वडापाव भजी गरम!!! (आजची ताजा खबर)

Submitted by छावा on 24 February, 2010 - 05:56

नमस्कार,
मायबोलीवर विविध विषयावर चर्चा होत असते. त्याच बरोबर आपल्या आजुबाजुच्या जगात काही महत्वाच्या घडलेल्या घटना आपल्याला वृत्तपत्र, टिव्ही, रेडिओ वगैरे मिडियातुन कळत असतात. अशा काही महत्वाच्या बातम्यांवर मायबोलीकरांनी आपले मत मांडावे. येथे आपण आपल्याला कळालेली बातमी मायबोलीकरां पर्यंत पोहचवुन त्यावर त्यांची मते जाणुन त्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे वैचारीक देवाणघेवान होऊ शकेल. हा या बीबी चालु करण्या मागे उद्देश.

"वडापाव भजी गरम" असे शिर्षक देण्या मागचा उद्देश असा कि, वडापाव व भजी यांच्या गरम असेल त्यांची चव उत्कृष्ठ असते आणि लोकांना ते आवडते किंवा त्याला भाव असतो. त्याच प्रमाणे बातमी ताजी असेल तेंव्हाच तिचे महत्व असते. म्हणुन "वडापाव भजी गरम"

तर चला आपल्याला एखादी बातमी विशेष वाटली तर चर्चेला घ्या.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल्वे बजेट सादर झाले. ममता बॅनर्जींनी अपेक्षाभंग केला. महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही नाही. रेल्वेच्या परीक्षा आता प्रादेशिक भाषांतही देता येतील. काही नव्या ट्रेन्सची घोषणा. बाकी माईल्स्टोन म्हणावे असे काही नाही. प्रवासी आणि मालवाहतूक भाड्यात वाढ नाही, हाच काय तो दिलासा.

आज दै. पुण्यनगरीत बातमी वाचली, "पुण्यात चेहर्‍यावर स्कार्फ लावण्यास बंदी"
बर्‍याच वर्षापासुन पाहतोय, पुण्यात तसेच इतर शहरात दुचाकी वाहन चालवतांना चेहर्‍यावर स्कार्फ बांधुन (विषेशतः मुली/स्त्रिया) आढळतात. आता हे लोण अगदि लहान शहराही पोहचलय. १३ फेब्रु. पुण्यात झालेल्या बॉम्बस्पोट मुळे अतिरेक्यांना ओळख लपवता येऊ नये म्हणुन हा आदेश पुणे पोलिंसांनी अमलात आणला आहे. आता यामुळे कित्ती लोकांना प्रॉब्लेम फेस करावा लागणार? मुलायम स्किन आता रफ होऊन काळवंडणार का? खरच हा अतिरेकि कारवायांवर याचा आळा बसेल? कि जनतेचा त्रासच वाढेल?

प्रयोग, तुझी बातमी वडा/भज्यासारखी खमन्ग नि चटकदार नाही, अळणी स्याण्डविच/बर्गर सारखी आहे! Biggrin
त्यापेक्षा ती स्कार्फ वगैरेची बातमी बघ! कसा अगदी "जनसामान्यान्च्या जिव्हाळ्याचा" प्रश्न आहे, शिवाय त्यात विषेशतः मुली/स्त्रिया, त्यान्ची काळवण्डू - रफ होऊ शकणारी स्किन अस बरच काय काय चर्चिता येईल ना? मग? Proud
सन्ध्यानन्द वगैरे मधल्या बातम्या लिही रे इकडे, (गुत्त्याबाहेरच्या) चणेफुटाण्याप्रमाणे हातोहात खपतील. Rofl Light 1

>>>> त्वचेची चिंता नै वाट्ट??
नाही, अज्याब्बात नाही!
स्कार्फ गुन्डाळला म्हणून दन्डुका आडवा धरुन मधे येऊन अडवु पहाणार्‍या पोलिसमामाची चिन्ता मला जास्त वाटते! Proud Lol
खर तर, राफा म्हणला मागे तस, गाडिवर बसुन एकादा का तिनी "ल्याण्डीन्ग गिअर" टाकुन मूठ पिळली की........... बस्स, मुक्कामाच ठिकाण आल्याखेरीज पिळलेली मुठ परत जागेवर येत नाही.

सचिन तेंडुलकरने आजच्या वन्डेत नाबाद २०४ धावा केल्या बद्दल अभिनंदन.:)

लिंब्या तुला लिंबीच्या काळवंडणा-या त्वचेची चिंता नै वाट्ट?? >>>>>
उलट आता लिंब्याचा भाव वाढणार, कारण त्वचा आणि आरोग्या करता लिंबु हितकारक आहे ना. Lol

सन्ध्यानन्द वगैरे नको प्लिज! पळतिल सारे. Proud

नाही.. मस्त पेपर आहे.. लोकांना हेल्मेट जास्त बरा (सेफ आणि चांगला) ऑप्शन का वाटत नाही?
अर्थात हेल्मेट मधून पोलिस अतिरेक्यांना कसे ओळखणार हा प्रश्न रहातोच!

अतिरेकी कपड्याच्या आत, जवळच्या पिशवीत इ. शस्त्रे घेऊन येतात.

तेंव्हा यापुढे कुणीहि घराबाहेर येताना कपडे घालायचे नाहीत, व जवळ पिशव्या, इ. काही बाळगायच्या नाहीत. तसेच नेहेमी हात वर करून, मूठ उघडून रहायचे, म्हणजे मुठीत पिस्तुल लपवलेले नाही याची खात्री पटेल.

असे केल्याने अतिरेकी असतील ते चटकन ओळखू येतील.

अतिरेक्यांनी सुद्धा चेहेर्‍यावर गडद हिरवा रंग लावावा, म्हणजे ते ओळखता येतील. हिरवा रंग न लावता अतिरेकीपणा केला तर अटक करण्यात येणार नाही नि तुमच्या रहाण्या, खाण्याची सोय सरकार करणार नाही.

असे कडक कायदे करून अतिरेक्यांना जरब बसेल.

Proud

झक्की!! Lol

Lol

समहाऊ, मला पोलिसान्चे बरोबरही वाटते अन चूकही!
धार्मिक बन्धनामुळे काळा बुरखाधारी स्त्री व त्वचेच्या काळजीपोटी(?) मिचमिचे डोळे तेवढे उघडे ठेऊन बाकि चेहरा झाकुन घेणार्‍या आधुनिक स्त्रीया, दोन्हीन्च्या घोळक्यात अतिरेकी सहज लपुन छ्पुन जाऊ शकतात.
पण असे म्हणले की अन्य व्यक्तिस्वातन्त्र्याची गळचेपी होत असल्याचे आक्षेप येऊ लागतात.
मात्र हनुवटीसहीत पूर्ण चेहरा झाकणारा रन्गित काचेचे हेल्मेट असल्यास आतिल काय दिसते? असे नाही का? मग हेल्मेटसक्ति देखिल उठवणार का? अन नाही, तर मग रुमालावरच आक्षेप का?
रस्त्यावर ऐन घटनेच्या आगेमागे अतिरेकी शोधण्यापेक्षा त्यान्च्या सम्भावित निवासस्थानान्च्या परिसरास पिन्जुन काढणे जास्त सोपे व योग्य नाही का? आजवर किती वस्त्या अशाप्रकारे शोधल्या गेल्याहेत? किती वस्त्यान्वर नजर ठेवली गेली आहे?
अनेक प्रश्न आहेत, अन उत्तरे सापडत नाहित!
वाईट परिस्थिती अशी, की हे प्रश्न "डिपार्टमेण्ट" व "कॉन्ग्रेसी राजकारण्यान्ना" विचारण्याचे धाडस माझ्यात (वा अन्य कुणाच्यातच) नाही. "शेट्टी" बनुन शहिद होणे कुणाला हो आवडेल?

अरे कोणीतरी बाफचा विषयही पाहा रे, आणि त्याला धरुन चाला रे...... Happy

टोयोटा रिकॉलसारखेच इथे ए-स्टार रिकॉल चालु आहे...१ लाख गाड्या परत घेणारेत. आणि विशेष म्हणजे ग्राहकांची तक्रार नाहीये, पण कंपनीला इंजिनपंपाच्या रचनेत दोष आढळला म्हणुन परत घेताहेत.

अर्थसंकल्पाच्या वाचनाच्या वेळी विरोधी पक्षाच्या सभासदांच्या घोषणा व सभात्याग.
<<अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी तुम्ही आक्षेप नोंदवू शकता>> असे त्यांच्या लक्षात आणून देऊनहि त्यांनी सभात्याग केला. हा एकप्रकारे सभागृहाचा, भारत सरकारचा अपमानच आहे.

असे का करतात? जेंव्हा अर्थसंकल्पावर चर्चा होईल तेंव्हा विरोधी पक्षाला आपले म्हणणे मांडायचा हक्कच असतो, नव्हे त्यांनी ते मांडावेत. मग हा आततायीपणा का? हा काय सिनेमा आहे? ही काय शाळेतली, ती सुद्धा juvenile delinquent असलेली मुले आहेत का?

हे काय पुढारी झाले?

मागे महाराष्ट्राच्या विधानसभेत शपथ घेतानाच मारामारी झाली. त्यावेळी काही जणांच्या निवडणूका रद्द झाल्या. मग ज्यांनी त्यांना निवडून दिले होते, की ते विधानसभेत आपले हितसंबंध पहातील, त्या लोकांचे प्रतिनिधि कोण?

कसली लोकशाही, नुसता विनोद आहे.

मला माहित आहे मला भारताच्या राजकारणाशी काही देणे घेणे नाही. पण वाईट वाटते, की हजारो लोकांनी प्राणापर्ण करून स्वराज्य मिळवले, लोकशाही स्थापन केली, एव्हढा चांगला देश, चांगले लोक नि आता त्याचे असे धिंडवडे काढताहेत हे लोक, स्वतःला नेते म्हणवणारे!! कुठल्याहि देशाचे असे झाले की वाईट वाटणारच.

एव्हढेच माझे म्हणणे आहे, वाईट वाटते. संबंधित "नेते" सोडून बाकी कुणाबद्दल मला काही तक्रार नाही.

तरी पण नेहेमी प्रमाणे शिव्या देणारे येऊन मला शिव्या देतील. म्हणजे वाईटाला वाईट म्हणणे सुद्धा यांना चालत नाही!! अजिबात शरम नाही, नुसता फुकाचा अभिमान, आम्ही काय वाट्टेल ते करू!! कुणि बोलायचे नाही!

कसली लोकशाही! गुंडांचा कारभार!! आश्चर्य नाही यांच्यावर अतिरेकी एकामागून एक हल्ले करतात!

बोवाजी जरा चीन, म्यानमार या लोकशाहीची गळचेपी करनार्‍या राजकारण्यांवर/राज्यकर्त्यांवर टीका करायला शिका की. तुम्ही भारतीय नसल्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो. हा देश काय अन तो देश काय. ? कोणावर तरी दुगाण्या झाडण्याचा मागच्या दोन पायांना व्यायाम होण्याशी कारण ....

तो 'प्रसाद' जरा तिकडेही वाटा की. पाकिस्तानतल्या अंतर्गत राजकारणावर टीका करा. उगीच उठसूट भारत. हे म्हनजे घरातून पळून गेलेल्या पोराने चोरून घरापुढून चकरा माराव्यात तसे झाले....

जा जा आपले 'पादकौशल्य' तिकडे दाखवा...

imagesCAG8O23F.jpg

काही झाले तरी भारताबद्दलच मनात सर्व काही वाटते. म्हणूनच असे काही भारतात होते म्हणून वाईट वाटते. इतर देश कुठे नि आपला, एव्हढा एकेकाळी संपन्न, आणि जगात सर्वोत्तम असलेला, ऋषि मुनींचा, पराक्रमी लोकांचा, विद्वान, सभ्य लोकांचा देश कुठे. नि आता ही माकडे नेते म्हणून त्याच देशाच्या लोकसभेचा अपमान करतात!

नि एव्हढा राग करू नका. वाटते मनात कुठेतरी. टीका फक्त वाईटाबद्दल आहे. क्रिकेट टीम उत्तम, भारतातले सृष्टिसौंदर्य उत्तम, काही लोक चांगले. पण बर्‍याच गोष्टी खटकतात. तुम्ही इथल्या मूर्ख लोकांसारखे एकदम तोंडात येईल ते बोलू नका. मनुष्यस्वभाव कळायला एव्हढा सोपा नसतो की चार शब्द ऐकून एकदम त्याचे वर्गीकरंण करावे.
जरा धीराने घ्या.

आज भारतातल्या माझ्या भावाशी बोललो. त्याने सांगितले की काश्मीरमधील शेख अदुल्ला यांचे नातू, यांचे असे म्हणणे आहे की काश्मीरमधऊन ११ हजार भारतीय (?) पाकिस्तानात अतिरेकी हल्ल्याचे शिक्षण घेण्यास गेले होते. पण आता ते पश्चात्ताप पावले आहेत नि भारतात परत येऊ इच्छितात. त्यांच्या पुनर्वसानाची जबाबदारी भारत सरकारने लवकरात लवकर घ्यावी नाहीतर ते अतिरेकी हल्ले करतील. अरे हो, ते येताना शस्त्रे न घेता, नि:शस्त्र, येणार आहेत.

आता या निमित्त काही प्रश्नः
१. येशू ख्रिस्त, महात्मा गांधी, विनोबा भावे, जुनी हिंदू संस्कृति यांचा आधार घेऊन शरण आलेल्यास अभय द्यावे काय? त्यांच्यावर दया करावी काय?
की
२. आजच्या जगातली परिस्थिति लक्षात घेऊन त्यांच्या वर विश्वास न ठेवता, त्यांना येऊ देऊ नये, किंवा येऊ द्यावे नि त्यांच्यावर लक्ष ठेवावे?

बघायला पाहिजे काय करतात भारत सरकारचे लोक? पहिला मार्ग अवलंबला तर, नि या परत आलेल्या लोकांनी खरोखरच अतिरेकी पणा न केल्यास त्यांना भारतरत्न द्यावे? किंवा केला तरी सिद्ध न झाल्यास, लालू प्रसाद, मुलायम सिंग व अरुंधति रॉय या तिघांचे मत विचारात घेऊन व न्यायमूर्ती चौधरी (गोध्रा प्रकरणाची चौकशी करून मुसलमान निर्दोष असल्याचा निर्णय देणारे) यांच्या मते.

दुसरा मार्ग स्वीकारण्यात काहीच गंमत नाही. मग महान भारत नि इतर देश यांच्यात फरक काय? शिवाय आपल्याला चीन, म्यानामार, पाकिस्तान, सोमालिया, सूदान यांच्या सारखे बनायचे आहे ना? मग काही तरी वेगळे म्हणजे समुद्रावर चाचेगिरी, किंवा इतर देशात जाऊन अतिरेकी हल्ले करणे असे करायला पाहिजे ना? नाही, म्हणजे वर कुणितरी तशी तुलना केली आहे भारताची इतर देशांशी, त्यांच्याच यादीतली काही नावे घेतली मी.

म्यानमारमधील लष्करी राजवटीचे काय करावे याबद्दल बोवाजी तुमची अभ्यासू मते ऐकवा ना जरा.त्या अतिरेक्यांचे अन इथल्या सरकारचे काय करायचे हे पहायला आम्ही समर्थ आहोत. आम्हाला मेंदूचे आऊट सोअर्सिंग नको आहे. किंवा गेला बाजार 'केकेके' चे हृदय परिवर्तन कसे करावे याबात तुम्ही उबदार खुर्चीत बसून काही नुस्खा शोधला असला तर तो किमान मांडा इथे.

>>मनुष्यस्वभाव कळायला एव्हढा सोपा नसतो की चार शब्द ऐकून एकदम त्याचे वर्गीकरंण करावे. जरा धीराने घ्या.
अगदी बरोबर,
रॉबीन, तुम्ही अन्य देशांबद्दल जे म्हणत आहात त्यापेक्षा आधी आपण आपल्या देशाचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का ?
झक्कींसारख्या लोकांनी नावे ठेवली तरी, ते म्हणतात त्यात कटू असले तरी सत्य आहे.
वय झालेल्या आजोबांनी नातवंडांना थोडे तिरक्या शब्दात काही ऐकवले तर असे म्हणुन कसे चालेल की तो शेजारचा बाळ्या माझ्यापेक्षा जास्त व्रात्य आहे, त्याला का नाही बोलत ?

महेश तुम्ही झक्कीना, आणि त्यांच्या विचारसरणीला ओळखत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. त्याना काही सुधारणा या देशात करायची असती तर त्यानी अब्दुल कलामांसारखी, नारलीकरांसारखी, माशेलकरांसारखी,भटकरांसारखी इथली धूळ खाऊन, दूषित पाणी पिऊन, इथल्या भ्रष्टाचाराला तोंड देऊन्,इथल्या राजकारण्याना तोंड देऊन , या देशात गाडून घेऊन केली असती ना.अमेरिकन नागरिकांकडून अक्कल शिकण्याइतका अकलेचा दुष्काळ अजून या देशात नाही.

कदाचित तसंही असेल, असो मला जे सरळपणे वाटले ते लिहिले.
पुढील बातमी ... अगदी नविन नाही, पण जुनीही नाही ...

भुकंपाचा धक्का, चिली आणि पेरूला त्सुनामीचा इशारा

<अब्दुल कलामांसारखी, नारलीकरांसारखी, माशेलकरांसारखी,भटकरांसारखी इथली धूळ खाऊन, दूषित पाणी पिऊन, इथल्या भ्रष्टाचाराला तोंड देऊन्,इथल्या राजकारण्याना तोंड देऊन , या देशात गाडून घेऊन केली असती ना.>
अहो कुठे ते मान्यवर, कर्तबगार, हुषार लोक नि कुठे मी! भारत कसला सुधारतो मी? स्वतःचे पोट भरणे पण शक्य होणार नाही हे कळल्यावर चक्क पळून आलो इकडे. अक्कल मी काय शिकवणार भारतीयांना?

सगळेच काही एव्हढे थोर नसतात. पण म्हणून वाईट वाटू नये का?

शिवाय नेहेमी प्रमाणे तुम्ही माझे काय चुकले आहे का ते सांगण्या ऐवजी, नुसते नावे ठेवू नका असे लिहीले आहे. जे काय चुकीचे लिहीले असेल ते सांगा, मी सुधारून लिहीन.
जे चालले आहे ते बरोबर वाटते का तुम्हाला? नेते म्हणवणार्‍यांनी असे वागायचे? गुंडगिरी करायची? ती सुद्धा विधानसभेत नि लोकसभेत? ती कय गावातली पारावरची सभा वातली का? तिथे सुद्धा सभ्य लोक असे करत नाहीत. काही सभ्यता? त्यांची बाजू घेता तुम्ही? त्यांना नावे ठेवली तर तुम्हाला राग येतो? कबूल नाही करता येत, की त्यांचे चुकले?!
मग म्हणाला असतात की आम्ही सुधारून घेऊ, तुमची मदत नको तर गप बसलो असतो.

>>>>> मनुष्यस्वभाव कळायला एव्हढा सोपा नसतो की चार शब्द ऐकून एकदम त्याचे वर्गीकरंण करावे.
जरा धीराने घ्या.<<<<
सपशेल चूक बोवाजी!
महम्मद तुघलकाच्या पासून, वा त्याचेही आधीपासून विशिष्ट धर्म/पन्थ यान्च्या उदयामुळे मनुष्यस्वभाव समजण्ञात जी घोडचूक झाली पूर्वजान्च्या हातुन त्याचेच तुम्ही उघड समर्थन करताय!
असो
या बाबीन्वर जाहिरपणे स्पष्ट पणे बोलणे इष्ट नव्हे

आजची ताजा खबर,
आज पहाटे चार वाजता उठून, पाच पर्यन्त आवरुन, साडेपाचला किल्ले पान्डवगड चढायला सुरुवात केली, साडेसहापर्यन्त एक तासात तो गड कसातरी रडतखडत सर केला, पण केला! सुर्योदय गडावरुन बघितला, नि पुन्हा आठ वाजेस्तोवर गड उतरलो देखिल! Happy
वरील एका वाक्याची सहस्र वाक्ये बनवु शकतो मी, बनवु का? Wink

हे पान सुरु करण्यामागे वर जो उद्देश लिहिला आहे, त्याच साठी कानोकानी.कॉम ची सुरुवात केली आहे. अशा सगळ्या बातम्या कानोकानी.कॉम वर त्यांचे दुवे देऊन तिथे त्यावर चर्चा करावी असे अपेक्षित आहे. तिथे वेगळे सभादत्व घ्यावे लागत नाही इतकेच काय तर इथे लॉगीन केले असले तर तिथे आपोआप लॉगिनही होते. तेंव्हा हे पान बंद करतो आहोत आणि पुढील चर्चा कानोकानीवर प्रत्येक बातमीची वेगळी लिंक देऊन सुरु ठेवता येईल.
http://kanokani.maayboli.com/