मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद.
मला पुस्तक परिक्षण वगैरे लिहिता येईल की नाही माहित नाही. तसेच खुप अभ्यासपुर्ण पुस्तक असल्याने मला सगळ्यासंदर्भांचे निटसे आकलन व्हायचे आहे.
जमेल तसा प्रयत्न करतो.

मधे एक पुस्तक वाचले
पुस्तकाचे नाव - 'भिन्न'
लेखिका - कल्पना महाजन.

काही काही गोष्टी आपण वाचु देखील शकत नाही. पुर्णपणे HIV/AIDS च्या संदर्भातल्या सत्यकथा आहेत. आपले जगणे किती कोषातले आहे याची सतत जाणिव होते. नक्की वाचा.

अजुन एक पुस्तक वाचले ते म्हणजे टण्याने सांगितलेले श्याम मनोहरांचे 'उत्सुकतेने मी झोपलो'. छान आहे. भाषा छान आहे.

मधे एक पुस्तक वाचले भिन्न लेखिका आहेत कल्पना महाजन>>>>>>>>.
कविता महाजन.
"ब्र" ह्या पुस्तकाची लेखिका.

मी ही वाचले मागच्या आठवड्यात भिन्न कविता महाजनचे...
आणि वाचुन खुप सुन्न व्हायला झाले. किती वेगळे जग आहे बाहेरचे त्या एडस ग्रस्तांचे किंवा त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडणाया समाजातील त्या घटकांचे..HIV/AIDS कडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो हे मात्र नक्की....जरा वाचायला जड जाते..पण वाचावेच असे...

आता वाचतेय ते सोनली कुलकर्णीचे सो कुल..
तीने २००५ ते २००७ व्या दोन वर्षाच्या काळात लोकसत्ताच्या विवा पुरवणीत केलेले स्तंभ लेखन संपादित केले आहे... ललित लेखनाकडे झुकणारी शैली मात्र मस्त..वाचावेसे वाटणारे पुस्तक आहे....बरेच लेख अंतर्मुख करतात वाचताना..तीने घेतलेला या वैचारिक वेधात एक अभिनेत्री म्हणुन जाणवण्यापेक्षा ती त्यातुन प्रकर्षाने जाणवते एक संवेदनशील व्यक्ती म्हणुन..राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक आताच नोव्हे. ०९ मध्ये प्रकाशित झालेय..बरेच स्तंभ आधीही वाचलेले आहेत ..पण तरीही वाचावे अवर्जुन असे पुस्तक

चेतन भगतचं '२ स्टेट्स' वाचलं. बरं वाटलं. माझ्याकडे पीडीएफ आहे त्याची. कोणाला हवं असेल तर संपर्कमधुन मेल करा मला.

मी काल कविता महाजनच नवीन ग्राफिटी वॉल आलय या महिन्यात ते सुरु केलय्..

लोकप्रभातील ग्राफिटी वॉल हे तिच लोकप्रिय सदर या पुस्तक रुपात संकलित केलय्..डायरीवजा अनेक अनुभव ,भावनिक कोलाहल यात मांडलेय..लेखक म्हनुन जगताना आलेले बरेच अनुभव मनमोकळे पणेमांडलेय..अर्थात अजुन पुर्ण करतेय्..मग परत लिहिल..पण सुरवात तर आवडलीये

'बापलेकी' वाचलं. तसं छान वाटलं पुस्तक पण १-२ वडीलांचे लेख नसते तरी चालले असते असं वाटलं. कारण त्यांच्या मुली अगदी ५ वर्षांपेक्षा छोट्या आहेत(लेख लिहीला जातांना). शेवटी असलेलं विवेचन फारच अंगावर आलं अर्थात ते सत्य असल्यामुळे खुप वाईट वाटलं.

चेतन भगत चे टु स्टेट्स वाचले. मला आवडले. एकदोन न पटणा-या गोष्टी सोडल्या तर बरेचसे चांगले लिहिले आहे. काही काही वेळा तर मला ऑफिसमध्ये हसु आवरणे कठीण झाले (पिडिएफ वाचत होते)

द व्हाईट टायगर वाचले,स्लमडॉग मिलेनिअरला ऑस्कर मिळणे आणि ह्या पुस्तकाला बुकर मिळ्णे यात कमालीचे साम्य आहे. ठरवून लिहिलेली फॅब्रिकेटेड,शॉकिंग शैली, प्रचंड आणि हास्यास्पद प्रमाणात असलेले उथळ जनरलायझेशन्स आणि त्याहूनही संताप आणणारी गोष्ट म्हणजे 'भारत म्हणजे काय ते मलाच समजलयं' हा आव.
पण हे पुस्तक वाचून मला एका गोष्टीचा प्रचंड आत्मविश्वास वाटू लागला आहे ती म्हणजे मला साहित्याचे नोबेल किंवा किमान बुकर तरी मिळणे! एकदम सोपयं ते, फक्त मिडीया मॅनेज केला की झाले!

व्हाईट टायगर पाच मिनिटांत फेकुन दिले. आणि म्हणुनच टु स्टेट्स वाचायला घाबरत होते. पण नशिब. वेळ वाया गेला नाही.

मला ऑफिसमध्ये हसु आवरणे कठीण झाले
>>
सेम पिंच साधना. मलातर त्याच्या लग्नाच्या वेळच्या एका रितीला जाम हसु आलं होतं. 'मिकी माऊस' ला.. Rofl

मलाही... Happy

अजुनही बरेच प्रसंग आहेत.. परत एकदा वाचायला पाहिजे...

मला ऑफिसमध्ये हसु आवरणे कठीण झाले
>>
सेम पिंच साधना. मलातर त्याच्या लग्नाच्या वेळच्या एका रितीला जाम हसु आलं होतं. 'मिकी माऊस' ला..

>>>
हे कशाबद्दल आहे? मागे तर काही सन्दर्भ दिसत नाही Uhoh

नुकतंच "हसरे दु:ख" हे चार्ली चॅप्लिनचं भा.द्.खेर लिखित चरित्र वाचलं. छान आहे. दु:खातुन घडणार्‍या विनोदांच आकलन झालं. मोठी माणसं मोठ्ठी काहोअतात ते त्यावरुन कळलं. त्याचं हालाखीच जीवन वाचताना अश्रु आवरण कठिण होतं.

हे कशाबद्दल आहे? मागे तर काही सन्दर्भ दिसत नाही

कसे दिसणार जर ते मुळातच नाहीत तर..... Happy

चेतन भगत चे टु स्टेट्स वाचा, पुस्तक नसेल तर मला किंवा योगमहेला संपर्क करा. पिडिएफ मिळेल...

मुळीच नाही. मला त्या चेतन भगतची पुस्तके वाचण्याची मुळीच इच्छा नाही. साला एक तर इन्ग्रजीत लिहितो ... Angry

घाबरु नका. सोप्प्या इंग्रजीत लिहिलेय ;),
तसे मलाही त्याची आधीची पुस्तके अजिबात आवडली नव्हती. ५ पॉईंट.. तर पाच मिनिटात फेकले होते. पण हे पुस्तक सुखद धक्का आहे....

रारंगढांग मस्ट रीड आहे. नीशाणी....मी तीन वेळा वाचलय! जबरदस्त ब्लॅक कॉमेडी आहे. एक अतिशय विदारक सत्य विनोदी शैलीत रंगवलय. त्यावर सिनेमा पण आलाय. तो एवढा जमला नाहीये.

आता नुकतेच वाचले" कळशीच्या तिर्थावर " लेखकः शरत कुमार माडगूळकर.
हे गदिमांचे सुपुत्र. त्यांनी गदिमां विषयी ,एकंदर बालपणा विषयी लिहिलेल्या आठवणी आहेत. चरित्र किंवा आत्मचरित्र असे नाही म्हणता येणार पण इतक्या मोठ्या व्यक्तीमत्वाच्या छायेतले रम्य दिवस लिहिताना आपणास त्या काळात घेऊन जाण्या इतपत सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे.अनेक कऊटूंबिक घटनांचा घेतलेला वेध अजुन खूप जवळुन ओळख करुन देतो अण्णांविषयी त्यांच्या कुटुंबा विषयी.

प्रकाशक म्हणजेच त्यांचे मेहूणे आनंद अंतरकर आहेत. पण वाचावे असे पुस्तक आहे.

मी नुकतच संपवलय विनीता कामटेंच टु द लास्ट बुलेट ......

वाचताना चिड, असाह्यता अन कामटे विषयी गर्व अश्या संमिश्र भावना मनात येत होत्या.. इतक्या सोन्यासारख्या माणसांच्या कतृत्वा विषयी त्यांच्या निर्णय क्षमते विषयी जेव्हा अशा काही बातम्या त्या काळरात्री नंतर जाहिर केल्या गेल्या कि ते वाचुन चिड आल्या खेरीज रहात नाही. अन त्यामुळे किती मानसिक क्लेश त्यांना झाले असतील..

किती झपट्ल्यासारखे विनीताजींनी कष्ट घेतले ते सत्य उजेडात आणण्या साठी त्याला त्रिवार मानाचा मुजरा करावासा वाटतो..जितके पेपर मधे येणार्‍या बातम्यांवरुन , लिखाणा वरुन कामटे कळाले होते त्यापेक्षा कैक पटीने अतिशय सुंदर पणे ते आपल्या पुढे येतात..

अन जे सत्य २६ नोव्हेंबर बाबत समोर येते ते चिड अन असाह्यता याने आपल्या सारख्या सामन्यमाणसाला पण कोलमडुन टाकते......कदाचित ते तीनही शुरवीर वाचलेहि असते या कल्पनेने तर खुपच घुसमट होते..खरच वाचले असते..पण तो केवळ जर तर चा खेळ..सत्य केवळ हेच कि हे असे घडलेय..

अगदी आवर्जुन वाचावे असे पुस्तक...त्रास होतो वाचताना खुप्..पण वाचावेच

कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेली ही यादी -

http://www.indianexpress.com/news/tome-travelling/559205/0

राजकीय नेते, लेखक, चित्रपट तंत्रज्ञ व कलावंत यांनी या वर्षी वाचलेल्या पुस्तकांची ही यादी आहे. यात डॉ. मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, मीरा कुमार, जया जेटली, कपिल सिबल, सीताराम येचुरी, कानीकोळी हे राजकीय नेते, शशी देशपांडे, अरविंद अडिगा, विल्यम डॅल्रिंपल, शंकर, चेतन भगत, सुनील गंगोपाध्याय, गुरुचरण दास, अमिताभ कुमार हे लेखक, मीरा नायर, रसूल पुकुट्टी, अमिर खान, दिबाकर बॅनर्जी हे चित्रपटतंत्रज्ञ यांचा समावेश आहे.

(हा दुवा टण्यानं मला पाठवला. सध्या तो माबोवर फारसा येत नाही, म्हणून मी ही यादी इथे देतो आहे.)

Pages