२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जे अमेरिकन मतदार आहेत आणि भारतातल्या ईव्हीएमचे खंदे समर्थक आहेत, त्यांच्यासाठी प्रश्न.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षासाठीची निवडणूक ईव्हीएम वर झाली का ? नसेल तर का ?
अमेरिका अप्रगत देश आहे का ?
(अनुल्लेख केला तरी चालेल)

अमेरिकन राष्ट्राध्यक्षासाठीची निवडणूक ईव्हीएम वर होते<<< हातात blanck ballet paper मिळतो, तो पेपर मशीन मध्ये ठेवून मशीन वरती vote करायचे. तुमचं vote print होत. Ballet paper हातात येतो, तुमचं vote चेक करून तुम्ही ballet paper बॉक्स मध्ये टाकायचा. हे Texas State ची voting प्रक्रिया आहे. इतर स्टेट मध्येही असेच असेल.

गर्भपात याविषयावर विनोद केले जात नाहीत काय? गर्भपात ही अपवादात्मक गोष्ट नसून ती एक स्त्री स्वातंत्र्याला बळकटी देणारी गोष्ट आहे असे मत मांडले जात नाही का?
किती काळापर्यंत गर्भपात केला जावा? गर्भधारणेची मुदत संपेपर्यंत, काही वेळा जन्म होईपर्यंत गर्भपात करू दिला जावा असे दुसरे टोक मांडले जात नाही का?
एका बालकाच्या किंवा अर्भकाच्या जीवाचा प्रश्न नसून केवळ स्त्री आणि तिच्या शरीरावरील स्वातंत्र्याचा मुद्दा आहे असे मांडले जात नाही का?
एका मुद्द्यावर माघार घेतली म्हणून लगेच तुटुन पडू नका. बाकी मुद्द्याचे काय?

गर्भपात फॅशनेबल केला जात आहे. त्यात एका जीवाची हत्या आहे हे लपवून केवळ स्त्री स्वातंत्र्यचाची मशाल भडकती ठेवण्याचा दिव्य कार्यक्रम असल्याचे मनावर ठसवले जात आहे. अर्भकाला कुठलाही हक्क असता कामा नये असे आडवाटेने सुचवले जात आहे.
बहुतांश गर्भपात हे इन्सेस्ट आणि बलात्कार ह्या कारणामुळे झालेले नसतात.
बहुतेक राज्यात विशिष्ट मुदतीपर्यंत, स्त्रीचे आयुष्य धोक्यात असेल तर गर्भपाताची परवानगी आहेच. आणखी नक्की काय हवे आहे?

गर्भपात याविषयावर विनोद केले जात नाहीत काय? गर्भपात ही अपवादात्मक गोष्ट नसून ती एक स्त्री स्वातंत्र्याला बळकटी देणारी गोष्ट आहे असे मत मांडले जात नाही का?
किती काळापर्यंत गर्भपात केला जावा? गर्भधारणेची मुदत संपेपर्यंत, काही वेळा जन्म होईपर्यंत गर्भपात करू दिला जावा असे दुसरे टोक मांडले जात नाही का?
एका बालकाच्या किंवा अर्भकाच्या जीवाचा प्रश्न नसून केवळ स्त्री आणि तिच्या शरीरावरील स्वातंत्र्याचा मुद्दा आहे असे मांडले जात नाही का?
एका मुद्द्यावर माघार घेतली म्हणून लगेच तुटुन पडू नका. बाकी मुद्द्याचे काय?

गर्भपात फॅशनेबल केला जात आहे. त्यात एका जीवाची हत्या आहे हे लपवून केवळ स्त्री स्वातंत्र्यचाची मशाल भडकती ठेवण्याचा दिव्य कार्यक्रम असल्याचे मनावर ठसवले जात आहे. अर्भकाला कुठलाही हक्क असता कामा नये असे आडवाटेने सुचवले जात आहे.
बहुतांश गर्भपात हे इन्सेस्ट आणि बलात्कार ह्या कारणामुळे झालेले नसतात.
बहुतेक राज्यात विशिष्ट मुदतीपर्यंत, स्त्रीचे आयुष्य धोक्यात असेल तर गर्भपाताची परवानगी आहेच. आणखी नक्की काय हवे आहे?

काही मुखंड येऊन उगीच वैयक्तिक शिवीगाळ करून चर्चेची पातळी घसरवत आहेत ह्याचा खेद वाटतो.
मागे ट्रंप मारला गेला नाही म्हणून बिथरले होते. आता ट्रंप ने सणसणीत मुस्काटात भडकावली जावी अशा प्रकारे विजय मिळवल्यामुळे आणखी सैरभैर झालेले दिसत आहेत.
अशा मुखंडाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या समस्त कन्या, नातींना मनसोक्त गर्भपात करता येऊ दे असा आशिर्वाद देतो!

pro-life, गर्भपांत, पेशींचा समूह याबद्दल येथे गप्पा मारणारे तिकडे गाझा मधे हजारो निरपराध्यांची हत्या होत असतांना त्यांना को-लॅटरल डॅमेज संबोधतात. किती दुटप्पी भुमिका. ते पण मानव आहेत पण त्यांना जगण्याचा हक्क आहे हेच मान्य नाही.

आज नोव्हेंबर -२०२४ मधे ५०, ००० पेक्षा जास्त हत्या झाल्या आहेत. आज जरी हत्यासत्र थांबले तरी अजून ५०००० लोक प्राण गमावणार आहेत. Sad निव्वळ पेशींचा समूह महत्वाचा नाही आहे. पेशींचे उगमस्थान त्यापेक्षाही महत्वाचे आहे.

इस्रायल गाझापट्टीत करीत असलेल्या वंशसंहाराचा मुद्दा उचलणार्‍या निदर्शकांना (हे अरब / मुस्लिमच असतील असं नाही) कमला हॅरीसनी - तुम्हांला डोनाल्ड ट्रंप जिंकायला हवा असेल तर तसं सांगा - असं उत्तर दिलं. बाईंच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून मला इथल्या एका महिला राजकारणी आठवल्या. तोच अ‍ॅरोगन्स, माझ्यासारखं हुशार कोणी नाही? तू कोण?

आता डेमोक्रॅट्स पराभवासाठी अरब आणि मुस्लिम मतदारांना दोष देताहेत म्हणे.

दोन्ही कँपेन्स दुसरा किती वाईट आहे अशीच होती.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षासाठीची निवडणूक ईव्हीएम वर झाली का ? नसेल तर का ?>>> कॅलिफोर्नियात प्रत्येकाला महिनाभर आधी पोस्टाने मत पत्रिका पाठवतात . (हे अजून तरी सर्वच स्टेट्स मध्ये होत नाही ) . फक्त प्रेसिडेंटच नाही तर इतर प्रोपोसीझन्स व लोकल काही पोस्ट साठी पण वोटिंग असते . ballot तुम्ही पोस्टाने (पोस्टेज फ्री असते ) पाठवू शकता किंवा प्रत्यक्ष पोल स्टेशन वर येऊन सील्ड बॅगेत टाकू शकता .

पेपर ballot वेळखाऊ वाटत असेल तर प्रत्यक्ष जाऊन वोटिंग मशीन्स वरही वोट करता येते . तुमच्या प्रिसिन्क्ट व भाषेनुसार हे बॅलट स्क्रीन वर दिसते. मशीनवर वोट मार्क केले कि पण शेवटी ballot प्रिंट करून बॅगेत प्रिंट आऊट टाकायचा . पेपर किंवा मशीन एकच काहीतरी वापरता येते . यावेळी तर आमच्याकडे १ १ दिवस आधीच अर्ली वोटिंग होते . पण खूप कमी लोक आधी येतात . बऱ्याच जणांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी जाऊन वोट करणे आवडते .

अमेरिकेत पक्ष कुठलाही असो, एकंदरीत अमेरिकन जनतेचा गाझा व पॅलेस्टाइन प्रश्नाचा अंडरटोन हाच आहे की पॅलेस्टाइन मधे जोपर्यंत हमास व हेजबुल्लाला सपोर्ट आहे व तेच तिथले लिडर्स आहेत तोपर्यंत अमेरिका इज्राएलला सपोर्ट करतच राहणार. आता हे धोरण भारतातल्याच काय पण जगातल्या कुठल्याही देशातल्या पुरोगाम्यांना आवडले नसले तरी ही वस्तुस्थिती इथे अमेरिकेत आहे. अमेरिकेनेच इस्राएल राष्ट्र स्थापन करण्यात सिंहाचा वाटा घेतला असल्यामुळे जोपर्यंत हमास व हेजबुल्ला ,(ज्यांचा उद्देशच हा आहे की “ रिव्हर टु सी“ हे ब्रिदवाक्य वापरुन इस्राएलचा या जगाच्या पाठीवरुन नायनाटच करायचा) हे दोघे पॅलेस्टाइनधे कार्यरत आहेत तोपर्यंत ज्यु व पॅलेस्टाइन असा “ टु स्टेट्स“ चा प्रश्न अमेरिका ऐरणीवर घेणार नाही. अमेरिकेत हमास व इराण बॅक्ड हेजबुल्ला या दोन्ही संघटनांना “ “ टेररीस्ट” मानले जाते. त्यामुळे जोपर्यंत हमास इस्राएलचे १२०० च्या वर टॉडलर्स, टिन एज मुली, म्हातारी माणसे कत्तल करत राहतील तोपर्यंत इस्राएल त्याचा सुड घेउन त्यांच्या द्रुष्टीने त्यांच्या देशाचे “ सेल्फ प्रिझरव्हेशन“ करायचा हक्क बाळगुन असेल असेच इथे अमेरिकन लोकांचे ठाम मात आहे. व्हेदर वर्ल्ड लाइक्स इट ऑर नॉट!

ही अमेरिकेतली आजची “ ग्राउंड रिअ‍ॅलीटी” आहे. ती चुक का बरोबर याकरता हे लिहीण्याचा प्रपंच नाही.

अमेरिकेतल्या दोन्ही पक्षांना आर्थिक रसद पुरवण्यातला सिंहाचा वाटा ज्यूंचा , इस्रायल समर्थकांचा आहे. त्यामुळे त्या पक्षांच्या भूमिकेबद्दल नवल नाही. शिवाय आर्म्स लॉबीही असेल.
तरीही अमेरिकेत पॅलेस्टाइनच्या बाजूने आणि इस्रायलच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. बर्नी सँडर्ससारख्यांनीही हीच भूमिका घेतली.

दुसर्‍या देशांत स्वतः रक्तपात घडवून वा नरसंहार घडवणार्‍या सत्ताधीशांच्या पाठीशी उभं राहून आमची लोकशाही आणि मानवी मूल्य किती महान असा डांगोरा पिटण्याचा अमेरिकेचा इतिहासही नवा नाही. भारताला बांग्ला मुक्ती संग्रामात याचा अनुभव आला आहे.
असो.

केवळ अर्थिक रसद नव्हे तर इतरही अनेक मार्गांनी दोन्ही पक्षांवर घट्ट पकड आहे. एप्स्टीन हा मोसादचाच माणूस होता.

हमास - हेजबुल्ला ( अजून इतर आहेतच किंवा उद्या नव्या नावाने अजून काही ) यांच्या संबंधांत मुकुंद यांच्या ग्राउंड रिअ‍ॅलीटी पोस्टशी सहमत.

एका बाजूला पोटात असलेल्या गर्भाची काळजी यांत मानवतावाद दिसतो पण त्याच वेळी दुसरीकडे हजारो लहानगे मारल्या जात आहे, अपंग होत आहे त्यांना को लॅटरल डॅमेज म्हणायचे यांत विरोधाभास वाटला. आजच्या हिंसाचाराचा धुडघूस पुढच्या हिंसाचाराला जन्म देत असतो. हे चक्र थांबायला हवे. ट्रम्प चार वर्षे राज्य करणार आहे, त्याने हा हिंसाचार थांबविला तर चांगलेच आहे.

इराण - इस्रायल या दोघांना आवर घातला गेला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

अहो अरिझोनात कॅरि लेक हरली!!
आहेत कुठे शेंडेनक्षत्र, राज बोंबाबोंब करायला की निवडणूक रिग्ड होती. इल्लिगल लोकांनी डेमोक्रॅट्स ना मते दिली. आणिक काही काही केले!!
उठा बोंबा मारा.

सोरोसच्या फंड मॅनेजरला ट्रेजरी देणार आहे म्हणे ट्रम्प तात्या.
खरं आता सोरोसच्या नावे फिअर मोंगर करण्याची गरज राहिली नाही कारण आपल्या साईडचा माणूस सत्तेत आहे.

एहे असे नाही. सोरोस खुद्द शैतान आहे असे पसरवले जाते ना. मग एकदा शैतानासोबत काम केले म्हणजे केले.

अ‍ॅरिझोनातील माणसांनी किती वेळा तिला रिजेक्ट केल्यावर त्या रेम्याडोकी( अ‍ॅक्च्युअली बिनडोक) पण उर्मट केरी लेकच्या रिकाम्या डोक्यात प्रकाश पडणार आहे कुणास ठाउक की तिथल्या लोकांना ती कुठल्याच पदावर अजिबात नकोशी आहे म्हणुन! प्रत्येक वेळी तिला रिजेक्ट केल्यावर कुठल्या ना कुठल्या पदासाठी परत परत उमेदवारी जाहीर करुन अ‍ॅरिझोनातील माणसांच्या मानगुटीवर भुतासारखी बसली आहे ती!

नंन्द्या, अहो ट्रंप भक्त निवडणुक हरले तरच निवडणुक रिग्ड होती, व्होटर फ्रॉड होता म्हणुन कॅपिटल बिल्डींगवर हल्ला करायला जातात. त्याच्या अंधभक्तांना ते निवडणुक जिंकले तर मात्र सगळे काही आलबेल असते! जरा थांबा अजुन थोडे पुढच्या निवडणुक सायकल पर्यंत. तेव्हा जर ते हरले तर बघायचा आहेच तमाशा व राडा आपल्याला जानेवारी ६ , २०२१ सारखा!

( केरी लेक हरल्याने त्याच्या सेनेट मेजॉरीटीला काही फरक पडत नसल्यामुळे तिच्यासाठी आता राडा करायची त्यांना आवशक्यता उरली नाही. नाहीतर केलाच असता तमाशा त्यांनी. दॅट्स देअर मोडस ऑपरेंडो! )

काल मिशिगनमधे व्हाइट सुप्रिमिस्ट नाझी स्वस्तिका झेंडे घेउन ज्युंना धमक्या द्यायला खुले आम रस्त्यावर फिरत होते म्हणे! चला आता त्यांच्यासाठी व प्राउड बॉइजसाठी ओपन सिझन!

ट्रंपने इलॉन मस्क व विवेक रामास्वामी हे त्याच्या सारखेच अजुन २ बिझिनेसमन टॅप केले म्हणे गव्हर्मेंट वेस्ट वर आळा घालायला! ते म्हणे ९५ टक्के गव्हर्मेंट कर्मचार्‍यांना घरी पाठवणार आहेत! त्यांच्या व प्रॉजेक्ट २०२५ च्या संहितेच्या नियमांनुसार खालील डिपार्टमेंट्स चॉपिंग ब्लॉक वर आहेत.

१: डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन
२: डिपार्टमेंट ऑफ जस्टिस
३: एन्व्हिरोन्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी
४: एफ बी आय
५: फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट ( फिमा)
६: डिपार्ट्ममेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी( प्रायव्हटायझेशन)
७: हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट( हड)
८ : डिपार्टमेंट ऑफ व्हेटरन्स अफेअर्स ( प्रायव्हटायझेशन )
९: डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी( ट्रंप व मस्क हे बिझिनेसमेन स्वतः ठरवणार की इंटरेस्ट रेट्स किती ते)
१०:सेंटर फॉर डिझिस कंट्रोल( सी डी सी), (त्या डिपार्टमेंट ऐवजी सर्व नॉलेजसंपन्न व एकदम हुशार( का व्हॅको?) असा रॉबर्ट केडी जूनिअर सर्व आरोग्यविषयी धोरण व नियम ठरवणार म्हणजे सगळ्या व्हॅक्सिन्सवर सरसकट बंदी!)
११: सर्व युनिअन्स वर सरसकट बॅन व युनिअन जॉइन करण्यावर सरकारी बंदी
१२: अ‍ॅबॉर्शनवर सरसकट बॅन
१३: पॅरीस क्लायमेट चेंज अ‍ॅकॉर्ड वर बॅन.

बहुतेक ज्या डिपार्टमेंट्स चे प्राव्हेटायझेशन होइल त्या डिपार्ट्मेण्ट्सचे कॉन्ट्रॅक्टस बहुतेक स्वतः दस्तुरखुद्द माननिय डॉनाल्ड ट्रंप साहेब, विवेक रामास्वामी व इलॉन मस्क हे सगळे चांगले बिझिनेसमन व गव्हरमेंट वेस्ट बद्दल खुप जागरुक आहेत म्हणुन त्यांना बक्षिस देण्यात येतील.

मग बघा अमेरिका कशी ( म्हणजे ट्रंप, मस्क व विवेक रामास्वामी) ग्रेट अगेन होते/ होतात ते! Proud

रघू आचार्य

आमच्याकडे मी पेपर बॅलेटवर सर्व उमेदवाराच्या नावापुढे( प्रेसिडेंट, सेनेटर, काँग्रेसमन, गव्हर्नर, स्टेट अ‍ॅटर्नी जनरल,काउंटी प्रॉसिक्युटर, लोकल जजेस, सगळे स्पेशल स्टेट अमेंडमेंट्स लाइक अबाउट एबॉर्शन, गॅम्बलिंग वगैरे) यांच्या पुढचे रिकामे सर्कल पुर्ण शाइने भरले. मग असे पुर्ण व्होट केलेले पेपर बॅलेट मी स्वतःच तिथे असलेल्या मेल बॉक्स सारख्या मशिन मधे टाकले. टाकल्या टाकल्या त्या मशिनने लगेच त्या शाइने भरलेल्या गोळ्यांवरुन माझे मत मी कोणत्या उमेदवाराला दिले व कोणत्या अमेंडमेंटला मी यस का नो मत दिले हे इलेक्ट्रॉनिकली रेकॉर्ड केले.

म्हणजे बॅलट पेपरचे होते पण गणना इलेक्ट्रॉनीकली झाली.

मॅट गेट्झ चे अभिनंदन. त्याला अ‍ॅटर्नि जनरल केले. आता मार्जरि टेलर ग्रीनला कुठले खाते मिळते ते बघायला पाहिजे. कॅरी लेक, बोबर्ट असे सगळे कॅबिनेटमध्ये येतील. मग मज्जाच मज्जा. आणि आपला जुना दोस्त - कान्ये वेस्ट!

Pages