न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे पोळ्या लिहायच्या राहिल्या. जो कोणी पुढचं हेडकाऊंट टाकेल त्यानी कृपया, चिकनच्या पुढे पोळ्या पण लिहा.

सांवसक्रुतीक खार्यखृम काय आहे?. Happy

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - (द. वडा?)
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन)
१३) विकु

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - (द. वडा?)
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन)
१३) विकु

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे)
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन)
१३) विकु

सायो, मुला बाळांना नाही आणणार? आण ग..

अनिलभाई, शेपुची भाजी अगदी हवीच असेल तर प्रत्येकीने एक जुडी शेपूची भाजी मायबोलीवरच्याच वेगवेगळ्या रेसिप्यांनी ट्राय केली तर ? Proud
झक्की, विनय या मंडळींनी आपलं शेपू वरचं मत अजून गुलदस्त्यातच ठेवलंय. Wink

शेपू म्हणजे काय? शाकाहारी की मांसाहारी? मासे का कुणि प्राणि? फळ, कंद, की पालेभाजी?

भाजी म्हणजे गोडाचा पदार्थ नसणारच!

काहीहि आणा! मला आपले बटाटे वडे, दहीवडे, भेळ, मसालेभात एव्हढे असले तरी पुरे. लाडवाक्का येणार म्हणजे लाडू असतीलच. नाहीतर फचिनच्या लग्नाचे असतीलच! आणि कुणाला मुलगा मुलगी झाली असल्यास, पेढा, बर्फी असेलच. तेंव्हा माझ्या खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला.

मै, तुझ्या हॉलचा पत्ता दे आणि झक्कि बारात सांगतायत तस हॉल दिसायच सिक्रेट पण शेअर कर. आणि हो फोन नं पण दे ग... हरवलो तर निदान फोन तरी करता येइल.

भाईंनी आधी वळलेलं शेपूट लिहिलं होतं Wink

मैचा हॉल मला तोंड पाठ झालाय. पण काय आता बाराकरांनी तारीखच अशी ठेवलीये की मी येऊ नये Uhoh

डीटेल डायरेक्शनस आणि पत्ता, फो नं. वगैरे सग्गळं कळवते, लवकरच Happy
बारा मधली चर्चा पाहून एक क्षण मीच कॅलेंडर पाहून घेतलं, आपण नक्की २३ जाने बुक केलाय की डिसें म्हणून Wink Happy

बघा!!.. नाही चर्चा केली तरी बोलायच, केली तरी बोलायच..

मगाशी बारात चर्चा चाललेली तेव्हा मी पण जाउन कॅलेंडर पाहिलेल Wink

शेपूट डकवून आणि शेपुची भाजी झुलु नृत्यातल्या स्कर्टसारखी कमरेला (अंगभर कपड्यांवरून) बांधून आले कुणी तर?

तर चालेल.. पण ती शेपू वासरहीत असावी....
(मला कुणी शेपू खायला सांगितल्यास त्यांना बेशुध्द पडेपर्यंत हिमेशची गाणी भाईंच्या आवाजात ऐकवण्यात येतील... ) Proud

त्यात वर विनयचा स्पिकर म्हणजे ट्रिपल.. Happy

शेपू वासरहीत असावी....>> आता ह्यात वासरं कुठुन आली. त्यांच्या हिताचा इथे काय संबंध. Happy

इन्डोनेशियात बोकडाच्या शेपटाचा काहीतरी पदार्थ करतात. तो तिथल्या लोकांच्यात फार प्रसिद्ध नि आवडता आहे. एकदा आम्ही आमच्या शोफरला सांगितले, तुला काय वाट्टेल ते जेवण घे, आम्ही पैसे देऊ. त्याने ते बोकडाचे शेपूट घेतले. आम्हाला ५० सेंटचा खड्डा (!) पडला! त्याबद्दल त्याला फार वाईट वाटत होते की, त्याने एव्हढा महागाईचा पदार्थ घ्यायला नको होता!!

Pages