हाफ डोम

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काही वर्षांपुर्वी असच काहीतरी लिहिल होतं की खूप कंटाळा आला आहे. आणि आयुष्य म्हणजे नुसत रहाट्गाडगग्याला जुंपल्यासारखं वाटतं आहे. त्यात एक मी लिस्ट पणं टाकली होती की पुढच्या काही वर्षात मला हे हे सगळ करायच आहे. सगळ तरी नाही जमल तरी काही गोष्टी केल्या. म्हणजे लिस्ट मधे नसलेल्या देखिल काही गोष्टी केल्या जसं लग्न :P, नोकरी बदलणे, घर घेणे वगैरे.. हाफ डोम त्याच लिस्ट मधे होता.
समीरची हाफ मॅरेथॉनची पोस्ट बघून वाटल आपण पण ही पोस्ट टाकावी. हाफ डोमची.. मागच्या फॉल मधे हाफ डोम चढायचा ठरवला तेंव्हा एप्रिल पासून हायकींगची प्रॅक्टीस सुरु केली. हाफ मॅरेथॉन मुळे पण फायदा झाला. स्टॅमिना मस्त वाढला होता. पेस घालवायची नाही म्हणून हायकिंग दर रविवारी सुरु केले. आजुबाजूच्या ट्रेल्स ,डोंगर सगळ चालून, चढून झाल. तरी हाफ डोम बद्दल भयंकर गोष्टी वाचल्यामुळे असेल मला भितीच वाटत होती. आमचा ६ जणांचा ग्रुप होता. त्यातल्या दोघानी हाफ डोम २-३ वेळा चढला असल्याने ट्रेलची पुर्णपणे माहिती होती. त्यामुळे ती माहिती गोळा करायची गरज नव्हती.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हाइक करायच अस ठरल. त्याप्रमाणे आदल्या दिवशी टेंटस घेउन करी व्हिलेजला पोचलो. निघताना नेहमीप्रमाणे थोडा उशीर झाला त्यामुळे पोचलो तेंव्हा almost रात्र झाली होती. एकदा Happy Isles ची ट्रेल डॉळ्याखालून घालायची होती पण ते काही जमल नाही. रात्री मस्तपैकी जेवण करून लवकर झोपलो कारण पहाटे लवकर निघायच होत.पहाटे उठून कपडे बदलून, बुटस, कमरेला २ पाण्याच्या आणि एक गेटोरेडची बाटली बांधली. गळ्यात सेलफोन अडकवला. हो सेलफोन वरती चालतो म्हणे :d
कमरेला फ्लॅशलाईट अडकवला. थोड खाऊन निघालो अजून अंधारच होता तसा. साधारण अर्धा तास चालल्यावर नेवाडा फॉल्सच्या ट्रेल पाशी आलो, सप्टेंबर मधे फॉल इतक्या फोर्स मधे नसतो म्हणून आम्ही Mist trail घेतली.फक्त चार एक माइल असली तरी स्टीप क्लाइंब. नंतर योसोमीटी व्हॅली ट्रेल .. थोड्याशा ब्ब्रेक नंतर साधारण सरळ सरळ सात आठ माइल्स चाललो मग परत स्टीप चढ , स्टीप पायर्‍या टाईप ट्रेल नंतर त्या फेमस केबल्स पाशी पोचलो. त्या केबल्स खरच भयंकर आहेत. मी सरळ माघार घेतली होती. पण थोडी विश्रांती झाल्यावर आता इतक आलोच आहोत तर मग उरलेल पण विचार करून निघालो. आम्ही आमचे स्वतःचे ग्लोव्ह्ज आणले होते. ४०० फुट उंच चढ आणि त्यात लाकडाच्या फळ्या आणि त्या दोन केबल्स. ओके त्या ट्रेल मधे मी १०-१३ वर्षंची लहान मुलं देखिल बघितली पण मी तरीहि शुअर नव्हते. कोणाचा हात निसटला आणि मागे घसरला तर मागची सगळीच पडतील असा काहिसा सीन. पण एकदा चढायला लागल्यावर मात्र समोरच्या र्रॉक नजर ठेवायची आणी हळूहळू वर जायच. सोप्प नाही आहे. पण impossible पण नाही. एकदा वर गेल्यावर मात्र it's amazing.
cables.jpg
View from the top of the cables.

halfdome.jpgnevada.jpg
up near nevada falls - 2200 foot climb

there.jpg
We are there..

विषय: 
प्रकार: 

मस्त !! सध्या सगळे माबोकर खूपच अ‍ॅक्टीव झालेले दिसतायत Happy
समिरची मॅरॅथॉन, यो चे ट्रेक्स, चंदनची भटकंती..आणि आता हाईक..

खूप मस्त.. Happy

सही! हाफ डोमचा ट्रेक भन्नाट आहे. शेवटचा सरळसोट उभा कडा चढताना चांगलीच दमछाक होते, पण वर पोचल्यानंतर दिसणारं दृश्य अ प्र ति म आहे. गेल्या वर्षी तिथे ट्रेकला गेलो असताना, अर्ध्या वाटेवर थांबून काढलेला हा फोटो -

Half_Dome_081508 054

बाकी अलीकडेच वाचलं की वाढत्या गर्दीमुळे सुट्ट्यांच्या दिवशी हाफ डोमसाठी परवाना पद्धत लागू करण्यात आली आहे.

धन्यवाद सर्वांना..
हो ट्रेक जबरदस्त आहे. थोडा अवघड आहे. शेवटचा चढ फारच. पण वर गेल्यावर मात्र खूप सही वाटते. ह्या वर्षी पण जायचा विचार आहे.
नंदन फोटो मस्त आहे. हो ऐकल मी पण की परवाना काढायला लागणार. जर समज सप्टेंबर मधे जायच तर मे मधेच घ्यावा लागेल वगैरे.
भाग्य काय माहित :p वर गेल्यावर विसरूनच गेले रेंज बघायचे. एकतर त्या केबल्सपाशी पोचल्यावर फोन गळ्यातून काढुन सरळ बॅगपॅक मधे टाकला.
ट्यु Happy हो .. ही नविन मायबोली अजून सरावाची होतच नाही आहे पण Sad

छान ग रचना. मला वाटलं तू चित्र वगैरे काढून टाकलं आहेस ह्या नावचं.
बाकी, पग्याशी सहमत.

wow !!

सिंडी , सीझन मे पासून सुरु होतो आणि साधारण ऑक्टोबर च्य सुरुवातीला त्या केबल्स काढून टाकतात. आम्ही साधारण सप्टेंबर च्या सुरुवातीला गेलो होतो. थोडी गर्दी कमी असते. पण जुन जुलै मस्त. फॉल्स एकदम मस्त दिसतात.