प्रश्न आणि प्रश्न

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नाही म्हणजे हे मायबोली, नेमकं आहे तरी काय?

हो ते सगळं ठीक आहे, तुम्ही हे दहा वर्ष करताय, पण त्याचा उद्देश काय?

तुम्ही सुरुवात कशी केली? प्लॅन काय होता आणि तो कितपत successful झाला?

पुढचा plan काय आहे? तो तुम्ही एकदा सांगून का नाही टाकत?

पैसे सुटतात का काही? का सगळ्या लष्कराच्या भाकर्‍या?

नाव मायबोली आणि मला तर कितीतरी पानं इंग्रजीत दिसतात ते कसं काय?

तुमची वेबसाईटची व्याख्या काय आहे हे स्पष्ट कराल का?

मला "वंदन करूनी धृतराष्ट्राचे, नंदन करूया महाराष्ट्राचे" हे गाणं मिळेल का?

खरंतर या कुठल्याही प्रश्नाचं माझ्याकडे याक्षणी उत्तर नाही. आणि उत्तर शोधुनही काढलं तरी ते महत्वाचं आहे का?

http://www.maayboli.com/about इथे म्हटल्याप्रमाणे
तुम्हाला, मायबोलीकरांना, मायबोली लाडकी वाटते, आपली वाटते. तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यातंच सगळं आलं, नाही का?

-Admin

विषय: 
प्रकार: 

अगदी खर माय नंतर मायबोलीच

छान, छान.. ऍडमिनने आपल्या मनीचे गुज आम्हा नविन हितगुजकरांना सांगावे हे खुपच छान...

साधना.

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

Forbidden
You do not have permission to access this document.
असं का येतंय वरची लिंक क्लिक केल्यावर?

मृ. मला नाही येत असे forbidden वगैरे काही, बहुदा मॉड लोकांना अधिकार नसावेत हे असे काही बघण्याचे Happy

--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

तो दुवा आता दुरूस्त केला आहे.

बहुदा मॉड लोकांना अधिकार नसावेत हे असे काही बघण्याचे <<< अय्या, मी कधी मॉड झाले? मला कळलंच नाही! Happy
धन्यवाद ऍडमिन -टीम!

सगल वाचुन मजा येतेय. चालु राहुद्या