डिटॉक्स.

Submitted by अश्विनीमामी on 20 January, 2010 - 06:33

मामीच्या मेंट्ल स्पा मध्ये आपले हार्दिक स्वागत. हे काही मेन्टल हॉस्पिटल नव्हे तर आपल्या मनासाठी एक
आरामाची, रीचार्ज होण्याची जागा आहे. आजकाल आपल्यापैकी बरेच जण जिमला जातात मग मेहनत करून झाल्यावर कधी कधी ट्रेनर सांगतो आता या वीकांताला तू फुल बॉडी मसाज घे, एक बॉडी रॅप घेऊन बघ स्किन अगदी नव्यासारखी होइल. आवडत असेल ते फेशिअल घे. दोन तीन दिवस डिटॉक्स डायेट कर. ­बघ अगदी नवीन वाटेल तुला. ताजे तवाने वाटेल. मी काल विचार करत होते. हे असेच काहीतरी आपल्या मनासाठी का नको?

जसे आपल्याला भान येते व आपण लहानाचे मोठे होतो. अनेक नाते संबंधांचा भाग होतो. कधी आपण त्यातून काहीतरी मिळवितो तर कधी काही तरी देतो. कधीतरी हिशेब चुकतात व मनाला त्रासच होतो. जसे आपले शरीर कायम आपल्या बरोबरच असते तसेच हे मन देखील आपल्याबरोबरीने सारे सुखदु:ख उपभोगत असते, आघात सोसत असते.

पण एक आहे. रोज स्नान करून शरीर सुन्दरपैकी स्वच्छ, सुवासिक होते. पण मन मात्र कितीतरी जुन्या नात्यांचे संबंधांचे हरवलेल्या मैत्र्यांचे घाव आठवणीस्वरूपात बरोबरच घेउन हिंडते. त्यामुळे ते भारावलेले, जडावलेले असते. अश्या कितीतरी आठवणी असतात ज्यांनी आपल्याला त्रास होतो, कधी रडू ही येते, का मला कोणी समजावून घेतले नाही, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, आनंदात सहभागी करून घेतले नाही. असा आकांत मनात उसळतो. काही लोक, काही प्रसंग आपल्याला आपसुक रागाने मुठी आवळायला लावतात. कधी तिरस्काराने मन भरून जाते. तर कधी पश्चात्तापाने! या नकारात्मक भावना आपले मानसिक जीवन व्यापून टाकतात व त्यात नवे अनुभव चाखून बघायला, नवे आनंद घ्यायला जागाच शिल्लक ठेवत नाहीत.

कसे कराल आपले मन डिटॉक्स? एखादी दोन तीन दिवसांची सुट्टी बघून ठेवा व हे डिटॉक्स प्लॅन करा.
ही एक पूर्ण वैयक्तिक बाब तसेच मोठ्या माणसाने करण्याची गोष्ट असल्याने मुलांची काळजी आपल्या
पार्टनर वर सोपवा. आपल्या घरीच हे करू शकता पण शक्य असेल तर आपल्या आवडीच्या, जिथे आपल्या पॉझिटिव असोसिएशन्स असतील त्या जागी जा. जसे कोकणातील गाव/ आवड्ता बीच/ ट्रेक/ अगदी मॉल मधील गॅलरी पण चालेल. पण शक्यतो बाहेरचा उपद्रव फार होणार नाही असे ठिकाण निवडावे. थोडी शांतता अपेक्षित आहे.

ज्या वेळी आपल्याला कामाचे फोन वगैरे येणार नाहीत साधारण पणे त्या वेळी एक खोल उडी आपल्याच मनात घ्यायची आहे. लहानपणीचे अपमान, जसे हिसकावून घेतलेला बॉल, खेळातील खोटे पणे, पालकांचे वागणे, शिक्षकांचे ओरडणे, वगैरे पासून सुरुवात करून मग वयात येताना झालेले दु:खी प्रसंग, विरह,
पहिला प्रेमभंग, कदाचित काही वेडेपणे नकळत घड्ले असतील ( दिल चाहता है मधील आकाश आठ्वा)
ते सर्व आठ्वणीत आणा, आता ते काही रेलेवंट आहे का त्याचा विचार शांतपणे, तट्स्थ पणे न इन्व्हॉल्व होता करा. नाहीतर त्या आठ्वणी डिलीट करा. झाली मेमरीत जागा. हीच प्रोसेस पुढे नेत नेत मग नोकरीतील अनुभव, वैयक्तिक नातेसंबंधातील अवघड प्रसंग, तुटी त्रास, अपमान आठ्वत व प्रोसेस करत करत चालु ठेवायची आहे. एखादा कप चहा किन्वा कडक कॉफी घ्या मध्ये. मॅगी टॉमॅटो सूप पण चालेल की. हलके जेवा. व ही अंतर्मनाची सहल चालूच ठेवा. यात जसे आपण जुने चान्गले पण आता न फिट होणारे कपडे, विट्लेल्या साड्या, कॉलर वर गेलेले शर्ट टाकायला बाहेर काढतो तसे तेव्हा ज्या ने आपण खूप दुखविले गेलो होतो त्या घटना, ते शब्द, मनात आणायचे. ती व्यक्ती आता या घडीला, आपल्या भविष्यात किती आवश्यक आहे, की ती नसलीच तरी काहीच फरक पडणार नाही हे मनात पक्के करायचे.
कारण आपला प्रवास पुढे जाण्याचा आहे. ज्यांनी आपल्याला घडविण्यात मोलाची मदत केले पण जे आता जवळ नाहीत किंवा जगातच नाहीत त्यांच्या आनंदी आठ्वणी आपण एका रत्नजडित पेटीत सुरक्षित ठेवणार आहोत व ती सोबत घेऊन पुढे जायचे आहे.

इथेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधी कधी आपण आसुसून प्रेम केलेले असते, कामात एखाद्या
विषयावर जिवापाड मेहनत केलेली असते ती वाया जाते. आपण दु:खी होतो. पण ती प्रेमाची भावना,
ते ज्ञान आपल्या जवळ असतेच की. त्या व्यक्तीपासून ती निखळ चान्गली भावना ते ज्ञान अलग करून
हलकेच आपल्या त्या पेटीत नीट ठेवायचे आहे. व उरलेली नकारात्म्क भावना मग का ओझे बाळगत फिरायचे? द्या सोडून. झाली बघा मेमरी मोकळी. आता तिथे नवे अनुभव, आनंद नवे ज्ञान येइलच. ते वाट्च बघत आहे. मन हलके झाले ना!

आता या रिकाम्या जागी एक सुन्दर दिवा लावायचा ज्यात सुगंधी तेल आहे व कधी न विझणारी वात आहे. त्याने आपले अंतर्मन उजळून निघेल. सुवासिक होइल. मग एक मोठा श्वास घ्या व आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींना( those who really love you for what you are and accept you for your strengths and with your weaknesses) फोन करा, त्यांना तुमच्या नव्या लाइट मनोव्रुत्तीचा लाभ घेउ द्या. कदाचित मुलांना तुम्हाला एखादे चित्र दाखवायचे असेल. पार्टनरला नवे गाणे ऐकून तुम्हाला सांगायचे असेल. नवी सुखे, नवे आनंद तुमच्या मनात येऊ पहात आहेत..... येउ द्या ना त्यांना.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer: I am not a trained therapist and this may not cure entrenched psychological diseases. You need to see a therapist for that.

गुलमोहर: 

छान लिहिलय्त मामी.. आपले मनही डीटॉक्स करता येईल असा विचारच केला नव्हता.. तुम्ही दिलेल्या पद्धतीने मन डीटॉक्स करण्याचा प्रयत्न करुन बघायला हवा.

मामी द ग्रेट! खरंच याचा खूप फायदा होतो. स्वानुभव आहे! Happy
काही वेळा लोकांना नाईलाजाने नावड्त्या लोकांसोबत रहावे लागते. उदा. नोकरीच्या ठिकाणी बॉस. इथे काहीही करु शकत नाही. नुसती मनाची घालमेल,. पण जिथे शक्य आहे तिथे आपण नेहमीच आवड्त्या लोकांशी बोलावे, ज्यांना आपण आवडतो अशांच्या सहवासात रहावे. मन आनंदाने भरुन जाते. गेल्या २-३ महिन्यातला माझा अनुभव आहे. ज्या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करायला शिकले आहे. आणि आता त्यांचा आपल्याला 'त्रास' होत होता, आप्ण रडत होतो हे आठवून हसू येते. Happy
मामी ,येत्या लाँग वीकेंडच्या मुहूर्तावर हे लिहील्याबद्दल धन्यवाद! त्याचा खरंच सदुपयोग होईल. Happy

ज्या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करायला शिकले आहे >>>
====================================
I like that and do the same ...
अवॉइड मॅन ... जस्ट अवॉइड अ‍ॅण्ड फॉर्गेट इट ...
टेक इट ईजी ... आल ईज वेल ...
====================================

मामी,
मस्त विचार आहे ... Happy

यात फरक आहे. अवॉइड करू नका. मग ते आतच राहील. ते प्रोसेस करून बरे वाइट सेपरेट करून बाहेर काढा. द ओन्ली वे आउट ऑफ अ प्रॉब्लेम इज थ्रु इट.

विचार मंथन करताना मंद वाद्य संगीत लावावे. रविशंकर सतार - राग यमन/ शिवकुमार शर्मा संतूर - मालकंस/
हरिप्रसाद - शुद्ध सारंग/ स्ट्रॉस वाल्ट्झ - विवाल्डी/ चाय्कोस्वकी या काही सजेशन्स. मानवी आवाजातील गाणी ऐकू नये कारण गाण्यातील भावना तुमच्या विचारांना ओवर शॅडो करू शकतात.

पोपुरी जवळ ठेवावी. / अरोमाथेरपी तेलाची मेणबत्त्ती लावावी. स्वेटर जवळ ठेवावे किन्वा तुमचे फेवरीट पांघरूण. कधी कधी विचारांची किन्वा घटनांची तीव्रता इतकी जास्त असते की आपण लिटरली गार पडू शकतो. अगदी डिमेंटर इफेक्ट होउ शकतो. थोडी बाहेरच्या उबेची गरज पडू शकते.

मामी,पूर्णपणे सहमत.. खरोखर मन असं अधुनमधुन डिटॉक्स करून त्याला पूर्ण हलकं करून मग त्यात अनेक सकारात्मक विचार,अनुभव ओथंबुन भरावेत.. आपोआप आपल्या आजुबाजुचे वातावरणही सकारात्मक होते.. जगण्याचा एक वेगळा आनंद मिळायला लागतो... आपलाच एक पुनर्जन्म होतो..
मस्त लिहिलय.. आवडेश एकदम... Happy

मामी सुंदर लिहिलत.
तुम्ही trained therapist नसल्यात म्हणुन काय झाले या विषयाची तुम्हाला जाण आहे.
या विषयी तुम्ही अधिक अभ्यास करु शकता. सध्या 'लर्नालॉजी' शास्त्र विकसित होऊ पाहात आहे.
त्याचा आधार तुम्हाला उपयोगी पडु शकतो.

मामी खूप सही लिहिलय !!! एकदम आवडेश..
करायला गेलं तर कितपत जमेल माहित नाही... म्हणजे तुम्ही लिहिलेलं वाचून जितक सोप्प वाटतय तितकं नाहिये नक्कीच.. !!!
पण एकदा ट्राय मारायला काही हरकत नाही Happy

सही हो मामी!
पण आपण विसरून गेलेल्या नको त्या गोष्टी आठवून त्यांचा निचरा अवघड नाही ना होऊन बसायचा?

मेंटल डिटॉक्स! कल्पनाच किती सुंदर आहे!!
मामी, जियो. तुम्ही ग्रेट आहात. मी हे असं करण्याबद्दल कधी विचारच केला नव्हता..........
पण हे करायलाच हवे. नाहीतर आयुष्यात पुढे जाताच येणार नाही.

Pages