उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ऑरिफ्लेमच्या सीइंग इज बिलिव्हिंग आणि झोपताना डोळ्यावर दुधाच्या घड्या याचा उपयोग होतोय असं वाटतंय.
सलग कॉम्पवर असाल तर अधून मधून ब्लिंक करणं, जाग्रणं व दारू कमी/ बंद करणं, या गोष्टींचाही उपयोग होतो.

ओके, पण दारु वगैरे प्यायल्याने जस डोळे खालच्या बाजूने सुजल्यासारखे दिसतात तस हे नाहीये. डोळ्यांच्या आतल्या टोकापासून नाक आणि डोळे ह्यांच्या मध्ये अस फुगल्यासारख दिसतय. आत्तापर्यंत हे सकाळी उठल्यावरच दिसायच पण आता दिवसभर... दुधाच्या घड्या वापरुन बघीन... दुध थंडच घ्यायच न?

धनश्री,
मला वाटतं तू डॉक्टरला दाखवावंस. कदाचित काही इन्फेक्शन असू शकेल किंवा कधी कधी टिअर कॅनल वर प्रेशर येऊन पण असं होतं असं म्हणतात. पण डोळ्याच्या डॉक्टरला विचारलेलं कधीही चांगलं.

दुधाच्या घड्या गारच. पण डॉक्टरला विचारल्याशिवाय करू नकोस.

इन्फेक्शन.. बापरे पण डोळ्यात किंवा डोळ्याजवळ काही नाहीये.. नाक आणि डोळ्यामधली स्किन जरा फुगल्यासारखी दिसते.. तरी डॉ ना दाखवीन.. स्किन स्पेशालिस्ट ना? btw, ते ओरीफ्लेम च क्रिम चांगला आहे का?

मला ३ वर्षाची मुलगी आहे. मला तिचि स्किन छान व्हावी ह्याकरिता काहि उपाय सान्गाल का? आणि अन्गावर्चे लव जाण्यासाठि काही उपाय सान्गाल का?

निर्मयी, लव जाण्यासाठी तिला आंघोळ घालताना साबणाऐवजी डाळीचे पीठ , अर्धा चमचा हळद दुधात कालवून चोळा. अत्यंत स्वच्छ वाटते. शिवाय हळदीमुळे तजेला येतो तर दुधामुळे कांती कोमल होते. हे खरंतर बाळ अगदी लहान २-४ महिन्याचे असल्यापासून केले तर लव अजिबात दिसून येत नाही. पण अजूनही ५ वर्षाची होईपर्यंत प्रयत्न करायला हरकत नाही.

आठवड्यातुन ३-४ वेळा संत्र्याचा गर चांगला चोळुन तो सुकु द्यायचा. कोमट पाण्याने हात धुवायचे. डाळीचे पीठ + हळद + दूध लावले तरी हात स्वच्छ होतात.

येस माझेही सेम असेच झालेय. बाकीच्या अंगाच्या तुलनेत फक्त हात (खांद्यापासुन मनगटापर्यंत, जी बाजु सुर्याला एस्क्पोज होते ती) काळे पडलेत. लिंबु/संत्र्याचा रस लावून बघते आता फायदा होत्तो का ते.

मी पण करून बघेन. स्कूटर चालवून हात काळे पड्लेत. काल घरचा आहेर. I like your complexion, its a nice russet colour. Sad

After buying her so many millions of crayons, pencils colour boxes and so on this is the only shade she remembered correctly. lol Proud

मी हल्ली घराबाहेर पडताना न चुकता जीन्सचे लांब हातांचे जॅकेट घालते... आता जरा विचित्र दिसते ते मुंबईच्या भर उन्हात.. पण हात इतके काळे झालेत की आता ते झाकुन ठेवले तरच जरा उजळतील अशी आशा वाटते.. Happy

लिंबू\संत्र्याच्या रसाने ड्रायनेसही येतो मात्र. त्यासाठी नंतर मॉयश्चरायझरही लावायला हवे, किंवा हा रस ग्लिसरिनमधे मिसळून लावावा. हाताच्या त्वचेला जास्त कोरडेपणा आला असेल तरीही ती काळपट दिसू दिसते. उर्जिता जैनचं अ‍ॅलोव्हेरा लिक्विड जेल मिळतं. ते हातांना बाहेर जाताना किंवा एरवीही चोळून लावलं तर छान मृदूता येते. ब्युटिकचं हॅन्ड लोशनही छान आहे.
हातांना, पावलांना किंवा मानेला असा टॅन आला तर अगदी इफेक्टिव अजून एक उपाय म्हणजे टोमॅटोचा रस चोळून लावणे. मुद्दाम रस काढायचीही गरज नाही. रोजच्या स्वयंपाकात टोमॅटो लागतोच. तो चिरताना बराच रस बाहेर येतो. या रसाने त्वचा उजळते आणि मृदूही होते. उन्हाळ्यात्ले ट्रेक्स किंवा हिमालयात जाऊन आल्यावर जो टॅन येतो तो सुद्धा यामुळे पटकन जातो. चेहर्‍यालाही छान आहे.

शर्मिला धन्स गं...

माझा चेहरा सोडुन बाकी सगळी त्वचा कोरडी आहे. थंडीत अजुनच कोरडी पडते. मी कालच दादरला भानुपद्ममध्ये ब-याच पावडरी आणि उर्जिता जैनची तेले आणि अलोवेरा विकत घेतली (एका दगडात दोन पक्षी ;). आता अलोवेरा ट्राय करते.

गेल्या वर्षी ट्रेकला गेले होते तेव्हा जंगलात खुप किडे चावले. पोटावर डाग आहेत पण ते दिसत नाहीत पण पाठीवरचे डाग मात्र ब्लाऊज घातला की दिसतात.. काय करावे?

माझेही हाताचि बोटे joint's च्या इथे काळि पडलि आहेत. तसेच कोपरे सुद्धा. लिंबु/संत्र्याचा रस लावून अथवा टोमॅटोचा रस लावुन फायदा होइल का? उन्हाने नाहि काळे पडलेले पण मला वाटते इथे आल्यावर भांडि घासुन पडले असतिल.

कच्चे दूध आणि लिम्बाचा रस (पाव वाटीला अर्ध्या लिम्बाचा रस) अंघोळीच्या आधी १५ -२० मिनिटे लावून ठेवले तर काळ्वंडलेली त्वचा लवकर पूर्ववत होते ..साधारण १५ दिवस रोज केल्याने फरक नक्की जाणवतो

प्रिया७
मॉइश्चर कमी झाल्यामुळे होतय का अस ते पहा आधी. तसे असेल तर सिंक जवळ एक हँड लोशन ठेव. व पाण्यात हात गेला की नंतर लगेच लोशन वापरायचे. कारण त्वचा कोरडी पडली असेल तर लिंबु/संत्र्याचा रस अथवा टोमॅटोच्या रसाने चुरचुरेल.

कोपरांना सुद्दा रात्री झोपायच्या आधी लोशन लाव.

काकडीचा रस पण उपयोगी पडतो, उन्हाने काळी पडलेल्या त्वचे साठी. चकत्या करुन हाताने चोळुन लावली काकडी तरी चालते. लगेच फरक दिसतो.

उन्हाळ्यात संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर दुपारी हा प्रयोग करुन बघा. त्वचेचा तजेला बघणार्‍यांच्या पण लक्षात येतो. Happy

मी कोणे एके काळी करायचे हे फेशिअल (आता आठवण काढलीच आहे तर उद्याच करते :)) न्युट्रोजेनाचे पोअर रिफायनिंग किंवा हिमालयाचे क्लीन्झर, मसाजसाठी बाथ अँड बॉडी वर्कमधे मिळायचे आल्मंड स्क्रब किंवा एव्हर युथचे वॉलनट स्क्रब किंवा संत्र्याच्या फोडी, पॅकसाठी घरी केलेली बदाम पावडर + दूध किंवा बेसन + हळद + दूध, नाकाला black head strips आणि डोळ्यांना काकडीच्या नाहीतर बटाट्याच्या फोडी. ह्यात बाहेरचे प्रॉडक्ट्स वगळुन लिंबाचा रस, मध बिध घालुन क्लींसर करतात ते वापरलं तर १००% घरगुती फेशिअल होतं.

चंदनाचे खोड असेल तर दूधात चंदन उगाळुन लावायचं चेहर्‍याला पॅक म्हणुन. नुसताच पॅक आठवड्यातुन २-३ वेळा लावला तरी चालतं. खूप छान मुलायम होते त्वचा आणि उजळते पण. पॅक धुताना छान चोळुन धुवायचा म्हणजे स्क्रब पण होते. इंस्टंट (उलटं) फेशिअल Wink

संत्र/ लिंबाने त्वचा कोरडी पडते तर तेलकट चेह-याला त्याचा गर चोळला तर चालेल का?
मला प्रचंड घाम येतो आणि चेहरा म्हणजे तेलाचा उत्पादन कारखाना होतो.

मी संत्र्याने मसाज केला की दूध घातलेला पॅक लावते. माझी नाकाशी भयंकर तेलकट आणि बाकी कोरडी आहे त्वचा. लिंबु कधी लावले नाही. वेळ नसेल तर हलकेसे निव्हिआ क्रीम लावते.

छे, मी तर पाझरत असते अक्षरश:, त्यातून आमच्या गावातली हवा पण अतिसुंदर. Sad थंडीचे काही दिवस तेवढे बरे जातात.

Pages