बघारे बैंगन

Submitted by सायो on 10 February, 2010 - 14:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक, दोन वांगी, तळायला आणि फोडणीला तेल, मोहरी,कढीपत्ता, गुळ, चिंचेचा कोळ (साधारण १,२ टीस्पून), आलं-लसूण पेस्ट (एक टिस्पून प्रत्येकी), मसाल्याकरता: किसलेलं सुकं खोबरं, जिरं,सुक्या लाल मिरच्या (चवीप्रमाणे),धणे आणि तीळ-कोरडे भाजून, शेंगदाणे- भाजून,२ ,३ लसूण पाकळ्या (मसाल्याकरताचे सगळे जिन्न्स साधारण एक-एक टेबलस्पून घ्यावेत), फ्रेश क्रीम साधारण अर्धी,पाव वाटी.
वरुन कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

वांग्याचे करंगळीएवढे लांब, उभे काप करुन तेलात तळून घ्यावेत. एकीकडे मसाल्याचे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावेत. थोडं पाणी घालून पेस्ट केली तरी चालेल.
पातेल्यात तेल गरम करुन मोहरी आणि भरपूर कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यावर तळलेली वांगी घालावीत. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून नीट ढवळून घ्यावं व झाकण घालून एक वाफ काढावी. त्यावर वाटलेला मसाला घालून पुन्हा नीट मिक्स करुन घ्यावं. ह्यात चिंचेचा कोळ /पल्प व गुळ घालावा. वरुन फ्रेश क्रिम व कोथिंबीर घालून पुन्हा झाकण घालून वाफ काढावी व गरम गरम खावं.

वाढणी/प्रमाण: 
२,३ जणांकरता
अधिक टिपा: 

ह्यात टोमॅटो प्युरी घालूनही छान लागते. बाकी मसाला तोच.आमच्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये ही भाजी 'बघारे बैंगन' ह्या नावाने मिळते म्हणून हेच नाव दिलंय.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण, संजीव कपूर, आणि जवळचं देसी रेस्टॉरंट.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
कृती इन्टरेस्टिंग आहे - << इथे तळून वांगी - वजन अशी कमेंट होती. खास लोकाग्रहास्तव काढली आहे.. जर तुम्हाला 'तळून' 'वजन' असे शब्द इथे दिसले- तर ताबडतोब डोळ्याच्या डॉक्टरांची भेट घ्या >> Proud

तळून म्हणजे डीप फ्राय नाही करायची. शॅलो फ्राय. थोड्या तेलावर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची.

इथे मी दिलेली हीच रेसिपी आहे, जरा वेगळी आहे. यात क्रीम, शेंगदाणे नाहीत. जुन्या मायबोलीत आहे तेव्हा IE मध्ये पहावे लागेल कदाचित.
हैद्राबादी बघार बैंगन

सायो.. इंटरेस्टींग वाटतय... साउदी रे. मधे गुंगुरा की काहितरीची भाजी असते.. ती पण अशीच करत असावे बहूदा..

नानबा..
आठवडाभर काही आबर-चबर न खाता फक्त "हेल्दी-फुड" असलेला आहार घेतला.. नियमितपणे व्यायाम केला.. तर रविवारी लंचला २ किंवा ३ पोळ्यांबरोबर पुरेल एव्हडी तळलेल्या वांग्यांची भाजी खाल्ली तर काय फरक पडणारे वजनात ?????? Uhoh रोज रोज कुठे खाणारे ती ?? Happy

आठवडाभर काही आबर-चबर न खाता फक्त "हेल्दी-फुड" असलेला आहार घेतला
>> तेच करते - आठवड्यातून अंदाजे ५ दा तास तास भर व्यायाम पण करते.. पण दोन दिवस जरी ह्या रुटीन मध्ये बदल घडला तरी दृष्य फरक जाणवतो माझ्यात (मेटाबॉलिझम जोरदार कमी आहे!)
Sad
जाऊदे.. तुम्ही खा.. माझ्याकरता "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" तशी वांगी आंबट Wink

सिंडी, वांगी तळून जास्त चांगली चव येते असं वाटतं.
नानबा, अर्धी वाटीच भाजी खायची असं ठरवून खाल्लंस एखादा दिवस तर काही हरकत नाही ग.

सायो, मस्त रेसिपी. आज छान छान रेसिपीजचा स्नोफॉल होतोय अगदी इथे Happy
नानबा, तू सव्वा माणसांना पुरेल एवढी भाजी कर. एक भाग नवर्‍याला खाऊ घाल आणि पाव भाग तू खा Proud

आणखीन एक छान (न खाताच छान असेल हे ठरवलंय) रेसिपी टाकायचा विचार आहे. पण त्याकरता फोटो स्कॅन करावा लागेल.

मस्त वाटतेय गं. नक्की करणार. धन्यवाद सायो.
लालु शॅलो फ्रायची आयडिया बेस्ट. तसंच करणार. वांगी तळायची हिम्मत नाही. Sad

यावेळी मुद्दाम लहान वांगी मागवते. इकडे ती हीssssमोठी भरताची वांगी मिळतात.
करून बघते.छान वाटतेय, वेगळी.

बघा रे बैंगन......... सायो तुम्हाला सगळ्यांना बैंगन नुसतेच बघायला सांगते आहे.. कशाला उगाच वजन वाढण्याच्या गोष्टी करताय... आणि नुसते बघूनच वजन वाढणार असेल तर मात्र कठीण आहे हो...

Pages