महिलांची उखाणी .. संक्रांतीनिमित्ताने.

Submitted by अभय आर्वीकर on 15 January, 2010 - 16:59

काल संक्रांती निमित्त आमच्या गावात बायकांनी वाण वाटला आणि जम्मुन नावं घेतली.(की ठेवली?)
मी भिंतीआडुन चोरुनलपुन ऐकली
व तुमच्यासाठी एका कागदावर उतरवुन घेतली.
तेवढ्यात माझ्यावर कुणाची तरी नजर गेली,
आणि जोराने हाक्के हान्.. म्हटले म्हणुन मी काढता पाय घेतला.
त्यामुळे काही राहुनच गेली.तरीपण मी पुन्हा एकदा चोरुनलपुन प्रयत्न करणार आहेच.
सध्या एवढीच तर वाचुन बघा.
.........................................................................
साहित्य समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
किंवा
साहित्याचे प्रतिबिंब समाजात उमटत असतात,असेही म्हणतात.

.........................................................................

१)
आमचे जग्गनराव आहेत पशुप्रेमी
माझ्यापेक्षा त्यांना कुत्राच आवडते,
लाथ मारुन निशाणीला मग मी
वरुन खाली तोंडबुचक्या पाडते.
२)
आमचे जग्गनराव माझ्या
रुपावरच भाळते,
पुस्तक वाचायचे सोडुन,
अर्पणपत्रिकाच चाळते.
३)
प्रयोगरावांची 'सलवार'
वाचकांना आवडली,
'सलवारी' च्या झगमगाटात,
तलवार मागे पडली.
४)
कौतुकरावांच्या झुल्यावर
हरीशची कविता झुलते,
तिकडे त्या तमाशात
रविची पोल खुलते.
५)
विडंबनाच्या नादी लागुन
जग्गनराव भलतिकडेच भिडते,
सहनशक्तीच्या बाहेर गेले
कि मग वैतागिका चिडते..
६)
मी गिरिषची गर्लफ्रेन्ड,
पण विशालशी मग्न.
केली अज्ञातशी सगाई,
अन जग्गनरावशी लग्न.
७)
जग्गनराव करतात,
दुधाचा धंदा
गुळ विका की ढेप,
माल माझा बंदा.

८)
माझ्या घराला आहे,
मुलुंडची फर्शी,
मला बाई आवडते
अनिलभाईची जर्शी.
९)
टीव्हीतील मालीका बाई
आजकाल चालती संथ,
खानदेशी मांडे खावुन
जग्गनराव करती रवंथ.
१०)
बन्नुचा कम्पॉस
बंटी घेतो हाती,
जग्गनराव त्यांना बाई
शाळेत घेऊन जाती.
११)
नी पोरुल बाताल,बेके दायनिन,
हिक्के वाय्,हाक्के हान्..
जग्गनरावांची मी लाडकी
आता वाटते वाण.

......

तुर्त एवढेच पुरेसे.......
बाकी उरलेले नंतर.

गंगाधर मुटे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६)
गिरिषची गर्लफ्रेन्ड,
विशालशी मग्न.
अज्ञातशी सगाई अन,
जग्गनरावशी लग्न. >>>

LOL गंगाधरराव तुमची काही खैर नाही आता Rofl

मुटे साहेब,
धमाल केलित हो तुम्ही.
तुम्ही असेच लिहत राहिलात आणी माबोनी जर सगळ्यात जास्त लेख्/प्रतिसाद मिळविण्याचा पुरस्कार देणे ठरविलेच तर विदर्भातच जाईल.
लगे रहो.

मुख्यपानावर कानोकानी मधे एकाच वेळी तुमचे दोन दोन लेख झळकत आहेत साहेब.
शुभेच्छा.

जग्गनरावान्च्या नावाचे
उखान्यासाठी घेतले पेटन्ट,
सन्क्रातीच्या निमीत्ताने,
गंगाधरजीनीच मारले बरेच स्ट्न्ट Lol

सही !!

पुन्हा लिहा ..... येऊ द्या पुन्हा अजुन...खूष का?? Happy
तुमची स्तुती करता करता पुन्हा लिहा असं लिहायचं राहुन गेलं असेल....

<< खूष का?? >>
चिमुरीजी, कशाबद्दल खुष होणार ?
जे हसलेत ते दिसलेत. पण जे दिसले नाहीत ते रागावले असणार...
ते आता डूख धरणार ना माझ्यावर...

पण जे दिसले नाहीत ते रागावले असणार...
ते आता डूख धरणार ना माझ्यावर...>>>>>>> काहीतरीच काय..
बरं जे दिसले नाहीत ते दिसेपर्यन्त लिहुन घ्या... Happy म्हनजे जरी रागवायचं असलं तरी एकदम सगळ्यावरच रागवता येइल... सोइचं जाइल ना ते... Happy हे सगळं मजेत बरका... बाकी तुम्ही कोनाबद्दल बोलताय हे काही मला कळलं नाही... पण छान विनोदी लिहिलयं.... लिहित रहा...

<< बाकी तुम्ही कोनाबद्दल बोलताय हे काही मला कळलं नाही. >>.
नाही असे कुणाबद्दल व्यक्तिश: नाही.
.... हंसते-हंसाते रहो एवढचं....बस्स..