RMP Infotec Pvt Ltd बद्दल माहीती हवी आहे.....

Submitted by शिल्पा८५ on 29 January, 2010 - 10:17

RMP Infotec Pvt Ltd बद्दल माहीती हवी आहे.....

RMP ही एक दुबईची कंपनी आहे. त्यांचे काही products आहेत. त्यातले एखादे तुम्ही विकत घेऊन एक फॉर्म भरुन सभासद व्हायचे मग तुम्ही आणखी असेच २ सभासद करायचे मग ते २ सभासद आणखी २ असे प्रत्येकीअसे तुम्ही जर सभासद करत गेलात तर तुम्हाला घरबसल्या कमिशन मिळते Multi-Level-Marketing या प्रकारात मोडणारे.
यात तुम्हाला जे पैसे मिळतात ते तुम्ही केलेल्या सभासदांमुळे... म्हणजे जितके तुमचे सभासद जास्त तेवढा तुम्हाला पैसा जास्त.. तर असे तुमचे Network वाढवत रहायचे एकदा तुम्ही केलेले सभासद त्याचे सभासद करत गेले की मग तुम्ही काही नाही केले तरी चालते काहीही न करता घरबसल्या दर आठवड्याला तुम्हाला कमीत कमी १००० असे वाढवत जास्तीत जास्त १३०००० पर्यत मिळवु शकता
आजच माझ्याकडे एका मैत्रीणीचा एक मित्र हा प्रस्ताव घेऊन आला होता. याबद्द्ल कोणाला अनुभव आहे का? हा कोणता घोटाळा नाही ना?
www.rmpinfotec.biz ही त्यांची वेबसाइट आहे सगळी माहीती आहे, त्या माणसाने सगळे लिगल प्रमाणत्र दाखवले, प्रेझेंटेशन, विडिओ क्लिप्स ही दाखवले. आधीच्या सभासदांचे युजर आयडी, पासवर्ड, इन्क्म लीस्ट इ दाखवले. कळत नाही काय करु?
कॄपया याबद्द्ल आणखी माहीती अस्ल्यास सांगावे. मी ही सभासद होउ का? इतक्या सहज इन्कम म्हणुन शंका वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा तर एम्वे चा प्रकार आहे. विनयने ह्याबद्दल खुप लिहील आहे. त्याच्या रंगीबेरंगीवर जा.
जॉईन करु नये..
तुम्ही दिलेली लिंक पण उघडत नाही.

अनिलभाई बरोबर सांगत आहेत, जॉईन करु नये... असले चेन बिझनेस जॉईन करणारे आपल्यासारखे सामान्य नागरिक नेहमी @ लास्ट स्टेप ऑफ लॅडर असतात.

आर सी एम, अ‍ॅमवे, हर्बल लाईफ... असे अनेक प्लॅन्स बाजारात सुरु आहेत............ यात सामन्य आणि मुखदुर्बळ माणसानी पडू नये. चांगले मित्र आणि नातेवाईक आपल्यापासून दूर होण्याचा हा खात्रीचा मार्ग आहे.... Proud

मला ही हे काही ठिक वाटत नाही पण माझे काही सख्खे नातेवाईक यात आधीच सभासद म्हणुन आहेत त्यांचे रेग्युलर इन्कमही चालु आहे. म्हणुन पुरेशी माहीती शोधतेय. ही कंपनी २००१ पासुन चालु आहे नी तेव्हापासुनचे सभासद अजुन कार्यरत आहेत.
http://www.rmpinfotec.biz ही लिंक ट्राय करा. मी पाहीली पण अजुनही कन्फ्युझ आहे. तरी जाणकारांनी वा अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन करावे.

शिल्पा,
हे वाच व मग ठरव.
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=822093#PO...

आधी कमीत कमी १५/२० माणस शोधुन ठेव. जी तुला जॉईन करतील. अडवान्स मधे पैशे घे व मग जॉईन कर. Happy

नकोच मुळी !
अगदी आधीच माणसे शोधली तरीही त्यांचे मेंबर होणार नाहीत मग ते तुम्हालाच पीडतील. शिवाय संबंध बिघडतील ते वेगळॅच.

हे अ‍ॅमवे सारखेच आहे. डोक्याला ताप. मैत्रीणीने घेतले ,रोज फोन, शेवटी स्पष्ट सांगितले तर मैत्रीत प्रॉबलेम झाला.(तिला राग आला). वेळ कोणाला रोज सतरा पंधरा फोन करा लोकांना, घरी बोलवून मिटींगा घ्या व शिव्या एका... ह्याची तयारी असेल तर ठिक.

मलाहि तेच वाटते.
कुठलीही अशी स्किम जी नेटवर्क बनविल्याने पैसे मिळतात, त्यात आपण जर सदस्यत्व घेतले तर आपल्या ओळखिच्याच लोकाना मेंबर बनवतोना? मग पुढे त्याना काही अडचण आल्यास / झाल्यास आपले संबंध बिघडतात.
हे असले स्किम म्हणजे Relation बिघडविण्याचं करार पत्र होय.
आमच्या गृप मधे एक दोन लोकं आहेत, जी हर्बल लाईफ ची मेंबर आहेत. कुणीहि, कुठेही दिसला कि त्यांचं मार्केटींग चालु होतं. आतातर त्याना दुरुन बघुनच आम्ही पळ काढतो.
हे तुमच्या बाबतित होऊ नये असं वाटत असल्यास, कुठल्याच MLM मधे शिरु नका.
तुमची लोकं तुटतात.

या बाफचा नक्की उद्देश काय आहे? चेन मार्केटिंग (साखळी विक्री) मध्ये पडावे का पडु नये? का वर उल्लेखिलेल्या चेन मार्केटींग कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल माहिती हवी आहे?? कारण चेन मार्केटिंग हे काय असते हे तुम्हाला माहित आहे असे तुमच्या मुळ पोस्टवरुन वाटते.

सुरुवातीचे दोन चार मेंबर पर्यन्त कमिशन चांगले मिळते. नंतर त्याची टक्केवारी कमी होत जाते.... शिवाय एकदा तुम्ही परचेसिंग करुन मेंबर झालात तरी त्याची मुदत १ वर्ष असते.... एक वर्षानंतर तुम्ही पुन्हा खरेदी करुन मेंबरशिप नाही कंटीन्यु केली की तुम्ही चेनमधून आउट... ही माहिती आधी कुणी सांगत नाहीत.... मेंबरशिपच्या लेटरवर कुठेतरी कोपर्‍यात लिहिलेले असते.... कन्फर्म करा.... ( आर सी एम चा माझा अनुभव... )

कंपनीच्या चौकशीची गरज नाही..... असल्या कंपन्या (दुर्दैवाने) खरोखरच आस्तित्वात असतात! आणि त्यांचा हा उद्योग कायद्यात बसतो!!!

कमिशन म्हणून कंपनी जे पैसे वाटते ते अगदी क्षुल्लक असतात...

उदा: तुम्ही साधारणपणे ५००० चा माल घ्या..... दोन मेंबर करा.... तुम्हाला १००० मिळतील... म्हणजे साधारण १०%. इतके पैसे तर एवीतेवी डिस्काउंट म्हणून कुठलाही दुकानदार देतच असतो... Happy

यानंतर आणि ४ मेंबर झाले की ( दोघांचे २) की तुम्हाला साधारण २०० रु पर हेड... ( तुमच्याखाली असणार्‍या पहिल्या माणसाला वरच्या ओळीत लिहिल्याप्रमाणे १००० मिळतात, तो वेगळा भाग) पण तुम्हाला आता २०००० च्या सेलवर ८००-१००० मिळाले म्हणजे फक्त ४-५ % झाले.

यापुढच्या लेवलला आणि % कमी होणार.....

१-१० टक्के कमिशनसाठी कंपनीचा ग्राहक्/प्रसारक्/जाहीरात करणारा/विक्रेता/इतरांच्या शंका निरसन करणारा/कंपनीचे किट्स साठवणारा/त्याची वाहतूक करणारा...... एवढे नवरंगी रोल करायचे असतील तर जरूर करा..... Happy

माझे काही सख्खे नातेवाईक यात आधीच सभासद म्हणुन आहेत त्यांचे रेग्युलर इन्कमही चालु आहे.

सख्खेच कशाला, नातेवाईक नसणारेही लोकही तुम्हाला त्यांचे रेगुलर इन्कम आहे, असेच सांगतील !!!! Proud .... तुम्ही मेंबर झालात की तुम्हीपण आम्हाला असेच सांगाल!! Happy

अजीबात असल्या फंदात पडु नका..
एकतर ह्यात देनारे प्रोडक्ट्स खूप महाग असतात, आणि आपण बाजारात ज्या qualityचे घेवु त्यापेक्षा खूपच खालच्या दर्जाचे असतात.... आणि वरील सर्व कारने अगदी १००% खरी....
स्वानुभव (फक्त ते विकत घेतल्यावर आम्हीच कोनाला हे recommend करन्याच्या फंदात पडलो नाही, एकवेळ आपल्याला काही फायदा झाला नाही तरी चालेल पण आपल्यामुळे बाकिच्यांचे पैसे जायला नको आणि आपले संबंध बिघडायला नको अस विचार केला.. पण आम्ही मात्र ते जवळचे असल्याने त्यांच्या नादी लागलो :()

अनिलभाई वाचली मी तुम्ही दिलेली लिंक, अगदी तंतोतंत सेम केस आहे , हेच सगळ अनुभवल मी.
धन्यवाद सर्वाना, सगळ्यांची ऩकारात्मक मत दिसताहेत, साहजिकच आहे ते मी ही सहमतच आहे.

<<<<माझे काही सख्खे नातेवाईक यात आधीच सभासद म्हणुन आहेत त्यांचे रेग्युलर इन्कमही चालु आहे.>>>>>>>
जागोमोहनप्यारे, हे मी या अर्थाने म्हट्ल की हे जे आमचे नातेवाईक परिस्थितीने नी स्वभावाने पण खुपच गरिब आहेत नी म्हणुनच या स्किमच्या बळी पडलेत, नी रेग्युलर (महिन्याभरापुर्वीपासुनच) पैसे मिळताहेत म्हणुन त्यांचा खुप विश्वास बसला आहे या सगळ्यावर. त्यांनी चक्क ६५०० पेक्शा जास्त (जे त्यांच्या साठी खुपच जास्त आहे) किंमतीचे प्रोडक्ट घेऊन सुरुवात केलि, त्यांना या सगळ्यात काही नुकसान होऊ नये म्हणुन मी हे उलटसुलट पडताळुन पाहत आहे. आम्ही सुरवात केल्याने त्यांना मदतच होणार आहे म्हणुन आम्ही फक्त प्रोडक्ट विकत घेऊन मेम्बर्शीप घ्यायची ठरवत आहोत पुढचे झोल आम्ही नाही करणार, कारण आम्ही इतक्यात त्यांना या स्किमचे दुष्परिणाम सांगायला गेलो तर त्यांना ते पटणार नाही कारण पुन्हा तेच त्यांना ही हे प्रपोजल त्यांच्या एका जवळच्या नात्यातुन आलेले आहे, त्यामूळे स्किमवर संशय दाखवणे म्हण्जे नात्यावर संशय दाखवण्यासारखे आहे सध्याच्या परिस्थितित..........

<<<एकतर ह्यात देनारे प्रोडक्ट्स खूप महाग असतात, आणि आपण बाजारात ज्या qualityचे घेवु त्यापेक्षा खूपच खालच्या दर्जाचे अस>>>
चिमुरी, हे ही अगदी बरोबर. म्हनुनच आपल्याफायद्यासाठी दुसर्‍याचा बळी देने योग्य वाटत नाही.

<<<या बाफचा नक्की उद्देश काय आहे? चेन मार्केटिंग (साखळी विक्री) मध्ये पडावे का पडु नये? का वर उल्लेखिलेल्या चेन मार्केटींग कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल माहिती हवी आहे?? कारण चेन मार्केटिंग हे काय असते हे तुम्हाला माहित आहे असे तुमच्या मुळ पोस्टवरुन वाटते.>>>
नात्या, याच सगळ्या प्रश्नांची मला उत्तर अपेक्शीत होती..... जी मिळत आहेत.

( प्रतिज्ञापत्र :

मी Gajanan1 म्हणजेच जागोमोहनप्यारे आहे. लॉगिन पेजवर मराठी टाइप करायला प्रॉब्लेम असल्याने मी हा माझा जुना आय डी वापरात आहे. म्हणून कोणत्याही नशापाणीशिवाय व जोरजबरदस्तीशिवाय हे प्रतिज्ञापत्र केले असे. Happy )

५००० वर १००० म्हणजे २० टक्के होतात. चुकुन मी १० % लिहिले आहे..

If you are asking my suggestion i would say please dont invest any amount inthis chain , my brotherin law got commission til 4 id he created and then whole his amount was block,, be careful with all this company.

जर तुम्हाला मार्केंटींगच करायचे असेल तर पुर्ण आत्मविश्वासाने करा.

चेन मार्केंटिंग विषयी आपल्या समाजाच्या समजुती-गैरसमजुती मध्ये प्रचंड गोंधळ आहे, हे तुम्हाला वर आलेल्या प्रतिसादामधुन कळलेच असेल. चेन मार्केंटींगचा सगळ्यात मोठा दोष एकच की तुम्ही तुम्हाला काहीही माहीत नसलेल्या, अगदी तुमच्या आजुबाजुच्या ९०-९५% लोंकांना पण माहीत नसलेल्या उत्पादनात तुम्ही स्वत:ला गुंतवता तसेच इतरांनाही गुंतवता. जर तुम्हाला चांगला अनुभव आला (ट्रायल कीट असेच असते की तुम्हाला खुप चांगला अनुभव येईल) तर तुम्ही मोठ्या हुरुपाने काम करता पण जर तुमच्या दुरदैवाने जर वाईट अनुभव आला तर तुम्ही तुमची गुतंवणुक परत मिळवण्यासाठी बकरे शोधता अथवा मुग गिळुन गप्प बसता. चेन मार्केंटींगचे जे उत्पादन असते ते तुमच्यावर तसेच तुमच्या ग्राहक वा सबओर्डीनेट वर मोनोपॉली एकाधिकारशाही लादते, आणि हिच एकाधिकारशाही काही दिवसांनी तुम्हास वा तुमच्या ग्राहकास सहन होत नाही , अहो नव्याची हौस कुणास नसते .

जर तुम्हास मार्केंटिंगच करायची असेल तर एखाद्या इन्शुरन्स कंपनी (एल आय सी, आय सी आय सी आय) वैगेरे चे विमा प्रतिनीधी व्हा. व समाजाचा तसेच आपला आर्थीक लाभ करुन घ्या. अथवा जर तुम्हाला इंटरनेट रोज अवेलेबल असेल , तर तुम्ही शेअर मार्केट चे प्रशिक्षण घेवुन शेअर ट्रेंडिंग करुन पैसा कमावु शकता (मित्र मैत्रिणि, नातेवाईंकाच्या शिव्या न खाता)

लक्षात ठेवा भिका-यालासुद्धा बसल्या जागी पैसा मिळतो, पण तो अगदिच शुल्लक (एक चहा पण न मिळेल इतका) असतो, जास्त पैसा हवा असेल तर त्यालाही दर मिनिटाला हात हलवावाच लागतो.. Happy

तेव्हा बसल्याजागी पैसा कमविण्याबद्दल विसरुन जा , व मार्केंटिंगचे योग्य प्रशिक्षण घेवुन या धंद्यात उडी मारा. मग यश नुमचेच आहे. Happy

RMP ऐवजि patroun join kara mitrano karan insurance la bhavishyat khup changale future aahe for more details call on 9604401001