्चर बाँड साठी "आय डी एफ सी" हा पर्याय खुला आहे Happy

गृहकर्जावरची आणि व्याजावरची सुट वाढेल असा अंदाज होता पण नाही Sad

पण टॅक्स स्लॅब वाढवल्यामूळे एकंदरीत अर्थसंकल्प छान Happy

केदार अतिशय चांगले समजावून सांगितले आहे धन्यवाद. मी एक्स्ट्रीम रिस्क टेकर आहे. आता मार्केट सकाळी एक तास लवकर उघड्ते ते तुम्हाला बरे पडत असेल कि नाही. तुमच्या सल्ल्या परमाणे शेअर्स घेतले व पोर्टफोलिओ बिल्ड करत आहे. असेच शिक्षण चालु ठेवा आमचे. हे ओपन क्लोज, हाय लो साइट वर कोट मागविले की पण येते. जास्त करून माझे निर्णय पूर्वी भावनेच्या भरात घेतले जात. आता ऑब्जेक्टिविटी आणत आहे. म्हणजे रिलायन्स घ्यायचेच. नारायण मूर्ती चांगले वाट्तात म्हणून इन्फोसिस चे घ्यायचे.
एन टी पीसी चे स्क्रिप्ट लिहिले म्हणून त्याचे. सिगरेट ला विरोध म्हणून आयटीसी नाही घ्यायचे. फारच विनोदी पण महाग निर्णय.

आता इटीची ती चार पाने समजून घेउन वाचता येतील.

सिगरेट ला विरोध म्हणून आयटीसी नाही घ्यायचे. फारच विनोदी पण महाग निर्णय.
>>
मामी, त्याला socially responsible investing असेही म्हणतात. अनेक लोक तसे करतात. इथे अमेरिकेत फक्त अशा सोशली रिस्पॉन्सिबल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे म्युचुअल फंड पण आहेत. पण ह्या मंदीच्या काळात त्यांची परिस्थिती चांगली नाहीये. भारतात असे फंड आहेत की नाही माहीत नाही.

केदार,
तुझ खालील समभागावरील मत सांगशील.
मान इंडस्ट्रिज (घ्यायचे आहेत)
srei infra (घ्यायचे आहेत)
ind swift lab (माझ्याकडे ५००० आहेत, avg. price ६०, ३०० ते २२ च्या range मधे avg. केलेले, काय करावे?)

मला जास्त ज्ञान नाही पन, moneycontrol research, equitymaster subscription, sharekhan research यावर थोडीफार research करुन मी समभाग घेतो. (२००५ पासुन सुरु केले, +७५% ते
-७०%... खुप बघीतले या ५ वर्षात बर्‍यापैकी extreme बघीतले. मी पन एक्स्ट्रीम रिस्क टेकर मधलाच आहे.

शुभा ह्याच ग्रूप अंतर्गत अमेरिकेचे पानं ही आहे. तिथे आपण येथील स्टॉक बद्दल बोलू शकतो. टिप्स देण्यापेक्षा (म्हणजे तितके शेअर्स रिसर्च करने ओघाने आले, तितका वेळ दोन्ही मार्केट मध्ये देणे शक्य नाही.) आपण सेक्टर, आवडणारे (परफॉर्म करणारे) समभाग, आणि लाँग टर्म गुंतवणूकी बद्दल लिहू शकतो.

आउटडोअर्स - मी ही केदार जोशीच आहे. Happy जुना आयडी kedarjoshi

केदार,
तुम्ही खुपच छान माहिति देता. मला पन तुमचा सल्ला पाहिजे होता .मी Reliance Ind चे futures घेतले आहेत. Price 982.52 , March करिता. तुमचे Reliance बद्दल काय मत आहे? आनि मी SBI मधे पन interested आहे. Next week मधे SBI घ्यावे का? साधारन काय range madhye ghyave?

Thank you

धन्यवाद. Happy

रिलायन्स मध्ये सद्या बुल्स अन बेअर्सची टफ फाईट चालू आहे. गेले चार सेशन्समध्ये हे जास्तच दिसून येते. (दोन रिव्हर्स हॅमर्स). मला वाटत सोमवार, मंगळवारच सेशन शॉर्ट टर्म गाईडन्स देईल. रिव्हर्सल ९८० ते १०२६ रेंज मध्ये ट्रेड करायला काहीच हरकत नाही. तु डिलेव्हरी घेणार नसाल तर १००० नंतर कव्हर करा. प्रॉफिट बूक करुन परत विचार करता येईल.

SBI बद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल. चार्ट एकदम फेव्हरेबल दिसत आहे. सोमवार / मंगळवारी मी पण ट्रेड करेन. Happy शॉर्टटर्म साठी मस्त दिसतोय. रेंज १९६० ते १९९० मध्ये बाय, २०४०, २०५० ला सेल. १९१० च्या आसपास शॉर्ट टर्म सपोर्ट लेवल.

ind swift lab - चार्ट ऑल ओव्हर द प्लेस. बहुतेक सटोडिंयाचा आवडता स्टॉक. फायनान्शियली फार काही वाईट नाही पण चांगलाही अजिबात नाही. ओके कॅटॅगरी मध्ये येणारा समभाग. तुम्ही ३०० ते २२ असे अ‍ॅव्हरेज केले आहे. ही रेंज फार मोठी आहे. भावनात्मक दृष्टीने एखाद्या समभागात अडकले ही माणूस ० पर्यंत गेल्यावरही तो शेअर वर जाईल अशी आशा करतो पण ते काही होत नाही. त्यामुळे लॉसेस वाढतात. भांडवल वाढले जरी नाही तरी लॉसेस कट केल्यावर ते कमी होत नाही त्यामुळे असे अ‍ॅव्हरेजींग करु नका असा अनाहुत सल्ला मात्र मि नक्कीच देईन.
बट गुड न्युज इज - तो रेंज बाऊंड आहे, कुठल्यातरी दिवशी परत एकदा तो ७९ टच करेन अशी माझी गटफिलींग आहे. ५८ ते ६० दरम्यान त्याला सपोर्ट आहे. त्यामुळे होल्ड करा. तो वर गेला तर थोडा तरी फायदा तुमच्या अ‍ॅव्हरेज किमतीला होईल.

srei infra - ५९-६० ला मेजर सपोर्ट आहे. तो ब्रेक झाला नाही तर गुंतवू शकता. पण ह्या शेअर मध्ये मला काही प्रिडिक्ट करता येत नाहीये. कारण कुठल्याही पॅटर्न मध्ये हा नाहीये. फंडामेंटल रिसर्च साठी देखील फारच अपूरी माहीती आहे. त्यामुळे काही नक्की सांगता येत नाही.

MANI NDS - मान ग्रूप ईंडिया - फंडामेंटल ग्रोथ तरी चांगली वाटतेय. Q on Q प्रॉफिट चांगले आहेत. पण ५२ विक हायच्या बर्‍याच जवळ असल्यामुळे फार वर जाईल असे वाटत नाहीये. अपसाईड ब्रेक व्हायला तशी काही न्युज असली किंवा खूप ग्रोथ दिसली तर वर जातो पण तसेही आत्ता काही दिसत नाही. त्यामुळे सध्या न घेता ह्यावर लक्ष ठेवा. त्याने जर लोअर साईडला ४९ ब्रेक केला तर परत ४५ वर जाईल. तेंव्हा घेऊ शकता. किंवा फारच आवडला तर थोडे घेउन ठेवा.

अतिशय शॉर्टटर्म साठी शेअर्स सुचविने फार अवघड असते. शॉर्टटर्म मुव्हज केवळ टेक्नीकल असल्यामुळे ते सर्व प्रिडिक्ट करणारे सॉफ्टवेअर त्यासाठी हवे असते. (तसे अनेक आहेत, पण मी वापरतो ते हे सर्व योग्य रितीने सांगत नाही व जे सांगतात ते २,३००० डॉलर्सच्या वर आहेत त्यामुळे घेतले नाहीत. Happy ) त्यामुळे अगदी शॉर्टटर्म साठी आंगने खरच अवघड आहे. पण वेळोवेळी मी मला शॉटटर्म साठी आवडले ते लिहील. मी शेअर्स शॉटटर्म साठी घेत नाही, तर त्या ऐवजी त्यांचे ऑप्शन्स किंवा फ्युचर्स घेतो.

केदार, तुम्ही छान लिहीता आहात. पण काही बेसीक प्रश्न
तुम्ही इतक्या पटापट इतक्या कंपन्यांचे टेक्नीकल आणि फंडामेंटल ऍनालीसीस कसे करता? त्या साठी डेटा कुठून आणता? आणि तो प्रोसेस कसा करता?
महत्वाचे म्हणजे, या पध्दती सिस्टिमॅटिकली कशा शिकता येतील?

तुषार

विश्व जालावतील मराठी जग

Pages