चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की बघा. Happy
Submitted by अस्मिता. on 11 June, 2025 - 19:08 >>> आज नेफ्लिवर दिसला. जाणार आहे लगेच. दोन दिवस राहिला तर पाहीन.

फोर डी बारकी फिल्म, युनिवर्सल किंवा सायन्स सेंटर, नाएग्रा, किंवा पार्क वगैरे ठिकाणी असतात त्या बघायला मजा येते. पायाखालून उंदीर गेला असं वाटतं, मध्येच पायाला थंडी वाजते, हादरायला होतंसं वाटतं, आपणं मंगळावर उताणे पडतो.
नेहेमीच्या पिक्चरला रिक्लायनर पेक्षा जास्त बेल्स अ‍ॅंड व्हिसल मला परवडतच नाहीत. रिक्लायनरचं आमच्या घरच्यांना व्यसन लागलंय म्हणून. मला साधी गुबगुबीत खुर्चीही पुरे होते. अगदीच गाजावाजा केलेला असेल ऑपनहायमर सारखा तर आयमॅक्स.

या आधीचे पाहायला हवेत असे काही नाही. द फायनल रेकनिंग बघून खतम कर >> काहीही काय अस्मिता ? पहिला मस्ट आहे. पुढचे नाही बघितले तरी चालतील असे म्हणेन मी Happy

तेच अमित. अर्धा तासाच्या आणि नेहमीच्या नसलेल्या- टुरिस्ट प्लेसेसला असलेल्या मलाही आवडलेल्या आहेत. उलट तो फार छान अनुभव असतो. प्राण्यांच्या निसर्गाच्या आणि डिस्नीची 'सोअरिंग ओव्हर कॅलिफोर्निया' अतिशय फेवरेट राईड होती.

ब्रह्मास्त्र आयमॅक्स मधे पाहून मला मळमळायला लागले होते, फारच लाऊड आणि हादरे बसवणारे होते. सेन्सरी ओव्हरलोड सहन होत नाही, खूप ॲलर्ट होऊन बसतो मेंदू. नंतर थकवा येतो. इतरांना होत नसेलही असे पण मला होते.

पहिलाही बघ गं मग ललिता प्रीती. असं करत सगळेच पाहायला लावू तिला. Happy

आमच्या देशात दिसत नाहीये राभु, त्यामुळे कल्पना नाही. पण पहिलाच असेल. 'द फायनल रेकनिंग'चा पहिला पार्ट म्हणजे सहावा 'मिशन इम्पॉसिबल.' (जो मी प्राईमवर पाहिला.) मी वर लिहिले आहे तो 'द फायनल रेकनिंग' चा दुसरा पार्ट म्हणजे सातवा 'मिशन इम्पॉसिबल.' अजून कन्फ्यूज केले बहुतेक. Happy

रिसेंटली जे पिक्चर IMAX करता बनलेले आहेत ते सिनर्स आणि MI हे फक्त तिकडे पाहिले. बाकी मग नॉर्मल ठिकाणीच बघतो. असे स्पेशल असतील तर त्यांचे शूटिंग तसे झालेले असते त्यामुळे ते एक मोठा अवकाश घेऊन मोठा पडदा भरू शकतात. सिनर्स मध्ये तर काही सीन्स असे भव्य आणि काही नॉर्मल असे होते तेव्हा ते भव्य सीन्स फार भारी वाटले बघायला.

आवाजाचा ज्यांना त्रास होतो त्यांनी खरंच IMAX मध्ये जाऊ नये. तिकडे जास्ती आवाज असतो असे वाटते. मला तो आवडतो, आधीची पुण्याच्या गणपतीतल्या डॉल्बीची सवय आहे म्हणा Proud

ओके ओके. आता विकिवर दिसलं. हा सेकंड लास्ट भाग आहे.
पहिला भाग आधी पहावा म्हणून ब्रेक घेतला तर हा जाणार आहे लवकरच.
टॉम क्रूझ एव्हढही वयस्कर वाटत नाही. टॉपगन मधे तरूण आहे.
आपला ऋत्विक पण काही वर्षांनी असा दिसेल.

४डी वगैरे ऐकले की मलाही पायातून जाणारे उंदीर आठवतात. डिस्नेलॅण्ड मधे एका शो मधे होते बहुतेक. किंवा युनिव्हर्सल स्टुडिओज मधे. बाकी पूर्ण पिक्चर असले गिमिक्स असतील तर कंटाळा येईल. समोरचा सीन जितका गुंग करेल तितके चांगले. "डी" दोनच ठीक आहेत. गंमत म्हणून कधीतरी तीन - ते ही कथा तशी असेल तर. शोले ३डी मधे आणून काय करणार. कोणीतरी प्रयत्न केला होता असे लक्षात आहे.

वरती सनीबद्दल रानभुलींशी सहमत. अमिताभच्या सुरूवातीच्या अँग्री यंग मॅन रोल्स मधे संताप/चीड हा मुख्य गाभा होता. फायटिंग वगैरे हे त्यातून निर्माण झालेले. दीवार, काला पत्थर मधे तो राग त्याच्या चेहर्‍यावर, बॉडी लँग्वेज मधे दिसत असे. नंतर डॉन, दोस्ताना, शान ई मधे तेच सलीम जावेद असूनही पिक्चर फिल्मी झाले. सनीच्या बाबतीत अर्जुन, घायल मधे तसाच राग व तिरस्कार त्याच्या चेहर्‍यावर दिसत असे. त्याचा इफेक्ट वेगळाच होता. इव्हन घातकमधे थोडा आहे पण घातक जास्त फिल्मी आहे हे ही बरोबर. नंतर काही दिग्दर्शकांनी अमिताभचे अंडरसेलिंग केले तसेच थोडे सनीचे झालेले दिसते.

सनी आवडतो आणि त्याची साउथ स्टाइल फायटिंग असलेले पिक्चर आवडतीलच - हे इतर कोणाचेही पाहण्यापेक्षा सनीचे आवडतील. थोडा जाट- तडका असेल तर जास्त आवडेल. म्हणजे हरयाणवी स्टाइल संवाद व तेथील फ्लेवरचे विनोद. पण तो यापेक्षा दमदार रोल करायला केपेबल आहे. सशक्त कथा, संवाद वगैरे. अर्जुनचे उदाहरण चपखल आहे.

फारेण्ड धन्यवाद. Happy

जाट मधे संवाद हरियाणवी नाहीत. फाईट सुरू होऊन सनीची इमेज गुंडांच्या डोक्यात तर्‍हेवाईक माणूस अशी झाली कि बॅकग्राऊंडला पंजाबी फोक (बहुतेक गुरूदास मानच्या आवाजातलं) सुरू होतं. सनी इडली खात असतो, गुंडांचा धक्का लागतो, इडली पडते, तो माफी माग म्हणतो. त्यावरून हाणामारी होते. मग तो म्हणतो कि आम्ही अण्णाची माणसं आहोत. यावर सनी म्हणतो "अण्णा माफी मागणार का ?" पुढच्या सीन मधे सर्वांना घेऊन माफी मागायला अण्णाकडे.त्याची धुलाई करून त्याला घेऊन त्याच्या वरच्या बॉसकडे. हा सीक्वेन्स भारीच आहे. जमलाय.

"मैं इडली खा रहा था ... " - सनी देओल Lol Lol

हा संवाद त्या २ ऑक्टोबर सत्संग सारखा फेमस होणार

३/४ डी ला माझे डोळे दुखतात. सेन्सरी ओव्हरलोड विशेषतः भडक कलर्स आणि ढणढण आवाज असेल तर मलाही मळमळतं. रामलीलाच्या वेळी झालं होतं तसं.

ऑपनहायमर अपवाद…

आईस एज वगैरे छान वाटतात बघायला कारण त्यांची कलरस्कीम सुदिंग न्युट्रल असते.

ल प्री, सगळे MI पहा. मज्जा येते. त्यातल्या त्यात मला तिसरा जरा बोरिंग वाटला होता.

टॉम क्रूझ एव्हढही वयस्कर वाटत नाही. टॉपगन मधे तरूण आहे.>>> तो चिरतरुण आहे Proud
टॉम क्रूज आजही प्रचंड आवडतो मला.

भारतात सिनेमागृहात फार जास्त आवाज ठेवतात असं वाटतं. त्यामानाने कॅनडात सुसह्य असतं. पिक्चर चालू असताना भारतात लोक फार गोंधळ घालतात माहोल माहोल करुन. इथे चिडीचुप! फारतर फिस्स हसतात. त्यामुळे पॉपकॉर्न खाणं ही माझ्या कधीकधी जिवावर येतं Lol
मला डेड रेकनिंगही बोर झालेला. पण फायनल रेकनिंगला मजा आली.

मला डेड रेकनिंगही बोर झालेला. पण फायनल रेकनिंगला मजा आली. >> Lol हे दोन स्वतंत्र आहेत काय? मग मी घोस्ट प्रोटोकॉल शेवटचा पाहिला आहे या सिरीज मधला. डेड झाल्यावरही एक नंतर फायनल आहे हे माहीत नव्हते. फायनल तरी फायनल आहे का? की माबोकरांच्या हेमाशेपो सारखे? Happy

तो चिरतरुण आहे >> Lol

माबोकरांच्या हेमाशेपो सारखे >>> Lol

मला डेड रेकनिंगही बोर झालेला. >>> प्रसंग लांबलचक असल्याने वेग संथ वाटतो, पण हे आवडतं. खूप दिवसांनी मानवी मारामार्‍या पाहिल्या.
हा लॅपटॉपवर बघून चूक केली असं वाटतंय. सुरूवातीचे अंडरवॉटर प्रसंग लॅपटॉपच्या पंधरा इंची स्क्रीनवर अजिबात खुलत नाहीत. ब्ल्यूटूथ स्पीकर चार्जिंगला लावलाय. पुढचा एक तास तरी थोडा स्पष्ट आवाज करून ऐकता येईल. लॅपटॉपचा आवाज फॅनच्या आवाजात मिसळून जातो.

टायगर, पठाण एम आय वरून बेतलेले वाटतात. जेम्स बॉण्डचा अमेरिकन अवतार आहे असं वाटलं.
खाली आपटलेला माणूस रिबाऊण्ड होऊन वर येत नाही या एकाच गोष्टीमुळं एअरपोर्टची सिक्युरिटी सिस्टीम हॅक करून फेस रेकग्निशन सिस्टीम मधे अशी छेडछाड होऊ शकते का ? अशा प्रश्नांना फाट्यावर मारता येतं.

हेमाशेपो >>> Lol

प्राइमवर एम.आय.चे सात भाग दिसले. पहिला तरी बघेनच, सगळे बघायचे की नाही बघू Proud

पहिला तरी बघेनच >> पहिला, Ghost Protocol, Fallout हे तीन नक्की बघ. दुसरा मला आवडतो पण त्याचे रिव्हुज सगळ्यात कमी आहेत.

इडलीचा सिक्वेन्स मस्त जमलाय, वरच्या परिक्षणाशी सहमत सनी पाजी एकाचवेळेस हा ६९ वाटतो आणी नाहि पण वाटत.
मी सनी पाजिला सॉरी मिळत एकदाच तिथवर पाहिला मग दाक्षीनात्य मारामारीचा ओव्हरडोस वाटायला लागुन मधेच (इथली चर्चा आठ्वुन ) घायल लावला आणी तोच परत कितव्यादा तरी पाहुन टाकला...जबरदस्त जमलेला आहे घायल.

ब्रह्मास्त्र आयमॅक्स मधे पाहून मला मळमळायला लागले होते
>>
ब्रह्मास्त्र न बघता नुसते डायलॉग्ज ऐकूनही मळमळायला होऊ शकतं...

Proud पूर्ण जीवसृष्टीच्या विनाशाची ताकद असलेल्या ब्रह्मास्त्राचा तुकडा प्लास्टिकच्या पिशवीत सुद्धा न ठेवल्यामुळे धडधडायला सुद्धा लागलं होतं. शेवटाची आग आणि ज्वाळा बघून पार्किंग लॉट मधे स्वतःची गाडी सापडेना सगळ्या गाड्या पिवळ्या टॅक्सी सारख्या दिसू लागल्या. संवाद भंगार आहेतच. इंग्लिशचे हिंदी मग पुन्हा इंग्लिश आणि पुन्हा चौथीचे हिंदी भाषांतर केल्यावर जे होईल ते त्यांच्या मुखातून बाहेर पडते.

ही गंमत आहे पण मला खरेच धडधड आणि मळमळ झाले त्या प्रचंड मोठ्या आवाजाने. मला आपले साधेच सोसवते. मायग्रेन असलेली लोक गंध, आवाज आणि प्रकाशाला जास्त सेन्सिटिव्ह असतात. सगळेच सेन्सेस रिफाईन्ड असतात. इतरांपेक्षा चांगल्या- वाईट दोन्ही अनुभवांची तीव्रता वाढते. म्हणून तर पिसे काढली ब्रह्मास्त्रची! Happy

संपला एकदाचा डेड रेकनिंग. पन पुढच्या भागाची सुरूवात शेवटाला झाली.
शेवटचा तास वेगवान आहे. द बर्निंग ट्रेन, गदर, शोले . कसांडा क्रॉसिंग आठवून गेले.

यात अर्नोल्ड किंवा जॅकी चॅन असते तर अजून मजा आली असती. त्यांचे स्टंटस खरे वाटतात.

अर्नोल्ड किंवा जॅकी चॅन असते तर अजून मजा आली असती. त्यांचे स्टंटस खरे वाटतात.
>>>
अर्नोल्ड असता तर तो मोटरसायकलच्या आधीच खाली पडला असता Proud
मला व्यक्तिशः अर्नोल्ड आणि जॅकी चॅनचे स्टंट्स खूप आवडतात, पण मिशन इम्पॉसिबलचे स्टंट्स फक्त आणि फक्त टॉम क्रूजचेच! इतकी चपळता, वेग आणि शिवाय देखणेपण हे पॅकेज अजून कोणाचेही नाही.

Pages