Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बेळगाव वादात देखील
बेळगाव वादात देखील म्हातारबांनी हस्तक्षेप करून कर्नाटकवर क्षेपणास्त्रे सोडण्याची शिंदे सरकारला परवानगी द्यावी अशी मागणी करून मी खाली बसतो
>>>>>आम्ही डीम्विटमधे येतो.
>>>>>आम्ही डीम्विटमधे येतो. इथल्या ज्ञानदिपांना कल्पना असेल कदाचित Wink
हाहाहा
माझाही अभ्यास अजिबातच नाहीये. अर्धवट मते मात्र आहेत लोल!!! जाऊ देत मीही वाट बघतेय दुसरी (माझीच मांडलेली) बाजू कोणीतरी अभ्यासासकट समर्थन करण्याची
>>>>>बेळगाव वादात देखील म्हातारबांनी हस्तक्षेप करून कर्नाटकवर क्षेपणास्त्रे सोडण्याची शिंदे सरकारला परवानगी द्यावी अशी मागणी करून मी खाली बसतो
हाहाहा
असामी इन जनरलच धन्यवाद
असामी इन जनरलच धन्यवाद
कोणीतरी माझ्या कमेन्टस वाचते हे पाहून आनंद झाला. सॉरी प्रतिवाद करण्याइतके मुद्दे नाहीयेत 
बायडेन यांनी आपली सत्ता सोडता
बायडेन यांनी आपली सत्ता सोडता सोडता इतका मोठा निर्णय घेणे चुकिचे आहे. मुळात तो त्यांनी घेतेलेलाच नाहिये, ते जेमतेम जिवंत आहेत. पडद्यामागून जे कुणी सूत्रे हलवत आहेत त्यांनीच घेतला आहे.
युक्रेन हा लहान देश आहे आणी त्यावर रशियाने हल्ला केला म्हणून आपली सहानुभुती असणे नैसर्गिक आहे. But the reality is much more complex and nuanced.
बायडेन यांनी आपली सत्ता सोडता
बायडेन यांनी आपली सत्ता सोडता सोडता इतका मोठा निर्णय घेणे चुकिचे आहे. >> Amy Coney Barrett विकु !
टॉमडिकहॅरीच्या लढाईत अमेरिकन
टॉमडिकहॅरीच्या लढाईत अमेरिकन टॅक्स पेयर्स च्या पैशाचा धूर नको.>>>>
युक्रेनला देण्यात येणारी मदत मुख्यतवे अमेरिकेच्या तिजोरीत पडून असलेले युद्धसामान आहे. थेट मोनेटरी मदत फार कमी आहे.
>>बायडेन यांनी आपली सत्ता
>>बायडेन यांनी आपली सत्ता सोडता सोडता इतका मोठा निर्णय घेणे चुकिचे आहे.<< +१
लेट्स होप इट इज नॉट कंस्ट्रुड अॅज अॅन अॅक्ट ऑफ वॉर बाय रश्या. शिवाय झिलिंस्कि रश्यावर अमेरिकन मिसल्स डागुन स्वतःच्या देशाला स्टोनेज मधे ढकलण्या इतका डिम्विट नसावा. असो..
दुसरीकडे, तैवान २० जानेवारीकडे डोळे लावुन बसला आहे. इथे हि तिच परिस्थिती. अमेरिकेने आम्हाला संरक्षण द्यावे, पण ट्रेड्च्या बाबतीत मात्र आम्हि हात आखडता घेणार. ट्रंपच्या मते तैवानने कमीतकमी जिडिपीच्या १०% डिफेंस बजेट करता (सध्या २.५%) राखुन ठेवावे. असं होण्याची शक्यता फार कमी. पांपियो गेला याचं बेजिंगला समाधान आहे परंतु रुबियो+वॉल्ट्झ डोकेदुखी ठरु शकतात. अमेरेकेकडुन डिफेंस सिस्टम मिळण्याची टाइमफ्रेम आहे २०२७-२९, ती अॅक्स्लरेट व्हावी अशी तैपेइची इच्छा आहे कारण बेजिंग २०२७च्या आधीच इन्वेजनची तयारी करतोय. असा सगळा मामला आहे..
थॅंकफुली इन धिस टाइम ऑफ ग्लोबल क्रायसेस, ट्रंप इज अॅट द हेल्म...
<< असामी इन जनरलच धन्यवाद
<< असामी इन जनरलच धन्यवाद Happy कोणीतरी माझ्या कमेन्टस वाचते हे पाहून आनंद झाला. सॉरी प्रतिवाद करण्याइतके मुद्दे नाहीयेत >>
----- प्रतिसादातला प्रांजाळपणा आवडला.
रशिया- युक्रेन युद्ध थांबावे तसेच गाझा- इस्रायल येथे चाललेला मानवीसंहारही थांबावा असे वाटते. ट्रम्पने किंवा बायडनने केले तरी आनंदच आहे. युद्धाने प्रश्न सुटत नाही, होते केवळ हानी.
इलेक्शन कँपेन फंड कोण कोण
इलेक्शन कँपेन फंड कोण कोण करते? त्यात आर्म्स & अॅम्युनिशन वाले आहेत का? यात युक्रेन रशिया युद्ध आणि इस्रायल करीत असलेल्या नरसंहाराची मुळे असतील .
युक्रेनला हे मदत म्हणून देत असतील तर ते अमेरिकन टॅक्स पेयर्सच्या पैशाने.
सामो, या आर्म्स अॅम्युनिशन कंपन्यांचे शेअर्स घेत चला.
युक्रेनला देण्यात येणारी मदत
युक्रेनला देण्यात येणारी मदत मुख्यतवे अमेरिकेच्या तिजोरीत पडून असलेले युद्धसामान आहे. थेट मोनेटरी मदत फार कमी आहे.
हे म्हणजे एखाद्या दारुड्याने बायकोचे मंगळसूत्र देऊन दारू आणली व मी कुठे पैसे खर्च केले ? असे विचारण्यासारखे आहे.
बर्नी सँडर्स सारखे डावे लोकही अनलिमिटेड एस्केलेशन च्या विरुद्ध आहेत. गंमत म्हणजे ज्या बायडेन चे मुत्सद्दी म्हनून कौतुक होते त्यने जाता जाता हे घातक hail mary pass केला आहे तर ज्या ट्रंप ची टिंगल होते त्याने प्लीज आपण तिघेही बसून मार्ग काढू असे आवाहन केले आहे.
अ या देशात राहणारे ब या
अ या देशात राहणारे ब या देशाचे नागरिक नसलेले आणि ब च्या राजकारणावर लिहिणारे लोक योग्य आहेत की 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना' आहेत यावर परवा माफक खल झाला. अशा लोकांनी खालील प्रवाहतक्ता वापरावा असे सुचवतो. चूभूद्याघ्या.
१- तुम्ही ब या देशाचे नागरिक आहात का? (नागरिक चा अर्थ तिथे मतदान करू शकता का असा घ्यावा)
हो- कृपया ७ वर जा
नाही- कृपया २ वर जा
२- तुम्ही ब या देशात कायदेशीररीत्या दीर्घकालीन वास्तव्य करीत आहात किंवा कधी केले आहे का?
हो- कृपया ७ वर जा
नाही- कृपया ३ वर जा
३- बरं मग तुमचे ब या देशाशी निगडीत अत्यंत जवळचे कौटुंबिक किंवा आर्थिक हितसंबंध आहेत का जेणेकरून तिथल्या राजकारणाचा त्यांच्यावर डायरेक्ट इंपॅक्ट होईल? (लव्हड वन्स तिथे रहात असणे/स्थावर जंगम मालमत्ता वगैरे)
हो- कृपया ५ वर जा
नाही- कृपया ४ वर जा
४- तुमचा ब या देशाच्या इतिहास, भूगोल, समाजकारणाचा निदान सखोल अभ्यास तरी आहे का? (नुसत्या बाजारू प्रसारमाध्यमांवरच्या बातम्या वाचणे आणि टिकटॉक, फेबु नव्हे)
हो- कृपया ५ वर जा
नाही- कृपया ६ वर जा
५- तुमच्या लिहिण्याचा टोन कसा आहे?
जेन्युईन कंसर्न / माहिती करून घेण्याची इच्छा - कृपया ७ वर जा
मल्लीनाथी (कसले मूर्ख लोक आहेत एका फेकूला / पप्पू ला / फेलन ला निवडून देतात वगैरे) - कृपया ६ वर जा
६- हम्म्म....
७- तुम्ही अब्दुल्ला नाही आहात. यू आर मोस्ट वेलकम _/\_
प्रवाहतक्ता आवडला.
प्रवाहतक्ता पटला नाही, पण प्रयत्न आवडला.
>>बायडेन यांनी आपली सत्ता
>>बायडेन यांनी आपली सत्ता सोडता सोडता इतका मोठा निर्णय घेणे चुकिचे आहे.>> सहमत! हे करायचेच होते तर बरेच आधी करायला हवे होते. त्यात आता युके आणि फ्रांस. ते काय युएसए ची वाट बघत बसले होते की काय कोण जाणे.
मोरोबा , तक्ता चांगला आहे.
मोरोबा , तक्ता चांगला आहे. खरच आवडला!
अमेरिकेने किंवा नेटो राष्ट्रांनी युक्रेनला मदत करावी किंवा नाही हे इथे येउन एक पिंक टाकुन जायचे तसे एखादे पोस्ट टाकुन जाण्याइतके सोप्पे नाही. हे बरेच गुंतागुंतीचे जागतिक राजकारण आहे. फक्त माझे टॅक्स डॉलर जाउ नयेत इतकाच मुद्दा नसावा.
किमान दुसर्या महायुद्धापर्यंत व त्यावेळच्या हिटलरच्या उदय व त्याच्या जगावर राज्य करण्याच्या मह्त्वाकांक्षेबद्दल, त्यात जर अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या वतीने युद्धात पडली ( किंवा पडली नसती तर काय झाले असते?) त्या युद्धानंतर उदयास आलेला साम्यवाद- भांडवलशाही हा कोल्ड वॉर, कोरियन वॉर, व्हिएतनाम वॉर या सगळ्या युद्धांमागचा मुद्दा, सत्तरच्या दशकातले रशियाचे अफगाणिस्तान आक्रमण, त्या रशिया- अफगाणिस्तान युद्धात अफगाण मुजाहुद्दिन अहमदशाह मसुद व त्याला (स्वतः सौदी अरेबियन असुनही ) जाउन मिळालेला ओसामा बिन लादेन यांना अमेरिकेने केलेली सढळ मदत,(हो, तोच ओसामा बिन लादेन ज्याने पुढे मग २००१ मधे ९/११ घडवुन आणले व ज्याला २०१० मधे अमेरिकेने ठार मारले) , तसच १९८० च्या दशकात पुढे इराण -इराक युद्धात अमेरिकेने केलेली इराकच्या सद्दाम हुसेनला मदत( हो, तोच सद्दाम हुसेन ज्याच्या विरुद्ध अमेरिकेने इराक वॉर केले व नंतर त्याला ठार मारले) या सगळ्या युद्धांचा व त्या मागच्या कारणांचा / व त्या सर्व युद्धात अमेरिकेने भाग घेतला असता वा नसता तर काय झाले असते/ नसते त्याचा सखोल अभ्यास ( पिंक टाकल्यासारखी पोस्ट टाकण्या आधी) असावा ही किमान अपेक्षा!
या वर मी नमुद केलेल्या युद्धांबद्दल लिहायला मायबोली अपुरी पडेल इतके मटेरियल आहे!
नाही नाही म्हणता अखेर बायडेन
नाही नाही म्हणता अखेर बायडेन यांनी हंटर ला पार्डन केलेच. याचे समर्थन करताना डेम्स नी घेतलेल्या कोलांट उड्या आणी whataboutism मजेदार आहेत.
“बायडेन यांनी हंटर ला पार्डन
“बायडेन यांनी हंटर ला पार्डन केलेच” - सगळे एकाच माळेचे मणी… शोलेत अमिताभ म्हणतो तसं, ‘मुझे तो सब पुलिसवालोंकी शक्ल एक जैसे लगती हैं ‘
हो. पथेटिक!
हो. पथेटिक!
<< सगळे एकाच माळेचे मणी… >>
<< सगळे एकाच माळेचे मणी… >>
----- सहमत.
सगळे एकाच माळेचे मणी कसे काय
सगळे एकाच माळेचे मणी कसे काय बुवा ? ट्रंप, बुश किंवा ओबमांनी आपल्याच मुलाला पार्डन केले होते का ?
बायडेन यांनी जाता जाता डीओजे च्या व गार्लंड यांच्या दिशेनेही दगड भिरकावले !
हो पथेटिक पण एका अर्थी बरेच
सगळे एकाच माळेचे मणी >> +१ ! पथेटिक पण ..... पण एका अर्थी बरेच केले. नुसता ड्रामा होण्यापासून थांबवला. तात्याही म्हणाला होताच कि मी हंटरला पार्डन करेन. बायडेनने तात्या , जॅक स्मिथ, ख्रिस्टोफर रे इत्यादी पण घाऊक दरात पारडन करून टाकायला पाहिजे. नुसती ड्रामेबाजी बंद होईल पुढची.
सगळे एकाच माळेचे मणी कसे काय बुवा ? ट्रंप, बुश किंवा ओबमांनी आपल्याच मुलाला पार्डन केले होते का ? >> मुलांना नसले तरी सासर्याला केलेलेच तात्याने. त्याच सासर्याला तर आता अॅम्बॅसिडर पण केले आहे.
ट्रंप ने कुशनर ला दिलेले
ट्रंप ने कुशनर ला दिलेले पार्डन आणी बयाडेन ने हंटर ला दिलेले यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
काश पटेल कुणाकुणाला टार्गेट
काश पटेल कुणाकुणाला टार्गेट करणार आहे, त्याची लांबलचक लिस्ट एम एस एन डॉट कॉम वर आहे. त्यात usual suspects म्हणजे, हिलरी, बायडेन, कमला आणी इतर अनेक लोक आहेत. सध्या तरी माझे नाव नाहीये, पण आता शेंडेनक्षत्र नि राज चुगल्या करतील तर येईलहि माझे नाव!
ट्रंप ने कुशनर ला दिलेले
ट्रंप ने कुशनर ला दिलेले पार्डन आणी बयाडेन ने हंटर ला दिलेले यात जमीन आस्मानाचा फरक आहे. >> कसा ? दोघांचेही गुन्हे कोर्टामधे सिद्ध झाले होते. दोघेही नातेवाईकच आहेत. दोघांचेही टॅक्स एव्हेजन होते (किशनर चे अजून काही तरी पण होते नि तो जेल मधेही होता हा भाग सोडा) आता तुम्ही सासरा नि मुलगा अशाच गोष्टींमधे शिरत असाल तर सोडा.
जमीन आस्मानाचा फरक आहे. >>
जमीन आस्मानाचा फरक आहे. >> कसा ? हा प्रश्न प्रामाणिक कुतुहलातून आलेला आहे हे गृहित धरून.
कुशनर ने केलेला गुन्हा कोर्टात सिद्ध होऊन त्याने शिक्षाही भोगली होती व दंडही दिला होता. तोही कित्येक वर्षे जुना गुन्हा होता. हंटर ने शिक्षा भोगलेली नाही. त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्याला मिळालेले पार्डन केवळ काही स्पेसिफिक गुन्ह्याबद्दल नव्हे तर २०१४ (काय झाले होते बरं २०१४ मध्ये ?) पासून आज पर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्याबद्दल पूर्वलक्षी प्रभावाने आहे. अशा प्रकारचे पार्डन अभूतपूर्व आहे. खरे तर त्याला दिलेले पार्डन हे जो बायडेन ने स्वतःचीच कातडी बचावासाठी दिलेले आहे. बुरिस्मा चे धागेदोरे येऊ नयेत म्हणून.
विकु कुतूहल जमीन अस्मान ह्य
विकु कुतूहल जमीन अस्मान ह्य शब्द प्रयोगाबद्दल आहे. (आम्ही डीमविट कॅटेगरीमधे येतो हे विसरू नका
) जेल मधून सुटलेल्या माणसाला पार्डन करायची काय गरज होती नक्की ? पार्डनचा अर्थच गुन्हा माफी असा असल्यावर त्याने गुन्ह्याची शिक्क्षा भोगली आहे , भोगत आहे कि भोगणार आहे ह्याला काय अर्थ आहे ? क्लिंटनपासून बायडन पर्यंत तिघांनीही आपापल्या नातेवाईकांना पार्डन केलेले आहे तेंव्हा उगाच आपला तो बाब्या तो दुसर्याचे ते कार्टे कशाला ? रॉजर स्टोन, मायकेल फ्लिन इत्यादींमधे तर मी शिरतही नाही.
बुरिस्मा बद्दल मला एव्हढेच माहित आहे कि चार वर्षे कंठशोष करूनही त्यातून काहीच बाहेर काढता आलेले नाही.
पार्डन चा हेतू केवळ
पार्डन चा हेतू केवळ गुन्ह्याला माफी असा नसून रेकॉर्ड साफ करणे हाही असतो . कपाळावर बसलेला कन्व्हिक्टेड फेलन चा.
एखाद्या माणसाने सारी शिक्षा भोगल्यावर त्याला दिलेले पार्डन आणी एखाद्याला शिक्षा होण्याआधीच दिलेले पार्डन यात गुणात्मक फरक आहे. इथे तर बायडेन ने गेल्या दहा वर्षात केलेल्या सर्व गुन्ह्यातून (मग तो कितीही गंभीर असो) पार्डन दिले आहे. असे पार्डन आजवर कुणी दिले नव्हते. मी ट्रम्प भक्त नाही त्यामुळे आपला तो बाब्या वगैरे शब्दप्रयोग अस्थानी आहेत.
हे पार्डन देऊन बायडेन ने अनेक लिबरल्स ना तोंडघशी पाडले आहे. आमचे बायडेन मुळीच पार्डन करणार नाहीत असे ते म्हणत होते. विवेक रामास्वामी ला मानले पाहिजे. बायडेन नॉमिनी नसतील हे त्याने सर्वात आधी सांगितले होते. त्यावेळी त्यच्यावर लोक हसले ही होते. आताही बायडेन पार्डन देणार हे त्याचे भाकित खरे ठरले. हे पार्डन सिनियर डेमोक्रॅट्सनाही रुचलेले नाही. शुमर, वॉरेन , जेफ्रीज वगैरे लोक ग्रूप फोटो देत होते तेव्हा कुणीतरी पार्डन बद्दल विचरले तर सर्व चेहेरे काळे पडले.
विकु माझे मूळ पोस्ट परत वाचा.
विकु माझे मूळ पोस्ट परत वाचा. मी त्या पार्डनला समर्थन दिलेले नाहिये. पण त्यामागचा उद्देश फारसा चुकीचा आहे असे मला वाटत नाही. तुम्ही गुणात्मक फरक म्हणत आहात त्यात तथ्य तेंव्हाच असते जर त्यात रॉजर स्टोन, मायकेल फ्लिन इत्यादीं नसते. दोन्ही प्रेसिडेंटने घेतलेल्या धोरणामधे काडीचाही फरक नाहीये. छातीवर हात ठेवून तात्याने जर आधी सत्ता मिळाली असती तर कुशनरला पार्डन केले नसते असे सांगू शकता का ? तुम्हीच मी तात्याचा भक्त नाहि असे म्हणता आहात म्हणून विचारतोय.
एनिवे एक गोष्ट ऐका.
एनिवे एक गोष्ट ऐका.
एक माणूस रस्त्याने जात असतो. त्याला एक मुलगा एका दिवसाची मांजराची पिल्लं विकताना दिसतो.
डेमॉक्रॅट पिल्लं घ्या. डेमॉक्रॅट पिल्लं घ्या.
साहेब, डेमॉक्रॅट पिल्लं घेणार का? तो मुलगा विचारतो.
हट! पिल्लं कधी डेमॉक्रॅट असतात का? असं म्हणून तो माणूस निघून जातो.
चार दिवसांनी त्याला तोच मुलगा तीच पिल्लं विकताना दिसतो.
रिपब्लिकन पिल्लं घ्या.
तो मुलाजवळ जाऊन विचारतो, काय रे परवा तर म्हणत होतास ही डेमॉक्रॅट पिल्लं आहेत.
मुलगा म्हणतो... हो, पण आता त्यांचे डोळे उघडले आहेत.
@मोरोबा,
@मोरोबा,
मस्त जोक.
आठवला तर हाच कधी भक्त आणि नोभक्त ह्यांच्या नावावर खपवीन.
बायडेन व होणार्या टीकेला
बायडेनवर होणार्या टीकेला 'ट्रंप ने असेच केले असते' हेच उत्तर असेल तर मग बायडेन पेक्षा तो काय वाईट आहे ? तो निदान जिवंत तरी आहे. २०२८ साठी संभाव्य उमेदवार न्यूसम यांनी पार्डन च्या पापात भागिदारी नाकारली आहे.
Pages