Submitted by प्राजु on 12 January, 2010 - 12:59
गर्दकाळी रात्र सारी, तेवणारा चंद्र दे
जीवघेणी ही निराशा, जीवनाला स्पंद दे..
ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे..
कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..
बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू?
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..
रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..
मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..
स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..
- प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम..!!
अप्रतिम..!!
ग्रेट .जराशी मेहनत घेतलीस तर
ग्रेट .जराशी मेहनत घेतलीस तर या कवितेची छान गझल होईल .पु .ले.शु.
प्राजु : काय जमलीय .... आख्खी
प्राजु : काय जमलीय .... आख्खी कविताच एकदम एकदम अप्रतीम !!!! दिवसाची काय सुरुवात झालीय... बिग थँक्स टू यू !!!!!
खूपच सुंदर कविता !!
खूपच सुंदर कविता !!
गंगाधर मुटे, छाया ताई,
गंगाधर मुटे, छाया ताई, गिरिशजी, केदार जी..
आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
सुरेख ! प्राजुतै लै
सुरेख ! प्राजुतै लै फ़ार्मात...
क्या बात है प्राजू...अगदी
क्या बात है प्राजू...अगदी स्पर्शुन गेली हृदयाला..
ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे..
>>>>मला वाटलं माझंच मागणं मागितलंस देवाकडे!!
थेट निवडक १० त!
सुंदर!! शरद
सुंदर!!
शरद
विशाल , सुमेधा, शरद आपले
विशाल , सुमेधा, शरद आपले मनापासून आभार.
सुन्दर, खुप छान....
सुन्दर, खुप छान....
कित्ती सुंदर! एकदम ठेक्यात.
कित्ती सुंदर! एकदम ठेक्यात.
खुप चांगली!
खुप चांगली!
कुंजिर निलेश, अलका, निबंध
कुंजिर निलेश, अलका, निबंध आपलेही मनापासून आभार.
व्वा! आज वेळ काढून सहज
व्वा! आज वेळ काढून सहज डोकावलो तर एकदम खजिनाच दिसला. आधी वाचून दाखवली होतीस; पण येथे अजून छान वाटतेय. आम्हालापण 'दे' तुझ्या प्रतिभेचा परीसस्पर्श!
सुंदर
सुंदर
मी न मीरा, मी न राधा, ना
मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..
स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..
अतिशय सुंदर पल्ली.
बधिर झाल्या भावनांची कास का
बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू?
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..
छानच गं..
प्राजु, संपुर्ण कविताच इतकी
प्राजु, संपुर्ण कविताच इतकी चान आहे...... थेट निवडक दहात!!!
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
प्राजू - छान आहे कविता !
प्राजू - छान आहे कविता !
गझलच्या तंत्रात नाही बसली तरि
गझलच्या तंत्रात नाही बसली तरि गझललाही हेवा वाटावा अशी !
कोसळ नको भिजवणारा तापलेल्या
कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..
सुंदरच!
नंद्या , भाऊ, चिन्नु मनापासून
नंद्या , भाऊ, चिन्नु
मनापासून आभार.
क्या बात है.. प्राजु!
क्या बात है.. प्राजु!
प्राजु, फारच छान.
प्राजु,
फारच छान.
मी न मीरा, मी न राधा, ना
मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे.
झक्कास. ही ओळ खूप आवडली. आणी अख्खी कविताच छान आहे.