शेतीवर आयकर का नको?

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2009 - 19:35

...............................................................................
या लेखापुर्वीची चर्चा अभ्यासण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................................................

------------------------------------------------------------------------------------------
मी नरेंद्र गोळे यांच्या मताशी शतप्रतिशत सहमत आहे. ( संदर्भ )
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकिय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
घरात पोटभर खायला नसुनही, मिशिवर ताव देवुन पाटीलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरुप समाजासामोर येईल.
आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी,दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये आणण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगुस चाललाय्,त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमता कशी,कुठुन आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडुन ते इतरांनाच जास्त अडचनीचे आहे.
आयकर लावल्यास गरिब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुनी बेंबीच्या देठापासुन ओरडत असेल तर त्यांना "माझं काय होईल',असे म्हनायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहीजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावु नये,नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल,
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही,कारण...
ज्याला आय नाही त्याला कर नाही,ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढोनपिढ्या लाचारासारखे जिवन जगन्यापेक्षा आर्थिक सुदृढ होवुन आयकरदाता शेतकरी म्हणुन सन्मानाने जगायला नक्किच आवडेल.
गंगाधर मुटे.
..............................................................................
२६-१२-२००९

बागायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
------------------------------------------------------------------------
=============================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
-----------------------------------------------------
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-------------------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
-------------------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
------------------------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
------------------------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००

----------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००

-------------------------------------------------------
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
- गंगाधर मुटे

=========================================

...........................................
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
............................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< बोलती बंद झाली. >>
.
बोलती बंद करुन कसे चालेल.?
येथुनच तर खरी विषयाची सुरुवात होते. तुम्ही शेतीशी निगडीत नाहीत पण जे शेतीविषयातील तज्ज्ञ आहेत ते नेमका एवढाच विषय सोडुन बाकी विषयावर खुप बोलतात.
त्यामुळे जागोमोहनप्यारेजी,
आता आपणच या विषयावर बोलु ,खुप बोलु,खुप चर्चा करु.
चर्चा थांबता कामा नये.कदाचीत यानिमित्ताने शेतकर्‍याच्या पदरात काही पडलं तर तुमच्या-माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे होईल.
..............................................................
कुरुंदवाड चा नरहर कुरुंदकराशी काही संबध आहे?
..............................................................

deleted

बुवा,
आपण वर उपस्थित केलेले चार मुद्दे अत्यंत महत्वाचे आहे.त्याची उत्तरे शोधाविच लागतील.
मी प्रयत्न करतोय.
प्रथम उत्पादन खर्च हाच विषय पुर्ण करु.

deleted

उत्पादनखर्च काढतांना;
शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
पुन्हा काही सुचना आल्या की मग त्यांचा एकत्रीतपणे विचार करु.

मला एक शंका आहे, भारतात शेतीच्या ईन्शुरंस मध्ये Pet Insurance पण येतो का? कि Pet Insurance वेगळा घ्यावा लागतो... असेल तर तोही शेतकर्‍याचा एक खर्च आहे ना!

सास,
भारतात शेतीसाठी इंशुरन्स नाहीच.सध्या शेतीमध्ये काही पिकांसाठी जो इंशुरन्स (त्यासाठी वेगळे पैसे भरावे लागतात.) उपलब्ध आहे तो शेतकर्‍यांच्या दृष्टीने काहीच उपयोगाचा नाही. दुष्काळी परिस्थिती आणी नापिकिच्या वर्षात बँकाची कर्जवसुली होण्यापलिकडे त्याचा कवडीचा उपयोग नाही.शेतीचे कितिही नुकसान झाले तरी या इंशुरन्समुळे शेतकर्‍याच्या पदरात काहीच पडत नाही.

इथे खरोखर आत्ता शेती करत आहेत त्यांनी जर त्यांचा खराखुरा जमाखर्च तपशील दिला तर त्याला जास्त विश्वासार्हता प्राप्त होइल. चंपक तुमच्या दुधकेंद्रावर येणार्‍या शेतकर्यांपैकी कोणी हे करु शकेल का?otherwise मला तरी शेती कशी तोटयातच आहे हे सिध्द करण्यासाठी केलेला अट्टाहास ह्यापलिकडे ह्या पोष्ट्चे काही महत्व आहे असे वाटत नाही.(किती संवेदनाहिन असतो ना आम्ही शहरी ,भरल्यापोटी जगणारे लोक)
बुवांचे खालिल मुद्दे मलाही महत्वाचे वाटतात.
२. कापसात दरवर्षी इतका तोटा होऊन सुद्धा शेतकरी दरवर्षी कापसाचेच पीक का काढतात? काहितरी फायदा असल्याशिवाय कोणीही एकच व्यवसाय वर्षानुवर्षे करत नाही. ज्या व्यवसायात सतत दरवर्षी मोठा तोटाच होतो असा व्यवसाय २-३ वर्षापेक्षा चालू शकत नाही. उदा. शहरातील सायकल दुरुस्तीची व सायकल भाड्याने देणारी दुकाने. 2-wheeler चा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे अशी बहुसंख्य दुकाने बन्द झाली आहेत.
३. ज्या व्यवसायात एकदा सुद्धा फायदा होत नाही व दर वर्षी रू. ७० हजार तोटा होतो तो तोट्याचा व्यवसाय शेतकरी बन्द का करत नाहीत?

<< इथे खरोखर आत्ता शेती करत आहेत त्यांनी जर त्यांचा खराखुरा जमाखर्च तपशील दिला तर त्याला जास्त विश्वासार्हता प्राप्त होइल. चंपक तुमच्या दुधकेंद्रावर येणार्‍या शेतकर्यांपैकी कोणी हे करु शकेल का?otherwise मला तरी शेती कशी तोटयातच आहे हे सिध्द करण्यासाठी केलेला अट्टाहास ह्यापलिकडे ह्या पोष्ट्चे काही महत्व आहे असे वाटत नाही. >>
एआरसी,
असे तुम्हालाच नाही वाटत,सर्वांनाच वाटते.
आणि नेमके म्हणुनच तर शेतीची दुर्दशा थांबत नाही.
तुम्हाला शेतीबद्दल माहीती नाही पण जे स्वतःला शेतीतज्ज्ञ समजतात ते का मुग गिळून बसतात.?
नेमका हाच विषय सोडुन बाकी सर्वच विषयावर का बोलतात?
.....................................................
तुमच्या इतर मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करुच,पण त्याआधी उत्पादन खर्चाचा हिशेब अधिक विश्वासाहार्य बनवुन घ्यायचा प्रयत्न करु.
....................................................

शेतकर्‍याला काही घर, प्रॉपर्टी, शेड असेल, आणि त्याचा घसारा तो कन्सीडर करत नसेल, तर जेमतेम फायद्यात आहोत, असे समजून तो उद्योग करत रहाणार.. कधीतरी चारपाच वर्षानी शेड, घर मोडले/पडले की तो एकदम कर्जात जाणार... असे होत असणार.

जागोमोहनप्यारेजी,
बघा एक अगदी न नाकारता येण्यासारख कारण मिळालं,एकदा का त्या दिशेने प्रयत्न व्हायला लागले की उत्तरे आपोआप मिळत जातात.
अगदी जटील व गुंतागुंतीचे प्रश्न सुद्धा सोपे व्हायला लागतात.
शेतकर्‍याचे दुर्दैव हे की कोणी या दिशेने विचारच करायला तयार नाही.

<< (किती संवेदनाहिन असतो ना आम्ही शहरी ,भरल्यापोटी जगणारे लोक) >>
एआरसी,
शेतीमधल्या वेदनांची जाणिवच शहरी किंवा भरल्यापोटी जगणार्‍या लोकापर्यंत कोणी पोहचविली नाही, ज्यांना वेदनाच माहीत नाही त्यांच्यात संवेदना जागृत कशी होईल? आणि त्यांना संवेदनाहीन कसे म्हणता येईल?
................................................................
शेतकर्‍यांच्या घरात पुढारी किंवा शेतीतज्ज्ञ होलसेल प्रमाणात जन्माला येतात.ते या भानगडीत पडत नाहीत.
दहा पिढ्यांची दरिद्री दहा वर्षात भरुन काढण्यासाठी शेतीसोडुन अवांतर मार्गाने जातात. तेथे माया मिळविली की झाकायसाठी शेती उपयोगी पडते.
................................................................
शेतकर्‍यांच्या घरात सहित्यीक मात्र किरकोळ प्रमाणात जन्माला येतात.ते या भानगडीत पडतात,त्यापैकी काहींचे वास्तवाशी ईमान असते.
मात्र काही शेतकरीपुत्र साहित्यिकांच साहित्य म्हणजे 'जेथे न पोहचे रवि तेथे पोहचे कवि' असे असते.
त्याचा वास्तवाशी काहीएक संबंध नसतो.
..............................................................
पिकलेल्या आंब्याच्या झाडाखाली नयनरम्य कपडे घालुन ढोल वाजवत नाचणारी तरुणी गेल्या तिन पिढ्यात आजपर्यंत कोणीच पाहीली नाही...
पण या साहित्यीकांना दिसते, ते लिहितात म्हणुन वाचक वाचतात्,वाचतात म्हणुन तसे मत बनते.
.............................................................
मेरे देशकी धरती सोना उगले उगले हिरे मोती..
हे गाणे जेव्हा लिहिले गेले, वाजवले गेले ,
तेंव्हा विदर्भातिल शेतकरी मोहाचा भड्डा खावुन जगत होता,खायला पुरेशे अन्न नव्हते असा अलिखीत इतिहास सांगतो.ही माणसे अजुन जिवंत आहेत. "आंखो देखी" सांगु शकतात.
.............................................................

अर्थक्रांती प्रतिष्ठान बद्दल वाचले आहे का? वरील अनेक प्रश्नांचे उत्तर त्यांच्या प्रस्तावातून मिळू शकतात. अर्थात त्या प्रस्तावांच्या implementation मधे आणि त्या मुळे काही उपप्रश्न तयार होतात. काही दिवसांपूर्वी मी त्याबद्दल मी एक चर्चेचा प्रस्ताव मी येथे मांडला होता.

सगळ्या प्रतिक्रिया नाही वाचल्या. हा लेख ज्या लेखावरून आला आहे त्या लेखाची लिंक कुठेही नसल्याने तो ही वाचू शकलो नाही.
शेतीवर आयकर लावण्यासाठी जी कारणे दिली जात आहेत ती फसवी आहेत. शेतीला कर लावायचा झाल्यास..

१. शेतीमालाच्या भावाला संरक्षण देणार का ?
२. एक रूपया इतकेही उत्पादनमूल्य नसलेले कोल्ड्रिक्सचे विक्री दर मात्र (मोठ्या बाटलीचे ) चाळीस रूपये हे ज्यांना चालते त्यांच्यासाठी नफ्यावर आधारीत शेतमालाची विक्री ही संकल्पना मान्य होईल का ?
३. साखर दोमशे रूपये किलो हा दर चालेल का ?
४. एकीकडे टोमॅटोला दर मिळत नाही म्हणून रस्त्यावर टोमॅटो फेकून द्यायचे प्रकार घडलेले आहेत त्याचवेळी मॅगी हॉट अँड स्वीटचे दर मात्र कमी होत नाहीत. शेतक-यांनी टोमॅटो खुल्या बाजारात न विकता बाहेरच्या देशात अथवा स्वतःच प्रक्रिया उद्योग उभारून बाटलीबंद उत्पादन म्हणून विकावेत का ?
५. ज्यांना आम्ही इथे मरतोय असे वाटतेय त्यांनी ज्याप्रमाणे आपण अमेरिकी दराप्रमाणे स्वतःचे वेतन घेतो त्याप्रमाणेच अमेरिकेप्रमाणेच शेतमालाचे भाव इथल्याही शेतक-यांना मिळावेत यासाठी पाठिंबा द्यायला काय हरकत आहे ? अमेरिकेमधे फ्रेश फूड ही लक्झरी आहे असे म्हणतात.. आपल्याला ती खूपच स्वस्तात उपलब्ध होते आहे..
६. सोने चार हजारावरून अठरा हजारांवर गेले, सर्व वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली, वेतनातली व्रूद्धीही चार आकडी पगारावरून सहा आकड्यापर्यंत गेली मग आजही दोन रूपये दराने आपल्याला भाजीची जुडी मिळावी का ?

याप्रमाणे शेतमालाचे भाव मुक्तपणे ठरवू दिल्यास कोण आरडाओरडा करेल ? देश अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण व्हावा असे धोरण असते त्याचे काय ? पुढा-यांकडे बोट दाखवून शेतक-यांवर आयकर लादण्याआधी या सर्व प्रश्नांची गांभीर्याने मिळायला हवीत. विनोदासाठी इतर अनेक विषय आहेत.. अंबानींनी गोदावरी खो-यात सरकारला कसे लुटले याचे विश्लेषण वर्तमापत्रांमधून आलेले आहे. पुढा-यांना पैसे कमावण्यासाठी शेतीच हवी असे काही नाही. इतरही धंदे दाखवून ते तूट दाखवू शकतात. आणि आयकर बसवल्यास आहेत ते लोकही शेती करणार नाहीत त्याचे काय ?

भारताची अन्नधान्याची गरज भागवणारा शेतकरी, त्याचे कष्ट आणि आयटीमधे एसीत बसून ऑर्कूट/ मायबोलीवर गप्पा हाणणा-यांचे कष्ट याची तुलना केली जाऊ शकत नाही.

<< सगळ्या प्रतिक्रिया नाही वाचल्या. हा लेख ज्या लेखावरून आला आहे त्या लेखाची लिंक कुठेही नसल्याने तो ही वाचू शकलो नाही.>>
...............................................
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक
.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................

मी सहमत आहे तुमच्याशी मुटेसाहेब. फ़क्त एकच अपेक्षा की सरसकट सगळ्या शेतकयांना एकच रेट लावु नये.
जामोप्यानी म्हटल्याप्रमाणे मार्जिनल रेट हा चांगला पर्याय ठरु शकेल.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे श्रीमंत शेतकर्यांची करचोरी पकडायला मदत होइल हे मात्र तितकेसे पटत नाही. कारण सामान्य शेतकयाची शेते जरी कोरडी राहात असली तरी श्रीमंत शेतकयाला ती समस्या नसते. कारण शेतीसाठी इतर खर्च करण्याची त्याची क्षमता असते. इकडचा लाखो रुपयाचा कर वाचवण्यासाठी शेतीवर चार पाच लाख खर्च करणे त्यांना अवघड नसते. पुन्हा शेतीतुन उत्पन्न मिळते ते वेगळेच. कारण त्यांच्या मालाला कुठेही प्राधान्य मिळते. तेव्हा माझ्या मते शेतकर्यांमध्ये वेगवेगळे उत्पन्न गट पाडुन त्यानुसार कराचे वेगेवेगळे रेट्स आकारता येतील का हे पाहायला हवे?

अन्यथा एखाद्या वर्षी समजा चांगले पिक आले आणि नेमका त्यानुसार जर कर भरावा लागला तर सामान्य शेतकयाला त्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फ़िरल्यासारखे वाटेल. यातुन कदाचीत पुन्हा मग करचोरीची नवे मार्ग शोधले जाती..

शेतकर्‍यांकडून कर घेण्यापेक्षा पी पी एफ सारखे एक शेतकरी विकास अकाउंट सरकारने उपलब्ध करुन द्यावे. त्यात शेतकर्‍याना त्यांच्या मर्जीनुसार पैसे ठेवता येतील, पण लगेच काढता येणार नाहीत, अशा बेताने ठेवण्याची व्यवस्था करावी. त्यावर ७-८ टक्के व्याज द्यावे. बाजारदरापेक्षा जरा जास्त द्यावे.

सरकार विकास कामांसाठी खाजगी बाजारातून १२-१५ टक्के व्याजाने कर्ज घेत असते. म्हणजे सरकारचा ५-७ टक्के फायदा होईल. तोच मिळालेला कर असे म्हणून सरकारने गोड मानून घ्यावे. ( गोड 'मानायला' काय जातंय, ते गोडच तर आहे!!! )

आता या अकाउंटला दुसर्‍या मार्गाने मिळवलेला पैसा जमा करुन व्याजाचा फुकट फायदा कुणी घेणार नाही, हे मात्र बघावे लागेल. अगदी अल्पभूधारकाना हे जमणार नाही, हे मान्य आहे. पण मधल्या फळीतील शेतकरी जे थोडेफार मिळवतात आणि साठवू शकतात, ते यात सहभागी होऊ शकतील. चारपाच वर्षानी साठलेले पैसे, व्याज बघितले की त्याना त्याची किंमत कळेल. नवेनवे लोक आपोआप येऊ लागतील. शेतकर्‍याकडून पैसा काढून घेण्यापेक्षा, त्याना विश्वासार्ह गुंतवणुकीचा एक मार्ग सरकारने उपलब्ध करुन दिला, तर अनेक प्रश्न सुटतील. बुडीत पतसंस्थेत हात पोळून घेणे थांबेल. सरकारला मोठे फंड्स उपलब्ध होतील आणि सहभागी होणार्‍याना भविष्याची तरतूद होईल.
मग कर कशाला हवा?

शेतकरी २० वर्षे राबला की त्याने हे पेन्शन घेऊन मोकळे व्हावे. मग भले मुलगाही शेतीच करणार असेल, तरी बिघडणार नाही. २० वर्षे राबणारी पिढी नंतर स्वस्थ बसून सुखाचे जीवन जगेल, हे बघायला हवे. हे टार्गेट असायला हवे.

उत्पादनखर्चाचा विषय पुन्हा मागे पडला. आहे हाच उत्पादनखर्च गृहित धरुन पुढच्या मुद्यावर चर्चेला सुरुवात करावे लागेल असे दिसते.

deleted

<< संरक्षण द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? कापसाला रू. ३००० प्रति क्विन्टल हे संरक्षण नाही का? >>
नाही. कापसाला रू. ३००० प्रति क्विन्टल भाव मिळण्याचा शासनाशी फारसा संबंध नाही.आंतरराष्ट्रिय बाजारपेठेच्या तुलनेने देशातील कापसाचे भाव काही खुप जास्त नाहीत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर रुईचे भाव कमी आणि देशांतर्गत बाजारपेठेत जास्त ही स्थिती उद्भवली तर चक्क आयात करुन कापसाचे भाव पाडते,हा आजवरचा इतिहास आहे.
याऊलट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर रुईचे भाव जास्त आणि देशांतर्गत बाजारपेठेत कमी अशी स्थिती उद्भवली तर निर्यातीला परवानगी देत नाही.
.... हा आजवरचा इतिहास आहे.
...............................................................
तुमच्या इतर मुद्द्यांचे स्पष्टीकरण नंतर कारण उत्पादनखर्चाचा मुद्दाच अजुन आपला स्पष्ट व्हायचा आहे.

deleted

<< हे योग्य धोरण आहे. जनतेला कमी भावात वस्तू व अन्नधान्य उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. >>
जनतेला कमी भावात वस्तू व अन्नधान्य उपलब्ध होण्याचा आणि शेतकर्‍यांना मिळणार्‍या किंमतीचा अर्थाअर्थी काहीही संबध नाही आणि त्यासाठी शेतकर्‍याला लुटायचीही गरज नाही.
आज अन्नधान्याचे भाव वाढलेले आहेत पण ही किंमत शेतकर्‍याच्या पदरात पडत नाहीये.
याविषयावर आपण बरीच चर्चा केलेली आहे.
कृपया खालिल चर्चा तपासावी.
.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
............................................

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
...........................................

चंपकजी,
जेट्रोपाबद्दल सुरुवातीला जेव्हडी चर्चा झाली त्या तुलनेने पुढे काहीच झालेले दिसत नाही.
गेल्या वर्षभरात मी साधी चर्चा देखील होताना पाहीलेली नाही.
..............................................................................
मला ऊसाचा उत्पादनखर्च पाहीजे होता.त्यात सर्व खर्चाचा समावेश आवश्यक आहे.

वर अप्रत्यक्ष उत्पन्नाचा उल्लेख बुवानी केला आहे. त्यात बचतीतुन होणारे उत्त्पन्न मिळवायचे का?
शेतकर्याची बचत खालीलप्रमाने होते.सगलेच मुद्दे सळ्याच शेतकर्‍याना लागु होतीलच असे नाही.
१.बर्र्‍याच शेतकर्‍याकदे दुभती गाय किवा म्हैस (कधी कधी एकपेक्शा जास्त)असते, ती चरायला गावभर फिरते ,त्यामुळे शेतकर्‍याची दुधाची सोय घरच्या घरी होते. वर्षभरातले ८ महिने जर हे दुध फक्त घरच्यांसाठी उपलब्ध असेल तर शहरातल्या नोकरदाराचा महिन्याला सरासरी दुधावरचा जो १५०० रुपये खर्च होत असतो तो शेतकर्‍याचा होत नाही.
२.पुण्यासारख्या शहरात जे भाड्याच्या घरात राहतात त्याचे सरसरी घरभाडे ७००० महिना जाते , जे स्वतःच्या घरी राहतात त्यांचे घर loanवर असेल तर EMI हा २०००० च्या घरातही जाउ शकतो.शेतकर्‍याचा तो खर्च होतो का?
३.शेतकरी परसदारी ज्या भाज्या,फळे लावतात ते शहरात शक्य नसते, आम्ही कडिपत्ता सुद्धा १ रुपया देउन विकत आणतो ,ती शेतकर्‍याची बचतच असते.
४.शहरात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी transport वर जो खर्च होतो, तेव्हडा खर्च शेतकर्‍यांचा होतो का?
५.कित्येक शेतकर्‍याना रानातील काटक्या कुटक्या सरपण म्हणुन (बिनाधुरीच्या चुलीसाठी),गोबरगस वापरल्यामुळे (वापरत नसतील तर इतरांची काय चुक?) शहरातल्या लोकांचा जो LPG वर खर्च होतो तो वाचु शकतो.
...
एका ओळखितल्या मुलीच किस्सा.पुण्यात HAमधे तिच्या नवर्‍याला शिपाइपदाची नोकरी होती.पगार वेतनआयोगाच्या नियमानुसार मिळत होता.असे असुनही त्याला नोकरी सोडायला लाउन तांदळवाडीला परत घेउन गेली.वरचे सगळे हिशेब तिने केलेच असणार. तिथे ५-६एकर शेतात चांगले चालले असावे. कारण पुण्यात परत येण्याचे नाव घेत नाही.तीने शेतातच ४-५ खोल्यांचे चांगले घर बांधले ,मोठी वास्तुशांत केली असेही ऐकण्यात आले.

१.बर्र्‍याच शेतकर्‍याकदे दुभती गाय किवा म्हैस (कधी कधी एकपेक्शा जास्त)असते, ती चरायला गावभर फिरते ,त्यामुळे शेतकर्‍याची दुधाची सोय घरच्या घरी होते. वर्षभरातले ८ महिने जर हे दुध फक्त घरच्यांसाठी उपलब्ध असेल तर शहरातल्या नोकरदाराचा महिन्याला सरासरी दुधावरचा जो १५०० रुपये खर्च होत असतो तो शेतकर्‍याचा होत नाही.

आणि शेतकर्‍याने ३०००० घालून ती म्हैस घेतलेली असते त्याचं काय?

२.पुण्यासारख्या शहरात जे भाड्याच्या घरात राहतात त्याचे सरसरी घरभाडे ७००० महिना जाते , जे स्वतःच्या घरी राहतात त्यांचे घर loanवर असेल तर EMI हा २०००० च्या घरातही जाउ शकतो.शेतकर्‍याचा तो खर्च होतो का?

खेड्यातला माणूसही म्हणू शकतो की. माझा मुलगा शिकायला मुंबईत आहे, त्याला हॉस्टेलचा खर्च आहे. ज्याचे मुंबईत घर आहे, त्याला हा खर्च नाही म्हणून..

३.शेतकरी परसदारी ज्या भाज्या,फळे लावतात ते शहरात शक्य नसते, आम्ही कडिपत्ता सुद्धा १ रुपया देउन विकत आणतो ,ती शेतकर्‍याची बचतच असते.

परसदाराच्या भाजीवर घर चालले असते तर शेती का केली असती लोकानी?

४.शहरात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी transport वर जो खर्च होतो, तेव्हडा खर्च शेतकर्‍यांचा होतो का?

ट्रान्स्पोर्टवर खर्च होतो तो तुमच्या इन्कम मधून करत असता. शेतकर्‍याला कुठे जायचे असेल तर तोही करेल.

५.कित्येक शेतकर्‍याना रानातील काटक्या कुटक्या सरपण म्हणुन (बिनाधुरीच्या चुलीसाठी),गोबरगस वापरल्यामुळे (वापरत नसतील तर इतरांची काय चुक?) शहरातल्या लोकांचा जो LPG वर खर्च होतो तो वाचु शकतो.

शहरातल्या लोकानीही गावात एकेकदा जाऊन सरपण गोळा करुन घरी न्यावे, कोण अडवले आहे?

आता फक्त एकच करा, खेड्यात ऑक्सीजनयुक्त हवा असते. त्याची एखाद्या बाँबे हॉस्पिटलमधल्या ऑक्सिजन सिलेंडरनुसार किंमत काढून शेतकरी किती श्रीमंत आहे, हे दाखवून द्या. Happy

Pages