बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

please माननीय तज्ञांनी, अनुभवी मंडळीनी लवकरात लवकर मदत करावी, हि अपेक्षा. घाईबद्द्ल क्षमस्व.

हाय शिल्पा,
बाळ ६ महिन्याचा आहे ना मग १ सफर्चन्द रोज हे मला जास्त होतय असे वाटतय. १ दिवस आड आणि आर्धे दे.सफरचन्दाने रोज खाउन बाळाला कोन्स्टीपेशन होउ शकते. त्या ऐवजी तू मुगाच्या आणि तान्दूळाची मउ खिचडी भाज्यान्चे सूप अशी थोडी थोडी सुरवात कर.
तोन्डाने फुर्र आवाज करण हे खेळण आसत बाळाच त्याला आवडत ,नवीन काहीतरी आवडतय असच लक्शण असत त्यात. आणि लाहान मुलाना शूच्या जागी हात लावण हे ही खेळ वाटतो.
फक्त त्याला डायपर राश किवा इतर काही स्किन प्रोब्लेम नाही हे पहा.
शी च्या जागी हात लावत असेल किवा खाजवत असेल तर ते जन्त झाल्याचे ही लक्षण आसू शकते.

सुनीता,
मसुरीच्या डाळीचे पीठ करायचे घरच्या मिक्सर वर्(जरा जाडेभरडेच)आणी उटण्या सारख दुधात मिसळुन लावायच आणि चोळून लगेच काढायच.

शिल्पा,

तोंडाने फुरफुर आवाज काढण हा लहान मुलांचा खेळ आहे त्यामुळे अजिबात काळजि करु नकोस. माझ्या मुलाने पण तो सहा महिन्यांचा असताना हे सुरु केल(आता तो ९ महिन्यांचा आहे), काहि दिवस करुन मध्ये सोडुन दिल. आता परत सुरु केलय पण तो व्यवस्थित आहे एकदम आजारि वगैरे काहि पडला नाहि.

आणि शु च्या जागि हात लावण पण एकदम नॉर्मल आहे, ह्या वयात हातांवर आलेला कंट्रोल आणि कुतुहल ह्याचा एकत्रित परिणाम आहे थोडे दिवसात आपोआप जाइल, मात्र तोषवि ने म्हंटल्याप्रमाणे त्याला तिथे रॅश्/खाज नाहिये ना त्याचि खात्रि करुन घे. बाकि दोन्हि गोष्टित काळजिचे काहिच कारण नाहि.

.

.

दिनेशदा, अश्वीनी..आणी इतर..
बाळांसाठी, किंबहुना सगळयांसाठी गायीच्या दुधाचं दही लावुन काढ्लेल लोणी आणी मग तुप चांगलं असं म्हणतात. मुंबईत चांगल गायीच दुध कुठे मिळेल? ज्यातुन लोणी येईल?. आम्ही गोकुल वापरल आहे. पण त्यात लोणी नाही येत जास्त..

माझ ७ म बाळ साध(उकळुन थंड केलेल) पाणी अजिबात प्यायला बघत नाही, त्यात थोडी साखर नी किंचीत मीठ घालुन दिले तरच तो पीतो नाही तर नाही पीत. तर त्याला कशी सवय लावु रोज साध पाणी प्यायची जरा सुद्धा तो तोंडात घेत नाही जबरदस्तीने द्यायला गेल तर रडुरडुन हैराण होतो. मग नाही धीर होत आणखी त्रास द्यायचा पाणी नाही जात पोटात त्यामुळे पोट साफ होत नाही शी पण घट्ट होते नी मग कीर्कीर वाढ्ते. आणखी कोणत्या प्रकारे देता येइल?

माझ्या ८ महिन्याच्या बाळाला दुधातुन (गायीच्या), खिमटीतुन किंवा इतर अन्नातुन रोज MTR च इन्स्टंट मिक्स बदाम ड्रिंक (पावडर) दिले तर चालेल का? उकडलेले अंडे दिले तर चालेल का नी चालत असेल तर कसे द्यावे?

माझ्या बाळाच्या चेहर्‍यावर बारीक पुरळ आली आहे घामोळ्यासारखी, खासकरुन ओठांच्या बाजुला (पुर्ण हनुवटी) नी कपाळावर गेले १५-२० दि. मी त्याला दुधाची साय नी आंबेहळद आंघोळीच्या वेळी लावते पण काही फरक नाही , johnson चे बेबी लोशन ही लावतेय पण त्याने ही काही फरक नाही, काय लावता येइल आणखी? त्याची चेहर्‍याची त्वचा खुपच कोरडी झाली आहे. प्लीज काही सुचवा. माझ्या आधीच्या पोस्टमध्ये विचारलय तस तो पाणी खुपच कमी पितो जवळ जवळ नाहीच म्ह्टल तरी चालेल, त्यामुळे पोट साफ होत नस्ल्यामुळे तर चेहर्‍यावर पुरळ आली नसेल ना?

शिल्पा मी माझ्या मुलाला अधुन मधुन प्रून ज्यूस देत असे पोट साफ होण्यासाठी. पण हे तू आधी डॉ. ला विचार. त्याला बदामाच्या तेलाने मालिश कर. कोरड्या त्वचेसाठी. व्हॅसलिन पण लाऊ शकतेस. मधे मी johnson च्या बेबी प्रॉडक्ट्स बद्दल बरेच उलट सुलट वाचले होते, तेंव्हापासून मी johnson चे प्रॉडक्ट्स वापरणे सोडून दिले होते. मुलाला ड्राय स्किन चा प्रॉब्लेम असल्याने डॉ. ने johnson सोप सुद्धा वपरू नका असे सांगितले होते. त्या ऐवजी अवीनो किंवा सेटाफिल वापरणे चांगले असे सांगितले होते.
पुरळ नक्की कशाने येते मी नाही सांगू शकत, पण बाळाचे पोट साफ होणे खूप महत्त्वाचे आहे.
असे पाणि पीत नसेल तर सूप वगेरे देऊन बघितले आहेस का?

ड्राय स्किन नसेल तरी लहान मुलांना johnson सोप वापरू नका अस माझ्या डॉ ने सांगीतल होत. मी पण अवीनो वापरते.
स्किन खूप ड्राय असेल तर aquaphore पण चांगल आहे.
माझ्या मुलाला मी थोड ओव्याच पाणी द्यायचे. एक चिमूट ओवा ग्लासभर पाण्यात टाकायचा आणी त्यातलं ओव्याचं पाणी १ चमचा आणी बाकी साधं पाणी अस मिक्स द्यायचे. ( आधी तू हे पाणी टेस्ट कर खूप तिखट वाटल तर अजून साधं पाणी घाल)

मी डव सोप वापरते त्याला थंडी चालु झाल्यापासुन पण पुरळ आताच १५-२० दि. दिसत आहे अवीनो , aquaphore सोप आहेत का? मेडीकल मध्ये मिळतील ना? आंघोळ घालणारी वॅसलीन लावत होती मी नको म्ह्ट्ल त्यावर लिहीलेल असत ना ३ वर्षाखालील मुलाना नको म्हणुन. तरी चालेल का लावल तर?

ओवा नुसताच टाकायचा की ते पाणी उकळवायच? १ म. पुर्वी त्याला युरिन इन्फेक्शन झाले होते तेव्हा त्याला डॉ ने पाण्यात चिमुट्भर साखर नी मीठ टाकुन द्यायला सांगितले होते त्यामुळे आता तो नुसत साध पाणी पितच नाही, शी एकदम घट्ट करतो , गोट्यांसारखे छोटे छोटे खडे टाकतो थोड्या थोड्या वेळाने. काही सुचत नाही काय करु. खिमट बरोबर फार तर अर्धी पाव वाटीच पाणी अगदी जबरदस्तीने पितो. बाकी नाहीच.
बाकी तो अ‍ॅक्टीव आहे.

शिल्पा, साधारण मध्यम आकाराच्या पातेल्यात अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून बाळंतशोपा भरडून टाक. एक दोन उकळ्या आल्या की बंद कर. गाळून पाहिजे तर किंचीत साखर घाल. तू चाखून बघ. चव औषधासारखी वाटली तर थोडं कोमट पाणी मिसळ. गार गरम पाणी एकत्र करू नकोस. पुढच्या वेळेस ओवा किती टाकायचा ह्याचा अंदाज येईल तुलाच. फ्लेवर्ड वॉटरप्रमाणे चव आली पाहीजे. त्याच्यापेक्षा स्ट्रॉन्ग नको. हे दिवसभर देत जा.

साळीच्या लाह्यांचे पाणी पण अश्याच पद्धतीने करून दे.
झोपताना गरम दुधात थोडे तूप घालून दे.

धन्यवाद अश्विनी, बघते करुन.
साळीच्या लाह्या म्हणजे आपल्या नेहमीच्याच का? पॉपकॉर्न वाल्या की वेगळ्या असतात?
मी त्याच्यासाठीचे दुध असे तयार करते यात काही चुक किंवा आणखी काय टाकता येइल ते सांगावे.
पाणी नी दुध २:१ प्नमाण कारण दुध खुपच जाड असत. त्यात अर्धा चमचा (सुंठ पावडर, साखर) नी ८-१० वावडिंगचे दाणे. नी कधी कधी जायफळ पुड (रोज नाही).
खिमट- तुपात जिरेपुड, ओवापुड, हींग, हळद ची फोड्णी, मग मुगडाळ्-तांदुळाची भरड जरा परतवुन मग पाणी, मीठ, सुंठ्पावडर, गुळ नी कधी कधी जायफळ पुड. लापशी इतपत जाड करुन भरवते.
नाचणी सत्व तुपात जरा परतवुन दुधात शिजवुन देते.
कधी उकड्लेल्या अंड्यात्ले पिवळे, वेलची केळे दुधात घालुन मिक्सर्ला लावुन, उकड्लेला बटाटा.
यात काही गैर आहे का? मी चुकत तर नाही ना असल्यास प्लीज सांगावे..........
आणखी काय काय देउ त्याला.

<<<माझ्या ८ महिन्याच्या बाळाला दुधातुन (गायीच्या), खिमटीतुन किंवा इतर अन्नातुन रोज MTR च इन्स्टंट मिक्स बदाम ड्रिंक (पावडर) दिले तर चालेल का? उकडलेले अंडे दिले तर चालेल का नी चालत असेल तर कसे द्यावे? >>>
याही प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे.............

अमेरिकेत तरी वर्षाच्या आत अंडे देऊ नका म्हणतात. गाजर, पालक, रताळे, सफरचंद, भोपळा, पीच, पेअर हे सगळे प्रकार उकडून मॅश करून देता येतील. नवीन प्रकार देताना थोडासा देऊन पहा. रोज वेगवेगळा नवा प्रकार देउ नका - मधे ५-७ दिवसांची गॅप असू द्या.

बदाम पावडर घरीच बनवुन देता येइल की. इथे वर्षाचा होइतो पोल्ट्री/फिश देऊ नका असे सांगितले होते.

शिल्पा,
मला वाटतं कि त्याच्या आहारामध्ये पाणी आणि भाज्या,फळे वाढवून बघ.फरक पडेल.वर मेधाने लिहिलय तश्या भाज्या,फळे द्यायला हरकत नाही.एखाद वेळेस पाणी पीत नसेल तर ज्यूस/सूप देऊन बघ.
पाणी प्यायला सिपी कप/स्ट्रॉ असलेला ग्लास आणून बघ. नविन गोष्ट बघून मुले कधी कधी त्या नादात नीट खातात-पितात.
जायफळा बद्दल नक्की माहित नाही पण त्यामुळे शी घट्ट होत असेल. जाणकारांना विचार एकदा.

शिल्पा, सगळ्यात प्रथम ते जायफळ बंद कर. तिथेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जायफळ हे स्तंभक असते. म्हणजे अतिसार(जुलाब) होत असतील तर मलावष्टंभक (मलाला घट्टपणा आणणे) ह्यासाठी जायफळाचा उपयोग करतात.

बाकी ठीक आहे. सुंठ पण जास्त होत नाहीना ते पाहा. त्याला सर्दीचा इ. त्रास नसेल तर रोज देण्याची आवश्यकता नाही. सर्दी, खोकला असेल तेंव्हाच दे.

MTR च इन्स्टंट मिक्स बदाम ड्रिंक (पावडर) पेक्षा सिंडीने सुचवल्याप्रमाणे घरी केलेली बदाम पावडर दे. पण थोडे दिवस थांब. त्याचं शीचं सुरळीत झालं की मग द्यायला लाग. बदाम जड पडू शकतो.

शिल्पा,
माझेही बाळ ८ महिन्याचं आहे. त्याला मी बदाम पावडर घरीच बनवुन खिमटीत्/रव्याच्या पेजेत देते.
त्याच्या नविन सिप्पी कप ने तो चांगला पाणी पितो आहे.

शिल्पा, बटाटा आणि मूगडाळ वगळून बघ एक दोनदा.
मेधाताई म्हणतेय त्याप्रमाणे बदाम भिजवून उगाळून वेढे करणे. त्यात Lion's date syrup चा एक थेंब घालून चाटव.
बरं माझा प्रश्न, सिप्पी कपची सवय कशी करू. पाणी वर ओढता येत नाही म्हणून चिडचिड होत्येय कप घेता बरोबर.

चिन्नु,
माझ्याकडे दोन सिप्पी कप आहेत. पण माझी लेक एकाच कपने पीते दुसर्‍या कपातुन नाहि.म्हणुन मी स्वता एकदा तो कप वापरुन पाहिला तर कळल की त्यातुन प्यायला आपल्यालाच जोरात ओढावं लागतयं. तस होत नाही ना ते बघ.

माझ्या पावणेतीन वर्षाच्या मुलीला खोकला झालाय. तिला अदुळसा सिरप डायल्युट करुन दिल तर चालेल का? लगेच उतर द्या प्लिज.....

Pages