Submitted by deepak_pawar on 17 March, 2023 - 11:58
आले कसे डोळ्यात पाणी ऐकुनी माझी कहाणी
का काळजी वाटे तुला ही सांग ना तू आज राणी.
डोळ्यातुनी या आसवा आता कशाला ढाळशी तू
वेडे कशी तू विसरली मी पोळलो तुझिया झळांनी.
आता कशाची टोचणी ही लागली तुझिया मनाला
तेव्हा कशाला वाट माझी सजवली तू कंटकांनी.
आली जरीही रात आता भारुनी अंधार सारा
माझ्या तरी या अंबराला उजळले या चांदण्यांनी.
मी चालताना वाट ती हातात होता हात जेव्हा
ती वाट काट्यांची तरीही बहरली होती फुलांनी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी चालताना वाट ती हातात होता
मी चालताना वाट ती हातात होता हात जेव्हा
ती वाट काट्यांची तरीही बहरली होती फुलांनी.>>
अगदी खरंं आहे.
छान.
छान.
वा! छानच आहे कविता.
वा! छानच आहे कविता.
केशवकूल, सामो, हरचंद पालव
केशवकूल, सामो, हरचंद पालव सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
छान कविता. पुलेशु.
छान कविता. पुलेशु.
अश्विनीमामी मनःपूर्वक धन्यवाद
अश्विनीमामी मनःपूर्वक धन्यवाद.
कविता आवडली.
कविता आवडली.
अस्मिता मनःपूर्वक धन्यवाद
अस्मिता मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान कविता...
खूप छान कविता...
छान - छान .कविता लिहिण्यात माहिर झालात दिपक तुम्ही...
रूपाली मनःपूर्वक आभार.
रूपाली मनःपूर्वक आभार.