Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जेलर धमाल आहे. काल रात्री
जेलर धमाल आहे. काल रात्री ऑफिसातुन आल्यावर बघीतला. माझे सगळे ऑफिसचे टेन्शन विसरलो. काही वेळा बिनडोकपणा बरा वाटतो. >>> + १
थिएटर मधे पाहिला असता तर रजनी फॅन्स ने काय गोंधळ घातला असता असे अनेक सीन्सच्या वेळी वाटून गेले. टेबलावरचा चष्मा (रजनीकांतच्या अलिकडच्या मूव्हीजमधे असतो तो) , अॅक्शन सिक्वेन्सच्या वेळी रजनी न दाखवता हातात त्याचा गॉगल दाखवायचा आणि कॅमेरा त्या गॉगलला फॉलो करतो हे सगळे रजनीचे स्टारडम आहे. आपण त्याच्या स्टारडमच्या अंमलाखाली नाहीत म्हणून हसायला येतं खरं, त्याच वेळी ही दृश्ये करोडो प्रेक्षकांना वेडं बनवतात ही जाणीव पण राहते.
ज्या वेळी तो जेलरच्या वेषात तरूण दाखवलाय तेव्हां सॅल्युट मारला. ७२ व्या वर्षी इतका भन्नाट दिसतो, शाहरूखला सीजीने दाखवूनही त्याचं वय लपत नाही. रजनी वयाला शोभेल अशा भूमिकेत आहे हे जास्त आवडलं.
रजनीचे सिनेमे गोविंदासारखे धमाल नसतात. ते त्याच्या भोवती फिरत राहतात. गावाचं, गल्लीचं, शहराचं, राज्याचं भलं करता करता तो लार्जर दॅन लाईफ बनतो आणि अधून मधून अॅक्शन करतो असे स्वरूप असते. अशा प्रकारच्या सिनेमांची आवड असणार्यांसाठी मस्त आहे.
(No subject)
नियत ची 10 मिनिटं पाहिली.खूप
नियत ची 10 मिनिटं पाहिली.खूप साधना कट बँग वाल्या बायका आहेत.नोटपॅड घेऊन बसावं लागेल कोण कोण आहे हे आठवायला.
द लॉस्ट स्ट्रेट हा इराणी
द लॉस्ट स्ट्रेट हा इराणी सिनेमा बघतोय.
२३ मिनिटे झालीत. अतिशय उच्च सिनेमा आहे. इराण इरा़क युद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर इराककडून झाला. त्यात होरपळलेले इराणी नागरीक आणि सैन्य. हा युद्धपट आहे पण आणि नाही पण. प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक आहे. पहिल्या फ्रेमपासून मातकट रंगाचा वापर केलेला आहे. चोहोबाजूंनी येणारे आवाज, गर्दी, त्यातून ऐकता येणारे नेमके संभाषण. काही सैनिक आता तेहरानला चाललेत तर काही युद्धभूमीवर.
तिकडे जाताना तिकडून परतणारे इराणी नागरिक आणि सैनिक यांचा निर्वासित कँप . हरवलेली मुलं, त्यांना घेऊन फिरणारे सैनिक. स्त्रिया आणि मुलांच्या जेवणाची सोय पाहणारे सैनिक आणि अशातच कॅमेरा एका बाजूला जातो.
त्यात रासायनिक अस्त्रांची भीषणता दाखवणारी दृश्ये २० व्या मिनिटाला येऊ लागली. इथे सिनेमा अंगावर येऊ लागला....
हा आता नंतर बघण्यात येईल.
नॉर्मलला येण्यासाठी पिसाळलेल्या बच्चनचा पुढचा एपिसोड बघावा लागणार..
नियत ची 10 मिनिटं पाहिली.खूप
नियत ची 10 मिनिटं पाहिली.खूप साधना कट बँग वाल्या बायका आहेत.नोटपॅड घेऊन बसावं लागेल कोण कोण आहे हे आठवायला.
>>> पुढे आपोआप कळत जाईल... कलायमॅक्स मध्ये निराश झाला कि इकडे या परत...
नीयत आवडला नाही. राम कपूर
नीयत आवडला नाही. राम कपूर आवडत नाही. पूर्ण बघू शकले नाही. कथा मनावर पकड घेत नाही. माझंच काही मिस झालं असेल म्हणून तीनदा रिव्हर्स केला व राम कपूरचा पोकळ बडेजाव व हाहाहुहु सहन केलं. विद्या बालन पूर्ण वेळ जॅकेट घालून वावरत होती व ते काढल्यावर एक कळकट बॅगी स्वेटर होतं. उत्कंठावर्धक नाही. जमला नाही. कुत्र्याला मारल्याचं वाईट वाटलं, माणसांचं काही वाटलं नाही. प्राजक्ता कोळी दिवसेंदिवस गोड दिसत चालली आहे. निकी अनेजा काय करत होती काही कळलं नाही. निरज कबी, दीपानीता शर्मा, अमृता पुरी हे वेगवेगळे आवडलेले आहेत, इथे फारशी छाप सोडत नाहीत. विद्या बालनचा वावरही लो एनर्जी किंवा हरवल्यासारखा वाटला.
जवान अत्यंत भिकारी टुकार
जवान अत्यंत भिकारी टुकार फालतू आहे.
मी तर खूप चांगले ऐकले
मी तर खूप चांगले ऐकले जवानबद्दल..
https://youtu.be/Uo2sz48a6UU?si=VhjUbIxwDMMtMxS0
जवान पब्लिक रिव्ह्यू
लोकं भर भरून कौतुक करत आहेत.
काही पेड रिव्ह्यू नाही की अजेंडा नाही..
बघूया आता माऊथ पब्लिसिटी वर कितपत चालतो..
https://youtu.be/se8YrWwtfkY
https://youtu.be/se8YrWwtfkY?si=1cSMF-jY3icoxGPn
हा पब्लिक रिव्ह्यू सुद्धा ऐका
यात वेगळी पब्लिक आहे
सर्व प्रकारच्या लोकांना तुफान आवडतं आहे असे वाटतेय..
आता अजून रिव्ह्यू बघायची गरज नाही..
थेट पिक्चर बघूया .. जय जवान.. जय शाहरूख खान.. बदाम बदाम बदाम
https://youtu.be/6Ez7knjqfZs
https://youtu.be/6Ez7knjqfZs?si=BAlY8nWOrRvkRmi1
हा व्हिडिओ मुद्दाम शोधून बघितला.
शाहरूख हे ट र
कमाल खानचा रिव्ह्यू..
त्यालाही पिक्चर चे आणि शाहरूख चे कौतुक करावे लागले.. गेम ओवर !
हे काय बरोबर नाय... ऋन्मेष ने
हे काय बरोबर नाय... ऋन्मेष ने अजून जवान पाहिला नाही??
पटले नाही आपल्याला...
विद्या बालनचा वावरही लो
विद्या बालनचा वावरही लो एनर्जी किंवा हरवल्यासारखा >>>> अरेरे
घाऊक प्रमाणात सिनेमे पाहिले
घाऊक प्रमाणात सिनेमे पाहिले तर काही काळाने ते लक्षात राहत नाहीत. शिंडलर्स लिस्ट असाच पाहिला आहे. त्यामुळे नीट आठवत नाही.
ओटीटी वरचे सिनेमे आता त्यामुळेच पाहून होत नाहीत. दोन प्लॅटफॉर्म्सचं सबस्क्रीप्शन संपल्यावर ते रिन्यू करायचं टाळलं. विनाकारण पैसे जातात.
शिंडलर्स लिस्ट असाच पाहिला
शिंडलर्स लिस्ट असाच पाहिला आहे. त्यामुळे नीट आठवत नाही.
->> कळला नसेल.. मलादेखील नाही कळला... मग गूगल केले कि समजला...
बरं.
बरं.
तुम्ही म्हणता ते मान्य करावंच लागेल. अॅडमिन आहात.
अर्रर्र ! लक्षात नाही आलं.
अर्रर्र ! लक्षात नाही आलं.
च्रप्स, तुम्हाला सांगितलेलं आहे आयडी उडवायला फार मेहनत करू नका. असाच उडवा.
बस का... सकाळ सकाळी मीच
बस का... सकाळ सकाळी मीच सापडलो का ...
बादवे - हड्डी बघितला... नवाज आणि अनुराग कश्यप... झी पाच..
जबरो आहे...
अरेच्चा ! अजून आहे आयडी..
अरेच्चा ! अजून आहे आयडी..
सिरीयसली ओ च्रप्स, नायतर असा वैयक्तिक हल्लेवाला प्रतिसाद देऊन आयडी राहतो का ?
लोक हो फुटकळ वादात रमू नका..
लोक हो फुटकळ वादात रमू नका.. तिथे जवान चा राडा सुरू झाला आहे.. तो एन्जॉय करा..
नीयत अगदीच कैच्याकैच आहे.
नीयत अगदीच कैच्याकैच आहे. विद्या बालनला वाया घालवले आहे.
नीयत 'नाइव्ह्ज आऊट'वरून घेतला
नीयत 'नाइव्ह्ज आऊट'वरून घेतला असावा असं ट्रेलर बघून वाटलं.
नुसता ढापलेला नाहीये तर
नुसता ढापलेला नाहीये तर भ्रष्ट आणि सुमार दर्जाचा आहे
नाईव्हज मध्ये निदान बॉण्ड जरा गंमत तरी आणतो
इथं विद्या बालन इतकी कंटाळवाणी थकलेली वाटते की हिला ऑफिसर आहे का रिटायर्ड होऊन आलीये हे कळत नाही
राम कपूर कितीही धनाढ्य दाखवला तरी तो बेगडी च वाटतो
मुळातच प्लॉट चोरलेला असल्यानं काय होणार याची उत्सुकता तिथंच संपते आणि कसं दाखवणार हे पहिल्या काही मिनिटात कळल्याने पुढं बघायची इच्छा ही मावळते
पाहिला जवान फायनली...
पाहिला जवान फायनली...
टोटल बारा चा क्राउड जाणार होता मात्र निघताना आणखी दोन फॅमिली ऍड झाल्या.... रात्री चा शो..डोक्याला बँडेड बांधून सगळे निघालो.. दोन कट्टर शाहरुख प्रेमी तर टक्कल करून आले होते...
आधी शाहरुख चा फोटो असणारा केक कापून सर्वानी तोंड गोड केले... नंतर बस मध्ये शाहरुख च्या गाण्याची अंताक्षरी आणि शाहरुख चे डायलॉग्स असा कार्यक्रम झाला...
थेटर मध्ये वातावरण शाहरुखमय झाले होते आधीच... नवीन चित्रपटाचे ट्रेलर सुरु झाले मात्र पब्लिक नुसतं शाहरुख शाहरुख शाहरुख असे ओरडत होते... हजार वेळा तरी शाहरुख चा जप झाला...
चित्रपट पैसा वसूल आहे हे सांगायला नकोच... अमिताभ बच्चन एके काळी एकटाच दहा बारा जणांना लोळवायचा.. ते पब्लिक के एक्सेप्ट केले तर इथले एक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही...
नयनतारा कडक दिसली आहे आणि अभिनयात शाहरुखपेक्षा किंचित जास्तच..... उगाच साऊथ लेडी सुपरस्टार नाही म्हणत तिला...
लार्गर ज्ञान लाईफ चित्रपट आहे...मिस नका करू... आपल्याला चार पाच वेळा बघून सगळे रेकॉर्ड ब्रेक करायचे आहेत...
जब्बारदस्त !!
जब्बारदस्त !!
बऱ्याच दिवसांनी दिसलात..
बऱ्याच दिवसांनी दिसलात.. मन्नत बाहेर गर्दीत भेटलो नंतर आज भेटतोय
जवान बघितला कि नाही...
https://www.youtube.com/watch
लल्लनटॉप - जवान न पाहण्याची चार कारणे
https://www.youtube.com/watch?v=A4-Sr4E09-I
एटली पर आरोप लग रहे हैं कि उन्होंने 'थाई नाडु' वाली डिट्टो कहानी पर 'जवान' बना दी.
Shahrukh Khan की Jawan की जो कहानी, डिट्टो वही कहानी Thaai Naadu नाम की तमिल फिल्म की है | Atlee
https://www.youtube.com/watch?v=WEeFfCtTlTM
लल्लनटॉप या पोर्टलशी आपण संवाद साधू शकता.
Thaai Naadu movie
https://www.youtube.com/watch?v=ATQfpEtjph8
तिकीटांच्या किंमती बघून कुणी गळेपडू आग्रह करणारे असेल तर त्यांनाच तिकीटाचा खर्च करता का असे विचारायला हरकत नाही. ओटीटीवर (नेटफ्लिक्स) पुढच्या महीन्यात येणार आहे. पैसे डंकी साठी राखून ठेवलेले बरे.
१.blumhouse's truth or dare
१.blumhouse's truth or dare इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
एक सहा सात मित्रमंडळीचा ग्रुप फिरायला जातो..तिथं एका पडक्या वास्तूत एक टुरिस्ट गाईड त्यांना घेऊन जातो..आणि सगळ्यांना एक खेळ खेळायला सांगतो..प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जाणार truth or dare, ट्रुथ निवडलं तर विचारलं जाईल त्या प्रश्नाचे खरे उत्तर द्यायचे, डेअर निवडलं तर जे करायला सांगितले जाईल ते करायचं...सोपा गेम वाटतोय ना.. पण जेव्हा त्या गाईडचा टर्न येतो तेव्हा तो ट्रुथ म्हणून हा गेम गम्मत नसून खरा गेम आहे, यातून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही.. जीथे जाल तिथे गेम पाठपुरावा करणार जर जे निवडाल त्याप्रमाणे केलं नाही तर डेथ कन्फर्म आणि पळून जातो..अब आयेगा कहानी मे मजा...स्केअरी, थ्रीलर, एंगेजींग सिनेमा.. बोअर होत नाही कुठेही..
२.The forest इंग्रजी नेटफ्लिक्सवर
एक स्कूल टिचर शाळेच्या पिकनिकला जाते एका जंगलात आणि हरवते.. तीची जुळी बहिण तीला शोधायला निघते..ते जंगल सुसाईड जंगल म्हणून प्रसिद्ध असते..चकवा, भुलभुलैय्या, चित्रविचित्र लोक्स, नेहमीचे घाबरवणारे हातखंडे..बोअर झाला नका बघू.
३.Extraction 2 बघितला ..जबरदस्त ऐक्शन थ्रीलर
४.Gerald's game
स्टीव्हन किंगच्या कादंबरीवर आधारित सिनेमा आहे
सायकॉलॉजिकल, हॉरर, थ्रीलर,भीतीदायक सिनेमा..चांगला आहे.
मी पण पाहिला गं ट्रूथ ऑर डेअर
मी पण पाहिला गं ट्रूथ ऑर डेअर.ओके आहे.त्यात ते सर्व विचारताना हसतात ते प्रचंड क्रिपी वाटतं.
त्यात ते सर्व विचारताना हसतात
त्यात ते सर्व विचारताना हसतात ते प्रचंड क्रिपी वाटतं.>>> होना.. स्माईल असाच क्रिपी आणि स्केअरी आहे प्राईमवर चा
जवान बघितला - एफर्टलेस
जवान बघितला - एफर्टलेस परफॉर्मन्स!! म्हणजे काही एफर्ट्सच घेतले नाहीयेत.
:). ‘डोकं चालवाल तर पैसे परत’ हे बहुदा सगळ्यांच्या काँट्रॅक्टमधलं मुख्य कलम असावं. टुकार सिनेमा.
Pages