शेतीवर आयकर का नको?

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2009 - 19:35

...............................................................................
या लेखापुर्वीची चर्चा अभ्यासण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................................................

------------------------------------------------------------------------------------------
मी नरेंद्र गोळे यांच्या मताशी शतप्रतिशत सहमत आहे. ( संदर्भ )
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकिय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
घरात पोटभर खायला नसुनही, मिशिवर ताव देवुन पाटीलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरुप समाजासामोर येईल.
आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी,दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये आणण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगुस चाललाय्,त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमता कशी,कुठुन आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडुन ते इतरांनाच जास्त अडचनीचे आहे.
आयकर लावल्यास गरिब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुनी बेंबीच्या देठापासुन ओरडत असेल तर त्यांना "माझं काय होईल',असे म्हनायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहीजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावु नये,नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल,
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही,कारण...
ज्याला आय नाही त्याला कर नाही,ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढोनपिढ्या लाचारासारखे जिवन जगन्यापेक्षा आर्थिक सुदृढ होवुन आयकरदाता शेतकरी म्हणुन सन्मानाने जगायला नक्किच आवडेल.
गंगाधर मुटे.
..............................................................................
२६-१२-२००९

बागायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
------------------------------------------------------------------------
=============================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
-----------------------------------------------------
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-------------------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
-------------------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
------------------------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
------------------------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००

----------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००

-------------------------------------------------------
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
- गंगाधर मुटे

=========================================

...........................................
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
............................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेची उधळपट्टी कशी करणार ? विहिरित पाणी असेल तेवढाच वेळ मोटार चालेल. रिकामी मोटर फिरली तर मोटार जळण्याची भिती असते.

धन्यवाद मधुकरराव अत्यंत उपयुक्त माहीती सादर केल्याबद्दल..

.........................................
<< शेतीला उद्योगाचा दर्जा दिला की त्याला कामगार कायदेही लागू होतील.- रॉबिनहूड
लेबर लॉ चं नविन भुत मानगुटिवर बसण्याची शक्याताही तेवढीच जास्त आहे.
१) Professional Tax 2) PF 3) ESI
पण यासाठी Employee या गटात मोडणारा कर्मचारी वर्ग असेल तर, आणि किमान कर्मचारी संख्या अशा ब-याच अटी लागु होतात. Contract Basis/Daily Basis / Voucher payment हे प्रकार आहेतच. तसही शेतीत Voucher payment प्रकार चालण्याचि जास्त शक्यता आहे.- मधुकर >>

--------------------------------------
लेबर लॉ लागायलाच हवा.
लेबर लॉ लागल्याने कामगारांना कलेक्टर एवढा पगार किंवा कामगारांना राहायला बंगला,फिरायला गाडी,ड्रायव्हर,पेन्शन द्यावे लागत नाही.किवा सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनही द्यावे लागत नाही.
लेबर लॉ लागला तरी किमान वेतन आयोगाचे निकषच लागु असतील,ज्या मध्ये कामगाराला फक्त जगता येईल एवढ्याच वेतनाची तरतुद आहे.
मग किमान तेवढे वेतन मिळणे हा त्याचा हक्क आहे.
आणि आपण तो का नाकारावा ?
-------------------------------------
पण आजची स्थिति अगदिच विपरित आहे.
देशातील बहुतांश भागात शेतमजुरीचे दर किमान वेतन कायद्यापेक्षा जास्त आहेत.
बर्‍याच भागात शेतमजुर मिळत नाही स्थिती आहे.
.....................................................

मुटेसाहेब...
नुसत्या शेतीवर मोठे झालेले किती लोक आहेत आपल्याकडे?
शेतीची तुलना इतर कारखानदारीशी करणे चुकीचे आहे....

आपल्या उत्पादनाची किंमत उत्पादक स्वःता ठरवतात. शेतीमधे मात्र व्यापारी ठरवतात.
चला आपण ऊसाचे उदाहरण घेऊ:

खर्च प्रत्येक एकर खालील प्रमाणे:

बियाणे : ३५०० रु.
नांगरट करणे: १५०० रु.
फण पाळी देणे: १००० रु.
सरी सोडणे: ९०० रु.
शेण खत : १००० रु.
शेणखत पसरुन टाकणे व वाफे तयार करणे: ५०० रु.
ऊस लागण मजूरी: २००० रु.
रासायनीक खते (लागणी पुर्वी): ४००० रु.
पहीले भांगलणः १५०० रु.
ऊस फोडणे: १५०० रु.
दुसरे भांगलणः १००० रु.
रासायनीक खते (भांगलणानंतर): १००० रु.
ऊस बांधणी: ५०० रु.
वर्षभर पाणी देणे (२४ वेळा): २४०० रु.
विज बिल: १५०० रु
ऊस तुटून गेल्यावरचा खर्चः १००० रु.
(Maintenance charges are not included above)
-------------------------------------
निव्वळ खर्चः २४८०० रु.
-------------------------------------
एकरी उत्पन्न ४० टन
(४० X २०००) = ८०,०००
-------------------------------------
निव्वळ नफा: ८०,००० - २४८०० = ५५,२०० रु.
-------------------------------------
उत्पन्न प्रती महीना (५५,२०० / १२) = ४,६००
-------------------------------------

आता लावा आयकर.
वरील आकडेवारी ही चालू वर्षामधील आहे.
यापेक्षा सरासरी जास्त उत्पन्न निघु शकत नाही. निघाले तर आनंदच आहे.
----------------------------------------
शेतकर्‍याला जोडधंदे व आंतरपिके यापासून वार्षीक १५,००० रु. वाढू शकतात.

पंकजजी,
खुप खुप धन्यवाद.
महत्वाची माहीती उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.
उत्पादन खर्च काढल्याबद्दल धन्यवाद.
...............................................
उसवाला गब्बर आहे असे ज्यांना वाटते त्यांनी पंकज यांचा हिशेब कुठे चुकतो हे शोधावे.
काही दुरुस्त्याही सुचवाव्या.
अन्य पिकाचे सुद्धा उत्पादन खर्च सादर करायला हरकत नाही.
.........................................
पंकज यांनी जो उत्पादन खर्च काढलाय त्यात खर्च म्हणुन खुप बाबींचा समावेश झालेला नाही.
त्या खर्चाचा समवेश झाला की एकरी नफ्याचे प्रमाण पुन्हा घटेल..

उत्पन्न प्रती महीना (५५,२०० / १२) = ४,६००

- हे १ एकराचे उत्पन्न झाले. महिन्याला ४६०० रू. मिळवणार्‍या शेतकर्‍यालाच काय पण नोकरदारालासुद्धा आयकर लागणार नाही. पण जे १० किन्वा जास्त एकरात उस लावतात त्यान्चे या हिशोबाने महिना ४६ हजाराहून अधिक उत्पन्न होईल. त्यात कर्जमाफी, फुकट / अल्पदराने दिली जाणारी वीज यान्चे अप्र्त्यक्ष उत्पन्न मिळवले तर महिना ५० हजाराहून अधिक उत्पन्न होईल. मग यान्नासुद्धा आयकर माफ करायचा का?

पंकज यांनी जो उत्पादन खर्च काढलाय त्यात खर्च म्हणुन खुप बाबींचा समावेश झालेला नाही.
त्या खर्चाचा समवेश झाला की एकरी नफ्याचे प्रमाण पुन्हा घटेल..

- पंकज यांनी जो नफा दाखवलाय त्यात कर्जमाफी, फुकट / अल्पदराने दिली जाणारी वीज, आयकर माफी इ. अप्र्त्यक्ष उत्पन्नाचा समावेश झालेला नाही. त्या उत्पन्नाचा समवेश झाला की एकरी नफ्याचे प्रमाण वाढेल.

मलाहि तेच म्हणायचे होते. कुठलाच शेतकरी फक्त एक एकर जमिनिवर शेती करत नाही. किमान ५ एकर धरल्यास मासिक उत्पन्न रुपये २३,०००/-व वार्षीक उत्पन्न २,७६,०००/-

२,७६,००० हे निव्वळ करमुक्त उत्पन्न होऊ शकतं.

ऊस आणि बागायती शेतकरी तर नक्कीच गब्बर असावेत.
उगीच नाही अनेक शेतकर्‍यांकडे भारी भारी गाड्या (कार) असतात.
लग्नकार्यात पण केवढा खर्च करतात.

बुवा,मधुकरराव
होत काय की आपण एखाद्या मुद्यावर चर्चा पुर्ण व्हायच्या आधी पुढील मुद्यावर निघुन जातो,त्यामुळे गोंधळ होतो आणि काढलेले निष्कर्श चुकिचे ठरु शकतात.
शेतीत नफा काय राहतो हे पहिल्यांदा पद्धतशीरपणे काढावा लागेल.
त्यासाठी थोडी मेहेनत घ्यावी लागेल.
पंकज यांनी काढलेल्या उत्पादन खर्चात खालिल बाबींचा समवेश नाही.
१) कर्जावरिल व्याज
२) शेतीचा इन्शुरन्स,
३) शेतजमिन, औजारे,बैलजोडी,वाहतुक साहित्य, विहिर,मोटारपंप,बांधबंदिस्ती,बैलांचा गोठा, शेतमाल साठवणुकीचे गोदाम,यांचा घसारा.
४) Maintenance charges
५) औजार दुरुस्ती.
ही यादी अपुर्ण आहे.सर्वांनी याविषयी मदत करावी म्हणजे यादी पुर्ण करता येईल.
यादी पुर्ण केल्यानंतर मग पद्धतशीर ताळेबंद तयार करता येईल.
...........................................................................
एका ऊस उत्पादक शेतकर्‍याकडे सरासरी किती एकर ऊसाची शेती गृहीत धरावी याविषयी मतप्रदर्शन होने आवश्यक आहे. याबाबी अंदाजे गृहीत धरणे योग्य नाही.

शेतजमिन, औजारे,बैलजोडी,वाहतुक साहित्य, विहिर,मोटारपंप,बांधबंदिस्ती,बैलांचा गोठा, शेतमाल साठवणुकीचे गोदाम,यांचा घसारा.

घसारा हा खर्च होऊ शकत नाही. तो कॅपिटल गेनमधून वजावट केला जातो, त्याचे कन्सीडरेशन कर कमी होण्यात होते.

<< शेतजमिन, औजारे,बैलजोडी,वाहतुक साहित्य, विहिर,मोटारपंप,बांधबंदिस्ती,बैलांचा गोठा, शेतमाल साठवणुकीचे गोदाम,यांचा घसारा.
घसारा हा खर्च होऊ शकत नाही. तो कॅपिटल गेनमधून वजावट केला जातो,
>>

ती वजावट वर काढलेल्या उत्पादनखर्चात धरली गेलेली नाही, ती धरावी लागेल की नाही?.

deleted

जागोमोहनप्यारे यांचे विधान कायद्याच्या दृष्टीने चूक आहे असे मला वाटते. घसारा हा खर्च मानला जातो आणि त्याची उत्पन्नातून वजावट नेहमीच घेता येते.

शरद

घसार्‍याची वजावट घेता येते. पण याचा अर्थ तो खर्च मानावा, असे नाही. व्यवसायातून नफा मिळवत असतानाच मशिनरीची झीज्देखील होत असते, त्याची मार्केट वॅल्यू कमी होते. ही कमी झालेली फरकाची किंमत म्हणजे घसारा. ती नफ्यातून वजा केली जाते.

आपल्याला मिळालेली रक्कम (विक्री करुन आलेली) म्हणजे नेट रिसिट्स.
नेट रिसिट्स मिळत असतानाच व्यवसायाचे खर्च देखील होत असतात.
वर्षाच्या शेवटी यातला फरक काढला की नेट प्रॉफिट मिळणार.

यानंतर टॅक्स कॅल्कुलेट करताना घसार्‍याचा संबंध येतो, आणि तो प्रॉफिटमधून वजा होतो. मग टॅक्सचा हिशोब.
लाकडी / लोखंडी फर्निचर टाईप वस्तूला साधारणतः १० टक्के आणि कॉस्प्युटरसारख्या वस्तूना साधारण २०-२५ टक्के घसारा धरतात. ( आमच्याकडे एवढ्याच वस्तू आहेत. Happy सी ए कडून डिटेल्स घ्या.) बैलाचा आणि गाईचा म्हसारा, चुकलो, घसारा कसा काढतात, ते काही अंदाज करतादेखील येईना. दीर्घकालीन झाडेझुडपे यांचा घसारा कसा काढायचा? ( असे झाले तर उद्या बायकोचाही घसारा वजावट म्हणून मागेल की कुणीतरी! :फिदी:) मला वाटते, घसारा हा निजीव वस्तूला लागू होतो. सजीव वस्तूला इजा झाल्यास त्याचा उपचाराचा/तत्सम खर्च वजा करता येतो. आणि ती वस्तूच नष्ट झाल्यास (उदा. प्राणी हरवला/मेला), त्याची मार्केट वॅल्यू नुकसान म्हणून क्लेम करता येईल. प्राणी निरुपयोगी झाला तरी त्याचा मेंटेनन्स खर्च हा वजा होईल. उत्पन्न मात्र शून्य असेल. यातून नुकसान क्लेम करता येईल. घसार्‍याचा संबंध बहुधा येणार नाही.. ( अरेरे, उगाचच डॉक्टर झालो. Sad )

मुटेसाहेब, आपल्या वरील मुख्य लेखाच्या पोस्ट बरोबर मी पुर्णपणे सहमत! Happy
आपण म्हणता ते प्रत्यक्षात घडणे अशक्य कोटीतले "सध्यातरी" वाटते
कारण, "डॊकी भडकवुन राडे" करायला अनेकानेक निमित्ते कशी वापरायची याचे भान सध्यस्थितीतील व गेल्या साठ वर्षात पुरते मुरलेल्या "~कॊ" राजकारण्य़ान्ना आहेच आहे, अन ते न पुरले, तर जोडीला हुकमी कायमस्वरुपी "ब्राह्मण्द्वेष्टेपणा" तर त्यान्च्या हातात १९४८ पासून मिळालेल कोलित आहेच आहे!

याबाबतच्या चालू राजकारणाबद्दलचे माझे विचार या व्यतिरिक्त अजुन मी इथे माण्डू शकत नाही!

आपण चान्गला विषय सुरू केलात, त्याबद्दल धन्यवाद

याउप्परही, शहरी "बाबू" लोकान्स जर हे श्रमकारण व अर्थकारण समजत नसेल, तर या निर्णय घेणाया व्यक्तिस, व बाष्कळ बडबड करणायास एक वर्षापर्यन्त एखादे शेत पिकवुन तिथे जगुन दाखवायला ठेवले पाहिजे!
मी कम्युनिस्टान्च्या विरोधी आहे, पण त्यान्ची काही तत्वे आत्यन्तिक शिरोधार्य आहेत हे नाकारता येत नाही, पण त्याच बरोबर त्या ती तत्वे भरतभूला नवि नसुन या ना त्या प्रकारात त्यान्ची अम्मलबजावणी येथे होतच होती बारा बलुत्यान्च्या वा अन्य रुपातून, हेच आम्ही इन्ग्रजी राजवटीत विसरुन गेलो! आता अवघड आहे सगळे

बुवा >>> पण जे १० किन्वा जास्त एकरात उस लावतात त्यान्चे या हिशोबाने महिना ४६ हजाराहून अधिक उत्पन्न होईल. त्यात कर्जमाफी, फुकट / अल्पदराने दिली जाणारी वीज यान्चे अप्र्त्यक्ष उत्पन्न मिळवले तर महिना ५० हजाराहून अधिक उत्पन्न होईल.
----------------------------------------------------------------------------

१० एकराहून जास्ती ऊस असणारे शेतकरी किती आहेत बुवा? किंबहूना १० एकर स्वःताची बागायत जमीन असणारे किती लोक आहेत?
कर्जमाफी झालीय पण ज्या शेतकर्‍याने शेतीसाठी कर्ज काढलेय त्याचे इतर कोणाचेही नाही. शिवाय ते कर्ज जिल्हा मध्यवर्ती मधूनच काढायला हवे. कर्जमाफी झालेल्यात जास्ती करुन जि. प. सदस्य, पंचायत समीती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, काही नोकरवर्ग असेच आहेत.
आज मी माझा ७/१२ घेऊन कोणत्याही बॅकेमधे गेलो तर किती बँका मला कर्ज देतील?
विजेबद्दल बोलावयचे झाले तर शेतकर्‍याला विज फुकट नकोच असे स्वःता शेतकरी म्हणतोय. फक्त वीज द्या... माझ्याकडे रोज ११ तास वीज नसते. असते ती पण खूप वेळा रात्री ११ ला येते त्यातही सातत्य कमीच.

आयकर लावायला शेतकरी स्वःता विरोध करणार नाहीत, पण आयकराबरोबर सरकारची पण काही कर्तव्य आहेत.
मिळालेला आयकरातून आजपर्यंत नोकरवर्गाला काय मिळते?
--- चांगले रस्ते? --------------- नाही
--- पुरेशी विज? --------------- नाही
--- आरोग्य सुविधा? --------------- नाही
--- चांगल्या शाळा? --------------- नाही
--- पिण्याचे पाणी? --------------- नाही
--- वहातूक सुविधा? --------------- नाही

मग गरीब, कमी शिकलेल्या शेतकर्‍याला काय मिळेल?
सरकारने वरील सुविधा आधी पुरवाव्यात (निदान ५०%) व नंतर त्यानी खुशाल आयकर लावावा. शेतकरी आयकर आनंदाने देतील.
तोच एकमेव दिलदार राजा आहे ( ***बळीराजा ***) ......
काय म्हणाल मुटेसाहेब?

पन्कज, मुद्दा चन्गला आहे
पण स्द्यस्थिती काय दिसते? सातवी पर्यन्तच्या वर्गान्ना केवळ तिन शिक्षक ही आजचीच परिस्थिती मी लिम्बिच्या गावी स्वतःच्या डोळ्यान्नी पाहून आलो आहे
रस्त्याबाबत काही न बोलणेच चान्गले
बियाणे/खते याकरता अनुदानित सप्लाय जाहिर अस्तो, प्रत्यक्षात किती चढ्या भावाने कसे मिनतवार्‍याकरीत खरेदी करावे लागते ते अनुभवल्याशिवाय समजणार नाही
गेल्या सिझनची पेपरमधिल बातमी होति की राजकिय हस्तक्षेपाने बियाणे अमक्या जिल्ह्यात किती जास्त व अमक्या जिल्ह्यात किती तुटवडा!
खरी गोष्ट अशी आहे की "बळीराजा बळीरजा" म्हणत उचलुन डोक्यावर आपटणे चालले आहे, व जोडीला "बळीराजा", तोच ज्यास "वामनाने" पक्षी बामणाने पाताळात धाडला हा जातीय प्रचार
या देशाचे म्हणण्ञापेक्षा सामान्य जनतेचे ब्रह्मदेवदेखिल येऊन रक्षण करु शकणार नाअही
नशिबाने महाराष्ट्राचा पूर्व भाग सोडला तर नक्षलवादाची लागण झालेली नाही, पण ही परिस्थिती यास अतिशय उपयुक्त आहे, महाराष्ट्रातील कॉन्ग्रेसी नेते मात्र ब्राह्मणद्वेष्टेपणाच्या मात्रेने नक्षलवादास थोपवुन धरु या धुन्दीत आहेत असे सर्वदूर दिसते, काही प्रमाणात ते यशस्वी देखिल होताहेत
पण महाराष्ट्र राज्य, मराठी माणूस, अन्ननिर्माणकर्ता म्हनून लाम्बवर बघितले तरे अन्धकारच दिसतो हे

अंधकाराला शेतकरीही कारणीभूत आहे.... १९५० साली एकेका माणसाच्या घरी २० एकर शेती होती. चार मुलं झाली... १९७० साली पाच एकर पर हेड. आता त्यातल्या एकाला चार मुलं/मुली झाल्या, तर मुलीच काय जावईही भांडत बसतात.... Sad , असे शेतकरी कमी आहेत का?

<< गंगाधर, तुला जो उत्पादनखर्च वाटतो आणि नफा वाटतो तो काढ आणि मग सान्ग की सर्व १०० टक्के शेतकर्‍यान्ची शेती वर्षानुवर्षे खरच तोट्यात आहे का? >> Buvaa | 23 December, 2009 - 13:24
<< गंगाधर मुटे यांचा प्रस्ताव खूप छान आहे... देवराम पळसकर | 23 December, 2009 - 13:53 >>

बुवाजी,हे खरे आहे की शेती तोट्याची हे माझे ठाम मत आहे.पण मला वाटते तेच सर्व खरे आणि बाकी सर्व चुक असे मी मानत नाही कारण ज्या अंगाने मी शेतीचा विचार केला त्या अंगाने शेती तोट्याची दिसत असेल पण कोनत्याही विषयाला अनेक अंगे असतात,बाजु असतात.कदाचित वेगळ्या अंगाने विचार केल्यास माझी मते चुकीची ठरु शकतात. म्हणुन शेती या विषयाची सांगोपांग चर्चा व्हावी असे मला वाटते.
एखाद्या उद्योग उत्पादनाचा उत्पादनखर्च काढणे फारच सोपे आहे,कुणालाही काढता येईल कारण त्याची मार्गदर्शक तत्वे,नमुने ठरलेली आहेत.
पण शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा ? हे काम एखाद्या सिएला सुद्धा सहज जमायचे नाही कारण त्याची मार्गदर्शक तत्वे,नमुने ठरलेली नाहीत. एखाद्या सिएने काढला तरी तो निर्दोष असणार नाही.
एकाअर्थाने शेतीविषयक सांगोपांग चर्चा करणे, शेतमालाचा उत्पादनखर्च काढायचा प्रयत्न करने ही ऐतिहासिक गोष्ट आहे कारण हे आजवर फारसे घडलेले नाही,आणि मला ते एकट्याला पेलणारे नाही,
या चर्चेत भाग घेणारे वेगवेगळ्या विषयातील जाणकार आहेत हे त्यांच्या प्रतिसादावरुन लक्षात येते. त्यांची मते माझ्यासाठी महत्वाचे ठरत आहेत. या मतांचा उपयोग करुन काही निष्कर्शांप्रत आपण नक्किच पोहचु शकु असा मला विश्वास मिळाला आहे.

.............................................

<< याउप्परही, लोकान्स जर हे श्रमकारण व अर्थकारण समजत नसेल, तर या निर्णय घेणाया व्यक्तिस, व बाष्कळ बडबड करणायास एक वर्षापर्यन्त एखादे शेत पिकवुन तिथे जगुन दाखवायला ठेवले पाहिजे!
limbutimbu | 23 December, 2009 - 15:13 >>

अगदी सहमत..
मी अनेकदा हेच म्हणत आलो की नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी प्रयोग शेती का सुरु करित नाहीत, कृषी विद्यापिठांकडे हजारो एकर जमिन आहे.तेथे ते किति खर्चात किती उत्पन्न घेतात हे जाहीर का करित नाही?
किंवा एखाद्या पिकाचा काय उपादन खर्च येतो हे शास्त्रियरित्या का शिकवत नाहीत? कृषी विद्यापिठांत सगळेच विषय असतात पण नेमका शेतमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा हाच विषय का नसतो?
.............
एका कृषी विद्यापीठाला हजारो एकर जमिन देवुन त्या शेतीत एक वर्ष उत्पन्न घेवुन त्या उत्पन्नावर कुलगुरुसहीत सर्वांना आपला उदरनिर्वाह करण्यांस सांगावे.शासकिय अनुदान बंद करावे.वर्षाशेवटी काय शिल्लक राहाते ते शेतकर्‍याला स्वानुभवाने दाखवावे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात असे किमान एखादे विद्यापीठ असणे अत्यंत आवश्यक आहे.

.............

<< आयकर लावायला शेतकरी स्वःता विरोध करणार नाहीत, पण आयकराबरोबर सरकारची पण काही कर्तव्य आहेत पंकज | 23 December, 2009 - 16:31 >>

अगदी बरोबर. त्यासाठीच मी शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा असे म्हटले आहे.
शेतकरी कर भरण्याचे कर्तव्य पार पाडेल आणि शेतीला मुलभुत व्यवस्था पुरविण्याचे काम शासनाला करावेच लागेल.

सध्या आपण प्राप्तिकर किंवा आयकराचा विचार करत आहोत. अर्थात घसारा हे करमुक्त उत्पन्न आहे; पण त्याचा उद्देश मालमत्तेच्या किंमतीतील घट स्वीकारणे आणि त्यासाठी प्रयोजन करणे असल्याने घसारा हे उत्पन्न धरता येणार नाही.

इतर खर्च वजा केले तर शेतकर्‍याच्या हातात काहीच रहात नाही हे सत्य आहे. फक्त जे जमीनदार आहेत, त्यांनाच कर लागेल. त्यामुळे शेतीवर प्राप्तिकर लावलाच पाहिजे.

शरद

एका ऊस उत्पादक शेतकर्‍याकडे सरासरी किती एकर ऊसाची शेती गृहीत धरावी याविषयी मतप्रदर्शन होने आवश्यक आहे.

एका ऊस उत्पादक शेतकर्‍याकडे सरासरी किती एकर ऊसाची शेती गृहीत धरावी याविषयी मतप्रदर्शन होने आवश्यक आहे.

याचा काय संबंध? दर एकरी उत्पन्न-खर्च काढले की झाले.

>>> एका ऊस उत्पादक शेतकर्‍याकडे सरासरी किती एकर ऊसाची शेती गृहीत धरावी याविषयी मतप्रदर्शन होने आवश्यक आहे.

माझ्या मते एका ऊस उत्पादक शेतकर्‍याकडे सरासरी दिड एकर (१.५ एकर) ऊसाची शेती गृहीत धरावी.
वरील सरासरी फक्त बागयती जमीन असणार्‍या शेतकर्‍यांच्या बाबतीत लागू होते. नुसती जिरायत जमीन असणारे सुद्धा शेकडो आहेत.

<< याचा काय संबंध? दर एकरी उत्पन्न-खर्च काढले की झाले. >>
एकरी उत्पन्न-खर्च काढण्यासाठी एक शेतकरी कमाल किती एकराची शेती करु शकतो हे लक्षात घ्यावे लागेल. कारण बरेच खर्च असे आहेत की ज्या खर्चांची विभागणी तो कसत असलेल्या एकुन शेतीवर होईल.जसे की बैलजोडी, बैलजोडी असेल तर तो खर्च संपुर्ण शेतिवर जाईल. मोटार पंप जळाल्यास दुरुस्तीचा खर्च आपण जेवढ्या एकराचे ओलित करित असु तेवढ्या एकरावर जाईल.
पहिला उत्पादनखर्च आपण एक शेतकरी-निव्वळ ऊसाची शेती-पुर्णतः बागायती शेती असे गृहित धरुन काढू.
इतर पिके आणि कोरडवाहु शेतीचा उत्पादनखर्च त्यानंतर काढण्याचा प्रयत्न करु.
लवकरच मी बागायती कापसाचा उत्पादनखर्च सादर करायचा प्रयत्न करतो.
उत्पादनखर्च शक्य तेवढा निर्दोश निघने आवश्यक आहे.

बागायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
...........................................

Pages