माझ्या आवडीचे वर्तमानपत्र

Submitted by हर्ट on 1 January, 2010 - 04:20

नमस्कार!

या बा. फ. चा उद्देश सांगणे तसे गरजेचे नाही तरीही लिहितो. मराठी वर्तमानपत्र तर आपण वाचतोच. ईंग्रजी मधे The Times of India, Indian Express हे वर्तमानपत्र कदाचित तुम्ही वाचत असाल. पण आपल्यापैकी काही जण इतर देशातील वर्तमानपत्र देखील वाचत असाल. अशा वाचकांकडून आपल्यालाही त्या वर्तमानपत्राची माहिती होईल आणि कदाचित तुम्हालाही ते वर्तमानपत्र वाचायला आवडेल.

तर तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या पेपर बद्दल इथे लिहा. का आवडतो, कुठला भाग आवडतो तेही लिहा.

धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाईम्स आणी ईटीबद्दल रैनाला अनुमोदन.
लोकसत्ता आवडतो. पुरवण्यांचा दर्जा अजूनही बरा आहे. महाराष्ट्र टाईम्सही आधी बरा होता. आता बातम्या अन पुरवण्या- दोघांमधली रया गेली आहे.
सकाळ पाच मिनिटात वाचून होतो कधी कधी. पुरवण्यांबद्दल न बोलणेच बरे. साप्ताहिक सकाळ अजून थोडा दर्जा टिकवून आहे, त्यातल्या त्यात.

पण तरी हे सगळे वाचतो (अजून तरी). आदतसे मजबूर.

पुणे सकाळचे काय माहित नाही पण सोलापूर सकाळ मी फक्त 'चिंटू' साठी वाचतो.सोलापूरी आडमापपणावर पुणेरी सॉफेस्टीकेशनचे कलम केल्यासारखे वाटते. त्यापेक्षा आमचा 'संचार' बरा, 'बगताय काय रागानं,मैदान मारलया आबानं' असल्या जाहिराति आणि 'अमुकतमुक गावात उघड्यावर संडास करताना १५ जणांना दंड' असल्या बातम्या ते पहिल्या पानावर छापतात.उगीच 'शौचास' वगैरे गुळमुळीत प्रकार नाहीत.पुन्हा सकाळमधे सिनेमाच्या जाहिराती देत नाहीत,काय उपयोग पेपरचा?

हळकुंडाने पिवळ्या झालेल्या रुमालाच्छादित अर्धवस्त्रांकित >> Proud

मला सकाळ व लोकमत मुळिच नाही आवडत. पण चिंटू तेवढा वाचतो.

पेपर कोणताही असो आजकाल पैसा ओतला की हवी ति बातमी ,हव्या तेवडया जागेत छापुन घेता येते.पैश्याच पाथबळ नसलेले अनेक चागलि माणसे आणि पेपर्मध्ये खूप कमी वेळा येत.

गेले दीड का दोन वर्षात पेपर घ्यायचे बन्द केले आहे. त्याच्या रद्दीचे डिस्पोजल माझ्या दृष्टीने डोकेदुखी होती. सकाळी उठून इन्टरनेट्वर सगळ्याच पेपरच्या बातम्या वाचतो. लेख वाचत नाही,.आठ दिवसातून पुण्याला जाऊन सकाळ वाचतो. आणि पेपर न वाचण्याच्या माझ्या निर्णयाचे मीच कौतुक करतो Happy

मी सगळ्या वर्तमानपत्रांची ऑनलाईन आवृत्ती वाचते. त्यांचा छापील दर्जा कसा आहे याबद्दल माहित नाही
लोकसत्ता - पुरवण्यासाठी
सकाळ - फक्त चिंटू
बीबीसी न्युज - सगळ्या जगातल्या बातम्या एकत्र वाचायची सवय झाली आहे म्हणून
वॉशिंग्टन पोस्ट, न्यु यॉर्क टाइम्स - अमेरीकेतल्या बातम्यांसाठी

लहानपणी मराठी वाचता येत न्हवते तेव्हा पप्पा चिंटूचा जोक सांगत मग नंतर वाचायला आल्यावर (कुठल्या बरे पेपरात चिंटूचा जोक यायचा विसरले) त्या पेपरासाठी वाद की आधी चिंटूचा जोक कोणी वाचायचा.

मग मोठे पणी मिडडे टाईम्स बरा वाटायचा भारतात असे पर्यन्त. लोकसत्ता वगैरे पप्पा कधीच घेत नसत. म.टा घेत रविवारी फक्त व टाईम्स मात्र रोज घेत. म.टा. मध्ये एक एक रंगीत पान असे रविवारी व त्यातच लहान मुलांसाठी काही जोक, कविता असे तेच फक्त वाचन.

मग इथे आल्यावर जेव्हा ऑनलाईन सुरु झाले तेव्हा टाईम्स चा तो 'अवतार' पाहूनच दचकले. कायच्याकाय सिनेमावर भर दिला असतो.. व उथळ बातम्यांवर. मिडडे इतका बकवास झालाय ना. फक्त नटांची लफडी व बाकीच्या उथळ बातम्या....

अमेरीकेत वॉल स्ट्रीट बरा वाटतो व त्या त्या स्टेटचे बुलेटिन असते ते बरे वाटते वाचायला पण ते ही ऑफीसमध्ये लायब्ररीत ठेवले असते म्हणून्,घेवून नाही वाचत.
घरी आल्यावर आता कोण पुन्हा कंप्युटर समोर बसून वाचतय..

कुठलेच वर्तमान्पत्र आता मनापासून आवडत नाही. आपल्या गावात पाणी व वीज कधी बंद आहेत ही मोलाची माहिती त्यातून कळली की पुरे!

आवडीचे वर्तमानपत्र म्हणुन एखाद्या वृत्तपत्राचे नाव सांगणे कठीन आहे.सर्वांची विचारधारा सारखीच. गुणात्मक दृष्टीकोनातुन वेगळेपण काहीच जाणवत नाही.

Pages