मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मदत्_समिति,

साधारण एक वर्षभरापुर्वि आहारशास्त्र विभागात कुणितरि 'स्पॅनिश फ्लॅन' हि पाककृति टाकलि होति, ती मला आता मिळत नाहिये, शक्य असल्यास लिंक देणार का?

मदत समिती,
मी आताच एक लेख ललित प्रकारात प्रकाशीत केला आहे. त्याचं नांव देवभूमी कोकणसय २.
पण मला तो 'नविन लेखन' मध्ये दिसत नाहीये. आपली मदत लागेल. Happy
धन्यवाद..

अद्याप मायबोलीवर doctor हा शब्द व कुणाच्याही पत्नीचे नाव लिहीण्यापुर्वी मिसेस ला पर्यायी मराठी शब्द कसा लिहावा हे समजले नाही.

नितिन,

डॉक्टर = DOkTar

मिसेस ला पर्यायी श्रीमती, सौ., इत्यादी शब्द वापरु शकाल, हे लिहायला सोपे आहेत.

किरु, लेख प्रकाशित झाल्यावर तो पहिल्यांदा जेव्हा सेव्ह केला होता (अप्रकाशित असला तरी) तीच तारिख दिसते. तेव्हा तसे शोधून पाहा. नाहीतर लेखात काहीतरी छोटा बदल करुन बघ. वर दिसेल.

नितीनचिंचवड,
तुम्ही लेखन सेव्ह करतांना अपूर्ण हा पर्याय निवडून मग सेव्ह पर्याय वापरला होता की नुसताच प्रतिसाद तपासा पर्याय वापरून पान बंद केले गेले? सेव्ह पर्याय वापरला असेल तर तुम्हाला तुमच्या माझे सदस्यत्व>> पाऊलखुणा >> फक्त लेखन मध्ये तुमचे अपूर्ण लिखाण मिळेल.
- मदत समिती

नमस्कार गौतम७स्टार,

"भटकंती" या विभागातील "प्रवासाचे अनुभव" या उपविभागात तुम्हाला नवीन पान उघडून लिहिता येईल.

मायबोलीवरील विषयानुसार हितगुज बघण्यासाठी हा दुवा वापरावा.

धन्यवाद.

मला फारसा प्रतिसाद मिळत नाही. मायबोली सद्स्यांनी वाचले पण प्रतिसाद दिला नाही असे किती सदस्य ? हे समजण्याची काही सोय आहे का?

मदत्_समिति,
मला माझी काहि प्रकाशचित्रे प्रदर्शित करायचि आहेत पण मी वेब पेज चि लिंक message body वर (text space) paste केल्यावर त्या लिंक वरचि प्रकाशचित्रे दिसत नाहित. मी तात्पुरते एक प्रकाशचित्र लिंक paste करुन प्रदर्शित केले पण मला ते प्रकाशचित्र नाहि दिसले. फक्त मजकूर दिसला.
मला मदत मिळू शकेल काय?
आभारी आहे,
चंदन

नितीनचिंचवड,
तुमचे लेखन किती जणांनी वाचले हे समजण्याची सोय उपलब्ध नाही.

सुप्रिया,
तुम्हाला कशा प्रकारची माहिती अपेक्षित आहे? तुम्ही अ‍ॅडमिनना "गद्यलेखन" विभागात या विषयावर नवीन धागा उघडण्याची विनंती करू शकता.

chandan,
वेबपेजची लिंक इथे देऊन ती चित्रे दिसणार नाहीत. प्रकाशचित्रे कशी द्यावीत यासाठी मदतपुस्तिकेतील हा दुवा पहा.

धन्यवाद.

मदत्_समिति,
आत्ताच प्रदर्शित झालेल्या एका प्रकाशचित्रावर मी जेव्हा "right click" करून "properties" वर "click" केले तेव्हा मला खाली दिलेलि लिंक दिसली:
http://lh4.ggpht.com/_2HkThZVPTto/S1_yE0dRX2I/AAAAAAAACNg/TyY1F2B7_IY/s6...

मग ह्याचा अर्थ हे प्रकाशचित्र एका website वरुन घेतले आहे असा होतो का?

धन्यवाद,
चंदन.

कोणी मला 'कविता', 'काव्यधारा' आणि 'काहीच्या काही कविता' यातील फरक सांगू शकेल काय? कारण सगळीकडे सगळे चालते असे मला आजकालच्या कविता वाचून वाटते आहे. Light 1

शरद

chandan,
इतर संकेतस्थळावरील प्रकाशचित्र इथे देण्यासाठी तुम्ही img टॅग वापरू शकाल. याचा वापर खालीलप्रमाणे करावा. परंतु असे करताना कोणत्याही कॉपीराईट नियमांचा भंग होणार नाही याची कृपया काळजी घ्या.

उदाहरणार्थ खालील img टॅग < व /> या चिन्हांमधे लिहिला तर त्या दुव्यावरचे प्रकाशचित्र दिसेल.

img src="http://www.worldwildlife.org/species/photography/Tiger%20Album/WWFImgFul..."

मदत्_समिति,
मी प्रकाशित केलेल्या प्रकाशचित्रांपैकी एक प्रकाशचित्र (लिंक) मुख्यपृष्ठावर कसे आणावे या बद्दल मार्गदर्शन मिळेल काय?
धन्यवाद.
चंदन

चंदन, मुख्यपृष्ठावर काय दाखवायचे याचा निर्णय अ‍ॅडमिन घेतात. त्यांना विनंती करु शकता.

अ‍ॅडमिन,
मी प्रकाशचित्रे ह्या सदरामध्ये "अतुल्य भारत" हि एक मालिका सुरु केलि आहे. मी आजपर्यंत जे काही भारतभ्रमण केले आणि त्यामध्ये जी काही प्रकाशचित्रे काढ़लि ती येथे प्रदर्शित करण्याचा माझा मानस आहे. माझी आपल्याला नम्र विनंति आहे कि कॄपया माझ्या प्रकाशचित्रांची लिंक मुख्यपृष्ठावर लावावि.

धन्यवाद.
चंदन

काहि दिवसांपासुन मी गुलमोहरच्या काहि विभागात मराठीत प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो पण प्रतिसाद इंग्रजीत टाइप होत आहे. Sad सध्या मी "नवीन लेखन" मध्ये टाईप करुन ते प्रतिसाद मध्ये पेस्ट करत आहे:(.
मदतपुस्तिकेत जे काहि टाइप केले ते मात्र मराठीतच Happy पण प्रतिसाद देताना ते इंग्रजीमध्ये येत आहे.

Pages