Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इस्लामी देशांनी इतर देशांत
इस्लामी देशांनी इतर देशांत मुस्लिमांवर होणार्या अ त्याचाराबद्दल कधी काही बोलल्याचं आठवतं का? त्या सगळ्यांपेक्षा अमेरिकेने जास्त वचवच केली. पाकिस्तानने भारताबद्दल बोलणं सोडा, कारण दोघे एकमेकांचे अघोषित शत्रू आहेत आणि त्यांचा तसा इतिहास आहे. पॅलेस्टीनींच्या वंशसंहाराबद्दल सौदी अरेबिया बोलला का?
काही देशांनी काश्मीर प्रकरणी तोंड उघडलं.
पण अरब देशांनी तोंड उघडायला त्यांच्या प्रेषिताबद्दलचं भाजप प्रवक्तीचं वक्तव्य कारण ठरलं. तेव्हा उघूर मुस्स्लिमांचा मुद्दा मला गैरलागू वाटतो.
१९७०-७१ आणि आताच्या
१९७०-७१ आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. तेव्हा पाकिस्तानी सेनाच वंशसंहार करत होती. लाखोंच्या संख्येने बांग्लादेशी भारतात आले होते.
श्रीलंकेतही अराजकाची स्थिती निर्माण झाली, तेव्हा भारताने तिथे तात्पुरते का होईना . हुकूम चालवणार्यांशी लगेच संपर्क साधला. श्रीलंकेला मदतही केलीनेपाळमध्येही अस्थिरता आहे. तिथे भारताने एकदा हात पोळून घेतल्यावर ध डा शिकला ; चीनचा धोकाही होताच.
बांग्लादेशच्या बाबतीत अजूनही आपण तिथून पळून आलेल्या आणि तिथल्या जनतेच्या मनात जिच्याबद्दल रोष आहे अशा माजी पंतप्रधानाला कवटाळून बसलो आहोत. ती सत्तेत असणं आपल्या सोयीचं आहे, याचा अर्थ तिच्या विरोधकांना पूर्ण इग्नोर करणं याला राजनैतिक मुत्सद्देगिरी म्हणत नाहीत. अन्य देशांचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा इथल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची औपचारिक होईना भेट घेतात.
@ मानव, आणि फार्स विथ द
@ मानव, आणि फार्स विथ द डिफरंस, वादविवादाच्या दिशेने जाणाऱ्या धाग्याला परत चर्चेच्या दिशेने वळल्या बद्दल धन्यवाद. कुठलेही मुद्दे खोडून काढणे हा उद्देश नसुन त्यावर मला जे जाणवले ते मांडण्याचा प्रयत्न करते.
वैयक्तिक दृष्ट्या मला भारताची लॉंग टर्म पॉलिसी मला अजुनही नेहरुंच्या काळात होती त्या प्रमाणेच वाटते. "लुक इस्ट" वगैरे टॅक्टिकल फोकस काळानुसार बदलला असेल पण गाभा तोच आहे. एक उदाहरण म्हणून रशियाने हंगेरीत रस्त्यावर रणगाडे घालून माणसे चिरडली तरीही नेहरुंनी ठरावाच्या विरोधात मतदान करण्याऐवजी तटस्थता स्विकारावी ह्यात भाजपचे नेते म्हणतात तसा साम्यवादी विचारसरणीशी घनिष्टता वगैरे नसुन देशाच्या लॉंग टर्म मित्रांचा विचार होता. तेच धोरण मोदी सरकारने युक्रेन युद्धाच्या वेळी रशियन पुतीन ह्यांच्या बाबतीत वापरले. चीन चा अंदाज आपल्या नेतृत्वाला ६२ मध्ये ही आला नव्हता आणि २०२० मध्ये गलवान झाले तेव्हा ही झाला नाही. पण सध्या भारताच्या दृष्टीने जमेची बाजू ही आहे की अमेरिकेचे आणि भारताचे आशिया खंडातील इंटरेस्ट (चीनी वर्चस्वाला शह देणे) हे एकाच बाजूला आहेत.
शेख हसीना ह्यांचे चीनचा दौरा अर्धवट टाकून परत जाणे अनप्रिसिडेंटेड होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या उघडपणे कधीच काही केले जात नाही. ज्या अर्थी हे इतके पब्लिकली तुटले त्याअर्थी आधी बरेच ताणले गेले असणार. त्याचा अंदाज भारतीय मुत्सद्यांना आला नाही की येऊनही ते काही करु शकले नाहीत ह्याचे उत्तर मला अजुनतरी मिळाले नाही.
पण नंतरच्या घडामोडी अतिशय इंटरेस्टिंग होत्या. उदा. शेख हसीना ह्यांच्या मुलांची पहिली प्रतिक्रिया 'माझी आई आता कधिही बांगलादेशात परत जाणार नाही' अशी होती . तिच्या पासुन अवघ्या ४८ तासात यु टर्न घेतला गेला. उत्तरोत्तर शेख हसीना ह्यांचे विरोध दर्शवणे जास्त आक्रमक होत जाणे, त्या इतक्या आक्रमक असतानाही त्यांच्या औपचारिक हस्तांतरणाची मागणी अजुनही तिथल्या सरकारने न करणे ह्या घटनांचा ट्रेंड आपण गोष्टी बर्यापैकी कंट्रोल मधे असाव्यात असे दर्शवतो. आणखी एक ताजी बातमी म्हणजे चीन च्या पाठिंब्यावर तगुन असलेल्या म्यानमार येथील लष्करप्रमुखांच्या विरुद्ध निघालेले कायदेशीर समन्स. ८०% भुभाग बंडखोरांच्या ताब्यात किमान वर्षभर तरी आहे पण समन्स बांगलादेशातील सत्तांतरानंतर निघाले आहे. हे भारत करत नसेलही तरी भारताच्या पथ्यावर पडणारे निश्चितच आहे.
युद्ध करू नका शांततेत प्रश्न सोडवा, अल्पसंख्य समुदायाच्या सुरक्षेची काळजी घ्या वगैरे नेहमी वापरल्या जाणाऱ्या टर्म्स दबाव बनवायला वापरल्या जात नाहीत निव्वळ उपचार म्हणून वापरल्या जातात. आतली गणिते अर्थातच वेगळी आणि गुंतागुंतीची असतात.
तसेच सामुदायिक हिंसेला नेहमी स्थानिक अर्थकारण/सत्ताकारणाचे पदर असतात. परत एकदा उदाहरण म्हणून पाकिस्तानात हिंदूंना उघड उघड टार्गेट केले जात असुन आणि बर्याच निवडणुकीच्या वेळी त्यासंबंधी चे विडिओ आवर्जून फिरवले जाते असुनही आज पर्यंत भारतात एकही मॉब लिचिंग तिथला स्कोअर सेंटर करण्यासाठी झाले नाही. अगदी उत्तर प्रदेशात योगींसारखे मुख्यमंत्री असताना आणि बजरंग दल सारख्या संघटना ऍक्टिव असताना देखील. बांगलादेशातील परिस्थिती काही वेगळी नाही. मोदी -शहा ह्यांची आक्रमक वक्तव्ये ऐकुन लोक नक्की संतापतील चार शिव्या देतील पण ते लोक हिंदुंवर हल्ले करणार नाहीत जे करतील ते निमित्त म्हणुन मोदी -शहांच्या वक्तव्याची वाट बघणार नाहीत. बांगलादेशात हे प्रकार कितीतरी आधीपासून सुरू आहेत. शेख हसीना सत्तेवर असल्या की कमी आणि खालीदा झिया सत्तेवर असल्या की जास्त. ते थांबवणे भारतच काय अमेरिकेला देखील शक्य होईल असे वाटत नाही. पण ह्या हितसंबंधांच्या दबावतंत्रात बाय प्रॉडक्ट म्हणून त्यांची तीव्रता कमी होईल ही आशा आहे.
<<<बांग्लादेशच्या बाबतीत
<<<बांग्लादेशच्या बाबतीत अजूनही आपण तिथून पळून आलेल्या आणि तिथल्या जनतेच्या मनात जिच्याबद्दल रोष आहे अशा माजी पंतप्रधानाला कवटाळून बसलो आहोत. ती सत्तेत असणं आपल्या सोयीचं आहे, याचा अर्थ तिच्या विरोधकांना पूर्ण इग्नोर करणं याला राजनैतिक मुत्सद्देगिरी म्हणत नाहीत. >>>
मुत्सद्देगिरी नाही ती अपरिहार्यता आहे. आशियातील राजकारणात दोन "बिग ब्रदर" आहेत भारत आणि चीन. नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका इ. लोकशाही राष्ट्रांत एक पक्ष भारताच्या बाजूने आणि एक चीनच्या बाजूने झुकलेला अशी परिस्थिती आहे. आज जर शेख हसीना यांना आश्रय दिला नाही तर ह्या भारताशी अलाइन्ड नेत्यांना काय संदेश जाईल? भारत जीव वाचवायला देखील मदत करत नाही, त्यापेक्षा चीन बरा. तसे झाले तर परवडेल आपल्याला? मला नाही वाटत कॉग्रेस सरकार सत्तेवर असते ह्यापेक्षा वेगळा निर्णय घेतला गेला असता.
१ बांग्ला देशात सध्या फक्त
१ बांग्ला देशात सध्या फक्त हिंदूंवर हल्ले होत नाहीएत. शेख हसीनांच्या जवळचे मानले जाणार्या अनेकांना लक्ष्य केलं जातंय- यात राजकारण्यांबरोबर सरकारी अधिकारी, पोलिस , पत्रकार सुद्धा आले.
२. सी ए ए आणि बांग्लादेश यावर या दोन देशांव्यतिरिक्त अन्य मीडियात बरंच काही लिहिलं गेलंय . मोदी शहा यांनी शेख हसीना यांच्या राजवटीपूर्वीच्या काळात बांग्ला देशात हिंदूंवर अत्याचार होत होते, असं म्हटलं. शेख हसीना यांनी हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हटलं . त्या आपल्या देशाचा विचार करतात असं सगळ्या बांग्लादेशींना वाटलं असेल का? (सी ए ए ने काय साध्य करायचंय, त्याबद्दल आता इथे आणखी लिहायची गरज नाही )
३ इथल्या सोशल मीडिया पासून ते लहान मोठ्या नेत्यांपरर्यंत अनेक भगवे मुसलमान दिसला की तो बांग्लादेशीच असं म्हणतात. कैलाश विजयवर्गीय हे नाव चटकन आठवलं. ते भाजपचे प. बंगालमधले प्रचार प्रमुख होते. बांग्लादेशातही हिंदू = भारतीय. भारत आमचा वैरी म्हणून बांग्लादेशी हिंदूही वैरी असा विचार करणारे इस्लामवादी नसतील का?
४. मुजीबूर रहमान यांनी बांग्लादेशाला सेक्युलर घोषित केलं. पण तिथेही इस्लामवादी होतेच. (इथे नेहरू , भारत आणि हिंदुत्ववादी हे शब्द बदलून वाचता येईल). काहींनी बांग्ला मुक्ति संग्रामाला विरोधही केला होता.
५. उठावाचं कारण शेख हसीना यांनी गेल्या काही वर्षांत केलेली दडपशाही हे होतं. त्यात सगळेच सामील होणार आणि हात धुवून घेणार.
६. तिथल्या हिंदूं दमनाच्या ज्या 'बातम्या' इथे पसरवल्या जातात, त्यातल्या खर्या किती आणि अतिरंजित किती?
७ भारत सरकार बांग्लादेशच्या सद्य स्थितीकडे फक्त हिंदू मुस्लिम चष्म्यातून बघणार असतील, तर त्याने प्रश्न सोपे होतील की कठीण ? वर हे विश्वगुरू, दक्षिण आशियातला वडील बंधू या बिरुदांशी किती मेळ खातं?
लोकसत्तेच्या अग्रलेखातून -
लोकसत्तेच्या अग्रलेखातून -
परराष्ट्रमैत्रीच्या परिप्रेक्ष्यात रोकड्या व्यवहारवादामध्ये वैयक्तिक स्नेहभावाची घुसळण टाळणेच हितकारक. याची जाण नसल्यामुळे आपली फसगत झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. अमेरिकेत एका पक्षाच्या सत्ताधीशांना ‘अबकी बार’ म्हणून डोक्यावर ठेवले, की विरोधी पक्षाचे सत्ताधीश आल्यानंतर काहीशी पंचाईत होणारच. मालदीव, नेपाळ, श्रीलंका अशा देशांमध्ये कुणी भारतमित्र सत्ताधीश गवसला की त्यास इतके डोक्यावर चढवायचे की त्या पदावर विरोधी पक्षीय कुणी आल्यावर त्यास भारताचा तिरस्कारच वाटावा. दक्षिण आशियात गेली अनेक वर्षे बांगलादेश हा भारताचा सर्वाधिक स्नेही देश ठरला. याचे एक कारण म्हणजे तेथील नेतृत्वाचे आपण नको इतके लाड चालवले. शेख हसीनांच्या विरोधात गेल्या पाच वर्षांमध्ये वाढत चाललेला असंतोष आपल्याला दिसला नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केले.
-------------
अजूनही शेख हसीनाना कु वाळणार असू आणि तिथले नवे सत्ताधीश पाकिस्तान आणि चीनकडे झुकले तर दोष कोणाचा ? की पुना एक नवा बांग्लादेश मुक्ति संग्राम घडवून हसीनांना तिथे पंतप्रधान करायचं आहे?
<< तसेच सामुदायिक हिंसेला
<< तसेच सामुदायिक हिंसेला नेहमी स्थानिक अर्थकारण/सत्ताकारणाचे पदर असतात. परत एकदा उदाहरण म्हणून पाकिस्तानात हिंदूंना उघड उघड टार्गेट केले जात असुन आणि बर्याच निवडणुकीच्या वेळी त्यासंबंधी चे विडिओ आवर्जून फिरवले जाते असुनही आज पर्यंत भारतात एकही मॉब लिचिंग तिथला स्कोअर सेंटर करण्यासाठी झाले नाही. >>
----- २०२० मधे, कोरोना अगदी दारांत उभा असतांना दिल्ली दंगलीला कुठले कारण होते?
प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी हिंसाचाराचाच आधार घ्यायला हवा का? मॉब लिंचींग होण्यासाठी " गोमांस खाल्ले किंवा बाळगले " असा केवळ संशय घेतला तरी तेव्हढे कारण पुरेसे आहे.
रेल्वे स्टेशनवर एखादा दाढीधारी दिसला तरी त्याचे लिंचींग होते.... कारण भक्ताच्या मनांत तो महंम्मद असल्याचा संशय येतो. तो महंम्मद असला तरी त्याचे लिंचींग व्हायला नको अशा मताचा मी आहे. एखाद्या व्यक्ती बद्दल संशय येत असेल तर पोलीसांना कळवा. त्यांचे काम आहे शहानिशा करायची.
कुणी कुणालाही थांबवून "चल दाखव आधारकार्ड.... पॅन कार्ड " असे दरडावू शकत नाही. दाखविले नाही तर डायरेक्ट लिंचींग ?
तो भवरलाल जैन आहे, हे कळल्यावर अशा प्रकाराला कोलॅटर डॅमेज समजायचा?
<< परराष्ट्रमैत्रीच्या
<< परराष्ट्रमैत्रीच्या परिप्रेक्ष्यात रोकड्या व्यवहारवादामध्ये वैयक्तिक स्नेहभावाची घुसळण टाळणेच हितकारक. याची जाण नसल्यामुळे आपली फसगत झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. >>
----- सहमत.
कुठे थांबायला हवे ? हे कळण्यासाठी मुत्सद्देगिरी हवी. एव्हढे जवळही करु नका कि तुमची लायाबिलीटी ठरावी. कुणाचेही सरकार आले तरी त्या नव्या सरकारचे भारताशी संबंध सौहार्दाचे / मैत्रीचे असायला हवे. आपण बाजू घेत आहोत.
<आज पर्यंत भारतात एकही मॉब
<आज पर्यंत भारतात एकही मॉब लिचिंग तिथला स्कोअर सेंटर करण्यासाठी झाले नाही > मॉब लिंचिंग करणार्यांना तो माणूस मुस्लिम आहे हे पुरेसं असतं. पाकिस्तानचं निमित्त लागत नाही. त्यांचा मुस्लिमद्वेष ऑर्गॅनिक आहे. पाकिस्तान निर्मितीच्या आधीपासूनचा.
मॉब लिंचीग आणि दंगली १००%
मॉब लिंचीग आणि दंगली १००% वाईटच आहेत ह्याबद्दल मायबोली वर कुणाला आक्षेप असेल असे वाटत नाही. फॉर द रेकॉर्ड मला अजीबात नाही.
मी फक्त अशा घटना घडतात त्यामागे स्थानिक अर्थकारण/ राजकारण/ जुने हिशेब चुकते करणे ही कारणे असतात असे म्हंटले. शेजारच्या देशातील पंतप्रधानांनी काही म्हंटले म्हणुन कुठे अशा घटना घडत नाहीत. आपल्या देशात नाही आणि जगातील कुठल्याही देशात नाही.
<<<मॉब लिंचिंग करणार्यांना
<<<मॉब लिंचिंग करणार्यांना तो माणूस मुस्लिम आहे हे पुरेसं असतं. पाकिस्तानचं निमित्त लागत नाही. त्यांचा मुस्लिमद्वेष ऑर्गॅनिक आहे. पाकिस्तान निर्मितीच्या आधीपासूनचा.>>>
एक्झॅक्टली. बांगलादेशातील परिस्थिती देखील हीच आहे हे स्पष्ट करण्यासाठी ते उदाहरण दिले होते.
शेख हसिना यांच्या विरुद्ध
शेख हसिना यांच्या विरुद्ध असंतोष एव्हढा प्रचंड खदखदत होता आणि भारताला याची कानोकान खबर नाही? शेख हसिनाचे विमान दिल्ली मधे आल्यावरच आपल्याला असंतोषाची तिव्रता समजली हे कशाचे लक्षण आहे ?
आपले कान / डोळे एव्हढे कमजोर आहेत?
अजूनही शेख हसीनाना कु वाळणार
<<<अजूनही शेख हसीनाना कु वाळणार असू आणि तिथले नवे सत्ताधीश पाकिस्तान आणि चीनकडे झुकले तर दोष कोणाचा ? की पुना एक नवा बांग्लादेश मुक्ति संग्राम घडवून हसीनांना तिथे पंतप्रधान करायचं आहे?>>>
नवे सत्ताधीश भारताने शेख हसीना ह्यांना आश्रय दिला म्हणून चीन कडे झुकेल? खरच ? आंतरराष्ट्रीय राजकारण असे चालते?
<शेजारच्या देशातील
<शेजारच्या देशातील पंतप्रधानांनी काही म्हंटले म्हणुन कुठे अशा घटना घडत नाहीत. आपल्या देशात नाही आणि जगातील कुठल्याही देशात नाही.> मी इतक्या छातीठोकपणे असं म्हणणार नाही. सरळ संबंध नसेल. पण खतपाणी तर मिळतंच.
आणि अंतर्गत राजकारणात तुम्ही शेजारी देशाचं नाव घेता तेव्हा मुत्सद्देगिरीचं भजं होतं.
<एक्झॅक्टली. बांगलादेशातील परिस्थिती देखील हीच आहे हे स्पष्ट करण्यासाठी ते उदाहरण दिले होते.>
बांग्लादेशच्या निर्मितीत भारताचा हात होता. शेख हसीना भारताच्या ओंजळीने पाणी पितात असा त्यांच्या विरोधकांचा आक्षेप आहे.
<नवे सत्ताधीश भारताने शेख हसीना ह्यांना आश्रय दिला म्हणून चीन कडे झुकेल? > माझ्या दोन वाक्यांमध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय नाही.
तात्पर्य - जे फार्स विथ द डिफरन्स यांनी त्यांच्या पहिल्याच प्रतिसादात स्पष्टपणे लिहिलं आहे - भाजपला बांग्लादेशमधल्या हिंदूंची काहीही पडलेली नाही. त्यांचं जे काही पोस्चरिंग आहे ते इथल्या ऑडियन्ससाठी आहे - जसा लोकसत्तेचा अग्रलेख. बाकीचे राजकीय पक्षही तेच करताहेत.
खरंच काही करायचं होतं तर त्यासाठी दुसरी चॅनेल्स वापरायला हवी होती.
निदान यापुढे तरी अंतर्गत राजकारणात शेजारी देशाचं नाव घेणार नाहीत, अशी आशा करणंही फोल आहे.
या विषयावर हेमाशेपो. - हे माझं शेवटचं पोस्ट.
भरत सर लिहा बिनधास्त सगळे
भरत सर लिहा बिनधास्त सगळे आपलेच आहेत ईथे.
कॉग्रेस सरकार सत्तेवर असते
कॉग्रेस सरकार सत्तेवर असते ह्यापेक्षा वेगळा निर्णय घेतला गेला असता.>>> यात तथ्य आहे, कारण शेख हसिनांचे जे समर्थक आणि पक्षातले आहेत ते मुख्यत्वे मुक्तीबाहिनीत ज्यांनी काम केले, हौतात्म्य पत्करले अशांचे वंशज आहेत.(यात मोठ्या संख्येने हिदू आहेत, आणि या मुक्तीबाहीनीच्या वंशजांच्या कोट्यामुळेच सर्व उद्रेक झाला) ते आणि भारत हे पुर्वापारपणे एकमेकाचे प्रो आहेत. म्हणूनच मी लिहीले होते की भारतने या बाबतीत प्रोॲक्टिव्ह रहायला हवे होते , जे या प्रकरणी दिसत नाही आहे. ( हस्तक्षेपाची वेळ तेव्हा होती जेव्हा शेख हसीना सत्तेवर होती आणि सर्व सिस्टीम आपण कामाला लावू शकत होतो) कारण मुक्तीबाहीनीच्या माध्यमातून एक प्रबळ इंटेलिजन्स नेटवर्क नक्कीच तिथे असणार ज्याने आपल्यला ग्राउंडवरच्या सिच्युएशनची इत्यंभूत माहीती मिळत असेल. दक्षिण पुर्व आशियात भारताने जिओपोलिटिकल बॅलन्स च्या संदर्भात चिनलाच आपला प्रमुख प्रतिस्पर्धी मानून त्याअनुषंगाने इतर देशांच्या बाबतीत आपली परराष्ट्रीय धोरणे अवलंबायला हवीत असे निदान माझे मत आहे, पण सध्याच्या सरकारच्या देशांतर्गत धोरणांच्या ( हिंदू धार्मिक ध्रूविकरण) या बाबी विपरीत जाउ शकतात त्यामुळे ते कदाचित या बाबतीत काणाडोळा करत असावेत. म्हणूनच आपल्या सरकारला बांगलादेशातील हिंदूची काहीही पडलेली नाही त्यांना फक्त या गोष्टीचे भांडवल करुन त्यांची देशांतर्गत असलेली स्वतः ची प्रतिमा ठळक करायची आहे या निष्कर्षाप्रत यावे लागते.
खालिल व्हिडिओ ५ महीने जुना आहे पण खरच खुप सुंदररीतीने या सर्वाच्या पार्श्वभूमीची कल्पना देतो..एकदा जरुर पहावा असा आहे.
https://youtu.be/rcT7MJ89TvQ?feature=shared
कॉग्रेस सरकार सत्तेवर असते
.
मुद्दा हा नाहीच आहे की मोदी
मुद्दा हा नाहीच आहे की मोदी पोजिंग करताहेत (ती वस्तुस्थिती आहे). मनमोहन सिंग ह्यांच्या विरुद्ध चा भाजपचा प्रचार "आदमी अच्छा है पर कमजोर है" (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन्ही कडे) असा होता. त्यामुळे मोदींनी स्वप्रतिमा आक्रमक अशी प्रोजेक्ट करणे हे ओघाने आलेच. "५६ इंच का सीना, घर में घुस के मारेंगे "वगैरे क्लिअर कट पोजिंग आहे. निवडणुका असतील तर त्याचा अतिरेक होणार हे उघडच आहे.
हे योग्य आहे का तर नाही पण हे होत रहाणार ही वस्तुस्थिती आहे. माझ्या दृष्टीने मुद्दा हा आहे की त्यांचे हे पोजिंग बांगलादेश आणि एकुणच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या हितसंबंधांना बाधा आणु शकेल इतके परिणामकारक आहे का? माझ्या मते नाही. चीन असो, बांगलादेश असो अफगाणिस्तान किंवा अमेरिका पॉलिसी लेवल ला मनमोहन सरकारच्या धोरणांनाच कंटिन्यु केले जाते आहे. कुठेही यु टर्न घेतलेला नाही.
बांगलादेशातील परिस्थिती इतकी चिघळले पर्यंत अंदाज आला नाही की अंदाज असुनही काही करता आले नाही हे इतक्यात कळणे शक्य नाही त्यामुळे त्यावर माझे काही मत नाही. पण सत्तापालट झाल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, घडत आहेत त्यावरून 'हातात आता काही उरलेच नाही' इतपत वाईट परिस्थिती नसावी असे मला वाटते. हा बुद्धिबळाचा शह-काटशह असा खेळ आहे आणि तो सुरू राहील, अजुन चेकमेट झालेला नाही.
आता मनमोहन सिंग यांच्यावर
आता मनमोहन सिंग यांच्यावर ढकलायचे . अर्थ स्पष्ट आहे कि चूक झाली याची ही कबुली आहे.
फार्स विथ द डिफरंस - व्हिडिओ
फार्स विथ द डिफरंस - व्हिडिओ बघितला. बांग्लादेशने ऑगस्टनंतर घेतलेले निर्णय आणि हा व्हिडिओ याच्यात बराच ताळमेळ दिसत आहे.
बांग्लादेशमध्ये हिंदू (आणि
बांग्लादेशमध्ये हिंदू (आणि फक्त हिंदूंबाबत नाही, तर हसीना समर्थकांबाबत ) जे होतंय त्यापेक्षा कितीतरी भयंकर प्रकार किती तरी अधिक पटीने म्यानम्यारमधल्या रोहिंग्यांबाबत झाला. पॅलेस्टिनींबाबत होतोय. त्यातल्या फक्त बांग्ला हिंदूंबद्दल कळवळा वाटून घेणं माझ्या मानवतावादापेक्षा धर्मवादी दृष्टिकोणातूनच घडू शकतं. त्याच दृष्टिकोणातून चीनमधले उघूर बॅलन्सिंग अॅक्टसाठी आठवतात.
समजा बांग्लादेशात फक्त ह सीना समर्थकांना लक्ष्य केलं असतं, तिथल्या हिंदूंना झळ पोचली नसती, तर इतकी आरडाओरड झाली असती का?
हेमाशेपो लिहून झाल्यावरही लिहावं लागलं.
ज्या गोष्टीचा त्रास आपल्याला
ज्या गोष्टीचा त्रास आपल्याला होतोय किंवा होईल त्यावर जास्त लक्ष ठेऊन प्रतिक्रिया देणं हे योग्यच आहे. तसाही हिंदू लोकांसाठी भारत सोडून दुसरा देश नाही. त्यामुळे फक्तं धर्मवादी दृष्टिकोणातूनच हे झालेलं आहे अस नाही.अफगाणिस्तानातील उरल्या सुरल्या शीख लोकांनाही तालिबान सत्तेत आल्यावर भारतच आठवला होता
ही सगळी कर्जे २०१४ पूर्वी
ही सगळी कर्जे २०१४ पूर्वी दिलेली होती असं म्हणायचं.
यात पॉवर सेक्टरमधल्या कंपन्या पुढे आहेत. त्यांची मालमत्ता कोणाच्या घशात गेली असेल बरं? आणि केवढ्याला?
रिलायन्स नेव्हल & एंजिनीयरिंग - याच कंपनीला राफेलचं काँट्रॅक्ट मिळालं होतं ना?
थोडंसं विनोदी...
थोडंसं विनोदी...गुजरात मॉडेल
https://www.financialexpress.com/business/infrastructure-villagers-in-gujarat-create-fake-toll-plaza-collects-rs-75-crore-from-motorists-heres-how-the-scam-unfolded-3344172/
https://www.thehindu.com/news/national/gujarat/fake-court-busted-in-gujarat-conman-who-posed-as-judge-passed-judgements-since-2019-arrested/article68790115.ece/amp/
<<<
<<<
बांग्लादेशमध्ये हिंदू (आणि फक्त हिंदूंबाबत नाही, तर हसीना समर्थकांबाबत ) जे होतंय त्यापेक्षा कितीतरी भयंकर प्रकार किती तरी अधिक पटीने म्यानम्यारमधल्या रोहिंग्यांबाबत झाला. पॅलेस्टिनींबाबत होतोय. त्यातल्या फक्त बांग्ला हिंदूंबद्दल कळवळा वाटून घेणं माझ्या मानवतावादापेक्षा धर्मवादी दृष्टिकोणातूनच घडू शकतं. त्याच दृष्टिकोणातून चीनमधले उघूर बॅलन्सिंग अॅक्टसाठी आठवतात.>>>
तुमच मत तसं आहे म्हणून वस्तुस्थिती तशी होते का? पॅलेस्टिनी, रोहिंग्या, श्रीलंकेतील तामीळ, बोस्नियामधील मुसलमान, येमेन मधील शिया, पाकिस्तानातले अहमदी, इराक मधील याझिदी, अनेक गटांवर त्यांच्या धार्मिक समजुतीमुळे अन्याय झाला. त्यातील एकाचाही उल्लेख चर्चेत आला नाही म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही असा निष्कर्ष आपोआप निघतो का?
माझे वडील राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या कडुन मी ह्या विषयांशी संबंधित घटनांचे शास्त्रीय पद्धतीने तर्कशुद्ध विश्लेषण कसे करायचे ते शिकले. ती पद्धत मी अजुनही वापरते.
मी हिंदुत्ववादी नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक मुद्यावरून मोदींवर टीका करण्याची गरज मला वाटतं नाही.
तुम्हाला तुमचे मत बनवण्याचे स्वातंत्र्य आहे पण इतक्या अतर्क्य विचारसरणीशी चर्चा करणे मला शक्य नाही.
It can be termed a classic
It can be termed a classic case of ‘targeting’ a Muslim in Uttarakhand without any distinction, by the ‘Hindutva’ forces allegedly unleashed by the ruling BJP/RSS combine. Even ‘nationalist’ credentials of serving in the Indian Army could not save a retired Muslim Army officer from being targeted by the so-called ‘Hindutva’ forces. Interestingly, his being a ruling Bharatiya Janata Party (BJP) leader also could not save him.
https://www.newsclick.in/uttarakhand-retd-muslim-army-officer-faces-ire-...
हे गृहस्थ चालवत असलेल्या शाळेने शुक्रवारी शाळा लवकर सोडायचा निर्णय घेतल्यापासून त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली गेली.
भगव्यांनी सगळ्या कॉन्व्हेंट शाळा बंद पाडायला हव्यात की नाही?
गुजरातमध्ये फेक
गुजरातमध्ये फेक डॉक्टर्ससुद्धा आहेत. अर्थात ते कुठे नसतात म्हणा?
पण गुजरातमधून पी एम ओ चा फेक ऑफिसर निघतो , हे मात्र अद्वितीय आहे.
सत्तापालट झाल्यानंतर ज्या
सत्तापालट झाल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, घडत आहेत त्यावरून 'हातात आता काही उरलेच नाही' इतपत वाईट परिस्थिती नसावी असे मला वाटते>>> तुम्ही मी डकवलेली व्हिडिओ लिंक पाहीलीत का? त्यामध्ये शेवटाला एका गोऱ्याचा लष्करीतळ नाही दिले तर सत्तापालट घडवून आणला जाईल असा धमकीवजा इशारा इम्रान खान व शेख हसीना अशा दोघांना मिळाल्याचा उल्लेख आहे..आणि त्याप्रकारे पुढील घटना घडलेल्या आहेत.. ज्याप्रकारे बांगलादेशात बीएनपी, जमात ए इस्लामी च्या नेत्यांना साईडलाईन करुन मुहम्मद युनुस चे प्यादे नेतृत्वासाठी पुढे करण्यात आले त्यावरुन हा जिओपोलिटिकल वर्चस्वासाठी केला गेलेला एक डावपेच असण्याची शक्यता जास्त दिसते आहे. आणि जर त्या प्रयत्नांत शेख हसीनाची सत्ता उलथवून टाकण्यात आली तर त्याचा एक उद्देश भारताच्या या देशातील महत्वाला शह देणे हा ही असण्याचे संभवते. अशा रीतीने आखलेल्या डावपेचांत / कटांत हाती आलेली सुत्रे सहजा सहजी निसटू न देण्यावर फोकस असतो आणि जर बांगलादेशातील अवामी लीग आणि शेख हसीनाच्या वर्चस्वाला कायमचे संपवायचे असेल तर त्यांना प्रो असणाऱ्या मुक्तीबाहीनी समर्थकांना ( ज्यात मोठ्या संख्येने हिंदू आहेत) सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संपवावेच लागेल. त्यामुळे माझ्यामते सध्या आपल्या हाती फक्तं काही टक्के प्रयत्न आणि मॅक्सिमम टक्के 'होप' करण्यापलीकडे काही उरले नाही असे वाटते. आता हे प्रयत्न भारत सरकार दाखवण्यापुरते करता आहेत हे मी पुन्हापुन्हा म्हणतोय कारण जर त्यांच्या लेखी खरंच बांगलादेशातील हिंदूंच्या जिवीताचा गांभीर्याने प्राधान्यक्रम असता तर आपल्याला या पेक्षा खुप आधीच हस्तक्षेप दिसला असता.
पण गुजरातमधून पी एम ओ चा फेक
पण गुजरातमधून पी एम ओ चा फेक ऑफिसर निघतो , हे मात्र अद्वितीय आहे.>>> यात अद्वितीय असे मला यरी काही दिसत नाही...त्यांचे आदर्शच जर फेक सर्टिफिकेट घेऊन विगु पदाला पोहचतात आणि देशातील लाखो करोडो पोपटपंची (पोपटपंचीची मेहनत) करुन डिग्री घेतलेले पढतमुर्ख त्यांच्या सर्टिफिकेटचे, विगु पदाचे गुणगान गाण्यात आणि महत्व पटवून देण्यात धन्यता मानतात, ते पाहून अशा फेक गोष्टी करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दुणावून अधिक जोमाने ते 'फेकायला' लागले नसतील तरच नवल.
राष्ट्र आणि धर्म या
राष्ट्र आणि धर्म या संकल्पनांना आपल्या दृष्टीने काय पर्याय आहेत?
जात या संकल्पनेला पर्याय असून देखील ती आपण लागू करू शकत नाही (पर्याय कोणत्याही सरकारी कागदपत्रात / शाळेत इ. जात न लिहिणे आणि त्याबरोबर मिळणारे फायदे तोटे नाकारणे), आधी जातीवाद नष्ट करा मग हळूहळू धर्म नष्ट करा.
Pages